"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

34 ✿ भौगोलिक माहिती ✿

    ◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑

■ सूर्यमालेतील ग्रहांना सूर्यापासून प्रकाश व उष्णता मिळते.

■ बुध हा सूर्यमालेतील सूर्याला सर्वांत जवळचा ग्रह आहे.

■ सूर्यमालेत पृथ्वीनंतर येणारा 'मंगळ' हा लालसर रंगाचा ग्रह दिसून येतो.

■ 'गुरू'हा सूर्यमालेतील सर्वांत मोठा ग्रह आहे.

■ पृथ्वीवरून धुरकट निळसर दिसणार्‍या 'शनी' या ग्रहाभोवती आढळणारी कडी हे शनी या ग्रहाचे वैशिष्ट्य होय.

■ 'चंद्र' हा पृथ्वीचा उपग्रह आहे. चंद्र स्वत:भोवती फिरत फिरत 'पृथ्वी': भोवती प्रदक्षिणा घालतो.

■ चंद्र दररोज आदल्या दिवसापेक्षा ५० मिनिटे उशिरा उगवतो.

■ ज्या वेळी चंद्र व सूर्य यांच्या मध्ये पृथ्वी येते त्या वेळी 'चंद्रग्रहण' लागते. 

■ ज्या वेळी सूर्य व पृथ्वी यांच्या मध्ये चंद्र येतो त्या वेळी 'सूर्यग्रहण' लागते.

■ चंद्रग्रहण नेहमी पौर्णिमेस येते;तर ग्रहण नेहमी अमावास्येस येते.

No comments:

Post a Comment