"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

 

*30/04/24 मंगळवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

*Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*

*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*

   *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

     *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

    *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
  🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

https://goo.gl/EXCPbS
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━

🟢🔵🟣
🍥 *30.एप्रिल:: मंगळवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
चैत्र कृ.6, पक्ष : कृष्ण पक्ष,
तिथि ~षष्ठी, नक्षत्र ~उत्तराषाढा,
योग ~साध्य, करण ~वणिज,
सूर्योदय-06:10, सूर्यास्त-19:00,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]       ❂ सुविचार ❂*
  ━┅━═▣◆★✪★◆▣═━┅━

30. *ज्ञान हाच सर्व सामाजिक व राजकीय क्रांतीचा पाया आहे.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

30. *इकडे आड़ तिकडे विहीर*
             *★ अर्थ ::~*
दोन्ही बाजूने अडचणीत सापडणे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

30. *सुखार्थिन: कुतो विद्या ।*
       ⭐अर्थ ::~ सुखाची इच्छा करणाऱ्याला विद्या कोठून मिळणार ?
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

    🛡 *★30. एप्रिल★* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★ बालकामगार विरोधी दिन
★ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज’ जयंती
★ हा या वर्षातील १२० वा (लीप वर्षातील १२१ वा) दिवस आहे.

    ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
  🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९६ : थेऊर येथील श्री चिंतामणी मंदिराच्या आवारातील श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांच्या स्मृ्तिमंदिराचे उद्‍घाटन झाले.
●१९९५ : ऊत्तर आयर्लंडला भेट देणारे बिल क्लिंटन हे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष ठरले.
●१९७७ : ९ राज्यांमधील विधानभा बरखास्त. जनसंघ, समाजवादी पक्ष, संघटना कांग्रेस आणि भारतीय लोकदल या पक्षांनी ‘जनता पक्ष‘ स्थापन करण्याचा निर्णय घेतला.
●१९३६ : वर्ध्याजवळ महात्मा गांधींनी सेवाग्राम आश्रम स्थापन केला.
●१७८९ : जॉर्ज वॉशिंग्टन हे अमेरिकेचे पहिले निवडलेले राष्ट्राध्यक्ष बनले.
●१६५७ : शिवाजी महाराजांनी मोगलांच्या ताब्यात असलेल्या जुन्नरवर हल्ला करुन ते लुटले.

    ~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९८७ : रोहित शर्मा – क्रिकेटपटू
◆१९१० : श्रीरंगम श्रीनिवास राव ऊर्फ ’श्री श्री’ – साहित्य अकादमी पुरस्कार विजेते तेलगु कवी व गीतकार
◆१९०९ : माणिक बंडोजी इंगळे ऊर्फ ’राष्ट्रसंत तुकडोजी महाराज’
(मृत्यू: ११ आक्टोबर १९६८)
◆१८७० : धुंडिराज गोविंद ऊर्फ ’दादासाहेब’ फाळके – भारतीय चित्रपट उद्योगाचे जनक, लेखक, छायाचित्रकार, दिग्दर्शक, संकलक, वेशभूषाकार, कलादिग्दर्शक इ. अनेक जबाबदार्‍या ते सांभाळत असत. (मृत्यू: १६ फेब्रुवारी १९४४)
◆१७७७ : कार्ल फ्रेड्रिक गाऊस – जर्मन गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ, आर्किमिडीज व न्यूटन यांच्या तोडीचे गणितज्ञ, इलिप्टीक फंक्शन्स व नॉन युक्लिडियन जॉमेट्री इ. विषयांवर त्यांचा मोठा अभ्यास होता.

   ~*★ मृत्यू / पुण्यतिथी ★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००३ : वसंत पोतदार – मराठी साहित्यिक
●२००१ : श्रीपाद अच्युत दाभोळकर – ‘प्रयोग परिवार‘ या संकल्पनेचे प्रवर्तक, गणितज्ञ आणि जमनालाल बजाज पुरस्काराने गौरवण्यात आलेले कृषीशास्त्रज्ञ
●१९४५ : नाझी जर्मनीचा हुकूमशहा अ‍ॅडॉल्फ हिटलर याने आत्महत्या केली
●१९१३ : मोरो केशव दामले – व्याकरणकार व निबंधकार
●१८७८ : साक्षात्कारी सत्पुरुष व दत्तावतारी  स्वामीमहाराज अक्‍कलकोट यांनी समाधी घेतली.
●१०३० : गझनीचा महमूद
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

30.    ★ भारत देश महान ★
        ●●●●●००००००●●●●●
भारत देश महान अमुचा भारत देश महान
स्फूर्ती देतिल हेच आमुचे राम कॄष्ण हनुमान॥धृ॥

व्यासादिक मुनिवरे गाइला
संत महंते पावन केला
प्रताप शिवबाने गाजविला
सुखसमृध्दिनिधान॥१॥

चिंतनि इतिहासाच्या दिसती
असंख्य नरवीरांच्या ज्योती
गाता स्वतंत्रतेची किर्ती
घडवू नव संतान॥२॥

धर्मासाठी जीवन जगणे
समष्टिमध्ये विलीन होणे
सीमोल्लंघन दुसरे कसले
यासाठी बलिदान॥३॥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      ❂ प्रार्थना ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

30.   *✹ देह मंदिर ✹*
     ✶✶✹✹★●★✹✹✶✶
देह देवाचे मंदिर
आता आत्मा परमेश्वर

जशी ऊसात हो साखर
तसा देहात हो ईश्वर
जसे दुधामध्ये लोणी
तसा देही चक्रपाणी

देव देहात देहात
का हो जाता देवळात
तुका सांगे मूढजना
देही देव का पहाना
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    ❂ बोधकथा ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

30.    *❃❝ गर्वहरण ❞❃*
     ━━═•●◆●★●◆●•═━━
       एकदा अर्जूनाला अापल्या महालातील कोलाहलाचा खूप कंटाळा येतो. एकांतवास मिळावा म्हणून तो गजबजलेल्या नगरापासून दूर एका निर्जन जंगलात निघून जातो.
     उन्हाळ्याचे दिवस असतात. त्यामुळे वातावरणात उकाडा असतो.
उकाडा दूर करण्यासाठी अर्जून एका झाडाची फांदी तोडण्याचा प्रयत्न करतो. तेवढ्यात एक छोटासा सूर्यपक्षी त्याच्या खांद्यावर येवून बसतो. तो चिमुकला पक्षी पक्षी अर्जूनाला विनंती करतो, " हे सर्वश्रेष्ठ धनुर्धरा ! कृपाकरून या झाडाची फांदी तोडू नकोस. या झाडावर अामची घरटी अाहेत. अाणि त्यामध्ये अामची छोटीछोटी पिलं अाहेत. तुम्ही जर फांदी तोडाल तर अामची  पिलं मरतील. तेव्हा अामच्यावर दया करा. भविष्यात मी अापणास मदत करण्याचे अाश्वासन देतो."
        अर्जून त्याचे म्हणने ऐकतो व तेथून निघून जातो. दुसर्‍या झाडाची फांदी तोडत असतांना एक मुंगी  त्याच्या हातावर चढते अाणि त्याला विनंती करते ," हे  कौंतेय ! या झाडाची फांदी कपाकरून तोडू नका. येथे अामची असंख्य  घरे  अाहेत. त्यात अनेक कुटुंब अाहेत.  अापण फांदी तोडल्यास , त्या सर्वांचा नाश होईल . मी अापल्याला वचन देतो की, संकटकाळी मी अापली अवश्य मदत करेल."
   अर्जून निघून जातो. पण जाताना तो विचार करतो की, "मी एवढा बलाढ्य , सर्वश्रेष्ठ धनुर्धर ! माझ्यावर कोणते संकट येणार अाहे. अाणि  हे  एवढाले क्षुद्र जीव माझी काय मदत करणार अाहेत?" त्याच्या मनात नकळत अहंकार घर करीत जाते .
        असेच बरेच दिवस निघून जातात. पांडवाना जेव्हा  अज्ञातवासाची शिक्षा भोगाण्याची वेळ येते तेव्हा अर्जून  त्याच जंगलात येतो. ही गोष्ट  कौरवांना माहीत होते तेव्हा ते त्याचा पाठलाग करतात. त्याच वेळी तो सूर्यपक्षी अर्जूनाला म्हणतो ,
" तुम्ही माझ्यामागे या."
असे म्हणून तो पूढे उडू लागतो व अर्जून त्याच्य मागेमागे पळू लागतो. पक्षी एका झाडावर येवून बसतो.
त्या झाडाला एक विशाल ढोली असते. अर्जून त्या ढोलीत लपून बसतो. थोड्याच वेळात झाडावरील मुंग्या त्याला झाकून टाकतात. अर्जून तसाच स्तब्ध उभा राहातो. शत्रू त्याच्या जवळ येवूनही त्याला शोधू शकत नाही.
       अर्जून त्यावेळी स्वतःशी विचार करतो ," ज्या चिमुकल्या जिवांना मी क्षुद्र समजून त्यांची हेटाळनी केली होती त्याच सूर्यपक्षाने अाणि या मुंग्यांनी अाज मला फार मोठ्या संकटातून  वाचविले. अन्यथा सर्वांना पून्हा   वनवास भोगावा लागला असता . मी अाज यांची क्षमा मागतो. यांचे उपकार मी जन्मभर विसरू शकणार नाही. अाणि माझ्या सामर्थ्यावर कधीही गर्व करणार नाही."

      *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
  अापण कितीही सामर्थ्यशाली असलो गुणवान असलो तरी कुणालाही कमजोर समजू नये.  कोणती वेळ कशी येईल सांगता येत नाही. कुणीही , केव्हाही, कशाही रूपातअापल्या कामी पडू शकतो . प्रत्येक जीव सामर्थ्यवान असतो.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

30.  "समाधान" म्हणजे 
एक प्रकारचे "वैभव" असून,
ते अंत:करणाची ”संपत्ती” आहे.
   *ज्याला ही "संपत्ती" सापडते तो खरा ”सुखी” होतो...!!*
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा...!!
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

30. *✿सामान्य ज्ञान प्रश्नावली✿*
   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑

✪ 'खेड्याकडे चला' अशी हाक कोणी दिली ?
➜ महात्मा गांधी.

✪ भूदान चळवळ कोणी सुरू केली ?
➜ विनोबा भावे.

✪ मौर्य साम्राज्याचा संस्थापक कोण होता ?
➜ चंद्रगुप्त मौर्य.

✪ प्रसिद्ध लाल किल्ला कोठे आहे ?
➜ दिल्ली.

✪ शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकासाठी काशीवरून कोणाला बोलावले होते ?
➜ गागाभट्ट
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

30. *❒राष्ट्रसंत तुकडोजी महाराज* 
    ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
◆मूळ नाव :~ माणिक बंडोजी इंगळे
●जन्म :~ ३० एप्रिल १९०९
यावली, जि. अमरावती
●निर्वाण :~ ११ ऑक्टोबर १९६८
मोझरी, जि.अमरावती
◆गुरू :~ आडकोजी महाराज
◆भाषा :~ मराठी, हिंदी
◆साहित्यरचना :~ ग्रामगीता, अनुभव सागर भजनावली, सेवास्वधर्म, राष्ट्रीय भजनावली
◆कार्य :~ अंधश्रद्धा निर्मूलन, जातिभेद निर्मूलन

    ★ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज★
  मानवतेचे महान पुजारी वंदनिय श्री तुकडोजी महाराज यांना राष्ट्रसंत म्हणून ओळखले जाते. अंधश्रद्धा निर्मूलन व जातिभेदाच्या निर्मूलना साठी त्यांनी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर केला. आत्मसंयमनाचे विचार त्यांनी ग्रामगीता या काव्यातून मांडले. त्यांनी मराठी व हिंदी भाषांमध्ये काव्यरचना केली आहे. तुकडोजी महाराजांनी १९३५ साली मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. खंजिरी भजन हा प्रकार त्यांच्या प्रबोधनाचे वैशिष्ट्य होते.

    तुकडोजी महाराज हे आधुनिक काळातील महान संत होते. आडकोजी महाराज हे त्यांचे गुरू. विदर्भात त्यांचा विशेष संचार असला तरी महाराष्ट्राभरच नव्हे तर देशभर हिंडून ते आध्यात्मिक, सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रबोधन करीत होते. एवढेच नव्हे तर जपानसारख्या देशात जाऊन त्यांनी सर्वांना विश्वबंधुत्वाचा संदेश दिला. सन १९४२ च्या भारत छोडो आंदोलनादरम्यान काही काळ त्यांना अटक झाली होती. "आते है नाथ हमारे" हे त्यांनी रचलेले पद या काळात स्वातंत्र्यलढ्यासाठी स्फूर्तिगान ठरले होते.

      भारत हा खेड्यांचा देश आहे, हे लक्षात घेऊन ग्रामविकास झाला की राष्ट्राचा विकास होईल, अशी तुकडोजी महाराजांची श्रद्धा व विचारसरणी होती. समाजातल्या सर्व घटकांतील लोकांचा उद्धार कसा होईल, याविषयी त्यांनी अहर्निश चिंता केली. ग्रामोन्नती व ग्रामकल्याण हा त्यांच्या विचारसरणीचा जणू केंद्रबिंदूच होता. भारतातील खेड्यांच्या स्थितीची त्यांना पुरेपूर कल्पना होती. त्यामुळे त्यांनी ग्रामविकासाच्या विविध समस्यांचा मूलभूतस्वरूपी विचार केला व त्या समस्या कशा सोडवाव्यात, याविषयी उपाययोजनाही सुचविली. या उपाययोजना त्यांच्या काळाला तर उपकारक ठरल्याच पण त्यानंतरच्या काळालाही उचित ठरल्या. हे आज (त्यांनी आपली जीवनयात्रा संपल्यानंतरच्या काळातही) तीव्रतेने जाणवते. अशा गोष्टींतूनच राष्ट्रसंतांचे द्रष्टेपण दिसून येते.

     अमरावतीजवळ मोझरीच्या गुरुकुंज आश्रमाची स्थापना हे तुकडोजींच्या आयुष्यातील जसे लक्षणीय कार्य आहे, त्याचप्रमाणे ग्रामगीतेचे लेखन हाही त्यांच्या जीवनकार्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. ग्रामगीता ही जणू तुकडोजी महाराजांच्या वाङ्‌मयसेवेची पूर्तीच होय. स्वत:ला ते तुकड्यादास म्हणत कारण भजन म्हणताना ते जी भिक्षा घेत, त्यावरच आपण बालपणी जीवन कंठिले, ह्याची त्यांना जाणीव होती. त्यांचे मूळचे माणिक हे नाव त्यांचे गुरू आडकोजी महाराज यांनी बदलून तुकडोजी असे केले.

       खेडेगाव स्वयंपूर्ण कसे होईल, याविषयीची जी उपाययोजना तुकडोजी महाराजांनी सुचविली होती, ती अतिशय परिणामकारक ठरली. ग्राम हे सुशिक्षित व्हावे, सुसंस्कृत व्हावे, ग्रामोद्योग संपन्न व्हावेत, गावानेच देशाच्या गरजा भागवाव्यात, ग्रामोद्योगांना प्रोत्साहन मिळा्वे, प्रचारकांच्या रूपाने गावाला नेतृत्व मिळावे, असा त्यांचा प्रयत्‍न होता. त्याचे प्रतिबिंब ग्रामगीतेत उमटले आहे. देवभोळेपणा, जुनाट कालबाह्य अंधश्रद्धा नाहीशा व्हाव्यात, याविषयी त्यांनी अविरत प्रयत्‍न केले.

     सर्वधर्मसमभाव हेही या राष्ट्रसंताच्या विचारविश्वाचे एक वैशिष्ट्य होते. त्यासाठी तुकडोजी महाराजांनी सामुदायिक/सर्वधर्मीय प्राथनेचा आग्रहपूर्वक पुरस्कार केला.

     तुकडोजी महाराज हे विवेकनिष्ठ जीवनदृष्टीतून एकेश्वरवादाचा पुरस्कार करत असत. धर्मातील अनावश्यक कर्मकांडाला त्यांनी फाटा दिला होता. आयुष्याच्या शेवटापर्यंत त्यांनी आपल्या प्रभावी खंजिरी भजनाच्या माध्यमातून त्यांना अभिप्रेत असलेल्या विचारसरणीचा प्रचार करून आध्यात्मिक, सामाजिक, राष्ट्रीय प्रबोधन केले. स्वातंत्र्याच्या चळवळीत भाग घेतला म्हणून त्यांना कारावासही भोगावा लागला. अखिल भारतीय पातळीवर त्यांनी साधुसंघटनेची स्थापना केली. गुरुकुंज आश्रमाच्या शाखोपशाखा स्थापन करून त्यांनी शिस्तबद्ध सामाजिक कार्यकर्त्यांची एक फळीच निर्माण केली. गुरुकुंजाशी संबंधित असलेले हे सर्व निष्ठावंत कार्यकर्ते आजही त्यांचे हे कार्य अखंडव्रतासारखे चालवीत आहेत.

     महिलोन्नती हाही तुकडोजी महाराजांच्या विचारविश्वाचा एक लक्षणीय पैलू होता. कुटुंबव्यवस्था, समाजव्यवस्था, राष्ट्रव्यवस्था ही स्त्रीवर कशी अवलंबून असते, हे त्यांनी आपल्या कीर्तनांद्वारे समाजाला पटवून दिले. त्यामुळे स्त्रीला अज्ञानात व दास्यात ठेवणे कसं अन्यायकारक आहे, हे त्यांनी अत्यंत प्रभावीपणे पटवून दिले.

     देशातले तरुण हे राष्ट्राचे भावी आधारस्तंभ. ते बलोपासक असावेत म्हणजे ते समाजाचे व राष्ट्राचे संरक्षण करू शकतील. ते नीतिमान व सुसंस्कृतयुक्त कसे होतील, याविषयीचे उपदेशपर व मार्गदर्शनपर लेखन तुकडोजींनी केले. व्यसनाधीनतेचा तीव्र निषेध या राष्ट्रसंताने आपल्या लेखनातून केला.

     ऐहिक व पारलौकिक यांचा सुंदर समन्वय तुकडोजी महाराजांच्या साहित्यात झाला आहे. त्यांनी मराठीप्रमाणेच हिंदी भाषेतही विपुल लेखन केले. आजही त्यांचे हे साहित्य आपल्याला मार्गदर्शन करीत आहे, यावरून त्यांच्या साहित्यात अक्षर वाङमयाची मूल्ये कशी दडली आहेत, याची सहज कल्पना येईल. राष्ट्रपतिभवनात झालेले त्यांचे खंजिरी भजन ऐकून राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांनी तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत म्हणून संबोधिले होते.

     तुकडोजी महाराजांचे महानिर्वाण आश्विन कृष्ण पंचमी शके १८९० (३१ ऑक्टोबर, १९६८) रोजी झाले.

     राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांच्या प्रसिद्धीचे काम अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळा द्वारे केले जाते.

     ग्रामगीताहा त्यांचा ग्राम विकासावरील ग्रंथ प्रसिद्ध आहे. या शिवाय हिंदीतून लिहिलेला लहरकी बरखा हे पुस्तकही प्रसिद्ध आहे. त्यांचे ग्रामगीता ग्रंथामधील विचार सर्व सामान्यापर्यंत पोहचावे याकरिता महाराष्ट्र शासनाने ग्रामगीता हा ग्रंथ पुनर्मुद्रित करून, सवलतीच्या १० रुपये या किंमतीत उपलब्ध करुन दिला आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
            *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌

*❁मंगळवार~30/04/20224❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment