"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

 *15/07/24 सोमवार चा परीपाठ*

◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤

*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*

*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*


 *Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*


*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*


 *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*

 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ 


 *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*

 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ 


 *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*

*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*


 *💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*

*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*

       🔘 *"माझी शाळा"* 🔘

   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*

    🔗🔗👇👇🔗🔗


https://urlzs.com/dmQmp

▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄

*0१ ]    ❂ आजचे पंचाग ❂*

  ━═●🇲◆🇸◆🇵●═━

🍥 *15. जुलै:: सोमवार* 🍥

 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━

आषाढ शु. ९, पक्ष :शुक्ल पक्ष,

तिथि ~नवमी, नक्षत्र ~स्वाती, 

योग ~सिद्ध, करण ~बालव, 

सूर्योदय-06:09, सूर्यास्त-19:19,

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0२ ]   ❂ सुविचार ❂* 

━┅═▣◆★✪★◆▣═┅━


15. *सुविचार जीवनात दिपस्तंभाचे कार्य करतात....*

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*

━━●🇲=◆🇸◆=🇵●━━


15. *अचाट खाणे अन मसणात जाणे*     ★ अर्थ ::~

कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केल्यास परिणाम नुकसान दायक असतात.

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*

━┅━▣◆★✧★◆▣━┅━


15. *चक्रवत् परिवर्तन्ते दु:खानि च सुखानि च ।*

   ⭐अर्थ ::~ सुखदु:खे चाकाप्रमाणे पालटत असतात.

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*

━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━


     *🛡 ★ 15. जुलै ★ 🛡*

🔻====●●●★●●●====🔻

★हा या वर्षातील १९६ वा (लीप वर्षातील १९७ वा) दिवस आहे.


        ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~

 🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹

●१९९७ : पर्यावरणवादी कार्यकर्ते महेशचंद्र मेहता यांची रॅमन मॅगसेसे पुरस्कारासाठी निवड

●१९९६ : स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पांडुरंगशास्त्री आठवले यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर

●१९५५ : पंडित जवाहरलाल नेहरू यांना ’भारतरत्‍न’ हा सर्वोच्‍च नागरी सन्मान जाहीर

●१९५५ : आण्विक अस्त्रांवर बंदी घालणाऱ्या मैनाउ जाहीरनाम्यावर १८ नोबेल पारितोषिक विजेत्या शास्त्रज्ञांनी स्वाक्षऱ्या केल्या. नंतर आणखी ३८ नोबेल पारितोषिक विजेत्यांनी त्याला मान्यता दिली.


    ~*★जन्मदिवस / जयंती★*~

🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸

◆१९२७ : प्रा. शिवाजीराव भोसले – विचारवंत, वक्ते व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू

◆१९०५ : चौधरी मुहम्मद अली – पाकिस्तानचे ४ थे पंतप्रधान 

◆१९०४ : गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर – जयपूर - अत्रौली घराण्याच्या शास्त्रीय गायिका

◆१९०३ : के. कामराज – स्वातंत्र्यसैनिक, खासदार व तामिळनाडुचे मुख्यमंत्री

◆१६११ : मिर्झा राजे जयसिंग 


      ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~

🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹

●२००४ : डॉ. बानू कोयाजी – कुटुंबनियोजनाच्या क्षेत्रात सलग साठ वर्षे कार्य करणार्‍या सामाजिक कार्यकर्त्या. त्यांना पद्मभूषण, रॅमन मॅगसेसे पुरस्कार, 

●१९९९ : इंदुताई टिळक – सामाजिक कार्यकर्त्या

●१९९८ : ताराचंद परमार – गांधीवादी कार्यकर्ते व स्वातंत्र्यसैनिक 

●१९९१ : जगन्नाथराव जोशी – जनसंघ व भाजपचे नेते, गोवा मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक, संसदपटू, वक्ते 

●१९६७ : नारायण श्रीपाद राजहंस तथा ’बालगंधर्व’ – गायक व नट  

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*🚦सतिष बोरखडे दारव्हा*

   💥📱7875840444💥

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..


     https://goo.gl/8D33ox

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪

*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂* 

 ━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━


15. *✸ आता उठवू सारे रान ✸*

      ●●●●●००००००●●●●●

आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान

शेतकर्‍यांच्या राज्यासाठी लावु पणाला प्राण


किसान मजूर उठतील, कंबर लढण्या कसतील

एकजुटीची मशाल घेउनि पेटवतिल सारे रान


कोण आम्हां अडवील, कोण आम्हां रडवील

अडवणूक त्या करणारांची उडवू दाणादाण


शेतकर्‍यांची फौज निघे, हातात त्यांच्या बेडि पडे

तिरंगि झेंडे घेती, गाती स्वातंत्र्याचे गान


पडून ना राहू आता, खाऊ ना आता लाथा

शेतकरी अन्‌ कामकरी मांडणार हो ठाण

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0७ ]      ❂ प्रार्थना ❂*

━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━


15.  *❂ हनुमान वंदना ❂*

    ━═●✶✹★●★✹✶●═━

अतुलितबलधामं हेमशैलाभदेहम्‌।

दनुजवनकृषानुम् ज्ञानिनांग्रगणयम्‌।

सकलगुणनिधानं वानराणामधीशम्‌।

रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि॥


मनोजवं मारुततुल्यवेगम जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं।

वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणम् प्रपद्ये॥

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0८ ]    ❂ बोधकथा ❂*

━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━


15.   *❝ असंगाचा संग ❞*

     ━━═•●◆●★●◆●•═━━

      एका गृहस्थाकडे  एक बैल होता. तो संध्याकाळी इतर गुरांबरोबर नेहमी वेळेवर घरी जायचा.


      परंतु एके दिवशी तो घरी न येता दुस-या  बैलांबरोबर एका शेजा-याच्या वाडयात निघून गेला. वाडयात शिरल्यावर पोटभर खाऊन  मनमुराद नासधूस करून इतर बैल विश्रांती घेत होते   व तेथेच थोडा वेळ शांत  बसले . 

इतक्यात वाडयाचा मालक काठी हातात घेऊन धावत आला. 


      *तेथील बैलांना नेहमीचीच सवय असल्याकारणाने मालकाला चुकवून ते मार न खाता एकदम पसार झाले .*


      परंतु त्या गरीब बैलाला असली मुळीच सवय नसल्यामुळे कोणत्या बाजूने पळून जावे हे त्याला  सुचेना , आणि अखेरीस बराच चोप दिल्यावर मालकाने त्याला  जाऊ दिले.


        मध्यरात्री घरी आल्यावर त्याचा मालक त्याला  पाहण्यास आला  बैलाच्या पाठीवर वळ त्याच्या दृष्टीस पडले.


       मालकाने त्या माराचे कारण मनात समजून एक भले मोठे लोढणे त्याच्या  गळ्यात अडकवून दिले. जेणेकरून त्याला  पळता येईना. अर्थातच त्यानंतर तो कधी दुसर्याच्या वाडयात शिरलाही नाही.. 


      सद्गुणी असतानाही एका  प्रसंगाने त्याच्या गळ्यात कायमचे लोढणे अडकले.


            *🌀❝ तात्पर्य ❞ ::~* 

    असंगाचा संग करण्याच्या दोषाने चांगल्या  बुद्धीला भ्रम झाला

*कुसंगती थोडा वेळ जरी प्राप्त झाली तरी ती अब्रुला हानीकारक होते.*

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*

━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━


15. *जो सूर्य* मला *उन्हाळ्यात*

               नकोस वाटतो..

  तोच *सूर्य* मला *हिवाळ्यामध्ये*

      किती *हवा हवासा वाटतो*,

        तसेच *माणूस* देखील 


*सुखामध्ये* जवळच्या *नात्यांना*

विसरतो पण *दुःखाच्या क्षणी*

तीच *नाती हवी हवीशी वाटतात...*

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

 *१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*

━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━


15. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*

       ◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑

■ *पंढरपूर शहरातून वाहणारी "चंद्रभागा" म्हणजे ही नदी होय* ?

● भीमा


■  *हळदीची प्रमुख बाजारपेठ महाराष्ट्रात कोठे आहे* ?

● सांगली


■ *"यंग इंडिया" हे वृत्तपत्र कोणी सुरू केले*?

● म.गांधी


■  *प्रसिद्ध "पुणे करार" कोणत्या दोन नेत्यांच्या मध्ये झाला होता* ?

● म.गांधी व डाॅ.आंबेडकर(24सप्टेंबर 1932)


■   *उंदरावरील पिसवांमुळे कोणता रोग होतो* ?

● प्लेग

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*

━═●🇲=◆🇸◆=🇵●━━


15. *❒ ♦डॉ. बानू कोयाजी ❒*  

  ━═•●◆●★◆★●◆●•━━

● जन्म :~ २२ आँगष्ट १९१८

*● मृत्यू :~ १५ जुलै २००४*


      कुटुंबनियोजनाच्या क्षेत्रात सलग साठ वर्षे कार्य करणार्‍या सामाजिक कार्यकर्त्या. त्यांना पद्मभूषण, रॅमन मॅगसेसे पुरस्कार, रामेश्वरदास बिर्ला राष्ट्रीय पुरस्कार, पुण्यभूषण पुरस्कार, पुणे विद्यापीठातर्फे डॉक्टर ऑफ लेटर्स (१९५५) इ. पुरस्कारांनी गौरविण्यात आले. 


      पुण्यातील के. इ. एम. रुग्णालय, जहांगीर नर्सिंग होम, दैनिक सकाळ, इंडिया फांउंडेशन इ. संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता.

▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄

••◎◑★✹🔅✹★◑◎••

        *✍ संकलन ✍*

*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*

♦📱7875840444♦

*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*

█║▌║█❃❂❃█║▌█


*❁सोमवार ~15/07/2024❁*

*⋐⋑⛯⋐⋑MSP⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment