"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

 

*31/03/24 रविवार चा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

*Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*

*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*

   *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

     *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

    *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
  🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

https://goo.gl/EXCPbS
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *31.मार्च:: रविवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
फाल्गुन कृ.6, पक्ष : कृष्ण पक्ष, तिथि ~षष्ठी, नक्षत्र ~ज्येष्ठा,
योग ~व्यतीपात, करण ~गर,
सूर्योदय-06:56, सूर्यास्त-18:44
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]   ❂ सुविचार ❂*
━┅═▣◆★✪★◆▣═┅━

31. नम्रता हा माणसाचा खरा दागिना आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]   ▪ म्हणी व अर्थ* ▪
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

31. *गाड्याबरोबर नळयाची यात्रा*
      *★ अर्थ ::~*
- एकमेकांशी संबंधित असलेल्या व समान परिस्थितीत दोन गोष्टीची परिस्थिती सारखीच असणे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ▫ सुभाषीत▫*
====••◆◆●★●◆◆◆••====

31.  *विद्याधनं सर्वधनप्रधानम् ।*
               ⭐अर्थ ::~
विद्याधन हे सर्व धनांमध्ये श्रेष्ठ होय.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ♦दिनविशेष*♦
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

      🛡 *★31. मार्च★* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★ हा या वर्षातील ९० वा (लीप वर्षातील ९१ वा) दिवस आहे.

    ~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००१ : सचिन तेंडुलकर याने एक दिवसीय सामन्यात १०,००० धावा पूर्ण केल्या.
●१९७० : १२ वर्षे अंतराळात भ्रमण करून एक्सप्लोअरर-१ हे अंतराळयान पृथ्वीच्या कक्षेत परतले.
●१९६६ : रशियाने ’ल्यूना-१०’ हा चंद्राचा पहिला कृत्रिम उपग्रह अंतराळात सोडला.
●१८८९ : आयफेल टॉवरचे उद्‍घाटन झाले. हा बांधायला २ वर्षे, २ महिने व २ दिवस लागले.
●१८६७ : डॉ. आत्माराम पांडुरंग यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली.

    ~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९३८ : शीला दिक्षीत – दिल्लीच्या मुख्यमंत्री
◆१८७१ : ’कर्नाटकसिंह’ गंगाधर बाळकृष्ण देशपांडे – स्वातंत्र्यसैनिक
◆१८६५ : आनंदीबाई गोपाळराव जोशी – भारतातील पहिल्या महिला डॉक्टर
◆१८४३ : बळवंत पांडुरंग तथा ’अण्णासाहेब’ किर्लोस्कर – नाटककार 
◆१५०४ : गुरू अंगद देव – शिखांचे दुसरे गुरू

      ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००४ : गुरू चरणसिंग तोहरा – अकाली दलाचे नेते आणि शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीचे अध्यक्ष
●२००४ : तुकाराम केरबा ऊर्फ टी. के. अण्णा वडणगेकर – कोल्हापूरची कलापरंपरा जपणारे चित्र व शिल्पकलेतील दिग्गज
●१९७२ : महजबीन बानो ऊर्फ ’मीनाकुमारी’ – अभिनेत्री
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
  ━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

31. *✸ खरा तो एकची धर्म ✸*
       ●●●●●००००००●●●●●
खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे

जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पददलित
तया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे

जयांना ना कोणी जगती सदा ते अंतरी रडती
तया जाऊन सुखवावे, जगाला प्रेम अर्पावे

समस्तां धीर तो द्यावा, सुखाचा शब्द बोलावा
अनाथा साह्य ते द्यावे, जगाला प्रेम अर्पावे

सदा जे आर्त अतिविकल, जयांना गांजती सकल
तया जाऊन हसवावे, जगाला प्रेम अर्पावे

कुणा ना व्यर्थ शिणवावे, कुणा ना व्यर्थ हिणवावे
समस्तां बंधु मानावे, जगाला प्रेम अर्पावे

प्रभूची लेकरे सारी तयाला सर्वही प्यारी
कुणा ना तुच्छ लेखावे, जगाला प्रेम अर्पावे

असे जे आपणापाशी असे, जे वित्त वा विद्या
सदा ते देतची जावे, जगाला प्रेम अर्पावे

भरावा मोद विश्वात असावे सौख्य जगतात
सदा हे ध्येय पूजावे, जगाला प्रेम अर्पावे

असे हे सार धर्माचे असे हे सार सत्याचे
परार्थी प्राणही द्यावे, जगाला प्रेम अर्पावे

जयाला धर्म तो प्यारा, जयाला देव तो प्यारा
त्याने प्रेममय व्हावे, जगाला प्रेम अर्पावे
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      💎 प्रार्थना  💎*
====••◆◆●★●◆◆◆••====

31.  *❂ विठ्ठला, तू वेडा कुंभार ❂*
       ✶✶✹✹★●★✹✹✶✶
फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार
विठ्ठला, तू वेडा कुंभार !

माती, पाणी, उजेड, वारा
तूच मिसळसी सर्व पसारा
आभाळच मग ये आकारा
तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत, ना पार !

घटाघटांचे रूप आगळे
प्रत्येकाचे दैव वेगळे
तुझ्याविना ते कोणा नकळे
मुखी कुणाच्या पडते लोणी कुणा मुखी अंगार !

तूच घडविसी, तूच फोडिसी
कुरवाळिसि तू, तूच ताडिसी
न कळे यातुन काय जोडिसी ?
देसी डोळे, परि निर्मिसी तयांपुढे अंधार !
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    🔵 बोधकथा*🔵
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

31. *❃ स्वामी अखिलानंद ❃*
        ••◆•◆•◆★◆•◆•◆••
    स्‍वामी अखिलानंद हरिद्वारमध्‍ये गंगेकाठी आश्रमात रोज रामायणावर प्रवचन देत असत. एकेदिवशी ते शिष्‍यांसोबत गंगेकाठी चालत होते. तेव्‍हा त्‍यांना आश्रमाच्‍या शेजारी असलेल्‍या झाडांवर दोन माणसे बसलेली दिसली. शिष्‍यांना विचारल्‍यावर शिष्‍य म्‍हणाले, ते दोघे ग्रामीण भक्त असून ते कथा ऐकायला येत असल्‍याचे सांगितले. त्‍यांचे फाटलेले कपडे पाहून स्‍वामीजी विचार करू लागले, ह्या अडाणी लोकांना काय रामायणाचे अन भक्तीचे मर्म समजणार? प्रसादाच्‍या आशेने येत असतील दोघे दुसरे काय? त्‍यांनी त्‍या दोघांना बोलावले आणि रामभक्तीचे महत्‍व विचारले, दोघेही अडाणी आणि अचानक बोलावणे आल्‍याने भांबावले, त्‍यामुळे ते दोघेही एक शब्‍द स्‍वामीजींपुढे बोलूच शकले नाही. स्‍वामीजी रागवत म्‍हणाले, तुम्‍हाला रामायण कळत नसेल तर येत जाऊ नका, उगाच गर्दी वाढवू नका, रामायण संपल्‍यावर या तुम्‍हाला प्रसाद द्यायची व्‍यवस्‍था मी करतो.'' दोघेही बिचारे मान-अपमानाची पर्वा न करता स्‍वामीजींना नमस्‍कार करून निघून गेले. दुसरे दिवशी मात्र स्‍वामीजींना खरी भक्ती काय असते हे पुरेपुर समजले, कारण रात्रभर मुसळधार पाऊस पडला आणि नदी भरून वाहू लागली, यायला वाटही नाही, स्‍वामींच्‍या आश्रमातही पाय ठेवायला जागा उरली नाही इतके पाणी झाले. रामायण कथन करण्‍यासाठी स्‍वामीजी आले पण समोर कुणीच श्रोता नाही इतक्‍यात स्‍वामीजींचे लक्ष समोरच्‍या झाडाकडे गेले तर कालचेच दोघे ग्रामीण भक्त त्‍यांच्‍या रोजच्‍या जागेवर झाडावर भिजलेल्‍या अवस्‍थेत रामायण ऐकण्‍यासाठी येऊन बसलेले दिसले. स्‍वामीजींना राहवले नाही व त्‍यांनी त्‍या दोघांच्‍या समोर लोटांगण घातले व त्‍यांच्‍या रामभक्तीला नमस्‍कार केला.

      *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
  कोणालाही कोणी कमी समजु नये. कोण कुठल्या अधिकाराचा असेल ते सांगता  येत नाही.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ]  🔷प्रेरणादायी विचार🔷*
====••◆◆●★●◆◆◆••====

31. *दु:खी माणासाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात, प्रार्थनेसाठी जोडलेल्या दोन हातांपेक्षा अधिक उपयुक्त आहे.* 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]    *🔴सामान्य ज्ञान🔴*
====••◆◆●★●◆◆◆••====

31. *✿महाराष्ट्र विषयी माहिती✿*
        ◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑
◆  महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ *नाशिक* येथे आहे.

◆  महाराष्ट्र राज्यात तोफखाना प्रशिक्षण शाळा *देवळाली, जि. नाशिक*

◆  पुणे ही पेशव्यांची राजधानी आहे.

◆  कोल्हापूर येथे देशातील गुळाची बाजारपेठ आहे.

◆  आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म शिरढोण, जि. रायगड येथे झाला.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] 🔶थोरव्यक्ती परिचय🔶*
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

31. *❒ आनंदीबाई जोशी ❒*
      ┄─┅•●●★◆★●●•┅─┄
*🔸जन्म :~ ३१ मार्च १८६५*
              पुणे , महाराष्ट्र
🔹मृत्यू :~ २६ फेब्रुवारी १८८७
              (वय वर्ष २१)
🔸राष्ट्रीयत्व :~ भारतीय
🔹शिक्षण :~ एम.डी (M.D)
🔸ख्याती :~ भारतातील पहिल्या महिला वैद्य (डॉक्टर)

  *आनंदीबाई गोपाळराव जोशी*    
   🔷या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर होत्या. आनंदीबाई जोशी यांचा जन्म ३१ मार्च १८६५ रोजी आजोळी, पुण्यात त्यांचा जन्म झाला.  आनंदीबाईंचे पूर्वाश्रमीचे नाव यमुना होते. वयाच्या नवव्या वर्षी बालपणातच त्यांचा विवाह वयाने २० वर्षांनी मोठे असणार्‍या गोपाळराव जोशी यांच्याशी झाला. लग्नानंतर गोपालरावांनी आपल्या पत्‍नीचे यमुना हे नाव बदलून आनंदीबाई असे ठेवले.
   
          ⚜ वैद्यकीय शिक्षण ⚜
    🔶लग्नानंतर आनंदीबाईंनी वयाच्या १४व्या वर्षी एका मुलास जन्म दिला. परन्तु दुर्दैवाने पुरेशी वैद्यकीय सुविधा न मिळाल्याने तो केवळ १०च दिवस जगू शकला . हीच खंत आनंदीबाईना वैद्यकीय शिक्षणाकडे खेचून घेण्यास कारणीभूत ठरली . त्यांनी शिकून डॉक्टर होण्याचा निर्णय घेतला.
    
     🔷आनंदीबाईना ख्रिस्ती धर्म न स्वीकारता १८८३मध्ये वयाच्या एकोणिसाव्या वर्षी "वीमेन्स मेडिकल कॉलेज ऑफ़ पेन्सिल्व्हानिया" मध्ये प्रवेश मिळाला. दरम्यान, नवीन वातावरण आणि प्रवासातील दगदग यामुळे आनंदीबाईंची प्रकृती खूप ढासळली होती. परंतु अमेरिकेतील एका जोडप्याच्या मदतीमुळे सर्व काही पार पडत गेले.

