"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

थोरपुरुष माहिती क्रं. 315

   *❒♦महाराणी येसूबाई ♦❒* 
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
     आपल्या सर्वस्वाचा त्याग करत स्वराज्यापायी आणि रयतेसाठी अनंत अन्यास सहन करणाऱ्या महान   "महाराणी येसूबाई"


     सुविद्य, सुसंस्कृत, कर्तव्यदक्ष, राजकारण-कुशल अशा महाराणी येसूबाई साहेबांनी १६८०-१७३० या कसोटीच्या काळात अतिशय महत्वाचे योगदान केले आहे. महाराणी येसूबाई ह्या शिवरायांच्या जेष्ठ सूनबाई तर छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी.
पिलाजीराव राघोजीराव शिर्के यांच्या कुलीन मराठा घरण्यात जन्मलेल्या जिऊबाई म्हणजेच महाराणी येसूबाईसाहेब महाराज ...

    अंदाजे इ.स.१६६१ ते १६६५ च्या दरम्यान त्यांच्या विवाह शिवपुत्र संभाजी राजांशी संपन्न झाला. विवाहाच्या वेळी त्यांच वय जेमतेम ६-७ वर्ष होत. त्यामुळे त्यांची जडन-घडन संभाजी राजांसामवेत माँसाहेबांच्या देखरेखी खाली झाली. त्याचा एकंदरीतच परिणाम त्यांच्या जीवनावर झालेला दिसून येतो. स्वराज्य प्रवर्तिका जिजाबाईसाहेब व युगप्रवर्तक छत्रपती शिवरायांच्या मुशीतून तावून सुकावून बाहेर पडलेले अस्सल बावनकशी सोने महाराणी येसूबाईसाहेब महाराज.

    महाराणी येसूबाई रणांगणी नसल्या तरी त्या धर्यशील,कर्त्यव्यदक्ष, कणखर वृतिच्या होत्या. ज्या शिवरायांच्या अनुपस्थितीत स्वराज्याचा काराभार माँसाहेब सांभाळत तसा संभाजी राजांच्या अनुपस्थितीत येसूबाई सांभाळत असत. त्याकरता त्यांच्या नावाचा शिक्काही "स्त्री सखी राज्ञी जयती" असा छत्रपती संभाजी महाराजांनी करवून दिला होता. छत्रपती संभाजीराजे यांच्या सारख्या निखाऱ्याला पदरात बांधून त्यांच्यावर मायेचे पांघरून घालणाऱ्या त्या पतिव्रता होत्या...

     पायाला तुफान बांधून अवघ्या महाराष्ट्रभर गरुड भरारी मारणाऱ्या संभाजी महाराजांच्या माघारी रायगडावरून स्वराज्याचा कारभार चालवणाऱ्या त्या कुशल राजनेत्या होत्या.. गडावर येणारे वाद आणि तंटे त्या स्वत: सदरेवर बसून कुशल रीतीने हाताळत.

       पुढे इ.स.१६८९ मध्ये संभाजी महाराजांच्या हत्येनंतर निर्माण झालेल्या परिस्थितीला आपले वैयतिक दुःख बाजुला सारून मोठ्या निर्धाराने सामोरे गेल्या. राजाराम महाराज व संभाजी पुत्र शाहू हे स्वराज्याचे दोन्ही वारस एकत्र शत्रुच्या हाती सापडू नयेत म्हणून त्यांनी स्वतःच्या मुलाला म्हणजे शाहुला आपल्या जवळ ठेवून राजारामंना रायगड सोडून जाण्यास भाग पाडले. बाहेरून रायगडला मदत करा, प्रसंगी जिंजीकडे जा, असे त्यांनी सुचवले. स्वतः येसूबाई रायगड लढायला लागल्या. पण शेवटी रायगड लढने शक्य नाही हे पाहिल्यावर त्यांनी मोगलांच्या छावनीत स्वतःच्या ७-८ वर्षांच्या मुलासह प्रवेश केला.

     स्वराज्याची शकले होऊ नये म्हणून पोटच्या मुलाचा म्हणजे लहानग्या शाहुराजेंचा अधिकार असताना सुद्धा स्वराजाच्या त्यांना गादीवर न बसवता छत्रपती राजाराम महाराज यांचा राज्याभिषेक करून त्यांनी आपल्या नि:स्वार्थपणाची साक्ष दिली.

   आयुष्यातील उमेदिची २७ वर्षे त्यांनी मोगल कैदेत घालवली. त्यात अनेक अडचणी आल्यात. त्या त्यांनी मोठ्या धैर्याने सोडविल्या. त्यांच्या ह्या आत्मबलिदानाला तोड़ नाही. सतत २७ वर्षे मोघलांच्या कैदेत राहून औरंझेबाचे नीच इरादे उधळून लावत आपला मान,सन्मान,अभिमान आणि स्वाभिमान कायम जपला...

      इ.स.१७१९ च्या सुमार्यास त्या दिल्लीहून दक्षिनेत परत आल्या. दक्षिणेत स्वराज्याची झालेली सातारा, कोल्हापुर अशी शकले पाहिली. आपसांतिल दुहिमुळे परकीय शत्रुंची कसे फावते याचा धडा शिवरायांच्या कारकिर्दीपासून पाहत आल्यामुळे त्यांनी कोल्हापुरचे संभाजीराजे व शाहू यांच्यात १७३० च्या सुमाराला वारणा येथे मैत्रीचा तह घडवून आणला. हा तह वारणेचा तह म्हणून इतिहासात अमर झाला.

     यानंतर थोडेच दिवसांत त्यांचे देहवासन झाले. त्याचा उल्लेख कोल्हापुरच्या संभाजी यांच्या पत्रावारून कळतो. साताऱ्या जवळील माहुली या क्षेत्री त्यांचे दहन करण्यात आले. आजही माहुलीच्या नदीकाठी एका चौथार्यावर त्यांची समाधी दाखवतात. परंतु त्यावर 'नाही चिरा नाही पणती'!.

     ह्या महान महाराणीची जन्मतारीख इतिहास विसरून गेला तो गेलाच परंतु त्यांच्या निधनाची तारीख सुद्धा याद ठेवण्याची तसदी इतिहासाने घेतली नाही.. त्यांच्या कर्तुत्वाची, ऐतिहासिक योगदानाची माहिती नाही.

अशा ह्या अद्वितीय स्त्रीश्क्तीला मानाचा त्रिवार मुजरा...!! 

No comments:

Post a Comment