31/12/24 मंगळवारचा परिपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*
*Ⓜ💲🅿 परिपाठ Ⓜ💲🅿*
*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*
*💥🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀
*💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀
*💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
🔘 *"माझी शाळा"* 🔘
*ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
🔗🔗👇👇🔗🔗
https://goo.gl/RpQbsw
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *31. डिसेंबर:: मंगळवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
पौष शु.१, पक्ष :शुक्ल पक्ष,
तिथि ~प्रतिपदा, नक्षत्र
~पूर्वाषाढा,
योग ~ध्रुव, करण ~किंस्तुघ्न,
सूर्योदय-07:11, सूर्यास्त-18:11,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ] ❂ सुविचार ❂*
━┅═▣◆★✪★◆▣═┅━
31. *नवं काहीतरी शिकण्यासाठी मिळालेला वेळ म्हणजे सुट्टी.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ] ▪ म्हणी व अर्थ* ▪
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••
31. *दोन्ही घरचा पाहुणा उपाशी*
*★अर्थ ::~*
दोन्ही गोष्टींवर अवलंबून राहिल्यास त्यातील एकही गोष्ट साध्य होत नाही
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ] ▫ सुभाषीत▫*
====••◆◆●★●◆◆••====
31. *सकलगुणभूषा च विनयः ।*
⭐अर्थ ::~
नम्रता ही सर्व गुणांचे भूषण आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ] ♦दिनविशेष*♦
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••
🛡 *31. डिसेंबर* 🛡
🔻===●●●★●●●===🔻
★हा या वर्षातील ३६५ वा (लीप वर्षातील ३६६ वा) दिवस आहे.
~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००४ : त्याकाळी जगात सर्वात उंच असलेल्या (१६७० फूट), तैपेइ - १०१ या इमारतीचे उद्घाटन झाले.
●१९९९ : पनामा कालव्यावर पनामा (देशा) चे पूर्ण नियंत्रण आले. त्याआधी काही वर्षे या कालव्यावर अमेरिका व पनामा यांचे संयुक्तपणे नियंत्रण होते.
●१८७९ : थॉमस एडिसनने मेन्लो पार्क, न्यू जर्सी येथे प्रथमच विद्युत दिव्यांचे प्रात्यक्षिक दाखवले.
●१८०२ : इंग्रज व दुसरा बाजीराव यांच्यात वसईचा तह झाला या तहात पेशव्यांचा बराच भूभाग इंग्रजांच्या अधिपत्याखाली गेला.
~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९४८ : डोना समर – अमेरिकन गायिका
◆१९३७ : अँथनी हॉपकिन्स – वेल्श अभिनेता
◆१९१० : पं. मल्लिकार्जुन मन्सूर – हिन्दुस्तानी शास्त्रीय गायक, पद्मविभूषण व कालिदास सन्मान आदी मानसन्मान त्यांना मिळाले.
◆१८७१ : गजानन यशवंत ताम्हणे तथा माणिकराव – आधुनिक भारतीय व्यायामविद्येचे प्रवर्तक, ‘कन्या आरोग्य मंदिरा’चे संस्थापक, बडोद्याचे मल्लविद्या विशारद
~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९७ : ’स्वरराज’ छोटा गंधर्व (जन्म: १० मार्च १९१८)
●१९८६ : राजनारायण – केंद्रीय आरोग्य मंत्री
●१९७१ : डॉ. विक्रम साराभाई – भारतीय अवकाश संशोधन कार्यक्रमाचे शिल्पकार
●१९२६ : वि. का. राजवाडे – इतिहासाचार्य (जन्म: १२ जुलै १८६३)
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..
https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫✫✪✫✪✫✪✪
*0६ ] ❂ देशभक्ती गीत ❂*
━┅═▣◆★✧★◆▣═┅━
31. *$ उठा राष्ट्रवीर हो $*
═══════════
उठा राष्ट्रवीर हो
सुसज्ज व्हा उठा चला, सशस्त्र व्हा उठा चला
उठा राष्ट्रवीर हो
युद्ध आज पेटले, जवान चालले पुढे
मिळुन सर्व शत्रूला क्षणात चारुया खडे
एकसंघ होऊनी लढू चला, लढू चला
उठा उठा, चला चला
वायुपुत्र होऊनी धरू मुठीत भास्करा
होऊनी अगस्तीही पिऊन टाकू सागरा
रामकृष्ण होऊ या, समर्थ होऊ या चला
उठा उठा, चला चला
चंद्रगुप्त वीर तो फिरुन आज आठवू
शूरता शिवाजीची नसानसांत साठवू
दिव्य ही परंपरा अखंड चालवू चला
उठा उठा, चला चला
यज्ञकुंड पेटले प्रचंड हे सभोवती
दुष्ट शत्रू मारुनी तयात देऊ आहुती
देवभूमी ही अजिंक्य दाखवू जगा चला
उठा उठा, चला चला
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ] 💎 प्रार्थना 💎*
====••◆◆●★●◆◆••====
31. *$ हे करुणाकरा ईश्वरा $*
✶✶✹✹★●★✹✹✶✶
हे करुणाकरा, ईश्वरा । कृपादान मज देई
तुजविण कोण निवारी संकट । दृढता ही तव पायी ॥
तूही आदि तू अनंत । तूही दु:स्तर भवनिधि तारक
तानसेन प्रभु तुम्ही उद्धरा ॥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ] 🔵 बोधकथा*🔵
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••
31. *■ आत्मसात करा ■*
••◆•◆•◆★◆•◆•◆••
एक दिवस शाळेला सुट्टी असल्याची घोषणा गुरूजींनी केली म्हणून एका शिंप्याचा मुलगा आपल्या वडीलाच्या दुकानवर गेला. तिथे गेल्यानंतर तो लक्षपूर्वक आपल्या वडीलाच्या कामाच निरीक्षण करु लागला. त्याने पाहीले की त्याचे वडील कैचीने कपडे कापतात व कैचीला पायाखाली दाबुन ठेवतात व नंतर सुईने कापलेले कपडे शिवायचे व नंतर सुईला आपल्या टोपीला टोचुन ठेवायचे. जेव्हा त्याने चार पाच वेळा हे पाहीले तेव्हा आश्चर्याने त्याने वडीलांना एक गोष्ट विचारु का असे म्हटले वडीलानी होकार देताच तो म्हणाला बाबा तुम्ही जेव्हा ही कपडा कापता तेंव्हा कैची पायाखाली ठेवता व सुईने जेंव्हा कपडा शिवता तेंव्हा सुई टोपीला लावता. असं का? याचे उत्तर त्याच्या वडीलांनी दोन ओळीत दिले त्यात पूर्ण जीवनाचे सार सांगितले ते म्हणाले "बेटा कैची कापायचे काम करते आणि सुई जोडायचे काम करते कापणा-याची जागा नेहमी खाली असते तर जोडणा-याची जागा नेहमी वर असते यामुळेच मी सुई टोपीवर लावतो व कैचीला पायाखाली ठेवतो.
*_🌀तात्पर्य_ ::~*
जीवनात उंची गाठायची असेल तर सुईसारखे जोडण्याचे काम करा कैचीसारखे तोडण्याचे नाही. आज त्याचे डोळे उघडले व जीवनाचा खरा अर्थ कळला.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] 🔷प्रेरणादायी विचार🔷*
====••◆◆●★●◆◆••====
31. *वादळ जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीत*
*घट्ट रुजून राहायचं असतं,*
*ती जितक्या वेगाने येतात तितक्या वेगाने निघूनही जातात*,
*वादळ महत्वाचं नसतं, प्रश्न आपण त्याच्याशी कशी झुंज देतो*
*आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा असतो.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ] *🔴सामान्य ज्ञान🔴*
====••◆◆●★●◆◆••====
31. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*
◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑
✪ तंबाखूमध्ये मुख्यत: कोणते विषारी द्रव्य असते ?
➜ निकोटीन.
✪ लवंग हा मसाल्याचा पदार्थ झाडाच्या कोणत्या भागातून मिळतो ?
➜ फुलांपासून.
✪ कागद उत्पादनास लागणारा मुख्य कच्चा माल कोणता ?
➜ बांबू.
✪ हळदीच्या कोणत्या भागापासून अँटीसेप्टीक क्रीम तयार होते ?
➜ खोडापासून.
✪ तांबेरा रोग सर्वसाधारणपणे कोणत्या पिकावर पडतो ?
➜ गहू.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] 🔶थोरव्यक्ती परिचय🔶*
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••
31. *💥 विक्रम साराभाई 💥*
─┅━━●✹●━━┅─
भारतीय अवकाश संशोधन
कार्यक्रमाचे शिल्पकार
_*🐾यांचा आज स्मृतिदीन*_🐾
_त्यानिमित्त त्यांना_
_*विनम्र अभिवादन..!!*_
दिव्यत्वाची जेथ प्रचीती
*तेथे कर माझे जुळती ....*
🙏🐾🌷🌹🌷🐾🙏
◆जन्म ~ १२ ऑगस्ट, १९१९
*◆मृत्यू ~ ३१ डिसेंबर १९७१*
*♦विक्रम अंबालाल साराभाई*
🔷 हे भारतीय भौतिकशास्त्रज्ञ व खगोलशास्त्रज्ञ होते. ते भारताच्या अंतराळ संशोधनाचे पितामह आणि भारताच्या अंतराळ युगाचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात.
*• कारकीर्द •*
~~~~~~~~~
१९४५ साली दुसरे महायुद्ध संपल्यावर विक्रम साराभाई ब्रिटनला गेले. १९४७ साली त्यानी ‘कास्मिक रे इंवेस्टिगेशन इन ट्रापिकल लैटीट्यूड्स’ वर संशोधन करून डॉक्टरेट मिळवली आणि त्याचवर्षी ते आपल्या मायदेशी परत आले. भारतात परत येउन त्यांनी नोव्हेंबर ११ १९४७ला अहमदाबाद येथे भौतिकी संशोधन कार्यशाळा ची स्थापना केली. हे त्यांचे पहिले पाउल होते, पुढे जाऊन अवकाश संशोधनात विक्रम साराभाई यांनी भरीव कामगिरी केली.
विक्रम साराभाई यांनी अहमदाबाद येथील भारतीय प्रबंध संस्था (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट) स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. १९७५ मध्ये जो पहिला अंतरिक्ष उपग्रह आर्यभट्ट अवकाशात सोडला गेला त्याची रचना विक्रम साराभाई यांच्या अहमदाबाद रिसर्च सेंटर मध्येच केली होती. आर्यभट्टच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर भारताने अनेक उपग्रह अवकाशात प्रक्षेपित केले. या यशामागे साराभाई यांचे अथक परिश्रम, दूरदृष्टी आणि खंबीर नेतृत्व ह्यांचा मोलाचा वाटा आहे.
विक्रम साराभाई यांनी जागतिक किर्ती असलेल्या अनेक सस्थांची सुरवात केली. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट (IIM) ही भारतातील सर्वोत्कृष्ट व्यवस्थापन शिक्षण संस्था डाॅ. साराभाई यांच्या प्रयत्नातुनच उभी राहिली. भौतिकशास्त्रातील संशोधनासाठी प्रसिद्ध असलेल्या राष्ट्रीय भौतिकी प्रयोगशाळा (PRL) देखिल डाॅ. साराभाई यांनीच सुरू केली. अहमदाबाद येथे वस्त्रोद्योग निर्मितीस चालना देणारे अहमदाबाद टेक्स्टाईल इंडस्ट्रीयल रिसर्च असोसिएशन (ATIRA) या संस्थेची उभारणी त्यांनी केली. पर्यावरण क्षेत्रात कार्यरत असलेली सेंटर फॅार इन्व्हीरॅान्मेंटल प्लॅनिंग टेक्नॅालॅाजी (CEPT) ही संस्था देखिल त्यांनी उभारली.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹✹★✹◑◎●••
*✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❂█║▌║█║▌
*❁मंगळवार~31/12/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
No comments:
Post a Comment