"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

 

*29/06/24 शनिवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

*Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*

*⌘⌘⌘✽⌘⌘✪⌘⌘✽⌘⌘⌘*

   *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

     *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

    *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
       🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

https://urlzs.com/dmQmp
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]    ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *29. जून:: शनिवार* 🍥
━═•●◆❃★❂★❃◆●•═━
ज्येष्ठ कृ.८, पक्ष :शुक्ल पक्ष,
      तिथि ~अष्टमी,
   नक्षत्र ~उत्तराभाद्रपदा,
योग ~शोभन, करण ~कौलव,
सूर्योदय-06:04, सूर्यास्त-19:20,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]       ❂ सुविचार ❂*
  ━┅━▣◆★✪★◆▣═┅━

29. *हाव सोडली की मोह संपतो आणि मोह संपाला की दुःख संपते.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●═━

29. *थेंब थेंब तळे साचे*
             ★ अर्थ ::~
थोड्या बचतीमधून मोठा संचय होणे
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━

29. *नास्त्युद्यमसमो बन्धु: ।*
          ⭐अर्थ :: ~
  उद्योगासारखा दुसरा मित्र नाही.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━

          🛡 *29. जून* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★हा या वर्षातील १८० वा (लीप वर्षातील १८१ वा) दिवस आहे.

        ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●२००१ : ज्येष्ठ शास्त्रज्ञ कृष्ण दामोदर अभ्यंकर यांना एम. पी. बिर्ला पुरस्कार जाहीर
●२००१ : पण्डित हृदयनाथ मंगेशकर यांना ’नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार’ जाहीर
●१८७१ : ब्रिटिश पार्लमेंटने कामगार संघटनांना परवानगी देणारा कायदा केला. यापूर्वी कामगार संघटना स्थापन करणार्‍यांना व अशा संघटनांच्या सदस्यांना ब्रिटनमधून तडीपार करुन ऑस्ट्रेलियात पाठवले जात असे.

    ~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९३४ : कमलाकर सारंग – रंगकर्मी, निर्माते, दिग्दर्शक व लेखक
◆१९०८ : प्रतापसिंग गायकवाड – बडोद्याचे महाराज
◆१८९३ : प्रसंत चंद्र महालनोबिस – भारतीय संख्याशास्त्राचे जनक, ’इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्युट’ चे संस्थापक
◆१८७१ : *श्रीपाद कृष्ण कोल्हटकर – नाटककार, वाङ्‌मय समीक्षक व विनोदी लेखक*

      ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०१० : प्रा. शिवाजीराव भोसले – विचारवंत, वक्ते व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू (जन्म: १५ जुलै १९२७)
●२००० : कॅप्टन वासुदेव श्रीपाद बेलवलकर – ऐतिहासिक कादंबरीकार
●१९९३ : विष्णुपंत जोग – ’चिमणराव-गुंड्याभाऊ’ मधील गुंड्याभाऊची भूमिका अमर करणारे गायक अभिनेते
●१९९२ : शिवाजीराव भावे – सर्वोदयी कार्यकर्ते
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
  ━┅━▣◆★✧★◆▣═┅━

29.  *✸ बहु असोत सुंदर ✸*
     ●●●●●००००००●●●●●
बहु असोत सुंदर संपन्‍न की महा
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा

गगनभेदि गिरिविण अणु नच जिथे उणे
आकांक्षांपुढति जिथे गगन ठेंगणे
अटकेवर जेथले तुरंगि जल पिणे
तेथ अडे काय जलाशय नदाविणे ?
पौरुषासि अटक गमे जेथ दु:सहा

प्रासाद कशास जेथ हृदयमंदिरें
सद्‍भावांचीच भव्य दिव्य आगरें
रत्‍नां वा मौक्तिकांहि मूल्य मुळी नुरे
रमणीची कूस जिथे नृमणिखनि ठरे
शुद्ध तिचे शीलहि उजळवि गृहा गृहा

नग्‍न खड्ग करिं, उघडे बघुनि मावळे
चतुरंग चमूचेही शौर्य मावळे
दौडत चहुकडुनि जवें स्वार जेथले
भासत शतगुणित जरी असति एकले
यन्‍नामा परिसुनि रिपु शमितबल अहा

