"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

*01/08/24 गुरूवार परीपाठ*

◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤

*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*

*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*


 *Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*


*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*


 *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*

 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ 


 *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*

 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ 


 *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*

*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*


 *💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*

*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*

       🔘 *"माझी शाळा"* 🔘

   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*

    🔗🔗👇👇🔗🔗


http://satishborkhade.blogspot.com/p/61.html

▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄

*0१ ]    ❂ आजचे पंचाग ❂*

  ━═●🇲◆🇸◆🇵●═━

🍥 *01. ऑगस्ट:: गुरूवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━

आषाढ कृ. १२, पक्ष :कृष्ण पक्ष, 

तिथि ~द्वादशी, नक्षत्र ~मृगशीर्ष, 

योग ~व्याघात, करण ~तैतिल

सूर्योदय-06:04, सूर्यास्त-19:20,

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0२ ]   ❂ सुविचार ❂* 

━┅═▣◆★✪★◆▣═┅━

01. नैराश्य हे धारदार तलवारीवरसाचलेल्या धुळीसारखे असतेधुळ झटकली की ती तलवारपुन्हा धारदार बनते. *साहीत्यसम्राट अण्णाभाऊ साठे*

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*

━━●🇲=◆🇸◆=🇵●═━


01. *जाणाऱ्याचे जाते, पण  कोठावळ्याचे पोट दुखते*

      *★ अर्थ ::~* -देणारा उदार मनाने देतो, इतराना ते पाहवत नाही.

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*

━┅━▣◆★✧★◆▣═┅━


01. *जाणाऱ्याचे जाते, पण  कोठावळ्याचे पोट दुखते*

      *★ अर्थ ::~* -देणारा उदार मनाने देतो, इतराना ते पाहवत नाही.

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*

━━●🇲=◆🇸◆=🇵●═━


    🛡 ★ 01. ऑगस्ट ★ 🛡

🔻===●●●★●●●===🔻

★ "वनमहोत्सव दिन"

★हा या वर्षातील २१३ वा (लीप वर्षातील २१४ वा) दिवस आहे.

लोकमान्य टिळक पुण्यतिथी

★१ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट – जागतिक स्तनपान सप्ताह


   ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~

 🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹

◆२००१ : सोलापूर विद्यापीठाची स्थापना झाली. ३ ऑगस्ट २००४ रोजी या विद्यापीठाचे औपचारिक उद्‍घाटन झाले.

◆१९९४ : भारतातील रेल्वे प्रवाशांसाठी विमा योजना लागू झाली. जllगातील अशा तर्‍हेची ही पहिलीच योजना आहे.

◆१७७४ : जोसेफ प्रिस्टले व कार्ल शील या शास्त्रज्ञांनी ऑक्सिजन हे मूलद्रव्य वेगळे केले.

  

    ~*★जन्मदिवस / जयंती★*~

 🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸

●१९३२ : महजबीन बानो ऊर्फ ’मीनाकुमारी’ – अभिनेत्री

●१९२० : *’लोकशाहीर’ अण्णाणाऊ साठे* – लेखक, कवी व समाजसुधारक  

●१८९९ : कमला नेहरू – जवाहरलाल नेहरू यांच्या पत्‍नी 

●१८८२ : पुरुषोत्तम दास टंडन – स्वातंत्र्यसेनानी, भारतरत्‍न (१९६१), राष्ट्रभाषा हिन्दीचे समर्थक, अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष 

●१८३५ : महादेव मोरेश्वर कुंटे – कवी व संस्कृतचे प्राध्यापक. ’राजा शिवाजी’ हे त्यांचे काव्य विशेष गाजले.


    ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~

 🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹

◆२००८ : हरकिशन सिंग सुरजित – मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते व पॉलिट ब्यूरोचे सदस्य 

◆१९९९ : निराद सी. चौधरी – साहित्य अकादमी पुरस्कार विजेते (१९७५)  

◆१९२० : लोकमान्य बाळ (केशव) गंगाधर टिळक – समाजसुधारक आणि प्रखर राष्ट्रवादी, भगव्‌दगीतेचे भाष्यकार (जन्म: २३ जुलै १८५६)

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*🚦सतिष बोरखडे दारव्हा*

   💥📱7875840444💥

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..


     https://goo.gl/8D33ox

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪

*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂* 

  ━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━


01. *✸ ऐ मेरे वतन के लोगों ✸*

       ●●●●●००००००●●●●●

ऐ मेरे वतन के लोगों

तुम खूब लगा लो नारा

ये शुभ दिन है हम सब का

लहरा लो तिरंगा प्यारा

पर मत भूलो सीमा पर

वीरों ने है प्राण गँवाए

कुछ याद उन्हें भी कर लो 

कुछ याद उन्हें भी कर लो..

जो लौट के घर न आये 

जो लौट के घर न आये..


ऐ मेरे वतन के लोगों 

ज़रा आँख में भर लो पानी

जो शहीद हुए हैं उनकी

ज़रा याद करो क़ुरबानी

जब घायल हुआ हिमालय

खतरे में पड़ी आज़ादी

जब तक थी साँस लड़े वो

फिर अपनी लाश बिछा दी

संगीन पे धर कर माथा 

सो गये अमर बलिदानी

जो शहीद...


जब देश में थी दीवाली

वो खेल रहे थे होली

जब हम बैठे थे घरों में

वो झेल रहे थे गोली

थे धन्य जवान वो आपने

थी धन्य वो उनकी जवानी

जो शहीद...


कोई सिख कोई जाट मराठा

कोई गुरखा कोई मदरासी

सरहद पर मरनेवाला 

हर वीर था भारतवासी

जो खून गिरा पवर्अत पर

वो खून था हिंदुस्तानी

जो शहीद...


थी खून से लथ-पथ काया

फिर भी बन्दूक उठाके

दस-दस को एक ने मारा

फिर गिर गये होश गँवा के

जब अन्त-समय आया तो

कह गये के अब मरते हैं

खुश रहना देश के प्यारों

अब हम तो सफ़र करते हैं

क्या लोग थे वो दीवाने

क्या लोग थे वो अभिमानी

जो शहीद...

तुम भूल न जाओ उनको

इस लिये कही ये कहानी

जो शहीद...


जय हिन्द... जय हिन्द की सेना..

जय हिन्द... जय हिन्द की सेना..

जय हिन्द, जय हिन्द, जय हिन्द

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0७ ]      ❂ प्रार्थना ❂*

━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━


01. *❂ इतनी शक्ति हमें दे न दाता *

          ✶✶✹✹★●★✹✹✶✶

इतनी शक्ति हमें दे न दाता

मनका विश्वास कमज़ोर हो ना

हम चलें नेक रास्ते पे हमसे

भूलकर भी कोई भूल हो ना...


हर तरफ़ ज़ुल्म है बेबसी है

सहमा-सहमा-सा हर आदमी है

पाप का बोझ बढ़ता ही जाये

जाने कैसे ये धरती थमी है

बोझ ममता का तू ये उठा ले

तेरी रचना का ये अन्त हो ना...

हम चले...


दूर अज्ञान के हो अन्धेरे

तू हमें ज्ञान की रौशनी दे

हर बुराई से बचके रहें हम

जितनी भी दे, भली ज़िन्दगी दे

बैर हो ना किसीका किसीसे

भावना मन में बदले की हो ना...

हम चले...


हम न सोचें हमें क्या मिला है

हम ये सोचें किया क्या है अर्पण

फूल खुशियों के बाटें सभी को

सबका जीवन ही बन जाये मधुबन

अपनी करुणा को जब तू बहा दे

करदे पावन हर इक मन का कोना...

हम चले...


हम अन्धेरे में हैं रौशनी दे,

खो ना दे खुद को ही दुश्मनी से,

हम सज़ा पाये अपने किये की,

मौत भी हो तो सह ले खुशी से,

कल जो गुज़रा है फिरसे ना गुज़रे,

आनेवाला वो कल ऐसा हो ना...


हम चले नेक रास्ते पे हमसे,

भुलकर भी कोई भूल हो ना...

इतनी शक्ति हमें दे ना दाता,

मनका विश्वास कमज़ोर हो ना...

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0८ ]    ❂ बोधकथा ❂*

━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━


01.  *❃ अपमान आणि उपकार ❃*

     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━

         एकदा दोन मित्र वाळवंटातून चाललेले असतात, रस्त्यात त्यांच्यात काहीतरी बाचाबाची होते आणि बाचाबाचीचे रुपांतर भांडणात होते. इतके कडाक्याचे भांडण होते कि एक मित्र दुसऱ्या मित्राच्या थोबाडीत ठेवून देतो. ज्याला थोबाडीत बसते तो दुसरा मित्र खूप दुःखी होतो, गप्प बसतो आणि वाळूमध्ये बोटाने लिहितो," आज माझ्या प्राणप्रिय मित्राने मला थोबाडीत दिली, ज्याला मी जीवापाड मैत्री करतो त्याने मला आज मारले." ज्याने थोबाडीत मारलेली असते तो हे पाहतो पण काहीच न बोलता दोघेही पुढे चालत राहतात. पुढे गेल्यावर त्यांना एक तलाव दिसतो, दोघेहीजण पाण्यात उतरून स्नान करायचे ठरवतात, अंघोळ करता करता थोबाडीत खाल्लेला मित्र अचानक पाण्यात घसरतो, तिथे नेमकी दलदल असते, तो जोरजोराने ओरडायला सुरुवात करतो. 


       ज्याने थोबाडीत मारलेली असते तो मित्र क्षणाचाही विचार न करता आपल्या मित्राच्या सहाय्याला धावतो आणि त्याला त्या दलदलीतून बाहेर ओढून काढतो. जेंव्हा तो बुडणारा मित्र पाण्याबाहेर येतो, अंग कोरडे करतो तेंव्हा तो एका दगडाने दगडावर कोरून लिहितो,"आज माझ्या प्राणप्रिय मित्राने मला मरणाच्या दारातून ओढून परत आणले, मी आज मेलोच असतो पण त्याने स्वतःचा जीव धोक्यात घालून मला वाचविले." हे पण तो थोबाडीत देणारा वाचतो आणि त्याला राहवत नाही तो त्या मित्राला विचारतो कि,"पहिले मी तुला मारले तर ते तू वाळूत लिहिले आणि आता तुला पाण्यातून वाचविले तर ते तू दगडावर कोरून लिहिले हे असे का?" लिहिणारा मित्र म्हणाला," जेंव्हा कोणी आपल्या हृदयाला, मनाला, भावनेला ठेच लावेल तेंव्हा ते सर्व काही वाळूत लिहावे कारण काही काळानंतर वाळू हि विस्कळीत होवून जाते आणि मनातील भावनाही फार काळ एकसारख्या राहत नाहीत. पण जर कुणी उपकार केले तर ते मात्र दगडावर कोरून लिहिले कारण दगडावर कोरलेले जसे कायमस्वरूपी टिकून राहते तसे उपकार हे कायम लक्षात ठेवले जावेत.


         *🌀❝ तात्पर्य ❞ ::~* 

   "माणसाने अपमान तत्काळ विसरून जावा आणि उपकार आजन्म लक्षात ठेवावे.

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*

━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━


01. *"जेव्हा माणसाची योग्यता* व

  *हेतूचा प्रामाणिकपणा सिद्ध होतो,*

         *तेव्हा त्याचे शत्रूदेखील*

   *त्याचा सन्मान करू लागतात.*

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*

━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━


01. *✿सामान्य ज्ञान प्रश्नावली✿*

   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑


✪  कोणत्या काव्यप्रकारातून वीररसाची प्रचिती येते ?

➜ पोवाडा.


  ✪ राष्ट्रीय पक्षी दिवस कधी साजरा केला जातो ?

➜ १२ नोव्हेंबर.


 ✪  एशियाई खेळात सर्वांत जास्त वेळा प्रथम स्थान कोणत्या देशाला मिळाले आहे ?

➜ चीन.


  ✪ पहिले सिकलसेलग्रस्तांना मोफत एस.टी. प्रवास सुविधा देणारे राज्य कोणते ?

➜ महाराष्ट्र.


 ✪  डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक पाक्षिक केव्हा सुरू केले ?

➜ ३१ जानेवारी १९२०

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*

━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━


01.  *❒ तुकाराम भाऊराव साठे ❒*  

     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती त्यानिमित्त त्यांना  *विनम्र अभिवादन..!!* 

   🙏🐾🌷🌹🌹🌷🐾🙏


●जन्म :~ १ ऑगस्ट  १९२०

         वाटेगाव, जिल्हा सांगली

●मृत्यू ;~ १८ जुलै  १९६९


     ◆ तुकाराम भाऊराव साठे

          ऊर्फ अण्णा भाऊ साठे ◆

    हे मराठी लेखक व समाजसुधारक होते. वर्गविग्रहाचे तत्त्वज्ञान सर्वसामान्य जनांपर्यंत पोहोचविणारा, महाराष्ट्राच्या ग्रामीण मातीतील बोली आणि कलांचा संस्कार घेऊन आलेला सिद्धहस्त कादंबरीकार, लोकनाट्यकार म्हणून त्यांची प्रतिमा आहे. ग्रामीण ढंगातील रांगड्या तमाशाला 'लोकनाट्य` हे बिरुद शाहीर अण्णा भाऊ साठे यांनी दिले., अण्णा भाऊंनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत लोकनाट्यांद्वारे जनजागृतीसाठी प्रयत्‍न केले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतून निर्माण झालेल्या मराठी भाषिक महाराष्ट्र राज्याच्या नवनिर्मितीत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, अमर शेख व शाहीर कॉ. द. ना. गव्हाणकरांचे मोलाचे योगदान होते. अण्णा भाऊ साठे हे अंतर्बाह्य मार्क्सवादी होते. अण्णा भाऊ साठे म्हणजे जातींच्या उतरंडीमुळे शिक्षणापासून, समग्र विकासापासून वंचित राहिलेल्या मातंग समाजातील एक समृद्ध व्यक्तिमत्त्व होते. वैयक्तिक दुःखांचा विचार न करता; आपले विचार, कार्य व प्रतिभा यांच्या साहाय्याने लोककलेला प्रतिष्ठा प्राप्त करून देणारे आणि वंचितांच्या व्यथा प्रभावीपणे मांडणारे लोकशाहीर होते.

       

  वयाच्या १४ व्या वर्षी अण्णांनी प्राथमिक शिक्षणाला सुरुवात केली. परंतु तत्कालीन मागास जातींतील मुलांसाठी त्या काळी वेगळ्या शाळा होत्या. त्या मुलांशी शिक्षकांचे वर्तनही निर्दयीपणाचे होते. वाढलेले वय, सदोष शिक्षण पद्धती यांमुळे अण्णा फार दिवस शाळेत गेलेच नाहीत.

    

    विविध राजकीय संघटनांचे ध्येय ब्रिटिशांना हाकलून देणे हेच होते. परंतु प्रत्येकाची विचारसरणी वेगळी होती. यांपैकी कम्युनिस्ट विचारसरणीचे अण्णा अनुयायी बनले. पक्षाच्या सभांचे आयोजन करणे, वॉलपेंटिंग करणे, हॅण्डबिले वाटणे, मोर्चे काढणे, छोट्या-मोठ्या सभेसमोर गोष्टी सांगणे, पोवाडे, लोकगीते म्हणून दाखविणे या सर्व गोष्टींमुळे कम्युनिस्ट वर्तुळात ते सर्वांना एकदम हवेहवेसे झाले. याच वेळी त्यांच्या तुकाराम या नावाचे अण्णा या नावात रूपांतर झाले.

       वयाच्या १७-१८ व्या वर्षी संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी अण्णांवर आली होती. गिरणी कामगार म्हणून त्यांच्या जीवनाला सुरुवात झाली होती. परंतु कोहिनूर मिलमधील नोकरी सुटल्याने त्यांच्यावर मोठेच संकट आले. या वेळी पुन्हा साठे कुटुंब वटेगावला आले.

    मुंबईतील धकाधकीचे जीवन, मोर्चे, सभा, सत्याग्रह, आंदोलने या सर्व गोष्टी पाहिलेल्या अण्णा भाऊंना वटेगावमध्ये राहणे शक्य होत नव्हते. अत्यंत अस्वस्थतेत त्यांनी घर सोडले आणि ते त्यांच्याच नातेवाईकांच्या तमाशाच्या फडात सामील झाले. अण्णा भाऊंचा धारदार आवाज, त्यांचे पाठांतर, पेटी, तबला, ढोलकी, बुलबुल ही वाद्ये वाजवण्याची कला या गुणांमुळे त्यांचे तमाशात स्वागतच झाले.

            ◆ कार्य ◆

   अण्णा भाऊ साठे हे लावण्या, शाहिरी काव्ये, पोवाडा या लोककलांमध्ये तरबेज होते. मराठीभाषिक स्वतंत्र महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीकरता इ.स. १९५० च्या दशकात चाललेल्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांनी लोककलेच्या माध्यमातून लोकप्रबोधन घडवून आणले. अण्णा भाऊ साठे यांची वगनाट्येही अत्यंत महत्त्वाची आहेत. या वगनाटयांसाठी अण्णा भाऊंनी तमाशा या महाराष्ट्रातील पारंपरिक लोककलेचा आकृतिबंध स्वीकारला. गरुडाला पंख, वाघाला नखं तशी ही (मुंबई) मराठी मुलुखाला हे कवन संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत विलक्षण गाजले.

     अण्णा भाऊ साठे यांनी लिहिलेली प्रसिद्ध छक्कड (लावणीचा एक प्रकार) म्हणजे ‘माझी मैना गावाकडं राह्यली’. या एका काव्यरचनेमुळे अण्णा भाऊ साठे यांचे नाव मराठी साहित्यात अविस्मरणीय असेल.


     ◆ पुरस्कार आणि सन्मान ◆

  पहिल्या दलित साहित्य संमेलनाचे उद्‌घाटक (१९५८) १९६१ साली, अण्णा भाऊ साठे यांच्या फकिरा या कादंबरीला महाराष्ट्र सरकारचा सर्वोत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला. तत्कालीन ज्येष्ठ साहित्यिक वि.स. खांडेकर यांनीही कादंबरीचे कौतुक केले होते.

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••

          *✍ संकलन ✍* 

*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*

   ♦📱 7875840444 ♦

 *✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*

█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌


*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment