*31/10/24 गुरूवारचा परिपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*
*Ⓜ💲🅿 परिपाठ Ⓜ💲🅿*
*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*
*💥🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀
*💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀
*💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
🔘 *"माझी शाळा"* 🔘
*ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
🔗🔗👇👇🔗🔗
https://goo.gl/RpQbsw
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *31.ऑक्टोबर:: गुरूवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
आश्विन कृ.१४, पक्ष :कृष्ण पक्ष,
तिथि ~चतुर्दशी, नक्षत्र ~चित्रा,
योग ~विष्कम्भ, करण ~शकुनि,
सूर्योदय-06:38, सूर्यास्त-18:05
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ] ❂ सुविचार ❂*
━┅═▣◆★✪★◆▣═┅━
31. *तिरस्कार पापाचा करा; पापी माणसाचा नको.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ] ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
31. *आपलेच दात अन् आपलेच ओठ*. *★अर्थ ::~*
दोषी ठरलेले आपण आणि ज्याना दोषी ठरविले तेही आपलेच.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ] ❂ सुभाषीत ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━
31. *दुर्जनः परिहर्तव्यः*
*विद्ययाऽलंकृतोऽपि सन् ।*
⭐अर्थ :: ~ दुर्जन हा विद्यायुक्त असला तरी त्याला दूर ठेवले पाहिजे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ] ❂ दिनविशेष ❂*
━═●🇲=◆🇸◆=🇵●═━
🛡 ★ 31. ऑक्टोबर ★ 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★जागतिक एकात्मता दिन,
★जागतिक बचत दिन
★हा या वर्षातील ३०४ वा (लीप वर्षातील ३०५ वा) दिवस आहे.
~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°•••◆•••°°~°°•••🔹
●१९८४ : पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्याच अंगरक्षकांकडून हत्या
●१९८४ : भारताचे ६ वे पंतप्रधान म्हणून राजीव गांधी यांनी सूत्रे हाती घेतली.
●१९६६ : दिल्ली उच्च न्यायालयाची स्थापना
●१९४१ : ’माऊंट रशमोअर’ या स्मारकाचे बांधकाम पूर्ण झाले.
●१९२० : नारायण मल्हार जोशी, लाला लजपतराय व इतर काही जणांनी ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची (AITUC) स्थापना केली. लाला लजपतराय पहिले अध्यक्ष बनले.
●१८७६ : भारतात आलेल्या महाभयानक चक्रीवादळात २,००,००० पेक्षा अधिक व्यक्ती ठार
~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
🔸•••°°~°°°••◆••°°°~°°•••🔸
◆१८९५ : सी. के. नायडू – क्रिकेटपटू
◆१८७५ : सरदार वल्लभभाई पटेल – स्वातंत्र्य सेनानी, स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान व पहिले गृहमंत्री, भारताचे लोहपुरुष, भारतरत्न (मरणोत्तर - १९९१) (मृत्यू: १५ डिसेंबर १९५०)
◆१३९१ : एडवर्ड – पोर्तुगालचा राजा
~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००९ : सुमती गुप्ते – मराठीत तमाशाप्रधान चित्रपटांची चलती असताना पडद्यावर केवळ सोज्ज्वळ नायिका रंगवून आपल्या सहजसुंदर अभिनयाची मोहोर उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री. अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचा चित्रभूषण पुरस्कार, व्ही. शांताराम पुरस्कार आणि रसरंग दादासाहेब फाळके पुरस्कार इत्यादी पुरस्कारांनी त्यांना सन्मानीत करण्यात आले होते.
●२००५ : अमृता प्रीतम – पंजाबी भाषेतील प्रतिथयश लेखिका आणि कवयित्री. त्यांच्या ’कागज ते कॅनव्हास’ या कवितासंग्रहासाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार (१९८१) देण्यात आला.
●१९८४ : भारताच्या ३ र्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्याच अंगरक्षकांनी गोळ्या झाडुन हत्या केली. (जन्म: १९ नोव्हेंबर १९१७)
●१९७५ : सचिन देव बर्मन – संगीतकार व गायक
●१८८३ : मूळशंकर करसनदास तिवारी तथा स्वामी दयानंद सरस्वती – संस्कृत विद्वान आणि आर्य समाजाचे संस्थापक
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..
https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫✫✪✫✪✫✪✪
*0६ ] ❂ देशभक्ती गीत ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━
31. *✹ आज़ादी का गीत ✹*
●●●●००००००●●●●
हम ऐसे आज़ाद हमारा झंडा है बादल।
चाँदी सोने हीरे मोती से सजती गुड़ियाँ।
इनसे आतंकित करने की बीत गई घड़ियाँ
इनसे सज धज बैठा करते जो हैं कठपुतले
हमने तोड़ अभी फेंकी हैं बेड़ी हथकड़ियाँ
परंपरा गत पुरखों की हमने जाग्रत की फिर से
उठा शीश पर रक्खा हमने हिम किरीट उज्जवल
हम ऐसे आज़ाद हमारा झंडा है बादल।
चाँदी सोने हीरे मोती से सजवा छाते
जो अपने सिर धरवाते थे वे अब शरमाते
फूलकली बरसाने वाली टूट गई दुनिया
वज्रों के वाहन अंबर में निर्भय घहराते
इंद्रायुध भी एक बार जो हिम्मत से ओटे
छत्र हमारा निर्मित करते साठ कोटि करतल
हम ऐसे आज़ाद हमारा झंडा है बादल।
~हरिवंश राय बच्चन
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ] ❂ प्रार्थना ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━
31. *❂ हे करुणाकरा ❂*
✶✶✹✹★●★✹✹✶✶
हे करुणाकरा, ईश्वरा । कृपादान मज देई
तुजविण कोण निवारी संकट । दृढता ही तव पायी ॥
तूही आदि तू अनंत । तूही दु:स्तर भवनिधि तारक
तानसेन प्रभु तुम्ही उद्धरा ॥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ] ❂ बोधकथा ❂*
━━═●🇲=◆🇸◆
31*❃❝ सिह आणि माणूस ❞❃* ━═•●◆●★◆★●◆●•═━
एका जंगलात एके दिवशी एक शिकारी शिकार करण्यासाठी आला. त्याला पाहून जंगलातील प्राणी घाबरून सैरावैरा पळू लागले. एका सिंहाने ते पाहिले, तो पळणाऱ्या प्राण्यांना म्हणाला, *" अरे माझ्यासारखा शक्तिमान प्राणी तुमचा राजा असताना तुम्हाला घाबरण्याचे काहीच कारण नाही. सिंह असे बोलतो न बोलतो तोच सूं सूं करत एक बाण आला व सिंहाच्या पंजात घुसला. सिंह तसाच विव्हळला. तीन पायावर पळत सुटला, एका कोल्ह्याने पाहिले व म्हणाला, वनराज आताच तर आपण शौर्याच्या, शक्तीच्या गप्पा मारत होता, मग आता का घाबरून पळता आहात. यावर सिंह कोल्ह्याला म्हणाला, अरे बाबा, मी शक्तीने सर्व प्राण्यांत श्रेष्ठ असलो तरी माणूस हा प्राणी बुध्दीने सामर्थ्यशाली आहे त्याची बरोबरी करणारा दुसरा प्राणी नाही.
*🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
बुद्धिच्या सामर्थ्या पुढे शक्तीचे सामर्थ्य कमी पडते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
31. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*
◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑
✪ पहिल्या भारतीय पाणबुडीचे नाव काय आहे ?
➜ कलवरी.
✪ कोणत्या व्हाईसराॅयची तुलना औरंगजेबाशी केली जाते ?
➜ लाॅर्ड कर्झन.
✪ जालीयनवाला बाग हत्याकांड केव्हा घडले ?
➜ १३ एप्रिल १९१९.
✪ भारताचे पहिले सरन्यायाधिश कोण होते ?
➜ न्या.एच.जे.केनिया.
✪ 'गांधी विरूद्ध गांधी' हे नाटक कोणी लिहिले ?
➜ अजित दळवी.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂ थोरव्यक्ती परिचय ❂*
━═●🇲=◆🇸◆=🇵●═━
31. *❒ सरदार वल्लभभाई पटेल ❒* ━━═•●◆★◆★◆●•═━━
●जन्म :~ ३१ ऑक्टोबर १८७५
(करमसद, खेडा जिल्हा, गुजरात)
●मृत्यू :~ १५ डिसेंबर १९५०
●गौरव :~ 'भारताचे लोहपुरूष', 'सरदार' या दोन पदव्या
◆सरदार वल्लभभाई पटेल ◆
बारडोलीचे सरदार, गुजराथ चे सिंह, भारताचे लोहपुरुष, भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील सेनापती, भारताच्या एकतेचे शिल्पकार आणि पहाडाप्रमाणे सुध्रुड ईच्छा शक्ती धारण करणारे वल्लभभाई पटेल...
भारताचे एक राजकीय व सामाजिक नेते होते. त्यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात व स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताच्या राजकीय एकसंघीकरणात मोठे योगदान दिले. त्यांना सरदार ह्या पदवीने संबोधित केले जाई.
वल्लभभाई पटेल पेशाने वकील होते. इंग्लंड वरून बॉरिष्टरिची परीक्षा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण करून मायदेशी परत आले. व अहमदाबाद ला वकिली करू लागले.वकिलीत भरपूर पैसा कमावूनते वैभवशाली जीवन काढू लागले. पण महात्माजींच्या सहवासात येउन त्यांनी वकिली सोडून देश्याच्या स्वातंत्र्यासाठी आपले जीवन अर्पण केले. त्यांनी असहकाराच्या चळवळीत भाग घेतला.व कारावास भोगला.
वकिली करीत असताना ते महात्मा गांधीच्या प्रभावाखाली आले. गुजरातच्या खेडा, बोरसद आणि बारडोली गावाच्या खेडुतांना संघटित करून त्यांनी इंग्रजी अत्याचाराविरुद्ध सत्याग्रह केला. या सत्याग्रहानंतर त्यांची गणना गुजरातच्या प्रभावशाली नेत्यांमध्ये होऊ लागली. भारतीय राष्ट्रीय कॉग्रेसचे ते एक महत्त्वाचे नेते होते. १९३४ व १९३७च्या निवडणुकांमध्ये त्यांनी पक्षाचे संघटनही बांधले. भारत छोडो आंदोलनात ते आघाडीवर होते.
वल्लभभाई पटेल हे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाचे पहिले गृहमंत्री व उपपंतप्रधान झाले. या रूपात त्यांनी पाकिस्तातून आलेल्या आणि पंजाब व दिल्ली येथे राहणार्या निर्वासितांच्या मदतीसाठी खूप काम केले. फाळणीनंतर उफाळलेल्या हिंसाचारानंतर शांतिस्थापनेकरिताही त्यांनी कार्य केले.
१९३१ साली कराची येथे ब्र्लेल्या अखिल भारती कॉंग्रेस च्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली.१९४२च्या ‘भारत छोडो” च्ल्व्लीठी भाग घेतल्याबद्दल त्यांना कारावास घडला. २ सप्टेंबर १९४६ रोजी स्थापन झालेल्या मध्यवर्ती हंगामी मंत्रीमंडळात ते भारताचे पहिले गृहमंत्री होते. ते घटना समितीचेही सदस्य होते. १५ ऑगष्ट १९४७ ला भारत स्वतंत्र झाला. पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान बनले. तेव्हा सरदार पटेल उपपंतप्रधान बनले. त्यांच्या कडे गृह, माहिती आणि प्रसारण तसेच घटक राज्यासंबधीचे प्रश्न हि खाती सोपविण्यात आली. पण देशाची फाळणी झाली पटेलांना या गोष्टीचे फार दु:ख झाले. सरदारांनी हिंदुस्थानातील ५६५ अर्धस्वायत्त संस्थानांचे भारतात विलिनीकरण करवून घेणे हे पटेलांचे सर्वात मोठे कार्य होय. मुत्सद्देगिरी व वेळ पडल्यास सैन्यबळ वापरून सरदारांनी संस्थाने भारतात विलीन केली. म्हणूनच ते भारताचे "लोहपुरूष" म्हणून ओळखले जातात. निजामचे हैद्राबाद संस्थान त्यांनीच भारतात विलीन करून घेतले. सुप्रसिद्ध सोरटीसोमनाथ मंदिराचा जिर्नोधार केला. ते मंदिर सर्वांना खुले केले. ते देशसेवेमुळे अमर झाले. देश हे एकच कुटुंब आहे अश्या भावनेनेच ते वागत. मात्र आपण “गृह मंत्री” ‘असतानाच गांधीजींची हत्या झाली. ‘ हि गोष्ट त्यांच्या मनाला अतिशय लागली. मग लवकरच हृद्य विकाराचा झटका येउन ते आजारी पडले. व त्यातच त्यांचे १५ डिसेम्बर १९५० रोजी निधन झाले.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹✹★✹◑◎●••
*✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❂█║▌║█║▌
*❁गुरूवार~31/10/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
No comments:
Post a Comment