"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

 

*30/03/24 शनिवार चा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

*Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*

*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*

   *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

     *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

    *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
  🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

https://goo.gl/EXCPbS
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *30.मार्च:: शनिवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
फाल्गुन कृ.5, पक्ष : कृष्ण पक्ष,
तिथि ~पञ्चमी, नक्षत्र ~अनुराधा,
योग ~सिद्धि, करण ~कौलव ,
सूर्योदय-06:57, सूर्यास्त-18:43,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]   ❂ सुविचार ❂*
━┅═▣◆★✪★◆▣═┅━

30. *शाळा हे सभ्य नागरिक तयार करण्याचे पवित्र क्षेत्र आहे.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]   ▪ म्हणी व अर्थ* ▪
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••
30. *कुंपनानेच शेत खाल्ले*
      *★ अर्थ ::~*
- पहारेकऱ्याने चोरी केली.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ▫ सुभाषीत▫*
====••◆◆●★●◆◆◆••====

30. *त्रैलोक्यदीपको धर्म: ।*
  ⭐अर्थ ::~ धर्म हा त्रिभुवनाचा दीपक (मार्गदर्शक) आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ♦दिनविशेष*♦
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

     🛡 *★30. मार्च★* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★ जागतिक डॉक्टर दिवस
★ हा या वर्षातील ८९ वा (लीप वर्षातील ९० वा) दिवस आहे.

    ~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९२९ : भारत व इंग्लंडदरम्यान हवाई टपालसेवा सुरू झाली.
●१८५६ : पॅरिसचा तह झाल्याने क्रिमियन युद्ध संपले.
●१८४२ : अमेरिकन शल्यविशारद डॉ. क्रॉफर्ड लाँग यांनी शस्त्रक्रिया करताना भूल देण्यासाठी इथर या द्रव्याचा प्रथमच वापर केला.
●१६६५ : पुरंदर किल्ल्यावर दिलेरखानाशी लढताना वीर मुरारजी धारातीर्थी पडला

    ~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९४२ : वसंत आबाजी डहाके – भाषातज्‍ज्ञ, कोशकार, लेखक आणि कवी
◆१९०८ : देविका राणी – अभिनेत्री
◆१९०६ : जनरल कोडेन्डेरा सुबय्या तथा के. एस. थिमय्या – भारतीय भूदलाचे ६ वे सरसेनापती, पद्मभूषण, मवावीरचक्र. १९४८ मधे काश्मीरमधील पाकिस्तानी आक्रमकांचा पराभव करणार्‍या भारतीय सैन्याचे ते प्रमुख होते.
(मृत्यू: १७ डिसेंबर १९६५)
◆१८९५ : निकोलाय बुल्गानिन – सोविएत युनियनचे अध्यक्ष

      ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००२ : आनंद बक्षी – गीतकार
●१९८९ : गजानन वासुदेव तथा ’ग. वा.’ बेहेरे – 'सोबत' साप्ताहिकाचे संस्थापक, संपादक व साहित्यिक
●१९७६ : रघुवीर मूळगावकर – चित्रकार
●१९६९ : वासुदेव गोविंद मायदेव – कवी व समाजसेवक
●१९५२ : जिग्मे वांगचुक – भूतानचे २ रे राजे
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
  ━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

30. *✹ध्वजकीर्ति वाढवूं या✹*
        ●●●●●००००००●●●●●
ध्वजपुजनी असावी निस्वार्थस्वरुप सेवा ॥धृ॥

रक्तात तेच भिनले चित्तात तेच रुजले
बल त्यातुनीच वाढे नच माहिती विसावा ॥१॥

उसनी नकोच शक्ती दुबळी तशीच भक्ती
खंबीर सेवकांनी बहरुन देश यावा॥२॥

उत्स्फूर्त ध्येयमार्गी बल पाशवी प्रभावी
फिरवू शके न मागे हा मंत्र एक गावा॥३॥

परकीय संस्कृतीने जरि शोषिले मदाने
नवतेज घेउनीया ध्वज त्यातुनी उठावा ॥४॥

भरल्या दिशांत दाही रणगर्जना कशाही
उसळून झेप घालू हिंदू न हा नमावा॥५॥

सर्वस्व जे सुखाचे क्षण सर्व चेतनेचे
अर्पुनिया ध्वजाला ध्वजकीर्ति वाढवूं या॥६॥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      💎 प्रार्थना  💎*
====••◆◆●★●◆◆◆••====

30.  *❂ पंढरीचा राजा ❂*
       ✶✶✹✹★●★✹✹✶✶
ऊठ पंढरीच्या राजा वाढ वेळ झाला
थवा वैष्णवांचा दारी दर्शनासी आला

पूर्व दिशी उमटे भानू
घुमे वारियाचा वेणु
सूर सूर वेणुचा त्या सुगंधात न्हाला

कुक्षी घेऊनिया कुंभा
उभी ठाकी चंद्रभागा
मुख प्रक्षाळावे देवा, गोविंदा गोपाला

पुंडलीक हाका देई
उभ्या राही, रखुमाबाई
निरांजने घेऊन हाती सिद्ध आरतीला
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    🔵 बोधकथा*🔵
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

30.  *❃ मूर्तीपूजेचे महत्त्व ❃*
        ••◆•◆•◆★◆•◆•◆••
     स्वामी विवेकानंद भ्रमंती करत असेच एकदा उत्तरेकडील अलवार संस्थानात गेले. त्यांचे प्रवचन ऐकायला गेलेल्या त्या संस्थानच्या दिवाणाने प्रभावित होऊन त्यांना राजवाड्यावर नेले आणि त्यांची राजा मंगलसिंह यांची भेट घडवून आणली. राजाचे आयुष्य चैनीत चालले होते. शिवाय त्याच्या मनात राजेपणाचा अहंकारही होता. विवेकानंदाना पाहून त्याला वाटले, बोलून चालून हा एक तरुण संन्याशी ! इंग्रजीत प्रवचन करत असला, तरी याचा अनुभव तो किती असणार ? आपण याची फिरकी घ्यावी, असा विचार करून तो म्हणाला, 'स्वामीजी, मूर्तीपूजा म्हणजे शुद्ध अडाणीपणा आहे, असे मी मानतो. एखाद्या मूर्तीला हळदकुंकू आणि फुले वाहतांना तसेच तिच्यापुढे हात जोडतांना लोकांना पाहिले की, मला त्यांची कीव येते. याबाबतीत तुमचे काय मत आहे ?' राजाच्या या प्रश्नाला सरळ उत्तर न देता स्वामी दिवाणजींना म्हणाले, 'दिवाणजी, या भिंतीवर टांगलेल्या चित्रावर थुंकून येता का ?' स्वामींच्या तोंडचे हे वाक्य ऐकून दिवाणजींना कापरेच भरले.

   रागाने लालबुंद झालेल्या राजाच्या चेह-याकडे एकवार चोरट्या नजरेने बघून दिवाणजी म्हणाले, ' स्वामी काय बोलता हे ? ते महाराजांचे दिवंगत वडील आहेत !' विवेकानंद म्हणाले, 'दिवाणजी, तो तर काळ्या शाईने रंगवलेला एक जाड कागद आहे'. एवढे बोलून ते राजाला उद्देशून म्हणाले, 'राजेसाहेब, त्या चित्रात अस्थी, मांस आणि जीव असलेले आपले वडील नाहीत; म्हणून त्याला केवळ काळ्या रंगाने रंगवलेला जाड कागद असे म्हणणे जेवढे अविचाराचे आहे, तेवढेच मूर्तीत प्रत्यक्ष देव नसतांना तिला देव मानून तिची पूजा करणार्यांची कीव करणे अविचाराचे आहे.' स्वामी पुढे म्हणाले, 'मूर्ती म्हणजे देव नव्हे, हे त्या मूर्तीची पूजा करणारे ज्ञानी भक्त जाणतात; परंतु निर्गुण, निराकार परमेश्वराची ध्यानधारणा करणे, ही सर्वसामान्यांना जमणारी गोष्ट नसल्याने, त्यांना ईश्वरभक्ती करता यावी, यासाठी मूर्तीपूजा ही प्रारंभीची पायरी आहे. यातूनच पुढे तो परमेश्वराशी एकरूप होण्याचे ध्येय साध्य करू शकतो'.हे ऐकून राजा अंतर्मुख होऊन विचारात पडला.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ]  🔷प्रेरणादायी विचार🔷*
====••◆◆●★●◆◆◆••====

30.  *_तुम्ही एकटे आहात म्हणून तुम्हाला यश मिळणार नाही अशी भीती कधीच बाळगु नका कारण थव्याने उडणाऱ्या पक्षापेक्षा गरुडाची शिकार मोठी असते._*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]    *🔴सामान्य ज्ञान🔴*
====••◆◆●★●◆◆◆••====

30. *✿ जागतिक भूगोल ✿*
     ◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑
🔸सर्वात लांब बोगदा (रेल्वे) :~ *सेइकन रेल टनेल जपान.
{समुद्रा खालून जाणारा 2 बेटे 53.85 कि.मी..* }

🔸सर्वात लांब रेल्वे प्लेटफॉर्म  :~
*खरगपूर (प.बंगाल) 820 मी..

🔸सर्वात लांब बोगदा (रस्ता) :~ *सेंट गॉटहर्ड, स्वित्झर्लंड (16 किमी.)..*

🔸सर्वाधिक उंचीवरील रेल्वे स्टेशन :~  *बोलीव्हीयामधील कंडोर स्टेशन (4800 मी)..*

🔸सर्वात मोठे रेल्वे स्टेशन :~
*ग्रँड सेंट्रल टर्मिनल (न्यूयॉर्क)..*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] 🔶थोरव्यक्ती परिचय🔶*
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

30.    *❒ माधव जूलियन  ❒*
       ┄─┅•●●★◆★●●•┅─┄
नाव :~ माधव त्रिंबक पटवर्धन
टोपणनाव :~ माधव जूलियन
कार्यक्षेत्र :~साहित्य
भाषा :~ मराठी
साहित्य प्रकार :~कविता

      *डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन*
               ऊर्फ  *माधव जूलियन*
      हे मराठी भाषेतील कवी, रविकिरण मंडळाचे संस्थापक व सर्वांत यशस्वी सदस्य होते. हे फारसी आणि इंग्रजीचे प्राध्यापक होते. माधवराव पटवर्धन हे मुंबई विद्यापीठाच्या मराठी साहित्यातील पहिल्या डी.लिट. पदवीचे मानकरी आहेत. इंग्लिश कवी शेले याने रचलेल्या ज्यूलियन आणि मडालो या कवितेवरून यांनी "जूलियन" असे टोपणनाव धारण केले. (माधव त्र्यंबक पटवर्धनांचे जूलियन नावाच्या मुलीवर प्रेम होते. तिच्याशी प्रेमभंग झाल्यानंतर तिची आठवण म्हणून त्यांनी माधव जूलियन हे टोपण नाव घेतले हीच माहिती लोकप्रसिद्ध आहे). याशिवाय ’गॉड्ज गुड मेन’ या कादंबरीतील नायिका ’ज्युलियन’ या व्यक्तिरेखेवरून माधवरावांनी ज्युलियन हे नाव उचलले असेही सांगितले जाते.

*गझल व रुबाई हे काव्यप्रकार*
    फारसीतून मराठीत प्रथम आणण्याचे श्रेय माधवराव पटवर्धनांना देण्यात येते. *माधव ज्युलियनांनी दित्जू, मा.जू. आणि एम्‌. जूलियन या नावांनीही लिखाण केले आहे. त्यांनी कविवर्य भा.रा. तांबे यांच्या कवितांचे संकलन आणि संपादन केले आहे. उत्कृष्ट संपादनाचा हा एक नमुना मानला जातो. पटवर्धनांचे काही लिखाण इंग्रजीतही आहे.

    पटवर्धनांनी कवितांशिवाय भाषाशास्त्रीय लेखनही केले. सोप्या व शुद्ध मराठी लेखनाचे पुरस्कारणाऱ्या पटवर्धनांनी भाषाशुद्धि-विवेक हा ग्रंथ लिहिला. ह्या ग्रंथात कालबाह्य ठरलेल्या शेकडो मराठी शब्दांची सूची समाविष्ट आहे.

         *व्यक्तीगत जीवन*
   पटवर्धनांचा जन्म इ.स. १८९४ साली बडोदा, बडोदा संस्थान येथे झाला. त्यांनी इ.स. १९१६ साली फारसी भाषा हा विशेष विषय निवडून बी.ए. पदवी मिळवली, तर इ.स. १९१८ साली इंग्रजी साहित्य हा विषय निवडून एम.ए.चा पदव्युत्तर अभ्यासक्रम पुरा केला.

💥  *व्यावसायीक कारकीर्द* 💥

   शिक्षणानंतर इ.स. १९१८ ते इ.स. १९२४ या कालखंडात ते फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे येथे फारसी भाषा शिकवत होते. त्यानंतर ते कोल्हापूर येथील राजाराम महाविद्यालयात फारसीचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. तेथे त्यांनी इ.स. १९२५ ते इ.स. १९३९ या काळात अध्यापन केले. माधव त्र्यंबक पटवर्धनांना त्यांच्या ’छंदोरचना’ या ग्रंथासाठी मुंबई विद्यापीठाने १ डिसेंबर १९३८ रोजी डी.लिट्. ही सन्माननीय पदवी दिली. मुंबई विद्यापीठाने मराठी साहित्यासाठी दिलेली ही पहिली डी.लिट. होती.

१९३९साली माधव ज्युलियन यांचे निधन झाले. माधवरावांचे व्यक्तिमत्त्व वादळी ठरले होते. त्यांच्या निधनानंतर त्यांच्यावर तीन-चार चरित्रग्रंथ लिहिले गेले आहेत.

🏵_*पुरस्कार आणि गौरव*_🏵
   ◆इ.स. १९३३मध्ये नाशिक येथे झालेल्या कविसंमेलनाचे अध्यक्ष.
  ◆इ.स. १९३४मध्ये बडोदे येथे झालेल्या साहित्यसंमेलनात ते कविशाखेचे अध्यक्ष होते.
   ◆इ.स. १९३६मध्ये जळगाव येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलन अध्यक्ष होते.
  ◆ "छंदोरचना" साठी मुंबई विद्यापीठाकडून डी. लिट. प्रदान. (मराठी साहित्यातील योगदानाबद्दल भारतातली पहिली डी. लिट.)
(१ डिसेंबर १९३८)

   पुण्यातल्या टिळकरोडवरील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहाला ’माधवराव पटवर्धन सभागृह’ असे नाव देण्यात आले आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
          *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌

*❁शनिवार~30/03/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment