"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

3 भारतातील सर्वात मोठे १५ पुरस्कार..!


        ज्या भारतीयांनी जगात भारताचे नाव उंचावले आहे, आपल्या देशाला ओळख मिळवून दिली आहे अश्यांचा सत्कार करण्यासाठी काही सर्वोच्च पुरस्कारांची तरतूद केली गेली आहे. त्यापैकी महत्त्वाचे पुरस्कार म्हणजे भारतरत्न, पद्मश्री यांबद्दलच आपल्याला माहिती आहे. पण तुम्हाला माहित आहे का भारत सरकारतर्फे एकूण १५ सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान केले जातात. या पुरस्कारांबद्द्दल जाणून घेऊया!

★ साहित्य अकादमी पुरस्कार ★
१९५४ सालापासून हा पुरस्कार देण्यास सुरुवात करण्यात आली. भारतातील कोणत्याही भाषेतील साहित्यकारास मिळणारा हा देशातील सर्वात मोठा पुरस्कार आहे.

       ★ परमवीर चक्र ★
१९५० सालापासून देशाच्या सुरक्षेमध्ये अतुलनीय योगदान देणाऱ्या व्यक्तीस हा पुरस्कार दिला जातो. शौर्य आणि साहस या दोन गोष्टींच्या बळावर शत्रूला धोबीपछाड देणारे निडर सैनिक या पुरस्काराचे खरे मानकरी समजले जातात.

        ★ भाषा सन्मान ★
भारतात बोलल्या जाणाऱ्या भाषांच्या सन्मानासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीस हा सर्वश्रेष्ठ पुरस्कार प्रदान केला जातो. १९९६ मध्ये ह्या पुरस्काराची घोषणा करण्यात आली होती.

       ★ युवा पुरस्कार ★
हा पुरस्कार युवा साहित्यकारांसाठी साहित्य अकादमी पुरस्काराच्या तोडीचा आहे. ह्या पुरस्कारामुळे युवा साहित्यकारांना प्रेरणा मिळते.

         ★ पद्म पुरस्कार ★
हा देशातील सर्वात मोठा दुसरा नागरी सन्मान म्हणून ओळखला जातो. १९५४ सालापासून देशाच्या आणि समाजाच्या हितासाठी कार्य कारणाऱ्या व्यक्तीस हा पुरस्कार देऊन गौरवले जाते.

       ★ भारतरत्न ★
हा आहे आपल्या देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार! १९५४ सालापासून कोणत्याही क्षेत्रात गौरवशाली कामगिरी बजावणाऱ्या व्यक्तीचा हा पुरस्कार देऊन सत्कार किला जातो.

        ★ अशोक चक्र ★
हा पुरस्कार मिळवणे कोणत्याही सैनिकाच्या जीवनातील सर्वोच्च क्षण असतो. युद्धाच्या दरम्यान अतुलनीय साहस दाखवणाऱ्या सैनिकास हा सन्मान मिळतो.

      ★ गांधी शांती सन्मान ★
महात्मा गांधींच्या विचारांवर मार्गक्रमण करून सामाजिक, राजकीय किंवा अर्थकारण या क्षेत्रात बहुमूल्य कामगिरी बजावणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो.

    ★ नौ / वायू / सेना मेडल ★
युद्धाच्या दरम्यान भारतीय सैन्य वा ठराविक सैनिकांसाठी केल्या गेलेल्या कार्याकरिता हा सन्मान दिला जातो. ह्या पुरस्काराची सुरुवात १९६० पासून करण्यात आली होती.

    ★ राजीव गांधी खेलरत्न ★
खेळामध्ये भारताचे नाव जगभर उंचावणाऱ्या खेळाडूंना हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला जातो.

    ★ राष्ट्रीय बहादुरी सन्मान ★
६-८ वयोगटातील लहानग्यांनी कठीण परिस्थितवर मात करत दाखवलेल्या अतुलनीय शौर्याबद्दल हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात येतो.

     ★ ध्यानचंद पुरस्कार ★
खेळाच्या क्षेत्रात दिलेल्या योगदानासाठी भारत सरकारतर्फे हा पुरस्कार दिला जातो. एखाद्या खेळाडूसाठी हा पुरस्कार जीवन गौरव पुरस्काराच्या पातळीचा असतो.

      ★ अर्जुन पुरस्कार ★
१९६१ पासून सुरु केलेला हा पुरस्कार खेळामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वोत्तम कामगिरी बाजावणाऱ्या खेळाडूला दिला जातो.

     ★ द्रोणाचार्य पुरस्कार ★
कोणत्याही खेळ प्रशिक्षकाला मिळणारा हा भारतातील सर्वोच्च पुरस्कार आहे.

   ★ इंदिरा गांधी शांती सन्मान ★
शांतीचा प्रसार करण्यासाठी आणि संपूर्ण विश्वात शांती प्रस्थापित करण्यासाठी कार्य कारणाऱ्या व्यक्तीला दिला जाणारा हा सर्वात मोठा पुरस्कार आहे. 

No comments:

Post a Comment