"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

 *09/07/23 रविवारचा परीपाठ*

◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤

*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*

*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*


 *Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*


*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*


   *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*

 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ 


     *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*

 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ 


    *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*

*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*


 *💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*

*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*

  🔘 *"माझी शाळा"* 🔘

   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*

    🔗🔗👇👇🔗🔗


https://urlzs.com/dmQmp

▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄

*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*

  ━═●🇲◆🇸◆🇵●═━

🍥 *09. जुलै:: रविवार* 🍥

 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━

आषाढ कृ.०७, पक्ष :कृष्ण पक्ष, 

तिथि ~सप्तमी, नक्षत्र ~उत्तराभाद्रपदा, 

योग ~शोभन, करण ~विष्टि, 

सूर्योदय-06:06, सूर्यास्त-19:20,

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0२ ]   ❂ सुविचार ❂* 

━┅═▣◆★✪★◆▣═┅━


09. *व्यर्थ गोंष्टींची कारणे शोधू नका; आहे तो परिणाम स्वीकारा.*

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*

━━●🇲=◆🇸◆=🇵●━━


09.  *आपलेच दात अन् आपलेच ओठ*.     *★अर्थ ::~*

    दोषी ठरलेले आपण आणि ज्याना दोषी ठरविले तेही आपलेच.

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*

━┅━▣◆★✧★◆▣═┅━


09. *ज्ञानमेव शक्तिः ।*

           ⭐अर्थ ::~

     ज्ञान हीच खरी शक्ती आहे.

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*

━━●🇲=◆🇸◆=🇵●═━


     *🛡 ★ 09. जुलै ★ 🛡*

🔻===●●●★●●●===🔻

★हा या वर्षातील १९० वा (लीप वर्षातील १९१ वा) दिवस आहे.

★अर्जेंटिनाचा स्वातंत्र्यदिन


    ~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~

🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹

●१९६९ : वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी घोषित करण्यात आला.

●१८९३ : डॉ. डॅनियल हेल यांनी जगातील पहिली ’ओपन हार्ट’ शस्त्रक्रिया शिकागो येथे यशस्वी केली.


    ~*★जन्मदिवस / जयंती★*~

🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸

◆१९३८ : हरी जरीवाला ऊर्फ ’संजीव कुमार’ – रुपेरी चित्रसृष्टी निखळ अभिनयाच्या जोरावर गाजवणारे कसदार अभिनेते.

◆१९२५ : वसंतकुमार शिवशंकर पदुकोण ऊर्फ ’गुरू दत्त’ – प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते.  त्यांच्या ‘साहिब बिबी और गुलाम‘ या चित्रपटाला राष्ट्रपतीपदक मिळाले.

◆१९२१ : रामभाऊ म्हाळगी – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक, जनसंघ या राजकीय पक्षाचे महाराष्ट्राचे पहिले सरचिटणीस आणि विधानसभेतील पहिले आमदार, तसेच भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्राचे पहिले प्रादेशिक अध्यक्ष 

◆१८१९ : एलियास होवे- शिवणयंत्राचा संशोधक 


      ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~

 🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹

●२००५ : डॉ. रफिक झकारिया – महाराष्ट्राचे नगरविकासमंत्री आणि लोकसभा सदस्य 

●१९९३ : संगीतकार व वाद्यवृंद संयोजक या सोनिक-ओमी (काका-पुतणे) जोडीतील सोनिक यांचे निधन 

●१९६८ : ह. भ. प. शंकर वामन तथा ’सोनोपंत’ दांडेकर – स. प. महाविद्यालयाचे माजी प्राचार्य तत्वज्ञानाचे प्राध्यापक व प्रवचनकार, महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे प्रणेते

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*🚦सतिष बोरखडे दारव्हा*

   💥📱7875840444💥

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या

 वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..


     https://goo.gl/8D33ox

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

✪✪✫✪✫✪★✪✫✪✫✪✪

*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*

   ━┅━▣◆★✧★◆▣═┅━


09. *✸ जय जय महाराष्ट्र माझा ✸*

       ●●●●००००००●●●●

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा


रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी

एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी

भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा


भीति न आम्हां तुझी मुळीहि गडगडणार्‍या नभा

अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा

सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिव शंभू राजा

दरीदरीतुन नाद गुंजला, महाराष्ट्र माझा


काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी

पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी

दारिद्र्याच्या उन्हात शिजला

निढळाच्या घामाने भिजला

देशगौरवासाठी झिजला

दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0७ ]      ❂ प्रार्थना ❂* 

━┅━▣◆★✧★◆▣═┅━


09. *❂ असे मी अनादी ❂*

   ━━●✶✹★●★✹✶●═━

असे मी अनादी मला अंत नाही

मला मृत्युची या मुळी खंत नाही

पडू दे इथे ही तनू मृण्मयी रे

चिरंजीव मी वीर मृत्युंजयी रे॥१॥


आम्ही प्राशिले मत्त त्या सागराला

आम्ही प्राशिले कालकूटा गराला

असे वीर्य ते माझिया संचयी रे

चिरंजीव मी वीर मृत्युंजयी रे॥२॥


जिथे न्याय -निती सवे सत्य आहे

जयाची पताका तिथे नित्य आहे

उभा देव तेथे सदा निश्चयी रे

चिरंजीव मी वीर मृत्युंजयी रे॥३॥


पुन्हा यज्ञि या द्यावया आहुती मी

पुन्हा जन्म घेइन रे भारती मी

असे येथली वीरता अक्षयी रे

चिरंजीव मी वीर मृत्युंजयी रे॥४॥


इथे वाहता धार ही शोणिताची

पहा जागली अस्मिता भारताची

उभी सिध्द सेना पहा ती जयी रे

चिरंजीव मी वीर मृत्युजयी रे॥५॥

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0८ ]    ❂ बोधकथा ❂*

━━●🇲=◆🇸◆=🇵●═━


09.     *❃❝ अनुभव ❞❃*

    ━━•●◆●★●◆●•═━

       एक राजा आपल्या कुत्र्यासोबत होडीतून जात होता. कुत्रा याआधी कधी होडीत न बसल्याने त्याला हे सगळं नवीन होत. त्यामुळे तो अस्वस्थ होऊन उड्या मारू लागला भुंकू लागला.

       त्याचा सह-प्रवाश्यांना त्रास तर होऊ लागलाच, पण होडी चालणारा नावाडी ही हैराण झाला. होडीत अशीच परिस्थिती राहीली तर नाव पलटू शकते. स्वःता तर बूडेन बरोबर सगळ्याना घेऊन बूडेल.

        राज्याच्या लक्षात ही गोष्ट आली तो ही कुत्र्याला शांत करण्याचा प्रयत्न करू लागला पण कुत्रा तो कुत्रा. तो पहील्यापेक्षा जास्त गडबड करू लागला.

       हे पाहून एक हुशार प्रवासी पुढे आला आणि राज्याला विनम्रपणे म्हणाला "महाराज, मला जर परवानगी दिली तर मी या कुत्र्याला गरीब मांजर बनवतो."

     राज्याने होकार देताच त्या प्रवाश्याने तीन चार प्रवाश्यांच्या मदतीने कुत्र्याला उचलले आणि पाण्यात फेकून दिले.

      कुत्र्याच्या नाका-तोंडात पाणी शिरू लागले श्वास घेणे मुश्किल झाले. शेवटी जिवाच्या आकांतने नावेचा आधार घेऊन तो तरंगू लागला. त्याला नावेची गरज लक्षात आली.

       थोड्या वेळात त्याला ओढून नावेवर घेतले आणि तो चुपचाप एका कोपर्‍यात जाऊन बसला.

       त्याने हे वर्तन पाहून राजा आश्चर्यचकीत झाला व म्हणाला   " पहा. पहिलं किती त्रास देत होता आणि आता भित्र्या मांजरासारखा चुपचाप बसलाय."

   प्रवाशी हसून म्हणाला " महाराज, जो पर्यंत स्वताःला त्रास होत नाही तो पर्यंत दुसऱ्याच्या त्रासाची कल्पना येत नाही. त्याला जेव्हा पाण्यात फेकले तेव्हा त्याला स्वतःच्या जिवाची काळजी वाटू लागली आणि नावेची गरज."


      *🌀❝ तात्पर्य ❞ ::~* 

   जो पर्यंत स्वताःला त्रास होत नाही,तोपर्यंत इतरांच्या त्रासाची कल्पना येत नसते.

    त्यामुळे असे वागावे की,दुसऱ्याना त्रास होऊ नये.

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*

━┅═▣◆★✧★◆▣═┅━


09. इतराशी प्रामाणिक राहण 

    कधीही चांगलं

पण स्वत:शी प्रामाणिक राहिलात

 तर जास्त सुखी आणि समाधानी

      होऊ शकता...!!

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*

━┅━▣◆★✧★◆▣═┅━


 09. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*

   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑

 ✪ नथ्थुराम गोडसे यांनी कोणत्या तारखेला महात्मा गांधीची हत्या केली ?

  ➜ ३० जानेवारी १९४८.


 ✪  भारताला स्वातंञ्य मिळाले त्यावेळी भारतीय राष्ट्रसभेचे अध्यक्ष कोण होते ?

  ➜ आचार्य कृपलानी.


 ✪  मार्च १९२३ मध्ये अहमदाबाद येथे कोणी स्वराज्य पक्षाची स्थापना केली ?

  ➜ चित्तरंजनदास आणि मोतीलाल नेहरू.


 ✪  तैनाती फौजेचा स्वीकार करणारा पहिला राज्यकर्ता कोण होता ?

  ➜ हैदराबादचा निजाम. 


 ✪  कोणाला 'भारतीय अर्थशा-

स्ञाचे जनक' म्हणून ओळखतात ?

  ➜ दादाभाई नौरोजी.


 ✪  विधवा विवाहाला कधी कायदेशीर मान्यता मिळाली ?

  ➜ १८५६.

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*

━═●🇲=◆🇸◆=🇵●═━


09.  *❒ ♦संजीव कुमार♦ ❒*  

  ━━•●◆●★◆★●◆●•═━

*हरिहर जरीवाला ऊर्फ ’संजीव कुमार’* रुपेरी चित्रसृष्टी निखळ अभिनयाच्या जोरावर गाजवणारे कसदार अभिनेते.


●जन्म :~ ९ जुलै १९३८

●मृत्यू :~ ६ नोव्हेंबर १९८५

●कार्यक्षेत्र :~ अभिनय


          ★ संजीव कुमार ★ 

    संजीव कुमार या टोपणनावाने प्रसिद्ध असलेला हरिहर जरीवाला  हा हिंदी चित्रपटांमधील एक अभिनेता होता. इ.स. १९६० सालातील हम हिंदुस्तानी या हिंदी चित्रपटाद्वारे त्याने चित्रपटसॄष्टीत पदार्पण केले. आँधी, खिलौना (इ.स. १९७०), मनचली (इ.स. १९७५), शोले (इ.स. १९७५), अंगूर (इ.स. १९८१), नमकीन (इ.स. १९८२) इत्यादी लोकप्रिय चित्रपटांत त्याने प्रमुख भूमिका साकारल्या. रुपेरी चित्रसृष्टी निखळ अभिनयाच्या जोरावर गाजवणारे कसदार अभिनेते होते. 

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

••●◎◑✹★✹✹★✹◑◎●••

            *✍संकलन ✍* 

*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*

   ♦📱 7875840444 ♦

 *✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*

█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌


 *❁रविवार~ 09/07/2023❁*

*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment