*30/06/25 सोमवार चा परिपाठ*
❂••⊰❉⊱•⊰❉⊱•⊰❉⊱••❂
*महाराष्ट्र शिक्षक परिवार*
*❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀*
 *💲शालेय परिपाठ💲*
❉⌘❉⌘✽⌘✪⌘✽⌘❉⌘❉
    🇮🇳 *राष्ट्रगीत*  🇮🇳
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ 
    ♦ *प्रतिज्ञा* ♦
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ 
    🇮🇳 *संविधान* 🇮🇳
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ 
   🌀 *महाराष्ट्र गीत* 🌀
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
💎 *सर्वप्रकारची शैक्षणिक माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी...*
 🔘 *"माझी शाळा" ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
  🔗🔗👇👇🔗🔗
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
 ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *30. जून:: सोमवार* 🍥
 ⫹⫺⫹⫺⫹⫺⫹⫺⫹⫺⫹⫺⫹⫺⫹⫺⫹⫺
आषाढ शु.५, पक्ष :शुक्ल पक्ष,
तिथि ~पञ्चमी, नक्षत्र ~मघा, 
योग ~सिद्धि, करण ~बालव, 
सूर्योदय-06:03, सूर्यास्त-19:19,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]       ❂ सुविचार ❂* 
  ━┅━═▣◆★✪★◆▣═━┅━
30. *गुणांचं कौतुक उशीरा होतं; पण होतं !*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
30. *असंगाशी संग प्राणाशी गाठ*
  *★ अर्थ ::~* दृष्टांची संगत करून स्वत:वर संकट ओढवणे 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
30. *नयेन चालंक्रियते नरेन्द्रता ।*   
             ⭐अर्थ ::~
    राजाला नम्रतेनेच शोभा येते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
        🛡 *30. जून* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★हा या वर्षातील १८१ वा (लीप वर्षातील १८२ वा) दिवस आहे.
        ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
 🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●१९८६	:	केन्द्र सरकार व मिझो नॅशनल फ्रंट यांच्यात करार होऊन मिझोरामला राज्याचा दर्जा देण्याचे ठरले.
●१९७१	:	सोयुझ-११ या रशियन अंतराळयानात बिघाड होऊन तीन अवकाशवीर ठार झाले.
●१९६६	:	कोका सुब्बा राव यांनी भारताचे ९ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
●१९६५	:	भारत व पाकिस्तानमध्ये कच्छचा करार झाला.
    ~*★जन्मदिवस / जयंती★*~
 🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९६९	:	सनत जयसूर्या – श्रीलंकेचा क्रिकेटपटू
◆१९६६	:	माईक टायसन – अमेरिकन मुष्टीयोद्धा
◆१९४३	:	सईद मिर्झा – दिग्दर्शक आणि पटकथालेखक
◆१९२८	:	कल्याणजी वीरजी शाह – सुमारे तीन दशके रसिकांवर आपल्या सुरावटीची मोहिनी घालणार्या ’कल्याणजी-आनंदजी’ या संगीतकार द्वयीतील ज्येष्ठ बंधू 
      ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
 🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९९	:	कृष्णा बळवंत तथा कृ. ब. निकुंब – सहजसुंदर काव्याविष्काराचा प्रत्यय घडवणारे मराठी काव्यसृष्टीतील कवी 
●१९९४	:	बाळकृष्ण हरी तथा ’बाळ’ कोल्हटकर – नाटककार, कवी, अभिनेते, निर्माते, लेखक व दिग्दर्शक
●१९९२	:	डॉ. वसंत कृष्ण वराडपांडे – साहित्यिक, वक्ते व समीक्षक 
●१९१७	:	पितामह दादाभाई नौरोजी – भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक आणि राजकीय व सामाजिक नेते, ब्रिटिश संसदेचे सदस्यत्त्व मिळवणारे पहिले भारतीय
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..
