"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

31 ✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿

    ◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑

■ उत्तर व दक्षिण अमेरिकेच्या मध्ये कुठला कालवा आहे?
    ➜ उत्तर व दक्षिण अमेरिकेच्या मध्ये  पनामा हा कालवा आहे.

■ अमेरिकेत मोटारीचे कारखाने असलेले शहर कोणते?
   ➜ अमेरिकेत मोटारीचे कारखाने असलेले शहर डेट्रॅाइट आहे.

■ अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्याजवळून कुठला प्रवाह वाहतो?
    ➜ अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्याजवळून लॅब्रेडोर प्रवाह वाहतो.

■ पश्चिम जर्मनी या देशाची राजधानी कोणती?
    ➜ पश्चिम जर्मनी या देशाची राजधानी बॉन आहे.

■ कंपाला ही कोणत्या देशाची राजधानी आहे?
    ➜ कंपाला ही युगांडा देशाची राजधानी आहे.

■ पाऊस पडत नसल्याने कोणत्या देशाचा फायदा झाला आहे?
    ➜ पाऊस पडत नसल्याने चिली  देशाचा फायदा झाला आहे.

■ भारताची उद्यान नगरी कोणत्या शहराला म्हणतात?
    ➜ भारताची उद्यान नगरी बंगलोर शहराला म्हणतात.

■ अरबी समुद्राची राणी कोणत्या शहरास म्हणतात?
    ➜ अरबी समुद्राची राणी गोवा शहरास म्हणतात.

■ भारतातील कोणते राज्य पर्वताचे राज्य म्हणून ओळखले जाते?
    ➜ भारतातील सिक्कीम राज्य पर्वताचे राज्य म्हणून ओळखले जाते.

■ वाऱ्याचा वेग मोजण्याचे साधन कोणते?
    ➜ वाऱ्याचा वेग मोजण्याचे साधन अॅनीमोमीटर आहे.

No comments:

Post a Comment