*31/01/24 बुधवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*
*Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*
*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*
*💥🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀
*💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀
*💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
🔘 *"माझी शाळा"* 🔘
*ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
🔗🔗👇👇🔗🔗
https://goo.gl/EXCPbS
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *31.जानेवारी:: बुधवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
पौष कृ.5, पक्ष : कृष्ण पक्ष,
तिथि ~पञ्चमी, नक्षत्र ~हस्त,
योग ~सुकर्मा, करण ~तैतिल,
सूर्योदय-07:13, सूर्यास्त-18:30,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ] ❂ सुविचार ❂*
━┅═▣◆★✪★◆▣═┅━
31. *ज्याच्या गरजा कमी, त्याला सुख आणि स्वास्थ्य अधिक..!!*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ] ▪ म्हणी व अर्थ* ▪
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••
31. आपला तो बाब्या,
दुसऱ्याचे ते कार्टे
*★ अर्थ ::~*
- माणसाला आपल्या सर्व गोष्टी चांगल्या वाटतात , पण दुसऱ्याच्या गोष्टीत त्याला दोष दिसतात.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ] ▫ सुभाषीत▫*
====••◆◆●★●◆◆••====
31. *आचार्यदेवो भव ।*
⭐अर्थ ::~ आचार्यांमध्ये देव पहा.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ] ♦दिनविशेष*♦
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••
🛡 *31. जानेवारी* 🛡
🔻===●●●★●●●===🔻
★हा या वर्षातील ३१ वा दिवस आहे.
~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९५० : राष्ट्रपती म्हणून डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी संसदेपुढे पहिले भाषण केले. यापूर्वी ते घटना समितीचे अध्यक्ष होते.
●१९२० : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ’मूकनायक’ या पाक्षिकाची सुरूवात
●१९११ : स्वातंत्र्यवीर सावरकर यांना दुसर्या जन्मठेपेची शिक्षा झाली. तत्कालीन ब्रिटिश साम्राज्यात दोनदा जन्मठेपेची शिक्षा झालेले ते एकमेव आहेत.
~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९७५ : प्रीती झिंटा – चित्रपट अभिनेत्री व उद्योजिका
◆१९३१ : गंगाधर महांबरे – गीतकार कवी व लेखक
◆१८९६ : दत्तात्रय रामचंद्र बेन्द्रे तथा ’अंबिकातनयदत्त’ – कन्नड कवी, पद्मश्री (१९६८), त्यांच्या ’नाकु तंती’ या काव्यसंग्रहास १९७३ मधे ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला.
~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००४ : व्ही. जी. जोग – व्हायोलिनवादक
●२००४ : सुरैय्या जमाल शेख ऊर्फ ’सुरैय्या – गायिका व अभिनेत्री
●१९९५ : सुरेश शंकर नाडकर्णी – बँकिंग तज्ञ, ’रोखे बाजार नियामक मंडळाचे’ (SEBI) चे अध्यक्ष, पद्मभूषण
●१९६९ : अवतार मेहेरबाबा – आध्यात्मिक गुरू, मौनव्रती संत, त्यांनी सलग ४४ वर्षे मौनव्रत पाळले होते.
●१९५४ : ई. एच. आर्मस्ट्राँग – एफ. एम. रेडिओचे संशोधक
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..
https://goo.gl/8D33ox
✪✪✫✪✫✪✫✫✪✫✪✫✪✪
*0६ ] ❂ देशभक्ती गीत ❂*
━┅━▣◆★✧★◆▣━┅━
31. *◆उषःकाल होता होता◆*
●●●●००००००●●●●
उषःकाल होता होता काळरात्र झाली !
अरे, पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली !
आम्ही चार किरणांचीही आस का धरावी ?
जे कधीच नव्हते त्याची वाट का पहावी ?
कसा सूर्य अंधाराच्या वाहतो पखाली !
तेच घाव करिती फिरुनी ह्या नव्या कट्यारी;
तोच दंश करिती आम्हां साप हे विषारी !
आम्ही मात्र ऐकत असतो आमुची खुषाली !
तिजोर्यात केले त्यांनी बंद स्वर्ग साती,
आम्हांवरी संसारची उडे धूळमाती !
आम्ही ती स्मशाने ज्यांना प्रेतही ना वाली !
अशा कशा ज्याने त्याने गाडल्या उमेदी ?
असा कसा जो तो येथे होतसे खरेदी ?
ह्या अपार दुःखाचीही चालली दलाली !
उभा देश झाला आता एक बंदिशाला
जिथे देवकीचा पान्हा दुधाने जळाला !
कसे पुण्य दुर्दैवी अन् पाप भाग्यशाली !
धुमसतात अजुनी विझल्या चितांचे निखारे !
अजुन रक्त मागत उठती वधस्तंभ सारे !
आसवेंच स्वातंत्र्याची अम्हाला मिळाली !
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ] 💎 प्रार्थना 💎*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
31. *हे करुणाकरा*
==••◆◆●★●◆◆••==
हे करुणाकरा, ईश्वरा । कृपादान मज देई
तुजविण कोण निवारी संकट । दृढता ही तव पायी ॥
तूही आदि तू अनंत । तूही दु:स्तर भवनिधि तारक
तानसेन प्रभु तुम्ही उद्धरा ॥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ] 🔵 बोधकथा*🔵
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••
31. *●शिकारी आणि कबुतर●*
─┅•●●●◆●●●•┅─
एका गावात एक दुष्ट शिकारी राहत होता. तो दररोज जंगलात जावून पशु पक्षांची शिकार करत असे. एकेदिवशी त्याचा जाळ्यात एक कबुतर मादी अडकली, तो तिला मारून खाऊ इच्छित होता. परंतु अचानक पाऊस सुरु झाला. पावसापासून बचाव करण्यासाठी तो एका झाडाखाली थांबला. संयोगाने त्याच झाडाला असलेल्या बिळात हे कबुतर राहत होते. ज्या कबुतर मादीला पकडले होते तिचा पती पत्नीच्या वियोगाने दुखी होता. कबुतर मादीने आपल्या पतीला दुखात असलेले पाहिले, ती भावनावश झाली ती कबुतराला म्हणाली," मला या शिकाऱ्याने पकडले आहे, परंतु या वेळी तो आपला अतिथी आहे. तू माझी चिंता सोडून शिकाऱ्याकडे लक्ष दे. शिकारी थंडीत कुडकुडत आहे." कबुतराने झाडाची सुकलेली पाने आणि बारीक फांद्या एकत्र करून शिकाऱ्याजवळ शेकोटी पेटवली. त्यामुळे त्याला ऊब मिळाली, शिकाऱ्याला श्रमामुळे भूकही लागली होती. कबुतराने शिकाऱ्याची भूक भागविण्यासाठी त्या आगीत उडी घेतली. कबुतर मादी आपल्या पतीच्या मृत्यूने दुखी झाली. हे सर्व पाहून शिकाऱ्याच्या मनात अपराधीपणाची भावना वाढीस लागली. ज्या पक्षांना तो मारून खात होता त्यापैकी एकाने त्याच्यासाठी आपला जीव अग्नीच्या स्वाधीन केला होता व शिकाऱ्यावर उपकार केले होते. हे उपकार फेडण्यासाठी त्याने कबुतर मादीला मुक्त केले. पण कबुतर मादीने पतीच्या आठवणीने व्याकूळ होवून आगीत उडी घेतली. शिकाऱ्याजवळ पश्चाताप करण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता. त्याच्या मूर्खपणाने दोन जीवांचा संसार उध्वस्त झाला होता.
*🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
माणसाची सुस्त चेतना जागृत करण्याची आज गरज आहे. ज्यामुळे निसर्गाचे नुकसान टाळता येवू शकते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] 🔷प्रेरणादायी विचार🔷*
====••◆◆●★●◆◆••====
31. *स्वभाव म्हणजे रंगांची पेटी!*
*कधी कुठला रंग सांडेल,*
*कधी कुठला रंग मिसळेल याचा अंदाज बांधता येत नाही,*
*फक्त स्व:ताचे रंग रंगवताना इतरांची चित्रं बिघडणार नाहीत... याची जमेल तितकी काळजी घेतली की आपले रंग देखील* *छान खुलतात..*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ] *🔴सामान्य ज्ञान🔴*
====••◆◆●★●◆◆◆••====
31. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*
◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑
✪ भारतात जनगणना दर किती वर्षांनी केले जाते ?
➜ दहा वर्षानंतर.
✪ गुगली हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
➜ क्रिकेट.
✪ गौतम बुद्धांनी पहिला उपदेश कोठे दिला ?
➜ सारनाथ.
✪ लखनऊ हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे ?
➜ गोमती.
✪ शरीरातील हाडे कशापासून बनलेली असतात ?
➜ कँल्शिअम फॉस्फेट व कँल्शिअम कार्बोनेट
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] 🔶 व्यक्ती परिचय🔶*
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••
31. *❒♦एडवीन आर्मस्ट्राँग♦❒*
━━═•●◆●★●◆●•═━━
एफ एम (FM) रेडिओ संशोधन..
●जन्म :~ १८ डिसेंबर १८९०
●मृत्यु :~ ३१ जानेवारी १९५४
★ एडविन हॉवर्ड आर्मस्ट्राँग ★
हा एक अमेरिकन इलेक्ट्रिकल अभियंता आणि संशोधक होता. त्याला "रेडिओच्या इतिहासातील" सर्वात प्रभावशाली संशोधक "म्हटले जाते. त्यांनी undergraduate असताना १९१४ साली रीजनरेटिंग सर्किट आणि त्याचे पेटंट मिळवले. त्यानंतर १९२२ ला सुपर रीजनरेटिंग सर्किट बनवले.
तसेच १९१८ मध्ये सुपर Heterodyne receiver बनवले. आधुनिक स्वरूपातील frequency modulation (FM) (Radio transmission) चे सुद्धा संशोधक होते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
*✍संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌
*❁बुधवार~31/01/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
No comments:
Post a Comment