     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
  ━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
30. *✹मेरे देश की धरती✹*
     ●●●●●००००००●●●●●
मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती 
मेरे देश की धरती 
बैलों के गले में जब घुँघरू जीवन का राग सुनाते हैं 
ग़म कोस दूर हो जाता है खुशियों के कंवल मुसकाते हैं 
सुन के रहट की आवाज़ें यों लगे कहीं शहनाई बजे 
आते ही मस्त बहारों के दुल्हन की तरह हर खेत सजे
मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती 
मेरे देश की धरती
जब चलते हैं इस धरती पे हल ममता अँगड़ाइयाँ लेती है 
क्यों ना पूजे इस माटी को जो जीवन का सुख देती है 
इस धरती पे जिसने जनम लिया उसने ही पाया प्यार तेरा
यहाँ अपना पराया कोई नही हैं सब पे माँ उपकार तेरा
मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती 
मेरे देश की धरती 
ये बाग़ हैं गौतम नानक का खिलते हैं अमन के फूल यहाँ 
गांधी, सुभाष, टैगोर, तिलक ऐसे हैं चमन के फूल यहाँ 
रंग हरा हरिसिंह नलवे से रंग लाल है लाल बहादुर से 
रंग बना बसंती भगतसिंह रंग अमन का वीर जवाहर से
मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती 
मेरे देश की धरती
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      ❂ प्रार्थना ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
30. *❂ हे करुणाकरा ईश्वरा ❂*
       ✶✶✹✹★●★✹✹✶✶
हे करुणाकरा, ईश्वरा । कृपादान मज देई
तुजविण कोण निवारी संकट । दृढता ही तव पायी ॥
तूही आदि तू अनंत । तूही दु:स्तर भवनिधि तारक
तानसेन प्रभु तुम्ही उद्धरा ॥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    ❂ बोधकथा ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
30.     *❝  परिश्रम ❞*
     ━━═•●◆●★●◆●•═━━
     एक जमीनदार होता. त्याला त्याच्या वाडवडीलांपासून खूप संपत्ती मिळालेली होती. अतिश्रीमंतीमुळे तो खूप आळशी बनला होता. त्याचा दिवस हा टवाळक्या करणे व हुक्का ओढत बाजेवर पडून राहणे यातच जात असे. त्याच्या या आळशीपणाचा फायदा त्याचे नोकरचाकर इमानेइतबारे घेत असत. 
   त्याचे नातेवाईकही या आळशी स्वभावाला ओळखून होते व तेही त्याच्या संपत्तीचा गैरफायदा घेत असत, त्याची संपत्ती हळूहळू का होईना साफ करण्यात ते मश्गुल होते. एकदा परगावाहून जमिनदाराचा एक मित्र त्याला भेटण्यासाठी आला होता. त्याने हे सर्व नोकरचाकरांचे, नातेवाईकांचे वर्तन पाहिले व मित्राला कसे लुटले जात आहे हे त्याच्या लक्षात आले. त्याने हे जमिनदाराच्या कानावर घातले पण तो इतका आळशी होता की त्याने मित्राच्या बोलण्याकडे लक्षच दिले नाही. शेवटी त्याने एक हुकुमी एक्का वापरला. तो जमिनदाराला म्हणाला,’’ मित्रा, मला असे एक संतमहात्मा माहित आहेत की जे तुझी संपत्ती दुप्पट करून देऊ शकतील. फक्त तू त्यांच्या दर्शनाला चल व ते जसे सांगतील तसे तू वाग. तुझी संपत्ती अजून वाढेल.’’ जमिनदाराला पैशाची हाव सुटली व तो संतांकडे जाण्यास तयार झाला. संतांकडे जाऊन दर्शन घेतले व संतांना मार्गदर्शन करण्यास सांगितल्यावर ते म्हणाले,’’ तुझ्या शेतामध्ये एक राजहंस रोज पहाटे सूर्योदयापूर्वी येत असतो त्याचे दर्शन तू घेतल्यास तुझ्या संपत्तीत प्रचंड वाढ होईल. मात्र इतर कोणीही त्या राजहंसाला पाहण्यापूर्वी तू पाहणे गरजेचे आहे.’’ दुस याच दिवशी जमिनदार लोभाने का होईना पहाटे उठला व शेतात गेला. त्याला तेथे एक आश्चर्यकारक दृश्य दिसले. त्याचा एक नातेवाईक पाठीवर धान्याचे भरलेले एक पोते शेतातून चोरून घेऊन चाललेला दिसला. नातेवाईकाला जमिनदाराने विचारले असता तो नातेवाईक ओशाळा झाला व माफी मागू लागला. जमिनदार लवकर उठला असल्याने तो दूध पिण्यासाठी गोठ्यामध्ये गेला तर तेथे अजून एक चकित करणारे दृश्य त्याला दिसले. त्याचे नोकर हे दूधामध्ये पाणी मिसळून दूध वाढवित होते व वाढविलेले दूध हे बाजूला ठेवून त्याचे पैसे मिळविण्यासंबंधी चर्चा करत होते. जमिनदाराने हे ऐकले व नोकरांना कामावरून काढण्याची धमकी देताच ते गयावया करू लागले व काम प्रामाणिकपणे करू असे त्यांनी सांगितले. 
        जमिनदार आता रोजच लवकर उठू लागला व राजहंसाचे दर्शन घेण्यासाठी शेतात जाऊ लागला. यामुळे सगळे नोकरचाकर, नातेवाईक, धान्यचोर यांना मालक शेतात हजर असतो याची जरब बसली व ते चोरी करेनासे झाले. लवकर उठून शेतात फेरफटका मारल्याने जमिनादाराची तब्येत पण सुधारू लागली. चोरी कमी झाल्याने दूधदुभते, धान्य, पीक, भाजीपाला यातून जमिनदाराचे धन अजूनच वाढू लागले. पण राजहंस कसा दिसत नाही हा प्रश्न घेऊन तो संतांकडे गेला असता महात्मा म्हणाले,’’ अरे तुला तर तो राजहंस दिसला पण तू त्याला ओळखू शकला नाही. परिश्रम नावाचा एक राजहंस तुझ्या आयुष्यात आला आणि त्याने तुझ्यातल्या आळशीपणाला दूर करून तुझ्या धनाची वाढ करून दिली.’’  
      *🌀❝ तात्पर्य ❞ ::~* 
   परिश्रमरूपी परिस ज्यांच्या ज्यांच्या आयुष्याला स्पर्श करतो त्यांच्या जीवनाचे सोने बनते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
30.    माणसाला यश मिळवणे हे 
कोणाच्या आधारावर नसते...!! 
*तर ते चांगल्या विचारावर असते...!!*
*कारण आधार कायम सोबत नसतो.*
     *पण चांगले विचार कायम*
            *बरोबर राहतात..!!*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
30. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿* ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑
✪  ' द थर्ड पिलर' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
   ➜ रघुराम राजन.
✪  जगातील पहिली महिला अंतरिक्ष यात्री कोण ?
   ➜ वेलेटिना तेरेश्कोवा.
✪ भारतीय चित्रपटसृष्टीत देण्यात येणारा सर्वोच्च पुरस्कार कोणता ?
   ➜ दादासाहेब फाळके पुरस्कार.
✪  पाकिस्तानच्या चित्रपट उद्योगाला काय म्हणतात ?
   ➜ लाॅलीवुड.
 ✪  भारतातील पहिले आदर्श डिजीटल गाव कोणते ?
   ➜ हरिसाल. ( अमरावती )
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
30. *❒♦ दादाभाई नौरोजी ♦❒*  
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
       भारतीय राजकारणातील   
                *भीष्माचार्य*
 _*🐾यांचा आज स्मृतिदीन*_🐾
         _त्यानिमित्त त्यांना_
      _*विनम्र अभिवादन..!!*_
 🙏🐾🌷🌹🌹🌷🐾🙏
●जन्म	 :~ ४ सप्टेंबर १८२५
             मुंबई, महाराष्ट्र, भारत
●मृत्यू	 :~  ३० जून १९१७
●व्यवसाय	 :~ बॅरिस्टर
         *◆ दादाभाई नौरोजी ◆*
      हे पारशी विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ, कापूस-व्यापारी व भारतीय स्वातंत्र्यलढ्यातल्या राजकारण्यांच्या पहिल्या पिढीतील होते. त्यांनी लिहिलेल्या पॉव्हर्टी अँड अन-ब्रिटिश रूल इन इंडिया (अर्थ: भारतातील अ-ब्रिटिश राजवट आणि गरिबी) या पुस्तकाने भारतातील संपत्तीचा ओघ ब्रिटनाकडे कसा वाहिला जात होता, याकडे लक्ष वेधले. इ.स. १८९२ ते इ.स. १८९५ या कालखंडात ते ब्रिटिश संसदेच्या कनिष्ठ गृहात संसदसदस्य होते. ब्रिटिश संसदेत निवडून गेलेले ते पहिलेच आशियाई व्यक्ती ठरले. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षाच्या स्थापनेचे श्रेय ए.ओ. ह्यूम व दिनशा एडलजी वाच्छा यांच्यासह दादाभाई नौरोजींना दिले जाते.
             
     "दादाभाई नौरोजी यांना भारताचे पितामह म्हणून ओळखतात." ते भारतीय राष्ट्रवादाचे प्रणेते होते. भारतीय अर्थशास्त्राचे जनक.* जहाल व मवाळ यांच्यात सुवर्णमध्य साधणारे नेते. भारतीय स्वराज्याचे पहिले उद्गाते. इंग्रजांच्या मतदारसंघातून निवडून येणारे व तेथील हॉउस ऑफ कॉमन चे सभासद बनणारे ते पहिले भारतीय. भारताच्या लुटीच्या सिद्धान्ताचे जनक. १८८३ साली ब्रिटिशा कडून त्यांना जस्टीस ऑफ पीस हा क़िताब देण्यात आला.
मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयात नियुक्त होणारे ते पहिले भारतीय. ते रा. गो. भांडारकर यांचे आवडते भारतीय प्राध्यापक होते. महंमद अली जिना हे त्यांचे खाजगी सचिव होते.
          *◆ जीवन प्रवास ◆*
१८४५ - स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी ही संस्था स्थापन करण्यात सह्भाग. 
१८८५ - भारतीय राष्ट्रिय कॉ्ंग्रेसचे संस्थापक सदस्य. 
१८८६, १८९३ व १९०६ - भारतीय राष्ट्रीय कॉग्रेसचे अध्यक्षपद.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
            *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
 *✧❂ महाराष्ट्र शिक्षण मित्र❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌
 *❁सोमवार~30/06/2025❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
No comments:
Post a Comment