विक्रम वैराग्य एक जागि नांदती
जरिपटका भगवा झेंडाहि डोलती
धर्म-राजकारण समवेत चालती
शक्तियुक्ति एकवटुनि कार्य साधिती
पसरे यत्कीर्ति अशी विस्मयावहा

गीत मराठ्यांचे श्रवणीं मुखीं असो
स्फूर्ति दीप्‍ति धृतिहि जेथ अंतरी ठसो
वचनिं लेखनींहि मराठी गिरा दिसो
सतत महाराष्ट्रधर्म मर्म मनिं वसो
देह पडो तत्कारणि ही असे स्पृहा
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      ❂ प्रार्थना ❂*
━┅━▣◆★✧★◆▣━┅━

29.  *✹ तुझे सूर्यदेव नाव ✹*
      ✶✶✹✹★●★✹✹✶✶
पूर्वेच्या देवा तुझे सूर्यदेव नाव
प्रभातीच येशी सारा जागवीत गाव

विधाता जगाचा तूची उधळीत आशा
उजळिशी येता येता सभोवती जग दिशा
रथ तुझा सोनियाचा धावे भरधाव

अंधारास प्रभा तुझी गिळे प्रभाकर
दिवसा तू ज्ञानदीप लावी दिवाकर
सृष्टीला या चैतन्याचा तुझा पेहराव

पुष्पपत्रदानाची रे तुला नसे आस
तूच चालुनिया येशी माझिया घरास
भक्ताठायी गुंतलासे तुझा भक्तिभाव
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    ❂ बोधकथा ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

29. *❝ परिस्थिती चा सामना ❞*
     ━═•●◆●★◆★●◆●•═━
     एकसारख्या दिसणाऱ्या दोन घरांमध्ये दोन वेगवेगळ्या व्यक्ती रहात होत्या. पहिल्या घरामध्ये एक सेवानिवृत्त आजोबा आणि दुसऱ्या घरामध्ये गलेलठ्ठ पगाराचा आय. टी. इंजिनिअर.

          घराच्या कुंपणासाठी एकाच प्रकारची शोभेची झाडं दोघांनी लावली होती. इंजिनिअर साहेब आपल्या झाडांना भरपूर पाणी आणि खत देत असे. आजोबा मात्र फारचं थोडं पाणी आणि खत देत असत. इंजिनिअर साहेबांची झाडं एकदम भरगच्च आणि घनदाट वाढली होती, आणि आजोबांची झाडं टुमदार, छान अंग धरून होती.

          एका रात्री अचानक जोराचा वारा आणि पाऊस आला. दुसऱ्या दिवशी सकाळी नेमकं काय घडलाय हे पाहायला दोघेही घराबाहेर आले. समोरच चित्र पाहून इंजिनिअर साहेबांना धक्काच बसला. कारण त्यांची सर्व झाडे अगदी मुळापासून उखडून पडली होती आणि आजोबांची मात्र छान शाबूत होती.

          इंजिनिअर साहेब विचारात पडले, भरपूर पाणी आणि मुबलक खत देऊनसुद्धा एका साध्या वाऱ्यात आणि पावसात माझ्या झाडांची अशी दशा आणि गरजेपेक्षा कमी गोष्टी मिळणाऱ्या आजोबांची झाडे जशीच्या तशी. शेवटी न राहून इंजिनिअर साहेबांनी आजोबांना याचे कारण विचारले.

          त्या निवृत्त आजोबांचे उत्तर म्हणजे आजच्या सर्व पालकांसाठी खूप मोठी शिकवण आहे.
          आजोबा म्हणाले "इंजिनिअरने झाडांना लागणाऱ्या सर्व गोष्टी पुरविल्या पण अति प्रमाणात आणि त्यामुळेच झाडांची मुळे पोषणाच्या शोधार्थ खोलवर गेली नाहीत. तेच मी माझ्या झाडांना गराजेपुरतेच किंवा थोडे कमी खत आणि पाणी दिले, त्यामुळेच त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी झाडांची मुळे खोलवर गेली. इंजिनिअर साहेबांच्या झाडाची मुळे खोलवर गेली नसल्याने थोड्याश्या वाऱ्याला आणि पावसाला बळी पडले. माझ्या झाडांची मुळे खोलवर गेल्याने त्यांना मजबुती मिळाली आणि वाऱ्याला आणि पावसाला न जुमानता माझी झाडं मस्त उभी आहेत."

          *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
    *मुलावरील संस्कार करतांना पन हीच काळजी घ्यावी जेणेकरून लहान संकट आले तरी मुले आत्महत्या सारखा विचार पन करणार नाही आणि जोमाने संकटाचा सामना करतील*       
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═━l┅━

29.     ठेचा  तर  लागत  राहतीलच
   ती  पचवायची  हिम्मत ठेवा...
      कठीण  प्रसंगात  साथ  देणाऱ्या
   माणसांची  तुम्ही  किम्मत ठेवा...!!
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅═▣◆★✧★◆▣═┅━

29. *✿  राष्ट्रीय माहिती ✿*
      ◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑      
*◆ भारतातील पहिला अंतराळवीर कोण?*
➡ राकेश शर्मा

*◆ अवकाशयात्री पहिली महिला कोण?*
➡ कल्पना चावला

*◆पहिली भारतीय विश्वसुंदरी कोण?*
➡ ऐश्वर्या रॉय

*◆ भारतातील पहिली महिला राष्ट्रपती कोण?*
➡ सौ.प्रतिभाताई पाटील

*◆महाराष्ट्राने भारताचा किती टक्के भाग व्यापलेला आहे?*
➡ ९.७ %
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

29. *❒श्रीपाद कृष्ण कोल्हटकर❒* 
     ━═•●◆●★◆★●◆●•━━
    मराठीतील आद्य विनोदी लेखक,
    नाटककार, कवी व समीक्षक
     *_"यांच्या जयंती निमित्त_*
         *_विनम्र अभिवादन"_*
          🌷🔹🌼🔹🌷
●जन्म :~  २९ जून १८७१
●मृत्यू :~ १ जून १९३४

        हे मराठीतील आद्य विनोदी लेखक, नाटककार, कवी व समीक्षक होते. *"बहु असोत सुंदर, संपन्न की महा" या महाराष्ट्रगीताचे रचनाकार* म्हणून ते सुपरिचित आहेत.

      त्यांचे १० वी पर्यंतचे शिक्षण अकोला येथे झाले. वडील अमरावती येथे शिक्षक होते. कोल्हटकरांना लहानपणापासून नाटकांची आवड होती आणि वडिलांमुळे त्यांना अनेक नाटके पाहता आली. १०वी नंतर डेक्कन कॉलेज, पुणे येथे गेले. पुण्यात शिकत असतांना त्यांना शिवराम महादेव परांजपे, वि. का. राजवाडे, एस. एस. देव यांच्यासारखे शिक्षक लाभले. इ.स. १८९१ मध्ये कोल्हटकरांनी पहिल्यांदा संस्कृत नाटक मृच्छकटिकमध्ये अभिनय केला. तसेच शिकत असतांनच विक्रम शशिकला या नाटकावर कोल्हटकर यांनी लिहिलेली समीक्षा विविधज्ञानविस्तारमध्ये प्रसिद्ध झाली होती. इ.स. १८८७ साली कोल्हटकरांनी एल एल. बी. चे शिक्षण पूर्ण केले व ते अकोला येथे आपला व्यवसाय करू लागले. १९०१ साली कोल्हटकर बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथे वास्तव्यास गेले.

         *◆ पुरस्कार व गौरव ◆*
    कोल्हटकर पुणे येथील दुसऱ्या कविता संमेलनाचे आणि पुणे येथे इ.स. १९२७ साली भरलेल्या १३ व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.

       मराठी लेखक गंगाधर देवराव खानोलकर यांनी कोल्हटकरांचे चरित्र लिहिले आहे. याखेरीज खानोलकरांनी कोल्हटकरांच्या संकलित लेखांचा "कोल्हटकर लेखसंग्रह" या नावाचा संग्रहग्रंथही संपादला आहे.

     कोल्हटकर ज्योतिषतज्ज्ञदेखील होते. ते तिसऱ्या ज्योतिष परिषदेचे अध्यक्ष होते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹✹★✹◑◎●••
             *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌

*❁ शनिवार ~ 29/06/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment