"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

 

*30/10/24 बुधवारचा परिपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

*Ⓜ💲🅿 परिपाठ Ⓜ💲🅿*

*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*

 *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

 *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

 *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
       🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

https://goo.gl/RpQbsw
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]    ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *30.ऑक्टोबर:: बुधवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
आश्विन कृ.१३, पक्ष :कृष्ण पक्ष,
तिथि ~त्रयोदशी, नक्षत्र ~हस्त,
योग ~वैधृति, करण ~वणिज,
सूर्योदय-06:38, सूर्यास्त-18:05,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]   ❂ सुविचार ❂*
━┅═▣◆★✪★◆▣═┅━

30. *मनाच्या निर्मलतेशिवाय निर्भयता निर्माण होत नाही.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

30. एका हाताने टाळी वाजत नाही–
  ★ अर्थ ::~ दोष दोन्हीकडे असतो.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

30.  *विनयात् याति पात्रताम् ।*
   ⭐अर्थ :: ~ नम्रतेमुळे पात्रता येते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

  🛡 ★ 30. ऑक्टोबर ★ 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★जागतिक काटकसर दिन
★हा या वर्षातील ३०३ वा (लीप वर्षातील ३०४ वा) दिवस आहे.

        ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●२०१३ : सचिन तेंडुलकर आपल्या कारकिर्दीतील शेवटचा रणजी सामना खेळला. हरयाणाविरुद्ध झालेल्या या सामन्यात सचिनने विजयी फटका मारला.
●१९६६ : शिवाजी पार्कवर शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा झाला.
●१९४५ : भारताला संयुक्त राष्ट्रांचे (United Nations) सदस्यत्त्व मिळाले.
●१९२८ : लाहोर येथे सायमन कमिशनचा निषेध करणार्‍या लाला लजपतराय यांच्यावर ब्रिटिश पोलिसांनी लाठीहल्ला केला. त्यातच पुढे १७ नोव्हेंबर १९२८ रोजी त्यांचा अंत झाला.

      ~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
🔸•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔸
◆१९४९ : प्रमोद महाजन – केन्द्रीय मंत्री व राज्यसभा खासदार
◆१९०९ : *डॉ. होमी जहांगीर भाभा* – भारतीय भौतिकशास्त्रज्ञ
◆१८८७ : सुकुमार रॉय – बंगाली साहित्यिक आणि ’संदेश’ या लहान मुलांच्या मासिकाचे संस्थापक, चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रॉय यांचे वडील
◆१७३५ : जॉन अ‍ॅडॅम्स – अमेरिकेचे २ रे राष्ट्राध्यक्ष आणि पहिले उपराष्ट्राध्यक्ष

        ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९८ : विश्राम बेडेकर – लेखक व दिग्दर्शक
●१९९६ : प्रभाकर नारायण ऊर्फ ’भाऊ’ पाध्ये – लेखक, पत्रकार व कामगार संघटनेचे कार्यकर्ते
●१९९० : व्ही. शांताराम – चित्रपटनिर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते, पद्मश्री, दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते
●१९९० : विनोद मेहरा – अभिनेता
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
   ━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

30. *✸ हम धरती के लाल ✸*
       ●●●●●००००००●●●●●
देश हमारा धरती अपनी, हम धरती के लाल
नया संसार बसाएँगे, नया इन्सान बनाएँगे
सौ-सौ स्वर्ग उतर आएँगे,
सूरज सोना बरसाएँगे,
दूध-पूत के लिए पहिनकर
जीवन की जयमाल,
रोज़ त्यौहार मनाएँगे,
नया संसार बसाएँगे, नया इंसान बनाएँगे।
देश हमारा धरती अपनी, हम धरती के लाल।
नया संसार बसाएँगे, नया इन्सान बनाएँगे॥

सुख सपनों के सुर गूँजेंगे,
मानव की मेहनत पूजेंगे
नई चेतना, नए विचारों की
हम लिए मशाल,
समय को राह दिखाएँगे,
नया संसार बसाएँगे, नया इंसान बनाएँगे।
देश हमारा धरती अपनी, हम धरती के लाल।
नया संसार बसाएँगे, नया इन्सान बनाएँगे॥

एक करेंगे मनुष्यता को,
सींचेंगे ममता-समता को,
नई पौध के लिए, बदल
देंगे तारों की चाल,
नया भूगोल बनाएँगे,
नया संसार बसाएँगे, नया इन्सान बनाएँगे।
देश हमारा धरती अपनी, हम धरती के लाल।
नया संसार बसाएँगे, नया इन्सान बनाएँगे॥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]     ❂ प्रार्थना ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

30. *❂ देह मंदिर चित्तमंदिर ❂*
       ✶✶✹✹★●★✹✹✶✶
देह मंदिर, चित्तमंदिर, एक तेथे प्रार्थना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना

दु:खितांचे दु:ख जावो ही मनाची कामना
वेदना जाणावयाला जागवू संवेदना
दुर्बलांच्या रक्षणाला पौरूषाची साधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना

जीवनी नवतेज राहो अंतरंगी भावना
सुंदराचा वेध लागो मानवाच्या जीवना
शौर्य लाभो, धैर्य लाभो, सत्यता संशोधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना

भेद सारे मावळू द्या वैर सार्‍या वासना
मानवांच्या एकतेची पूर्ण होवो कल्पना
मुक्त आम्ही फक्त मानू बंधुतेच्या बंधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    ❂ बोधकथा ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

30. *❃एक तरी ओवी अनुभवावी❃*
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
    कौरव आणि पांडव आश्रमात राहून शिक्षण घेत होते. एकदा त्यांच्या गुरूंना काही कामानिमित्त बाहेरगावी जायचे होते. जातांना त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना ते परत येईपर्यंत काही पाठांचा अभ्यास करण्यास सांगितले. पंधरा दिवसांनी गुरु परतले आणि प्रत्येकाने काय काय अभ्यास केला, याविषयी विचारणा करू लागले. प्रत्येक जण आपण कसा जास्तीतजास्त अभ्यास केला, याविषयी सांगू लागला. शेवटी धर्मराजाची पाळी आली. धर्मराज म्हणाला, गुरुजी, मी एका वाक्याचा अभ्यास केला. धर्मराजाच्या तोंडचे उत्तर ऐकताच गुरुजींना खूप राग आला; कारण धर्मराज हा त्यांचा अत्यंत आवडता आणि हुशार विद्यार्थी होता. ते ओरडले, काय रे, या सर्वांपेक्षा तू मोठा आहेस, बुद्धीमान आहेस आणि तरीसुद्धा तू केवळ एकाच वाक्याचा अभ्यास केला म्हणतोस ? तुला लाज वाटली पाहिजे.

धर्मराज शांतपणे म्हणाला, गुुरुजी, माझा नाईलाज आहे; परंतु एवढ्या कमी काळात मी खरंच एक वाक्य शिकलो. गुरुजींचा पारा चढला. ते खवळले आणि म्हणाले, मूर्खा लेका, तू आळशीच नाहीस, तर निर्लज्ज आहेस. तरीही धर्मराज शांतच होता. जराही विचलित न होता तो म्हणाला, गुरुजी, माफ करा; पण मी खरोखरच एवढंच शिकलो. गुरुजींना राग आवरेना. त्यांनी रागाच्या भरात धर्मराजाच्या थोबाडीत मारायला सुरुवात केली, तरीही धर्मराज शांतच होता. त्याच्या तोंडावरचे भाव जरासुद्धा पालटले नव्हते.

आता मात्र गुरुजी वरमले. त्यांना वाटले की, धर्मराजाच्या म्हणण्यात काहीतरी तथ्य असले पाहिजे. ते म्हणाले, बाळ, तू कोणते वाक्य शिकलास, ते तरी सांग. धर्मराजाने आपली वही आणून दाखवली. तिथे लिहिले होते, कोणत्याही परिस्थितीत आपल्याला राग येऊ देऊ नये. या एका वाक्यासरशी गुरुजी आणि बाकी विद्यार्थी काय समजायचे, ते समजले. विनाकारण शिक्षा केल्याविषयी गुरुजींनी धर्मराजाची क्षमा मागितली.

      *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
  नुसत्या अफाट ज्ञानापेक्षा थोडे शिकले, तरी चालेल; परंतु जे शिकू, ते कृतीत आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. संत ज्ञानेश्‍वर महाराजांनी म्हटले आहेच, एक तरी ओवी अनुभवावी ।
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

30. *आपल्या "हजार" चांगल्या शब्दांचा "अंत" करण्यासाठी...*
   *एका" चुकीच्या" शब्दाकडे*
*"हजार" लोक लक्ष ठेवून असतात...*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

30. *✿संशोधक व लावलेले शोध✿*
       ◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑
▪ इलेक्ट्रॉन     ➜  थॉम्पसन
▪ प्रोटॉन     ➜  रुदरफोर्ड
▪ ऑक्सीजन     ➜  लॅव्हासिए
▪ नायट्रोजन     ➜  डॅनियल रुदरफोर्ड
▪ कार्बनडाय ऑक्साइड  ➜  रॉन हेलमॉड
▪ हायड्रोजन     ➜  हेन्री कॅव्हेंडिश
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

30.  *❒ ♦होमी भाभा♦ ❒* 
     ━━═•●◆●★●◆●•═━━
  भारतीय भौतिकशास्त्रज्ञ,अणुऊर्जा व अण्वस्त्र विकास कार्यक्रमाचे प्रणेता
   *_"यांच्या जयंती निमित्त_*
         *_विनम्र अभिवादन"_*
   🌹🌷🌺🏵🌺🌷🌹

●जन्म :~ ३० ऑक्टोबर १९०९
          मुंबई, महाराष्ट्र, भारत
●मृत्यू :~ २४ जानेवारी १९६६
           माँत ब्यांको, इटली
🔸कार्यसंस्था :~ कॅव्हेंडिश लॅबोरेटरी, टाटा मूलभूत संशोधन संस्था, भारतीय अणुऊर्जा आयोग
🔹ख्याती :~भारतीय अणू संशोधन

         ◆ होमी जहांगीर भाभा ◆
   भारतीय अणुभौतिकशास्त्रज्ञ होते. भारताच्या अणुऊर्जा विकास कार्यक्रमाचा पाया रचण्याच्या कामगिरीमुळे त्यांना *भारताच्या अणुऊर्जा व अण्वस्त्र विकास कार्यक्रमाचे प्रणेता मानले जाते.*

    भाभा यांचा जन्म सधन पारशी कुटुंबात झाला. वडील जहांगीर भाभा हे बॅरीस्टर होते. पुस्तकांची आवड असल्यामुळे घरातच खूप पुस्तके गोळा केली होती. त्यात विज्ञान विषयाचीही पुस्तके होती. होमी भाभा यांना या पुस्तकांमुळे विज्ञानात स्वाभाविकपणेच आवड निर्माण झाली. शिवाय त्यांना कवितेचा आणि चित्रकलेचा छंद होता. अतिशय सुंदर, देखणे व्यक्तीमत्त्व लाभालेले होमी भाभा उत्तम वक्ताही होते.

     त्यांचे प्राथमिक ते पदवी पर्यंतचे शिक्षण मुंबई येथे झाले. होमी यांनी पुढे इंजिनियर व्हावे असे त्यांच्या वडिलांना वाटत होते. पण होमी यांनी वडिलांना आपल्याला गणित आणि भौतिक शास्त्रातच विशेष आवडतात असे ठामपणे सांगितले. वडिलांनी हो-ना करत गणिताचा सखोल अभ्यास करण्यास परवानगी दिली पण आधी प्रथम श्रेणीत इंजिनियरींगची पदवी प्राप्त करण्याची अट घालून दिली. वडिलांनी परवानगी दिल्यावर होमी भाभा केंब्रीज विद्यापिठातून इ.स. १९३० साली प्रथम श्रेणीत इंजिनियर झाले. तसेच पॉल डिरॅक यांच्या मार्गदर्शनाखाली गणिताचा अभ्यासही करीत राहिले. त्या काळात त्यांना शिष्यवृत्ती आणि अनेक बक्षीसेही मिळाली.

    इ.स. १९४० साली भारतात परत आल्यावर काही काळ डॉ. भाभा यांनी भारतीय विज्ञान संस्था, बंगलोर येथे प्रोफेसर म्हणून काम केले. इ.स. १९४५ साली टाटा मूलभूत संशोधन संस्थेची स्थापना करण्यात मदत केली आणि आपले संशोधन कार्य संभाळून डॉ. भाभा टाटा मूलभूत संशोधन संस्थेचे संचालक झाले. भारताच्या स्वातंत्र्यानंतर इ.स. १९४८ साली त्यांच्या पुढाकाराने अणु उर्जा आयोगाची स्थापना करण्यात आली. याही संस्थेचे तेच संचालक म्हणून काम पाहू लागले. त्यांच्या अथक परिश्रमांमुळेच भारत देशात अणु भट्टी ची स्थापना होऊ शकली. अणुचा वापर शांततेच्या मार्गानेच व्हावा असे ठाम मत संयुक्त राष्ट्रच्या सभेत मांडणारे भाभा हे पहिले वैज्ञानिक. डॉ. भाभा यांनी पाया रचला म्हणूनच भारताने अनेक ठिकाणी अणु भट्या सुरू करून त्यांचा विज निर्मितीसाठी उपयोग केला तसेच १८ मे, इ.स. १९७४ या दिवशी भारताने पोखरण येथे पहिला अणुस्फोट घडवून आणला.

     संयुक्त राष्ट्रच्या सभेला जातांना २४ जानेवारी, इ.स. १९६६ या दिवशी फ्रान्सच्या हद्दीत असतांना त्यांचे विमान अपघातात निधन झाले. त्यांच्या मृत्यु नंतर ट्रॉम्बे येथील अणु संशोधन केंद्राचे नाव बदलून भाभा अणु संशोधन केंद्र असे ठेवण्यात आले.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
           *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌

*❁बुधवार ~30/10/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment