"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

*30/08/24 शुक्रवार परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

*Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*

*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*

 *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

 *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

 *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
       🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

https://goo.gl/RpQbsw
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]    ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *30. ऑगस्ट:: शुक्रवार* 🍥
━═•●◆❃★❂★❃◆●•═━
श्रावण कृ.१२, पक्ष :कृष्ण पक्ष,
तिथि ~द्वादशी, नक्षत्र ~पुनर्वसु,
योग ~व्यतीपात, करण ~कौलव,
सूर्योदय-06:22, सूर्यास्त-18:55,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]      ❂ सुविचार ❂*
  ━┅━▣◆★✪★◆▣═┅━

30. *चुकीचा व्यवहार माणसं तोडतो म्हणून तो सत्त्याने आणि सन्मानाने करा.*


▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●━━

30. *काखेत कळसा गावाला वळसा*
             ★ अर्थ ::~ 
वस्तू स्वत:पाशी असून शोधत राहणे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━

30. *"सन्तोषतुल्यं धनमस्ति नान्यत्"*
              ⭐अर्थ ::~
   समाधानासारखे दुसरे धन नाही.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●━━

    🛡 ★ 30. ऑगस्ट ★ 🛡
🔻===●●●★●●●===🔻
★हा या वर्षातील २४२ वा (लीप वर्षातील २४३ वा) दिवस आहे.     

   ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९७९ : सुमारे दहा लाख हायड्रोजन बॉम्बच्या स्फोटांएवढी ऊर्जा निर्माण करुन ’हॉवर्ड-कुमेन-मायकेल्स’ हा धूमकेतू सूर्याच्या पृष्ठबागावर आदळला. सूर्याच्या पृष्ठभागावर धूमकेतू आदळण्याची मानवी इतिहासातील ही पहिली नोंद आहे.
●१८३५ : ऑस्ट्रेलियातील मेलबर्न शहराची स्थापना झाली.
●१५७४ : गुरू रामदास शिखांचे चौथे गुरू बनले.

  ~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९०४ : नवल होर्मुसजी टाटा – उद्योगपती, पद्मभूषण [१९६९]
◆१८८३ : जगन्नाथ गणेश गुणे तथा स्वामी कुवलयानंद – योगविद्येचे पुरस्कर्ते व शारीरिक शिक्षणतज्ञ,
◆१८७१ : अर्नेस्ट रुदरफोर्ड – नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ
◆१८५० : काशिनाथ त्र्यंबक तेलंग – प्राच्यविद्या संशोधक, न्यायमूर्ती, कायदेपंडीत, समाजसुधारक, अखिल भारतीय काँग्रेसचे एक संस्थापक,

   ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
◆१९९८ : नरहर वामन तथा ’नरुभाऊ’ लिमये – स्वातंत्र्यसैनिक, निर्भिड पत्रकार व काँग्रेसचे तत्त्वनिष्ठ नेते
◆१९८१ : जयंत पांडुरंग तथा ’जे. पी.’ नाईक – शिक्षणतज्ञ, ’इंडियन इन्स्टिट्युट ऑफ एज्युकेशन’चे संस्थापक, भारतामध्ये प्रथमच स्थापन केल्या गेलेल्या शैक्षणिक आयोगाचे सभासद सचिव
◆१९४७ : नारायण मुरलीधर गुप्ते ऊर्फ ’कवी बी’ – त्यांची ‘चाफा बोलेना, चाफा चालेना ...‘ ही कविता खूप प्रसिद्ध आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

   https://urlzs.com/18er9
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
  ━┅═▣◆★✧★◆▣═┅━

30. *✹मेरे देश की धरती✹*
   ●●●●०००००●●●●
मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती 
मेरे देश की धरती 
बैलों के गले में जब घुँघरू जीवन का राग सुनाते हैं 
ग़म कोस दूर हो जाता है खुशियों के कंवल मुसकाते हैं 
सुन के रहट की आवाज़ें यों लगे कहीं शहनाई बजे 
आते ही मस्त बहारों के दुल्हन की तरह हर खेत सजे

मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती 
मेरे देश की धरती

जब चलते हैं इस धरती पे हल ममता अँगड़ाइयाँ लेती है 
क्यों ना पूजे इस माटी को जो जीवन का सुख देती है 
इस धरती पे जिसने जनम लिया उसने ही पाया प्यार तेरा
यहाँ अपना पराया कोई नही हैं सब पे माँ उपकार तेरा

मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती 
मेरे देश की धरती 
ये बाग़ हैं गौतम नानक का खिलते हैं अमन के फूल यहाँ 
गांधी, सुभाष, टैगोर, तिलक ऐसे हैं चमन के फूल यहाँ 
रंग हरा हरिसिंह नलवे से रंग लाल है लाल बहादुर से 
रंग बना बसंती भगतसिंह रंग अमन का वीर जवाहर से

मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती 
मेरे देश की धरती
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      ❂ प्रार्थना ❂*
━┅═▣◆★✧★◆▣═┅━

30. *❂ देह मंदिर चित्तमंदिर ❂*
    ━═●✶✹★★✹✶●━━
देह मंदिर, चित्तमंदिर, एक तेथे प्रार्थना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना

दु:खितांचे दु:ख जावो ही मनाची कामना
वेदना जाणावयाला जागवू संवेदना
दुर्बलांच्या रक्षणाला पौरूषाची साधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना

जीवनी नवतेज राहो अंतरंगी भावना
सुंदराचा वेध लागो मानवाच्या जीवना
शौर्य लाभो, धैर्य लाभो, सत्यता संशोधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना

भेद सारे मावळू द्या वैर सार्‍या वासना
मानवांच्या एकतेची पूर्ण होवो कल्पना
मुक्त आम्ही फक्त मानू बंधुतेच्या बंधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    ❂ बोधकथा ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●━━

30.❝ऐकावे जनाचे, करावे मनाचे.!❞
   ━═•●◆●★★●◆●•═━
        *एक म्हातारा व त्याचा मुलगा आपला घोडा विकण्यासाठी बाजारात चालले असता वाटेत एक माणूस त्या म्हातार्‍याला म्हणाला,*                                         

       'हा लहान मुलगा पायी चालला आहे, त्यापेक्षा तू त्याला घोड्यावर बसव.' .

       ते ऐकताच म्हातार्‍याने मुलाला घोड्यावर बसविले व आपण लगाम धरून चालू लागला.

      पुढे दुसरा माणूस त्या मुलाला म्हणाला,
     'आळशी पोरा, तुझा म्हातारा बाप पायी चालत असताना तुला घोड्यावर बसून जायची लाज वाटत नाही का?'

      ते ऐकताच म्हातार्‍याने मुलाला खाली उतरवले व आपण घोड्यावर बसून निघाला. थोडे पुढे जाताच दोन स्त्रिया त्यांच्याकडे बोट दाखवून म्हणाल्या,

     'म्हातारा पहा, लहान मूल पायी चाललं असता आपण घोड्यावर बसून कसा चालला आहे?'

      ते ऐकताच त्याने मुलाला आपल्या मागे घोड्यावर बसवून घेतले. ते आणखी थोडे पुढे जाताच तोच एक माणूस त्यांना विचारतो,

     'हा घोडा तुमचाच का?' म्हातारा म्हणाला, 'हो.' माणूस म्हणाला, 'मला काही खरं वाटत नाही, कारण हा जर तुमचा असता तर तुम्ही त्याचे असे हाल केले नसते. दोघंही त्याच्या पाठीवर बसून चालला आहात, त्यापेक्षा तुम्हीच त्याला उचलून का घेत नाही?'

      ते ऐकताच दोघेही घोड्यावरून खाली उतरले व त्या घोड्याला आडवे करून त्यांनी त्याचे पाय बांधले. मग त्यात एक वेळू घालून तो त्यांनी आपल्या खांद्यावर घेतला व पुढे निघाले. ते पाहून रस्त्यातील सगळे लोक टाळया पिटून मोठमोठ्याने हसू लागले. तो आवाज ऐकून घोडा बिचकला व त्याने आपले पाय झाडून पायाला बांधलेले दोर तोडून टाकले. दोर तुटताच खाली नदी होती तिच्यात तो पडला व बुडून मरण पावला.

      *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
   प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रकारच्या सुचना देतात त्या एकूण घेऊन त्याप्रमाणे वागणे व प्रत्येकाला त्या प्रमाणे खुष करणे फार कठीण काम आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━

30. प्रत्येकाचा *आदर* करणे
     हा आपल्या स्वभावातला
  एक सुंदर दागिनाच नव्हे तर ..
    एक प्रकारची गुंतवणूक आहे..!

    ती आपल्याला व्याजासकट
        नक्की  परत मिळते...!!
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━▣◆★✧★◆▣━┅━

30. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*
   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑

◆ एकलहरे विद्युत निर्मिती केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे ?
  ➜नाशिक.

◆ कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?
  ➜रायगड.

◆ चंद्रपूर जिल्ह्यात कोणते औष्णिक ऊर्जा केंद्र आहे ?
  ➜दुर्गापूर.

◆ चादरीकरीता प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते ?
  ➜सोलापूर.

◆ हिमरू शालीकरीता प्रसिद्ध असलेले शहर कोणते ?
  ➜ औरंगाबाद.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●━━

30. *❒ नारायण मुरलीधर गुप्ते ❒* 
     ━═•●◆●★★●◆●•═━
●जन्म :~ १ जून १८७२
*●मृत्यू :~  ३० ऑगस्ट १९४७*

  *" चाफा बोलेना, चाफा चालेना..."*
    नारायण मुरलीधर गुप्ते ऊर्फ
            *कवी "बी"*
_यांचा स्मृतिदीन त्यानिमित्त त्यांना_
        *विनम्र अभिवादन..!!*
   🙏🐾🌷🌹🌹🌷🐾🙏
    
    💎हे मराठी कवी होते. त्यांनी प्रणय, सामाजिक, कौटुंबिक, ऐतिहासिक इ. नानाविध विषयांवर कविता केल्या. तसेच, त्यांनी काही भाषांतरेही केली आहेत. त्यांची पहिली कविता 'प्रणय पत्रिका' १८९१ साली 'करमणूक' मध्ये छापून आली होती. त्यांच्या प्रसिद्धीपराङ्मुख स्वभावामुळे 'कवी बी' कोण हे लोकांना अनेक वर्षे माहिती नव्हते.
    💎'फुलांची ओंजळ' हा त्यांच्या ३८ कवितांचा संग्रह असून प्रस्तावना आचार्य अत्र्यांची आहे.

     *_💥प्रकाशित काव्यसंग्रह_*

♦ फुलांची ओंजळ (१९३४)
          *_💥प्रसिद्ध कविता_*

🔸चाफा (चाफा बोलेना, चाफा चालेना..)
🔹माझी कन्या (गायी पाण्यावर काय म्हणूनी आल्या...)
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹✹★✹◑◎●••
            *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❂█║▌║█║▌

*❁शुक्रवार~30/08/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*


No comments:

Post a Comment