*29/11/24 शुक्रवारचा परिपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*
*Ⓜ💲🅿 परिपाठ Ⓜ💲🅿*
*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*
*💥🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀
*💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀
*💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
🔘 *"माझी शाळा"* 🔘
*ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
🔗🔗👇👇🔗🔗
https://goo.gl/UWrHm9
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *29. नोव्हेंबर:: शुक्रवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
कार्तिक कृ.१३, पक्ष :कृष्ण पक्ष,
तिथि ~त्रयोदशी, नक्षत्र ~स्वाती,
योग ~शोभन, करण ~वणिज,
सूर्योदय-06:54, सूर्यास्त-17:59,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ] ❂ सुविचार ❂*
━┅═▣◆★✪★◆▣═┅━
29. *इमानीपणामुळे गुलमगिरीत देखील उदारतेचा अंश चमकतो.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ] ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
29. *घोडामैदानजवळ असणे –*
★ अर्थ ::~ परीक्षा लवकरच होणे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ] ❂ सुभाषीत ❂*
━┅═▣◆★✧★◆▣═┅━
29. *हस्तस्य भूषणं दानम् ।*
⭐अर्थ ::~
दानधर्म करणे हे हाताचे भूषण आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ] ❂ दिनविशेष ❂*
━●🇲=◆🇸◆=🇵●═━
🛡 ★ 29. नोव्हेंबर ★ 🛡
🔻===●●●★●●●===🔻
★हा या वर्षातील ३३३ वा (लीप वर्षातील ३३४ वा) दिवस आहे.
★International Day of Solidarity with the Palestinian People
~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●२००० : दक्षिण अफ्रिकेचे माजी अध्यक्ष डॉ. नेल्सन मंडेला व बांगलादेशच्या ग्रामीण बँकेस ’गांधी शांतता पुरस्कार’ जाहीर
●१९९६ : नोबेल पारितोषिकविजेत्या समाजसेविका मदर तेरेसा यांना त्यांची मायभूमी अल्बानियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ’गोल्डन ऑनर’ जाहीर
~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
●१९२६ : प्रभाकर नारायण ऊर्फ ’भाऊ’ पाध्ये – लेखक, पत्रकार व कामगार संघटनेचे कार्यकर्ते
●१९०७ : गोपीनाथ तळवलकर – बालसाहित्यिक, ’आनंद’ मासिकाचे संपादक, आकाशवाणीच्या ’बालोद्यान’ कार्यक्रमातील ’नाना’
●१८६९ ; अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर ऊर्फ ’ठक्कर बाप्पा’ – समाजसेवक
~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
◆१९९३ : जहांगीर रतनजी दादाभॉय तथा *’जे.आर.डी. टाटा’–भारतरत्न,* उद्योगपती व वैमानिक, भारतीय नागरी विमान वाहतुकीचे जनक
◆१९५९ : ’रियासतकार’ गोविंद सखाराम सरदेसाई – मुसलमानी काळापासून ब्रिटिश अमदानीपर्यंतचा महाराष्ट्राचा इतिहास लिहीणारे इतिहासकार
◆१९३९ : माधव त्र्यंबक पटवर्धन उर्फ ’माधव जूलियन’ – कवी, कोशकार, छंदशास्त्राचे व्यासंगी आणि मराठी भाषाशुद्धीचे तत्त्वनिष्ठ पुरस्कर्ते
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..
https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫✫✪✫✪✫✪✪
*0६ ] ❂ देशभक्ती गीत ❂*
━┅═▣◆★✧★◆▣━┅━
29. *✸ स्वातंत्र्य प्राण ✸*
●●●●००००००●●●●
भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी
सैनिक हो तुमच्यासाठी
वावरतो फिरतो आम्ही नित्यकर्म अवघे करतो
राबतो आपुल्या क्षेत्री चिमण्यांची पोटे भरतो
परि आठव येता तुमचा आतडे तुटतसे पोटी
आराम विसरलो आम्ही आळसा मुळी ना थारा
उत्तरेकडुनि या इकडे वार्तांसह येतो वारा
ऐकताच का अश्रुंची डोळ्यांत होतसे दाटी
उगवला दिवस मावळतो अंधार दाटतो रात्री
माउली नीज फिरवीते कर अपुले थकल्या गात्री
स्वप्नात येउनी चिंता काळजा दुखविते देठी
रक्षिता तुम्ही स्वातंत्र्या प्राणांस घेउनी हाती
तुमच्यास्तव आमुची लक्ष्मी तुमच्यास्तव शेतीभाती
एकट्या शिपायासाठी झुरतात अंतरे कोटी
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ] ❂ प्रार्थना ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━
29. *❂ देवा चांगली बुध्दी दे ❂*
━━═●✶✹★✹✶●═━━
*देवा, देवा चांगली बुध्दी दे*
*सर्वांशी प्रेमाने गोड बोलू दे..||धृ||*
*देवा, देवा चांगली बुद्धी दे*
मनातील कटुता दूर होवू दे
एकमेकांशी एकोप्याने राहू दे
मुखात सर्वांच्या गोडवा राहू दे..||१||
*देवा, देवा चांगली बुध्दी दे*
कोणालाही आळशी नको बनू दे
नवचैतन्य रक्तात उसळू दे
चांगले विचार मनात येवू दे
संघर्षाला तोंड देण्याची हिंमत दे..||२||
*देवा, देवा चांगली बुध्दी दे*
सर्वांना समान शिक्षण मिळू दे
शिक्षणातील भेदभाव दूर होवू दे
शिक्षणातील प्रगती होवू दे
आनंदाने शिक्षण सर्वांना घेवू दे..||३||
*देवा, देवा चांगली बुध्दी दे*
वेळेवर पाऊस येवू दे
शेतकऱ्यांची प्रगती होवू दे
सकस अन्न सर्वांना मिळू दे
आरोग्य सर्वांचे चांगले राहू दे...||४||
*देवा, देवा चांगली बुध्दी दे*
सुरक्षा जवानांची काळजी घे
देशावर हल्ले नको होवू दे......
देशाला सुरक्षित राहू दे
भारत देशाचे नाव उंचावू दे...||५||
*देवा, देवा चांगली बुध्दी दे*
गावात शांतता राहू दे
गावातील भेदभाव नष्ट होवू दे
जिव्हाळ्याचे संबंध राहू दे
गावात एकोपा राहू दे... ||६||
*देवा, देवा चांगली बुध्दी दे*
सर्वांना सुखात राहू दे
दु:ख वाट्याला नको येवू दे
आनंदाचे वातावरण राहू दे
सर्वांचेच कल्याण होवू दे...||७||
*देवा,देवा चांगली बुध्दी दे*
*गीतरचना ✍🏻शांतीसुत*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ] ❂ बोधकथा ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●═━
29. *❃❝ खटला ❞❃*
━━•●◆●★●◆●•═━
दोघां भावात जमिनीवरून तंटा निर्माण झाला. मामला कोर्टात पोहोचला. त्यात एक भाऊ लखपती होता तर दुसरा गरीब होता. त्या दोघांना प्रत्येकी दहा लाख रूपये वाटणीमध्ये आले होते. न्यायाधिशांनी एका भावाला विचारले तुझ्या भावाने सात वर्षात दहा लाख रूपये कसे काय खर्च केले. श्रीमंत भाऊ म्हणाला, माझा भाऊ प्रत्येक काम नोकराकडून करवून घेत असे. कोणतेही काम त्याने केले नाही. नोकरही मनमानी करू लागले. एक रूपया खर्च येत असेल तर शंभर रूपये आल्याचे दाखवत असत. तो अन्नाला महाग झाला. न्यायाधीशांनी विचारले, तुझी श्रीमंती कशी काय टिकून राहिली. तो म्हणाला,nn माझ्या वाडवडिलांची देणगी दिली म्हणजे मी परिश्रम करूच नये की काय, संपत्ती मिळाल्यावरही मी परिश्रम करण्याचे सोडले नाही. मी नोकरांवर कधीच अवलंबून राहिलो नाही. प्रत्येक कामात माझा सहभाग असल्याने नोकरांची बोलण्याची हिंमत होत नव्हती. आता जेव्हा याच्याकडे फुटकी कवडीही उरली नाही म्हणून याने माझ्यावर दावा ठोकला आहे. याला परिश्रम करायला नको आहेत याने स्वत:ची संपत्ती तर आळसाने घालविली आता माझ्या संपत्तीवर याचा डोळा आहे.’’ यावर न्यायाधीश महोदयांनी इतर साक्षीपुरावे तपासले व श्रीमंत भाऊच खरे असल्याचा निर्वाळा दिला.
*🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
मिलालेले धन टिकवुन ठेवने कठिन असते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━
29. *लहानपणी मोठे व्हायची स्वप्ने असतात....*
*तर मोठेपणी लहानपणाच्या आठवणी असतात....*
*खरंय माणसाकडे जे असतं, ते त्याला नको असतं अन् जे नसतं तेच तेच हवं असतं ...!!*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ] ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅═▣◆★✧★◆▣═┅━
29. *✿सामान्य ज्ञान प्रश्नावली✿*
◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑
✪ भारतातील कोणत्या राज्यात संगमरवराचे साठे जास्त आहेत ?
➜ राजस्थान.
✪ वेरूळचे कैलास लेणे कोणत्या राजघराण्याने घडविले आहेत ?
➜ राष्ट्रकूट.
✪ मोनालिसा या जगप्रसिध्द कलाकृतीचे निर्माते कोण आहे ?
➜ लिओनार्दो दा विंची.
✪ वास्को-द-गामा हा कोणत्या देशाचा दर्यावर्दी होता ?
➜ पोर्तुगीज.
✪ तेनालीराम हा कोणाच्या दरबारात होता ?
➜ कृष्णदेवराय.(विजयनगर)
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●═━
29. *❒ जे.आर.डी. टाटा ❒*
━━•●◆●★●◆●•═━
भारतरत्न, उद्योगपती व वैमानिक, नागरी विमान वाहतुकीचे जनक
_यांचा स्मृतिदीन त्यानिमित्त त्यांना_
*विनम्र अभिवादन..!!*
🙏🌷🌹🌺🌹🌷🙏
●जन्म :~ २९ जुलै १९०४
पॅरिस,फ्रान्स
*●मृत्यू :~ २९ नोव्हेंबर १९९३*
जिनेव्हा, स्वित्झर्लंड
●पुरस्कार :~ भारतरत्न, पद्मविभूषण पुरस्कार
"जहांगीर रतनजी दादाभॉय टाटा "
उर्फ "जे.आर.डी. टाटा"
हे भारतीय उद्योजक होते. ते पहिले भारतीय वैमानिक असून, भारतातील विमान वाहतूक उद्योगाचे जनक मानले जातात.
टाटांचा जन्म जुलै २९, इ.स. १९०४ मध्ये पॅरिस, फ्रान्स येथे झाला. रतनजी दादाभॉय टाटांचे ते दुसरे पुत्र होते. मुंबईतील कॅथेड्रल अँड जॉन केनॉन स्कूल येथे काही वर्ष ते शिकले, पण टाटांची आई फ्रेंच असल्यामुळे त्यांचे बालपण मुख्यत: फ्रान्सातच गेले. काही कारणाने ते मॅट्रीक परीक्षेपुढे शिकू शकले नाहीत.
◆ उद्योजक पदभार ◆
इंग्लिश खाडी विमानाद्वारे पहिल्यांदा पार करणारे सुप्रसिद्ध फ्रेंच वैमानिक लुईस ब्लेरिअट यांच्या जीवनकार्याने जेआरडी खूप प्रभावित झाले होते. त्यामुळे त्यांनीही विमान शिकण्याचा ध्यास घेतला. इ.स. १९२९ साली त्यांनी वैमानिकाचा परवाना मिळवला. वैमानिकाचा परवाना मिळवणारे ते पहिले भारतीय ठरले. इ.स. १९३२ साली त्यांनी टाटा एरलाईन्स या पहिल्या भारतीय प्रवासी विमानवाहतूक कंपनीची स्थापना केली. पुढे इ.स. १९४६ साली तिचे नाव बदलून एर इंडिया ठेवले गेले.
वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी म्हणजे इ.स. १९३८ साली ते टाटा सन्स उद्योगसमूहाचे चेअरमन बनले. ते प्रदीर्घ काळ त्या पदावर होते. त्यांनी पदभार सांभाळला तेव्हा टाटा सन्स उद्योगसमूहाच्या १४ कंपन्या होत्या. टाटांच्या काळात ९१ कंपन्यांची भर पडली. रसायन, वाहन, चहा, माहिती, हॉटेले आणि तंत्रज्ञान अश्या नवीन क्षेत्रांत त्यांनी टाटा उद्योगसमूहाचा विस्तार केला. टाटांच्या पुढाकाराने इ.स. १९५६ साली कंपनीतील कामगारांच्या कल्याणासाठी खास योजना राबविण्यात आली. त्यामध्ये 'दिवसातून आठ तास काम', 'मोफत आरोग्यसेवा', 'भविष्य निर्वाह निधी' आणि 'अपघात विमा योजना' अश्या पायाभूत गोष्टींचा समावेश करण्यात आला होता. पुढे या योजना भारतीय केंद्र शासनाने सर्व उद्योग-व्यवसायांसाठी कायदेशीर रित्या बंधनकारक केल्या.
टाटांच्या कारकिर्दीत उद्योग समूहाच्या विस्ताराबरोबरच इतर अनेक संस्था स्थापन झाल्या. भारतात मूलभूत संशोधन व्हावे म्हणून त्यांनी इ.स. १९३६ साली टाटा समाजविज्ञान संस्था आणि इ.स. १९४५ साली टाटा मूलभूत संशोधन संस्था या संशोधनसंस्था स्थापण्यात पुढाकार घेतला. आशियातील पहिले कर्करोग रुग्णालय इ.स. १९४१ साली मुंबईत सुरू केले.
◆ पुरस्कार ◆
टाटांना त्यांच्या हयातीत अनेक पुरस्कार मिळाली. भारतीय केंद्रशासनातर्फे त्यांना इ.स. १९५७ साली पद्मविभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले, तर इ.स. १९९२ साली त्यांना भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मानाने भूषवण्यात आले.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹✹★✹◑◎●••
*✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❂█║▌║█║▌
*◆शुक्रवार~29/11/2024◆*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
No comments:
Post a Comment