"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

थोरपुरुष माहिती क्रं. 314

  *❒ ♦इंदिरा संत♦ ❒* 
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
◆जन्म नाव :~ इंदिरा नारायण संत
●जन्म :~ ४ जानेवारी १९१४; इंडी, कर्नाटक, भारत
●मृत्यू :~ १३ जुलै २०००

◆कार्यक्षेत्र :~ साहित्य, अध्यापन
◆भाषा :~ मराठी
◆साहित्य प्रकार :~ कविता

                                      ★ इंदिरा नारायण संत ★

        या मराठी कवयित्री आणि कथालेखक होत्या. शिक्षकीपेशा स्वीकारलेल्या इंदिरा संतांनी लहान मुलांच्या कथा लिहून आपल्या लिखाणाला प्रारंभ केला. १९५०च्या दशकात त्यांनी स्त्रीवादी कविता लिहण्यावर आपले लक्ष केंद्रित केले. आई, पत्नी, मुलगी या नात्यांतून भारतीय स्त्रीचे दिसणारे खडतर जीवन त्यांनी आपल्या कवितांमधून हळुवारपणे मांडले आहे. इंदिरा संत आणि त्याचे पती ना.मा. संत या दोघांच्या कवितांचा एकत्रित असा संग्रह 'सहवास' या नावाने १९४० ला प्रसिद्ध झाला. दुर्दैवाने ना.मा. संत यांचे १९४६ साली निधन झाले. वेळीच सावरून या घटनेचा इंदिरा संत यांनी आपल्या कवितेवर परिणाम होऊ दिला नाही. विशुद्ध रूपातील इंदिरा संत यांची कविता टीकाकार तसेच काव्यरसिकांनी उचलून धरली. आजमितीस इंदिरा संत यांची सुमारे पंचवीस पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. रमेश तेंडुलकरयांनी इंदिरा संत यांच्या निवडक कविता 'मृण्मयी' नावाने १९८२ साली संपादित करून प्रसिद्ध केल्या आहेत.

      इंदिरा दीक्षित असलेल्या इंदिरा संत यांनी कोल्हापूर  व पुणे  येथून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले.  बी.ए.,  बी.टी.डी. व बी.एड या पदव्या प्राप्त केल्यानंतर  बेळगावच्या ट्रेनिंग कॉलेजात अध्यापिका म्हणून काम पाहण्यास त्यांनी सुरुवात केली. या कॉलेजात त्यांनी १९५६ ते १९७४ या काळात प्राचार्यपद देखील भूषवले. पुढे पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजात  सहाध्यायी ना.मा.संत यांच्याशी त्या १९३५ साली विवाहबद्ध झाल्या.

                     ■ "प्रकाशित साहित्य" ■
  इंदिरा संत यांचे प्रकाशित झालेले साहित्य पुढीलप्रमाणे:

                          ★ कवितासंग्रह ★
   इंदिरा संत यांच्या समग्र कविता (पॉप्युलर प्रकाशन, २०१४). या पुस्तकाला अरुणा ढेरे यांची प्रस्तावना आहे.

       गर्भरेशीम १९८२, निराकार, बाहुल्या १९७२, मरवा, मृगजळ १९५७, मेंदी १९५५, रंगबावरी १९६४, वंशकुसुम, शेला १९५१,

                       ★ कथासंग्रह ★
  कदली, चैतू, श्यामली, ललितलेख संग्रह, मृदगंध १९८६, फुलवेल १९९४

                       ■ पुरस्कार ■
◆साहित्य अकादमी पुरस्का गर्भरेशीम
◆अनंत काणेकर पुरस्कार गर्भरेशीम
◆साहित्य कला अकादमी पुरस्कार  घुंघुरवाळा
◆महाराष्ट्र शासन पुरस्कार शेला रंगबावरी मृगजळ
◆ कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार 

No comments:

Post a Comment