     🔶सुरुवातीला तत्कालीन समाजा कडून या कामाला खूप विरोध केला. आनंदीबाईंनी कलकत्त्यामध्ये एक भाषण केले. तेव्हा त्यांनी भारतामध्ये महिला डॉक्टरांची किती आवश्यकता आहे हे पटवून दिले, आणि हे स्पष्ट सांगितले की, मला यासाठी धर्मांतर वगैरे करण्याची काही गरज नाही. मी माझा हिंदु धर्म व संस्कृती यांचा कदापि त्याग करणार नाही. मला माझे शिक्षण पूर्ण झाल्यावर भारतात येऊन महिलांसाठी एक वैद्यकीय महाविद्यालय सुरू करायचे आहे .

      🔷आनंदीबाईचे हे भाषण लोकांना खूप आवडले. त्यामुळे त्यांना होणारा विरोध तर कमी झालाच पण त्यांना या कार्यात हातभार म्हणून सबंध भारतातून आर्थिक मदत जमा झाली. भारताचे तत्कालीन व्हाइसरॉय यांनी पण २०० रुपयांचा फंड जाहीर केला.

    🔶कष्टाच्या आणि जिद्दीच्या जोरावर अभ्यासक्रम पुरा करून मार्च इ.स. १८८६ मध्ये आनंदीबाईना एम.डी. ची पदवी मिळाली. एम.डी. साठी त्यांनी जो प्रबंध सादर केला त्याचा विषय होता, ‘हिंदू आर्य लोकांमधील प्रसूतिशास्त्र’. एम.डी. झाल्यावर व्हिक्टोरिया राणीकडूनसुद्धा त्यांचे अभिनंदन झाले . हा खडतर प्रवास करताना त्यांना गोपाळरावांचा पाठिंबा होता. तिच्या पदवीदान समारंभाला गोपाळराव स्वतः उपस्थित राहिले. पंडिता रमाबाई होत्या. ‘भारतातील पहिली स्त्री डॉक्टर’ म्हणून सर्व उपस्थितांनी उभे राहून जोरदार टाळ्या वाजवून तिची प्रशंसा केली.
  
             ⚜भारतात आगमन ⚜
    🔷एम.डी. झाल्यावर आनंदीबाई जेव्हा भारतात परतल्या तेव्हा त्यांचे जोरदार स्वागत झाले . सर्वत्र अभिनंदन झाले. त्यांना कोल्हापूर मधील अल्बर्ट एडर्वड हॉस्पिटल मधील स्त्री-कक्षाचा ताबा देण्यात आला.

              ⚜ मृत्यू ⚜
     🔶वयाच्या विशीतच त्यांना क्षयरोग झाला. पुढे काही महिन्यातच म्हणजे २६ फेब्रुवारी, इ.स. १८८७ रोजी त्यांना पुण्यात मृत्यू आला.

      🔷केवळ २१ वर्षाच्या जीवन यात्रेत आनंदीबाईंनी भारतीय स्त्रियांसाठी प्रेरणादायी जीवनादर्श उभा केला. दुदैर्वाने आनंदीबाईंच्या बुद्धिमत्ता आणि ज्ञानाचा फायदा जनतेला होऊ शकला नाही. मात्र 'चूल आणि मूल' म्हणजेच आयुष्य असं समजणार्‍या महिलांना त्या काळात आनंदीबाई जोशी यांनी आदर्श व मानदंड घालून दिला. एकीकडे सावित्रीबाई व ज्योतिबा स्त्रीशिक्षणासाठी खस्ता खात असतानाच आनंदी -गोपाल हे जोडपे आपले ध्येय प्राप्त करण्यासाठी झटत होते . जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणतेही मोठे काम अशक्य नाही . समाजात राहून काम करायचे तर अडथळे येणारच. मात्र त्यावर मात करून आपले ध्येय प्राप्त करून दाखविणे यातच जीवनाची खरी सार्थकता आहे, असे आनंदीबाईंच्या आयुष्यावरून उमजते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
            *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌

*❁रविवार~31/03/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment