"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

29/12/24 रविवारचा परिपाठ*

◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

*Ⓜ💲🅿 परिपाठ Ⓜ💲🅿*

*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*

 *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

 *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

 *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
       🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

https://goo.gl/RpQbsw
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]    ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *29. डिसेंबर:: रविवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
मार्गशीर्ष कृ.१४, पक्ष :कृष्ण पक्ष,
तिथि ~चतुर्दशी , नक्षत्र ~ज्येष्ठा,
योग ~गण्ड, करण ~विष्टि,
सूर्योदय-07:10, सूर्यास्त-18:10,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]   ❂ सुविचार ❂*
━┅═▣◆★✪★◆▣═┅━

29. *संकटं तुमच्यातली शक्ती, जिद्द पाहण्यासाठीच येत आसताच.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

29. *कुंपनानेच शेत खाल्ले*
      *★ अर्थ ::~*
- पहारेकऱ्याने चोरी केली.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

29. *अन्नदानं परं दानं विद्यादानमतः परम् ।*
*अन्नेन क्षणिका तृप्तिः यावज्जीवं च विद्यया ॥*
    ⭐अर्थ ::~ अन्नदान श्रेष्ठ आहे, पण विद्यादान त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. कारण अन्नामूळे त्यावेळेची भूक भागते मात्र विद्येमूळे संपूर्ण आयुष्याची.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

    🛡 ★ 29. डिसेंबर ★ 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★ हा या वर्षातील ३६३ वा (लीप वर्षातील ३६४ वा) दिवस आहे.

        ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●१९५९ : नोबेल पारितोषिक विजेते रिचर्ड फाइनमॅन यांनी CALTECH येथे There is plenty of room at the bottom हे प्रसिद्ध भाषण दिले. ही nanotechnology ची सुरुवात मानली जाते.
●१९५९ : पोर्तुगालमधील लिस्बन येथे भुयारी रेल्वेची सुरूवात झाली.

    ~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९४२ : *राजेश खन्ना* – चित्रपट अभिनेते, निर्माते आणि राज्यसभेचे सदस्य
◆१९१७ : रामानंद सागर – हिन्दी चित्रपट निर्माते
◆१९०४ : कुपल्ली वेंकटप्पागौडा पुट्टप्पा उर्फ ’कुवेम्पू’ – ज्ञानपीठ विजेते कन्नड लेखक व कवी
◆१९०० : मास्टर दीनानाथ मंगेशकर – शास्त्रीय व नाट्यसंगीत गायक व अभिनेते
◆१८०० : चार्ल्स गुडईयर – रबरावरील व्हल्कनायझेशन ही प्रक्रिया शोधणारे अमेरिकन संशोधक

  ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०१२ : टोनी ग्रेग – इंग्लिश क्रिकेटपटू व समालोचक
●१९८६ : हॅरॉल्ड मॅकमिलन – इंग्लंडचे पंतप्रधान
●१९६७ : पण्डित ओंकारनाथ ठाकूर ऊर्फ ’प्रणव रंग’ –गायक व संगीत अभ्यासक, १९५५ मधे पद्मश्री पुरस्काराने सन्मानित
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
  ━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

29.  *✸ असा महाराष्ट्र माझा ✸*
        ●●●●००००००●●●●
असा महाराष्ट्र माझा
असा महाराष्ट्र माझा

वाहतो माणूसकीचा
नित्यसे मनात झरा
पेरतो संस्कार मोती
देतो प्रत्येका आसरा

असा महाराष्ट्र माझा

             समानता नांदे तेथे     
             असो कुणी रंक राव
             पाहून ते संत श्रेष्ठ
             जागतो आदर भाव

             असा महाराष्ट्र माझा

कष्टकरी माझा राजा
येथेच वसतो खरा
खाई चटणी भाकर
स्वाभिमानाची हो धरा

असा महाराष्ट्र माझा

             सुविचारांची पेरणी
             करतो अभंगातून
             रमतो भक्तीत सदा
             देतो जनसेवेतून

              असा महाराष्ट्र माझा

कडी कपारी डोंगर
सुजलाम् असे सारा
शिवजिजाऊंची भूमी
असे अभिमान खरा

असा महाराष्ट्र माझा
             शब्दरचना- सौ.जया नेरे
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      ❂ प्रार्थना ❂*
━┅━▣◆★✧★◆▣━┅━

29.  *❂ जगाला प्रेम अर्पावे ❂*
   ✶✶✹✹★●★✹✹✶✶
जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पददलित
तया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे
जयांना ना कोणी जगती सदा ते अंतरी रडती
तया जाऊन सुखवावे, जगाला प्रेम अर्पावे
समस्तां धीर तो द्यावा, सुखाचा शब्द बोलावा
अनाथा साह्य ते द्यावे, जगाला प्रेम अर्पावे
सदा जे आर्त अतिविकल, जयांना गांजती सकल
तया जाऊन हसवावे, जगाला प्रेम अर्पावे
कुणा ना व्यर्थ शिणवावे, कुणा ना व्यर्थ हिणवावे
समस्तां बंधु मानावे, जगाला प्रेम अर्पावे
प्रभूची लेकरे सारी तयाला सर्वही प्यारी
कुणा ना तुच्छ लेखावे, जगाला प्रेम अर्पावे
असे जे आपणापाशी असे, जे वित्‍त वा विद्या
सदा ते देतची जावे, जगाला प्रेम अर्पावे
भरावा मोद विश्वात असावे सौख्य जगतात
सदा हे ध्येय पूजावे, जगाला प्रेम अर्पावे
असे हे सार धर्माचे असे हे सार सत्याचे
परार्थी प्राणही द्यावे, जगाला प्रेम अर्पावे
जयाला धर्म तो प्यारा, जयाला देव तो प्यारा
त्याने प्रेममय व्हावे, जगाला प्रेम अर्पावे
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    ❂ बोधकथा ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

29.  *❃❝ शब्दांच्या पुढे ❞❃*
     ━━═•●◆●★●◆●•═━━
      एका मुलाने एका मुलीशी लग्न केलं. ती मुलगी दिसायला खूप सुंदर होती.

  तो तिच्यावर खूप प्रेम करायचा काही काळाने त्या मुलीला कोणता तरी स्किन चा प्रॉब्लेम झाला , एका वेगळ्याच आजाराने ती त्रस्त झाली.

    त्या आजारामुळे त्या मुलीची सुंदरता हळूहळू कमी होत चालली, इकडे मुलीला हा आजार झाला तर लगेच मुलाला पण आंधळे पणा आला.

    असेच दिवस चालले. काही दिवसाने मुलगी खूप कुरूप दिसायला लागली पण नवरा आंधळा झाल्याने त्याला काही कळत नव्हते व तो तिच्यावर तसाच प्रेम करायचा जसा पहीले करत होता.

     त्या मुलीचा आजार वाढला व कालांतराने तिचा मृत्यू झाला. त्या मुलाला खूप वाईट वाटले त्याने त्या मुलीचा अंत्यविधी खूप प्रामाणिकपणे पार पाडला.

     आता तो ते गाव सोडून दुसरीकडे स्थायिक व्हायचा विचार करत होता, तेवढ्ययात त्याला एका शेजारीने विचारले तू तरआंधळा एकटा कसा राहशील. त्यावर तो बोलला मी आंधळा कधीच नव्हतो , मी माझं अर्धे आयुष्य अांधळे पणाचं नाटक करत जगत होतो ,कारण जर मी तस केलं नसत तर माझ्या बायकोला त्या आजारापेक्षा मला काय वाटेल व माझं तिच्यावरील प्रेम कमी होईल हेच जास्त दुःख झालं असत, ती खूप प्रेमळ होती व एक चांगली बायको होती. मला तिला आनंदी ठेवायचं होत,

      *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
    काही वेळा आयुष्यात आनंदी राहण्यासाठी दुसऱ्याच्या शुल्लक  गोष्टी दुर्लक्ष करा आयुष्य अजून सुंदर बनेल.
   हेच तर मानवी नात्याचं सौन्दर्य आहे. आपण एकमेकां शिवाय काहीच नाही.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

29. *"रुळलेल्या वाटेने जाणारे बरेच*
           *असतात परंतु स्वत:ची*
वाट निर्माण करणारा एखादाच असतो

  *"नशीबवान तर सर्वच असतात*
                 *नशीबाला*"
  "बदलणारा एखादाच असतो..."

    *"जिंकणारे बरेच असतात पण*
हरून जिंकणारा एखादाच असतो...!
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

29. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*
   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑
✪  बांबू ही कोणत्या जातीची वनस्पती आहे ?
  ➜ गवताच्या जातीची.

✪  भेंडीची संकरीत जात कोणती ?
  ➜ मधुमालती.

✪ तंबाखूचा वापर कशासाठी करतात ?
  ➜ उत्तेजक म्हणून.

✪ सजीव व निर्जीव यातील दुवा कोणास संबोधले जाते ?
➜ जीवाणूस.

✪  मका ही वनस्पती कशी आहे ?
  ➜ स्वयंजीवी.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

29   *❒ भाऊसाहेब पाटणकर ❒* 
     ━━═•●◆●★★●◆●•═━━
*●जन्म :~ २९ डिसेंबर १९०८*
●मृत्यु :~ २० जून १९९७

    मराठी भाषेतील नामवंत गझलकार शायर व कवी भाऊसाहेब पाटणकर

     वासुदेव वामन पाटणकर यांना त्यांचे परिचित "जिंदादिल" भाऊसाहेब पाटणकर असेच म्हणायचे. भाऊसाहेब स्वतः वेदपंडीत, वकील, शिकारी होते, शिकारीचा तर त्यांचा छंद नुसता शौर्य दाखविण्यासाठी नव्हता, तर श्वापदांची स्वभाव वैशिष्ट्ये, त्याचे निरीक्षण करुन भाऊसाहेबांनी कथा लिहिल्या होत्या, ज्या किर्लोस्कर, युगवाणी, अमृत इत्यादी अनेक मसिकात प्रकाशित झाल्या होत्या, त्यात शिकारीतील शौर्या पेक्षा, प्राण्यांच्या अभ्यासाला प्राधान्य असायचे. कालांतराने कायद्याने शिकारीला बंदी आली, त्यामुळे भाऊसाहेबांची शिकार पण बंद झाली, मोतीबिंदू मुळे भाऊसाहेबांच्या दोन्ही डोळ्यांची नजर गेली आणि त्याच कारणास्तव वकिली पण बंद करावी लागली, पण इतके होऊनही भाऊसाहेब हतबल झाले नाहीत, वेदाध्ययन,संस्कृत भाषेवर त्यांचे प्रभुत्व होतेच, त्यातील चंपू प्रकारात शायरीचा उगम असल्याचे ते म्हणत, त्यातूनच त्यांनी मराठी शायरीची रचना केली, त्यांची शायरी ही उर्दू भाषेतील शायरी पेक्षा वेगळी होती, त्यातून नेहमीच स्वाभिमानी आणि अपेक्षित अशा शायरीची रचना त्यांनी केली, पुढे भाऊसाहेबांच्या शायरीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळू लागला, महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या अनेक भागात त्यांचे कार्यक्रम होऊन लोकप्रिय झाले. भाऊसाहेबांची मराठी शायरी, मराठी मुशायरा, मैफिल, दोस्तहो, जिंदादिल ही पुस्तके प्रकाशित झाली, खऱ्या अर्थाने त्यांनी मराठी शायरी आणि गझल हा प्रकार रुजवली आणि ती रसिकापर्यंत पोहोचवली. त्यांच्या " दोस्त हो" आणि " जिंदादिल " ह्या संग्रहानी मराठी साहित्याप्रेमीना वेड लावले. *भाऊसाहेब पाटणकर* यांचे २० जून १९९७ रोजी निधन झाले.

भाऊसाहेब पाटणकरांची शायरी
पेड वेणीचे तुझ्या तू सोडू नको मागे पुढे
आम्ही तरी कैसे बघावे सारखे मागे पुढे

आलो तुझ्या दुनियेत नव्हतो चोर वा डाकू आम्ही
एकही ना चीज इथली घेऊनी गेलो आम्ही

तेही असो आमुच्या सवे आणिला ज्याला ईथे
भगवन अरे तो देहही मी टाकूनी गेलो ईथे

आजवरी बेधुंद जैसा मांड आम्ही गाईला
त्याच त्या तल्लिनतेने जोगिया ही गाईला

जाणतो इतुकेच आम्हा मस्तीत आहे गायचे
लोकहो हे दैव जाणे काय केव्हा गायचे

येतो असाही काळ केव्हा काही असेही गायचा
जोगिया डोक्यात आणिक मांड असतो गायचा

कौशल्य माझ्या गायनाचे कळलेच ना कोणा कधी
गेलो असा गाऊन नाही बेसूरही झालो कधी

सन्मानिले वैराग्य आम्ही शृंगार ही सन्मानिला
अंकावरी आहे रतिच्या बुद्ध येथे झोपला

विसरला दुनियेस आपुल्या गुंजनाही विसरला
कमलपोषी भृंग आता कमलासही त्या विसरला

हे आले वैराग्य आम्हा निष्कामता ऐसी आली
तैसी नको नुसतीच जेथे दाढी हवी लुंगी हवी.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
           *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
║▌║▌║█❃❂❃█║▌║║▌

*❁रविवार ~ 29/12/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment