"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

 *29/07/24 सोमवारचा परीपाठ*

◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤

*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*

*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*


 *Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*


*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*


 *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*

 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ 


 *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*

 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ 


 *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*

*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*


 *💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*

*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*

       🔘 *"माझी शाळा"* 🔘

   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*

    🔗🔗👇👇🔗🔗


https://urlzs.com/dmQmp

▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄

*0१ ]    ❂ आजचे पंचाग ❂*

  ━═●🇲◆🇸◆🇵●═━

🍥 *29. जुलै:: सोमवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━

 आषाढ कृ.९, पक्ष :कृष्ण पक्ष, 

तिथि ~नवमी, नक्षत्र ~भरणी, 

योग ~गण्ड, करण ~तैतिल, 

सूर्योदय-06:14, सूर्यास्त-19:15,

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0२ ]   ❂ सुविचार ❂* 

━┅▣◆★✪★◆▣┅━

29. *शिकणाऱ्याला शिकवावं लागत नाही; तो स्वतःहून शिकतो.*

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*

━━●🇲=◆🇸◆=🇵●━━


29. *पालथ्या घड्यावर पाणी –* 

          *★ अर्थ ::~* 

   सर्व प्रयत्न निरुपयोगी ठरणे

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*

━┅━▣◆★✧★◆▣━┅━


29. *पृथ्विभूषणं राजा ।*

          ⭐अर्थ ::~

 राजा हा पृथ्वीचे भूषण आहे.

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*

━━●🇲=◆🇸◆=🇵●━━


        🛡 *29. जुलै* 🛡

🔻====●●●★●●●====🔻

★आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन

★हा या वर्षातील २१० वा (लीप वर्षातील २११ वा) दिवस आहे.


        ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~

 🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹

●१९८७ : भारताचे पंतप्रधान राजीव गांधी व श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष जे. आर. जयवर्धने यांनी भारत-श्रीलंका शांतता करारावर सह्या केल्या.

●१९५७ : ’इंटरनॅशनल अ‍ॅटॉमिक एनर्जी एजन्सी (IAEA)’ची स्थापना झाली.

●१९४८ : दुसऱ्या महायुद्धामुळे पडलेल्या १२ वर्षांच्या खंडानंतर लंडन येथे १४ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.


   ~*★जन्मदिवस / जयंती★*~

 🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸

◆१९५९ : संजय दत्त – अभिनेता 

◆१९५३ : अनुप जलोटा – भजनगायक

◆१९२५ : *शि. द. फडणीस – व्यंगचित्रकार*

◆१९२२ : ब. मो. पुरंदरे – इतिहासकार आणि लेखक, शिवशाहीर

◆१९०४ : जहांगीर रतनजी दादाभॉय तथा ’जे. आर. डी. टाटा’ – भारतरत्‍न, उद्योगपती व वैमानिक, भारतीय नागरी विमान वाहतुकीचे जनक

◆१८८३ : बेनिटो मुसोलिनी – इटलीचा हुकूमशहा (मृत्यू: २८ एप्रिल १९४५)


   ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~

 🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹

●२००९ : महाराणी गायत्रीदेवी – जयपूरच्या राजमाता 

●२००६ : डॉ. निर्मलकुमार फडकुले –  मराठी संत साहित्यातील विद्वान 

●२००३ : बद्रुद्दीन जमालुद्दीन काझी उर्फ ’जॉनी वॉकर’ – विनोदी अभिनेता 

●२००२ : सुधीर फडके ऊर्फ ’बाबूजी’ – गायक व संगीतकार 

●१९९६ : अरुणा असफ अली – स्वातंत्र्यसेनानी. ९ ऑगस्ट १९४२ रोजी त्यांनी मुंबईतील गोवालिया टँक मैदानावर तिरंगा फडकवला होता.  भारतरत्‍न (मरणोत्तर) इ. पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले. 

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*🚦सतिष बोरखडे दारव्हा*

   💥📱7875840444💥

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..


     https://goo.gl/8D33ox

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

✪✪✫✪✫✪✫✫✪✫✪✫✪✪

*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂* 

  ━┅━▣◆★★◆▣═┅━


29. *✸ उठा राष्ट्रवीर हो ✸*

  ●●●●००००००●●●●

सुसज्ज व्हा उठा चला, सशस्‍त्र व्हा उठा चला, उठा राष्ट्रवीर हो


युद्ध आज पेटले, जवान चालले पुढे

मिळुन सर्व शत्रूला क्षणात चारुया खडे

एकसंघ होऊनी लढू चला, लढू चला

उठा उठा, चला चला


वायुपुत्र होऊनी धरू मुठीत भास्करा

होऊनी अगस्तीही पिऊन टाकू सागरा

रामकृष्ण होऊ या, समर्थ होऊ या चला

उठा उठा, चला चला


चंद्रगुप्‍त वीर तो फिरुन आज आठवू

शूरता शिवाजीची नसानसांत साठवू

दिव्य ही परंपरा अखंड चालवू चला

उठा उठा, चला चला


यज्ञकुंड पेटले प्रचंड हे सभोवती

दुष्ट शत्रू मारुनी तयात देऊ आहुती

देवभूमी ही अजिंक्य दाखवू जगा चला

उठा उठा, चला चला

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0७ ]      ❂ प्रार्थना ❂*

━┅━▣◆★✧★◆▣━┅━


29. *❂ शुभंकरोति म्हणा मुलांनो ❂*

    ━━●✶✹★★✹✶●═━

दिवा पाहुनी लक्ष्मी येते करू तिची प्रार्थना

शुभंकरोति म्हणा, मुलांनो, शुभंकरोति म्हणा

शुभंकरोति कल्याणम्‌, शुभंकरोति कल्याणम्‌


जेथे ज्योती तेथे लक्ष्मी

उभी जगाच्या सेवाधर्मी

दिशादिशांतुन या लक्ष्मीच्या दिसती पाउलखुणा


या ज्योतीने सरे आपदा

आरोग्यासह मिळे संपदा

शत्रुबुद्धिचा विनाश होता सौख्य मिळे जीवना


दिव्या दिव्या रे दीपत्कार

कानी कुंडल मोतिहार

दिव्यास पाहून नमस्कार हा रिवाज आहे जुना

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0८ ]    ❂ बोधकथा ❂*

━━●🇲=◆🇸◆=🇵●━━


29. *❃❝ फुलांची शिकवण ❞❃*

 ━━•●◆●★★●◆●•═━

      फुलांचे एक गाव होते. त्या गावाशेजारीच दगडांचे गाव होते. दगडांना फुलांचा खूप राग येई. कारण कोणीही फुलांनाच महत्त्व देत असे. प्रत्येक जण फुलांचीच स्तुती करत असे.


   कोणीही दगडांना चांगले म्हणत नसत. दगडांना याचे खूप दु:ख होई. अनेक वर्षे त्यांच्या मनात हे दु:ख  साठलेले होते.


        एकदा काहीतरी  कारण घडले. दोन्ही गावांत भांडण झाले. दगडांचा राग  उसळून आला. त्यांनी फुलांवर जोरदार हल्ला चढवला. सर्व फुलांना नष्ट करायचे असे त्यांनी ठरवले. प्रत्येक दगड एकेका  फुलाला ठेचू लागला. फुले मात्र अजिबात  प्रतिकार करत नव्हती. जरासाही  दु:खाचा उद्गार काढत नव्हती. उलट प्रसन्नपणे हसत होती.


      दगडांना फुलांचे आश्चर्य वाटते. त्यांनी फुलांना विचारले," आम्ही तुम्हाला इतके ठेचतो तरी तुम्ही हसता कसे?" फुलांनी उत्तर दिले," तुम्ही आम्हाला जितके अधिक चिरडता, तितका अधिक सुगंध सर्वत्र पसरतो. त्याचा आम्हाला आनंद होतो."


       *🌀❝ तात्पर्य ❞ ::~* 

  स्वत: दु: ख सोसून इतरांना आनंद देण्यातच सुख असते.

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*

━┅━▣◆★✧★◆▣━┅━


29. "आपल्याकडे समोरच्या व्यक्तीला

    देण्यासाठी काहीच नाही,

        असं वाटत असेल,

तर चेहऱ्यावर एक छान "स्मितहास्य"

             असुदया..!

 खरच हा उपहार इतर कोणत्याही

वस्तू पेक्षा खुपच "मौल्यवान" आहे.

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

 *१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*

━┅━▣◆★✧★◆▣━┅━


29. *✿सामान्य ज्ञान प्रश्नावली✿*

   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑


 ✪  भारतीय चित्रपट सृष्टीचें जनक कोणास म्हणतात ?

➜ दादासाहेब फाळके.


 ✪  डिझेल इंजिनचा शोध कोणी लावला ?

➜ रूडाल्फ डिझेल.


 ✪  'फटका' या काव्यप्रकाराचे जनक कोणास म्हणतात ?

➜ अनंत भवानीबाबा घोलप.


 ✪  व्हाॅलिबाॅल खेळातील बाॅलचे वजन किती ग्रॅम असते ?

➜ २७० ते २८० ग्रॅम.


 ✪  डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाज समता संघ केव्हा स्थापन केला ?

➜ ४ सप्टेंबर १९२७.

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*११ ] ❂ व्यक्ती परिचय ❂*

━━●🇲=◆🇸◆=🇵●━━


29.  *❒ अरुणा असफ अली ❒*  

  ━═•●◆●★★●◆●•━━

 स्वातंत्र्यसेनानी त्यांनी मुंबईतील गोवालिया टँक मैदानावर तिरंगा फडकवला होता.

   *यांच्या स्म्रुतीदिनानिमीत्त*

       *विन्नम्र अभिवादन..!!*

  🙏🌲🙏🌹🙏🌲🙏

●जन्म :~ १६ जुलै १९०९

●मृत्यू :~  २९ जुलै १९९६


    *स्वातंत्र्यसेनानी ९ ऑगस्ट १९४२ रोजी त्यांनी मुंबईतील गोवालिया टँक मैदानावर तिरंगा फडकवला होता. लेनिन शांतता पुरस्कार, इंदिरा गांधी शांतता पुरस्कार, पद्मविभूषण, आंतरराष्ट्रीय सद्भावना पुरस्कार, भारतरत्‍न (मरणोत्तर) इ. पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले.*


    अरुणा असफ अली यांचा जन्म कोलका (हरियाणा) येथील एक पुराणमतवादी हिंदू बंगाली कुटुंबात झाला. नैनीतालच्या सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंटमध्ये त्यांनी आपले शिक्षण घेतले. पदवीधर झाल्यानंतर, अरुणाने असफ अली गोखले मेमोरियल स्कूल, कलकत्ता येथे शिक्षक म्हणून काम करणे सुरु केले. अलाहाबादमध्ये आपल्या पती असफ अलीला भेटले, ते एक प्रमुख काँग्रेस नेते होते आणि त्यांच्यापेक्षा 23 वर्षांनी मोठे होते. 1928 मध्ये त्यांनी आपल्या पालकांच्या इच्छेविरूद्ध विवाह केला होता.


    स्वातंत्र्यासाठीच्या लढ्यात अरुणा असफ अली नायिका म्हणून उदयास आल्या. 1942 मधील भारत छोडो आंदोलन या काळात त्याने त्याचे मूल्य सिद्ध केले. त्यांनी गोवालिया टँक मैदानावर राष्ट्रीय झेंडा फडकवून भारत छोडो आंदोलन सुरू करण्यास सांगितले. असे केल्याने, हजारो  युवकांना प्रेरणा देऊन अनुकरण करायला होते आणि देशाच्या स्वातंत्र्यसाठी काहीतरी करायचे होते.


     असफ अली पूर्णपणे स्वातंत्र्य चळवळीशी संबंधित होत्या, म्हणून विवाह झाल्यानंतर अरुणा असफ अली यांनीही या मोहिमेत त्यांची साथ केली. 1930 साली मिठाच्या सत्याग्रहाच्या दरम्यान त्यांनी सार्वजनिक सभांना संबोधित केले आणि मिरवणूकी काढली. ब्रिटिश सरकारने एका अनोळखी व्यक्ति असल्याचा आरोप केला आणि त्याला एक वर्षाची कारावासाची शिक्षा ठोठावली. गांधी-इरविन यांच्या अधिवेशनात सर्व राजकीय कैद्यांची सुटका करण्यात आली, परंतु याना सोडण्यात आला नाही.  काही दिवसांनी ब्रिटिश सरकारने त्यांना सोडून द्यावे लागले.


    1932 मध्ये त्यांना पुन्हा अटक करण्यात आली आणि तिहार कारागारात ठेवण्यात आले. तिहार तुरुंगामध्ये राजकीय कैद्यांच्या वाईट आचरणाच्या विरोधात ते उपोषण केले. कारावासातुन मुक्त झाल्यानंतर ते 10 वर्षे राष्ट्रीय चळवळीपासून विभक्त झाल्या. 1942 मध्ये ती त्यांचे पतीनी ऐतिहासिक 8 ऑगस्ट रोजी मुंबई काँग्रेसचे अधिवेशन भाग घेतला पास 'भारत छोडो' ठराव.  त्यांनी आंदोलनात एक नवीन आवेश भरावा भारत छोडो आंदोलनात ते पूर्णत: सक्रिय झाले आणि अटकपूर्व बचावण्यासाठी भूमिगत बनले. त्यांची संपत्ती सरकारच्या जप्तीद्वारे विकली गेली. सरकारनं त्यांना पकडण्यासाठी 5 हजार रुपये जाहीर केले. दरम्यान, त्या आजारी पडल्या व  26 जानेवारी 1946 रोजी अरुणा असफ यांनी स्वत: ची शरणागती पत्करली.


     स्वातंत्र्यप्राप्तीनंतर अरुणा असफ अली सोशलिस्ट पार्टीचा सदस्य होत्या. तेव्हापर्यंत समाजवादी पक्ष कॉंग्रेसच्या चौकटीचा भाग होता. तथापि, 1948 मध्ये अरुणा व सोशलिस्ट गटांनी एकत्रितपणे समाजवादी पक्षाची स्थापना केली. 1955 मध्ये हे गट भारतीय कम्युनिस्ट पक्षामध्ये सामील झाले व अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेसचे उपाध्यक्ष व केंद्रीय समितीचे सदस्य झाले. 1958 मध्ये त्यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाची निवड केली आणि दिल्लीचे पहिले महापौर निवडून आली. 1964 साली ते पुन्हा कॉंग्रेसमध्ये सामील झाल्या पण सक्रियपणे भाग घेण्यास नकार दिला. 1975 मध्ये त्याला लेनिन पीस प्राइज आणि 1991 मध्ये आंतरराष्ट्रीय ज्ञानासाठी जवाहरलाल नेहरू पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. अरुणा असफ यांची 29 जुलै 1996 रोजी निधन झाले. 1998 मध्ये भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान 'भारत रत्न' आणि 'इंडियन पोस्टल सर्व्हिस' यांनी त्यांना टपाल तिकिट काढुन त्यांना सन्मान दिला.

▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄

••◎◑★✹🔅✹★◑◎••

        *✍ संकलन ✍*

*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*

♦📱7875840444♦

*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*

█║▌║█❃❂❃█║▌█


*❁सोमवार ~29/07/2024❁*

*⋐⋑⛯⋐⋑MSP⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment