*29/09/25 सोमवारचा परिपाठ*
❂••⊰❉⊱•⊰❉⊱•⊰❉⊱••❂
*महाराष्ट्र शिक्षक परिवार*
*❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀*
 *💲शालेय परिपाठ💲*
❉⌘❉⌘✽⌘✪⌘✽⌘❉⌘❉
    🇮🇳 *राष्ट्रगीत*  🇮🇳
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ 
    ♦ *प्रतिज्ञा* ♦
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ 
    🇮🇳 *संविधान* 🇮🇳
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ 
   🌀 *महाराष्ट्र गीत* 🌀
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
💎 *सर्वप्रकारची शैक्षणिक माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी...*
 🔘 *"माझी शाळा" ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
  🔗🔗👇👇🔗🔗
https://goo.gl/eDeLY7
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
 ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *29. सप्टेंबर:: सोमवार* 🍥
 ⫹⫺⫹⫺⫹⫺⫹⫺⫹⫺⫹⫺⫹⫺⫹⫺⫹⫺
 आश्विन शु.७, पक्ष :शुक्ल पक्ष,
तिथि ~सप्तमी, नक्षत्र ~मूळ, 
योग ~सौभाग्य, करण ~वणिज, 
सूर्योदय-06:28, सूर्यास्त-18:29,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]      ❂ सुविचार ❂*
  ━┅━═▣◆★✪★◆▣═━┅━
29. *प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो तोच खरा माणूस.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
29. *आधी पोटोबा मग विठोबा* –
  ★ अर्थ ::~ अगोदर पोट भरावे मग देवास आळवावे
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
29. *सत्यं वद । धर्मं चर ।*
            ⭐अर्थ ::~
 खरे बोल. धर्माचरण कर.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
  🛡 *★ 29. सप्टेंबर ★* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★ आंतरराष्ट्रीय कॉफी दिन
★ हा या वर्षातील २७२ वा (लीप वर्षातील २७३ वा) दिवस आहे.
        ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
 🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●२०१२	:	अल्टमास कबीर यांनी भारताचे ३९ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
●२००८	:	’लेहमन ब्रदर्स’ आणि ’वॉशिंग्टन म्युच्युअल’ या बड्या वित्तीय संस्थांनी दिवाळखोरी जाहीर केल्यामुळे न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजचा ’डाऊ जोन्स’ निर्देशांक एका दिवसात ७७८ ने कोसळला. ही अमेरिकन शेअरबाजारात एका दिवसात झालेली सर्वाधिक घट आहे.
●१९९१	:	हैतीमधे लष्करी उठाव
●१९६३	:	’बिर्ला तारांगण’ हे आशियातील पहिले तारांगण कोलकाता येथे सुरू झाले.
●१९४१	:	दुसरे महायुद्ध – किएव्हमधे नाझींनी ३३,७७१ ज्यूंना ठार मारले.
●१९१६	:	जॉन डी. रॉकफेलर हा १ अब्ज डॉलर संपत्ती असलेला पहिला मनुष्य ठरला.
     ~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
 🔸•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔸
◆१९४३	:	लेक वॉलेसा – नोबेल पारितोषिक विजेते पोलंडचे राष्ट्राध्यक्ष
◆१९३२	:	महमूद – विनोदी अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता 
◆१९२८	:	ब्रजेश मिश्रा – राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार 
◆१९०१	:	एनरिको फर्मी – न्यूट्रॉन कणांवरील संशोधनासाठी १९३८ चे पदार्थविज्ञानातील नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन-भौतिकशास्त्रज्ञ
       ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
 🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९१	:	उस्ताद युनुस हुसेन खाँ – आग्रा घराण्याच्या ११ व्या पिढीतील गायक 
●१९१३	:	रुडॉल्फ डिझेल – डिझेल इंजिनचा संशोधक 
●१८३३	:	फर्डिनांड (सातवा) – स्पेनचा राजा 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..
     https://goo.gl/ghuC48
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂* 
  ━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
29.     *✹ जयो स्तुते ✹*
        ●●●●००००००●●●●
रक्षिण्यास चालले, जवान मायभूमीते
दिंगत किर्ती वाढवा, जयो स्तुते, यशो स्तुते ll धृ.ll
वाजतात नौबती, रक्त हो उधाणले
कंपिल्या दिशा दहा, धुंद वायु मंडळे
लाख लाख अंतरात दिव्य ज्योत जागते ll १ll
प्रचंड यज्ञ मांडिला, राष्ट्र सिध्द जाहले
काम, दाम, यज्ञदान रक्त्कुंड पेटले
भेदभाव संपले,प्रणाम लोकदेवते ll २ll
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      ❂ प्रार्थना ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
29. *❂ आनंदाचे डोही आनंद ❂*
         ✶✶✹✹★●★✹✹✶✶
आनंदाचे डोही आनंदतरंग ।
आनंदचि अंग आनंदाचे ॥१॥
काय सांगो जालें कांहींचियाबाही ।
पुढें चाली नाहीं आवडीनें ॥२॥
गर्भाचे आवडी मातेचा डोहळा ।
तेथींचा जिव्हाळा तेथें बिंबे ॥३॥
तुका ह्मणे तैसा ओतलासे ठसा ।
अनुभव सरिसा मुखा आला ॥४॥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    ❂ बोधकथा ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
29.  *❃❝ राक्षसी प्रवृत्त्ती ❞❃*
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
     एक राक्षस होता. त्याला आपल्या सर्व कामासाठी एका माणसाची गरज होती. त्याने शोधाशोध करून एका माणसाची नियुक्ती केली. तो माणूस खूप सज्जन होता. राक्षस सांगेल ते कोणतेही काम तो पूर्ण करत असे. तो अविरत काम करत असे. मात्र राक्षस आपली वाईट प्रवृत्ती दाखवून द्यायचाच. तो त्याला सतत धमकावत असे. कामात त्याला विलंब झालेला चालत नसे. माणसाने जरा जरी कामात विलंब केला तरी मी तुला मारून टाकीन असे धमकी वजा राक्षस बोलत असे. माणूस राक्षसाच्या भीतीने घाबरून आणखी वेगाने काम करत असे. माणूस विचार करायचा की आपण जर काम नीट केले नाही तर आपल्याला हा राक्षस मारून तर टाकायचा नाही ना. एकेदिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत तो सतत काम करत होता. तो इतका थकला होता की त्याला सुस्ती येऊ लागली. त्याला एक पाऊलही टाकवेना. थोड्या वेळाने राक्षस आला. माणसाला बसलेला पाहून राक्षस ओरडला,’’ तुझी अशी रिकामे बसून राहण्याची हिंमत झालीच कशी, चल उठ कामाला लाग नाही तर मी तुला खाऊन टाकीन.’’ राक्षसाच्या धमकीने माणूस घाबरला. त्याच्या मनात विचार आला की तू माणूस आहे व तो राक्षस आहे. धमकाविणे हे त्याचे काम आहे. तू जोपर्यंत याला घाबरशील तोपर्यंत हा तुला घाबरवत राहणार. एकदा का होईना याला प्रत्युत्तर दिलेच पाहिजे. शेवटी माणसाने मनाची तयारी केली. आता जे होईल ते होईल पण याला उत्तर हे द्यायलाच हवे हा पुरुषार्थ त्याच्या मनात जागृत झाला व तो राक्षसाला म्हणाला,’’ सारखे सारखे खाऊन टाकण्याची भाषा कशाला करतोस, खायचे असेल तर मला खाऊन टाक म्हणजे मी पण एकदाचा सुटलो.’’ त्याची ही हिंमत पाहून राक्षसाने आपले वागणे बदलले.
      *🌀❝ तात्पर्य ❞ ::~* 
   रोजच्या जीवनातही बरेच राक्षस घाबरवत असतातच पण त्यांना किती किंमत द्यायची हे आपणच ठर वायचे असते. ज्या दिवशी आपल्यातील भीती सोडून आपण चालु तेव्हा ही राक्षसी प्रवुत्ती आपोआप गप्प बसते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
29.    *"ध्येय दुर आहे म्हणून रस्ता*
                   *सोडू नका,*
           *स्वप्नं मनात धरलेलं कधीच*
                      *मोडू नका..*
   *पावलो पावली येतील कठिण*
                         *प्रसंग*
    *फक्त चंद्र तारकांना स्पर्श करुन*
*जिंकण्यासाठी जमीनीला सोडू नका*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
29. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*
   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑
✪ भारतातील सर्वांत मोठे वाळवंट कोणते ?
 ➜ थरचे वाळवंट. ( राजस्थान )
✪  बिस्मील्ला खाॅं हे नाव कोणत्या वाद्यासी संबंधित आहे ?
 ➜ शहनाई.
✪  देशातील पहिली गुप्तवार्ता प्रबोधिनी कोठे आहे ?
 ➜ पुणे.
✪  पोलिओच्या विषाणूचा आकार साधारणपणे किती नॅनोमीटर असते ?
 ➜ २८ नॅनोमीटर.
✪  किशोरी आमोणकर ह्या कोण होत्या ?
 ➜ शास्त्रीय गायिका.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂ व्यक्ती परिचय ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
29. *❒♦अभिनवसिंग बिंद्रा♦❒*  
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
●जन्म :~ 28 सप्टेंबर 1982
       देहारादून, उत्तराखंड,भारत.
◆खेळ :~ नेमबाजी, 10 मीटर हवाई रायफल.
       *◆ पदक माहिती ◆*
 *★ भारतासाठी खेळताना ★* 
    🏅 *कॉमनवेल्थ खेळ* 🏅
● सुवर्ण :- 2002:- म्याचेस्टर:-           10 मीटर हवाई रायफल.(जोडी)
●रौप्या:-2002 म्याचेस्टर.
10 मीटर हवाई रायफल.(एकेरी)
●कांस्य:-2006 मेलबर्न 10 मीटर हवाई रायफल.(एकेरी)
●सुवर्ण:-2006 मेलबर्न 10 मीटर
हवाई रायफल.(जोडी)
●सुवर्ण:-2010 दिल्ली 10 मीटर
हवाई रायफल.(जोडी)
●रौप्या ~ 2010 दिल्ली 10 मीटर
हवाई रायफल.(एकेरी)
*◆ 2008 ऑलम्पिक खेळ ◆*
●सुवर्ण ~ बीजिंग ऑलम्पिक 2008 10 मीटर हवाई रायफल.(एकेरी)
*◆ विश्व नेमबाजी अजिंक्यपद ◆*
●सुवर्ण :~ 2006 जाग्रेब 10 मी हवाई रायफल (एकेरी)
         🏆 *पुरस्कार* 🏆
🏅 2000- अर्जुन पुरस्कार
🏅2001-राजीव गांधी खेलरत्न
 (भारताचा सर्वोच्च खेळ पुरस्कार)
🏅2009 पदंभूषसन पुरस्कार
🏅2011ऑनररी लेफ्टनंट कर्नल भारतीय सैना 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
           *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
 *✧❂ महाराष्ट्र शिक्षण मित्र❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌
*❁सोमवार ~ 29/09/2025❁* 
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
No comments:
Post a Comment