30/12/24 सोमवारचा परिपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*
*Ⓜ💲🅿 परिपाठ Ⓜ💲🅿*
*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*
*💥🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀
*💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀
*💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
🔘 *"माझी शाळा"* 🔘
*ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
🔗🔗👇👇🔗🔗
https://goo.gl/RpQbsw
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *30. डिसेंबर:: सोमवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
मार्गशीर्ष अमावस्या,
नक्षत्र ~मूळ,
करण ~चतुष्पाद,
सूर्योदय-07:11, सूर्यास्त-18:10,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ] ❂ सुविचार ❂*
━┅═▣◆★✪★◆▣═┅━
30. *हिंसा ही वाईट गोष्ट आहे परंतु गुलामी ही त्यापेक्षाही वाईट गोष्ट आहे.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ] ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
30. *अडला हरी गाढवाचे पाय धरी*
*★ अर्थ ::~*
- संकटाच्या वेळी मोठ्या माणसाला देखील क्षुद्राची मदत घ्यावी लागते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ] ❂ सुभाषीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
30. *प्रज्ञा नाम बलं ह्येव निष्प्रज्ञस्य बलेन किम् ।*
⭐अर्थ ::~
प्रज्ञा हेच खरे बळ आहे. प्रज्ञाहीन माणसाला बळाचा काय उपयोग ?
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ] ❂ दिनविशेष ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
🛡 ★ 30. डिसेंबर ★ 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★हा या वर्षातील ३६४ वा (लीप वर्षातील ३६५ वा) दिवस आहे.
~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●१९४३ : सुभाषचंद्र बोस यांनी पोर्ट ब्लेअर येथे भारतीय स्वातंत्र्याचा झेंडा फडकविला
●१९२४ : एडविन हबलने आकाशगंगेखेरीज इतर दीर्घिकाही अस्तित्त्वात असल्याचे जाहीर केले.
●१९०६ : ऑल इंडिया मुस्लिम लीगची ढाक्का येथे स्थापना.
~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९०२ : डॉ. रघू वीरा – भाषाशास्त्रज्ञ, जनसंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष, घटनासमितीचे सदस्य, राज्यसभा खासदार
◆१८७९ : वेंकटरमण अय्यर तथा योगी रमण महर्षी – भारतीय तत्त्ववेत्ते
◆१८८७ : डॉ. कन्हैय्यालाल मुन्शी – मुंबईचे पहिले गृहमंत्री, हैदराबाद संस्थानात भारत सरकारचे एंजट जनरल, नामवंत साहित्यिक आणि 'भारतीय विद्याभवन'चे संस्थापक
◆१८६५ : रुडयार्ड किपलिंग – नोबेल पारितोषिकविजेते ब्रिटिश लेखक
~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
◆२००६ : इराकी हुकूमशहा व इराकचे ५ वे अध्य्क्ष सद्दाम हुसेन यांना फाशी
◆१९८२ : दत्ता उर्फ दादा धर्माधिकारी – चित्रपट अभिनेते व दिग्दर्शक
◆१९७४ : आचार्य शंकरराव देव – गांधीवादी कार्यकर्ते
◆१९७१ : डॉ. विक्रम साराभाई – भारतीय भौतिकशास्त्रज्ञ
◆१९४४ : रोमें रोलाँ – साहित्यातील नोबेल पारितोषिक विजेते फ्रेन्च लेखक, नाटककार व संगीत समीक्षक
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..
https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫✫✪✫✪✫✪✪
*0६ ] ❂ देशभक्ती गीत ❂*
━┅━▣◆★✧★◆▣━┅━
30. *✸ भारत अमुचा देश ✸*
●●●●००००००●●●●
भारत अमुचा देश, भारत अमुचा देव
'भारत अमुचा सत्यधर्म' हा मंत्र जपू हा एक
भारतीय मी आहे आधी, आपण सारे एक
आम्ही मराठी, आम्ही गुर्जर, मद्रासी, आम्ही हिंदी
प्रांत आमुचा भाषा आमुची श्रेष्ठचि सर्वांमधी
दुराभिमाना देऊ असल्या पूर्ण छेदती रेघ
धर्म-जातिच्या, जुन्या मनूच्या, जुन्या कल्पना सोडू
उच्चनीचता गाडुन टाकू जाचक रुढिंना तोडू
विशाल भारत स्वप्नी त्याचा साकारू आलेख
प्रांत, देश, या पुढेहि जाऊ, पुजु या मानवतेला
मित्र जगाचे सार्या होऊ, मित्र करू या त्याला
सत्य, अहिंसा, शांती यांचा संगम साधु सुरेख
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ] ❂ प्रार्थना ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━
30. *❂ क्षणभर उघड नयन ❂*
✶✶✹✹★●★✹✹✶✶
क्षणभर, उघड नयन देवा
करावया तव मंगल पूजा
देहदीप मी जाळिन माझा
भावभक्तिचा हा नजराणा स्वीकारून घ्यावा
धूप जाळिते मी श्वासाचा
सुगंध पसरिल मंगलतेचा
कोमल पद हृदयावर ठेवित प्रभू माझा यावा
अभंग नाही, नाही ओवी
मूक जिवाने कशि रे गावी ?
नयनांमधले अश्रू करिती अखेरचा धावा
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ] ❂ बोधकथा ❂*
━═●🇲=◆🇸◆=🇵●═━
30. *❃❝ आनंदी व्हायचंय?? ❞❃*
━═•●◆●★●◆●•═━
एक व्यापारी आपल्या दोन उंटावर माल लादून गावागावातून तो विकत असे. असाच एका गावात त्याने दिवसभर विक्री केली. रात्र झाल्याने तिथेच एका मंदिराच्या आवारात मुक्काम करण्याचे त्याने ठरवले. मैदानातील झाडाला उंट बांधून स्वतः मंदिराच्या ओसरीत झोपायचं असा विचार तो करतो. दोन्ही उंटांना झाडाजवळ नेतो. एका उंटाला दोरीने बांधतो. मात्र दुसऱ्या उंटाला बांधायला जातो तर दोरी कमी पडते. आता काय करावे ? पंचाईत झाली. उंट तसाच मोकळा ठेवणे शक्य नव्हते. व्यापारी परेशान झाला. इकडे तिकडे एखादी दोरी सापडतीय का ते पाहून लागला. ती काही दिसेना. त्याची परेशानी पाहून मंदिराचा पुजारी त्याच्या जवळ येऊन म्हणाला, "अरे. पहिल्या उंटाला बांधले तसेच दुसऱ्याला बांध."
"महाराज, पण दोरी नाहीये न"
पुजारी म्हणाला, "तू नुसतं दोरी बांधल्याचा नाटक कर" त्याप्रमाणे व्यापाऱ्याने खोटे खोटेच उंटाला दोरी बांधली. आश्चर्य म्हणजे त्यानंतर तो दुसरा उंटही निवांत खाली बसला....
सकाळी व्यापारी उठून, सगळे यावरून दुसऱ्या गावी जायला निघाला. झाडाजवळ येऊन पहिल्या उंटाची दोरी सोडली. तो उंट उभा राहिला. दुसऱ्या उंटाला काही दोरी बांधलेली नव्हतीच म्हणून व्यापाऱ्याने त्या दुसऱ्याला फक्त "झ्याक झ्याक" असा आवाज देऊन उठवले. पण तो दुसरा उंट काही उठेना. व्यापारी पुन्हा परेशान. तिथेच उभा असलेला पुजारी हसू लागला. तो म्हणाला, "अरे, तो उठणार नाही. कारण तू त्याची दोरी कुठे काढलीस?"
"पण महाराज, मी दोरी बांधलीच कुठे होती ? नुसते नाटक केले होते न "
पुजारी म्हणाला, "नाटक तुझ्यासाठी होते. पण त्याला तर ते खरेच वाटले होते न. म्हणून आता ती काल्पनिक दोरी सोडव. मग पहा"
त्याप्रमाणे व्यापाऱ्याने दोरी काढल्याचे नाटक केले. आणि काय आश्चर्य ? तो दुसरा उंट तटकन उठला की !! व्यापारी चकित झाला !!
पुजारी म्हणाला "जसा हा उंट अदृष्य दोरीने बांधला गेला तसेच आपणही जुन्या, कालबाह्य रूढीमध्ये अडकलॊ आहोत. "ती" अदृश्य दोरी काढून टाकण्याची इच्छाच नाही तर आपण पुढच्या (आनंदाच्या ) गावी जाणार कसे ?
*🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
तुमच्या आनंदाच्या वाटेत तुमच्याशिवाय दुसरा कोणीही अडथळा आणू शकत नाही.
निष्कारण स्वतःच स्वतःला बांधून घेतलेल्या अनेक "दोऱ्या" सोडवून पहा. नक्की आनंदी व्हाल..!!
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
30. मैत्री म्हणजे फळ नसते..
पिकायला,
मैत्री म्हणजे फांदी नसते..
तुटायला,
मैत्री म्हणजे मुळ असते एकमेकांना..
*'आधार’द्यायला...!'*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ] ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
30. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*
◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑
✪ पाव ( ब्रेड ) तयार करतांना कशाचा उपयोग करतात ?
➜ यिस्ट.
✪ गुरांच्या हिरव्या चारयासाठी कशाला प्राधान्य देतात ?
➜ कुरण शेतीला.
✪ अमरवेल ही वनस्पती कोणत्या प्रकारात मोडते ?
➜ परजीवी वनस्पती.
✪ रबराच्या झाडापासून निघणारया द्रव्यास काय म्हणतात ?
➜ लॅटेक्स.
✪ सफ्रीनचा रंग कसा असतो ?
➜ केसरी.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂व्यक्ती परिचय ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
30. *❒ निर्मलाताई आठवले ❒*
┅━━●●★★●●━━┅
●जन्म :~ ३ ऑगस्ट १९२६
*●मृत्यू :~ ३० डिसेंबर २०१६*
निर्मलाताईंचा जन्म ३ ऑगस्ट १९२६ रोजी राजापूर तालुक्यात झाला. पांडुरंगशास्त्री आठवले यांच्याशी विवाह झाल्यानंतर निर्मलाताईंनी स्वत:ला स्वाध्याय कार्यात वाहून घेतले. स्वाध्याय कार्यात निर्मलाताईंचं योगदान मोठं होतं. स्वाध्याय परिवारामध्ये त्या 'ताई' म्हणून ओळखल्या जात. पांडुरंगशास्त्रींच्या निधनानंतर निर्मलाताई ठाणे येथील तत्त्वज्ञान विद्यापीठातच वास्तव्याला होत्या. तिथं त्या स्वाध्यायी बंधुभगिनींना मार्गदर्शन करत.
स्वाध्याय परिवाराचे प्रणेते दिवंगत पांडुरंगशात्री आठवले यांच्या पत्नी निर्मलाताई आठवले यांचं सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास निधन झालं. ठाणे येथील तत्त्वज्ञान विद्यापीठातील त्यांच्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या ९० वर्षांच्या होत्या. स्वाध्यायींना मातृवत असलेल्या निर्मलाताईंच्या निधनामुळं स्वाध्याय परिवारावर शोककळा पसरली होती.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹✹★✹◑◎●••
*✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌
*❁सोमवार ~ 30/12/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
No comments:
Post a Comment