"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

 *02/07/23 रविवार चा परीपाठ*

◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤

*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*

*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*


 *Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*


*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*


   *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*

 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ 


     *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*

 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ 


    *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*

*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*


 *💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*

*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*

  🔘 *"माझी शाळा"* 🔘

   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*

    🔗🔗👇👇🔗🔗


https://urlzs.com/dmQmp

▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄

*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*

  ━═●🇲◆🇸◆🇵●═━

🍥 *02. जुलै:: रविवार* 🍥

 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━

आषाढ शु.१४, पक्ष :शुक्ल पक्ष,

तिथि ~चतुर्दशी, नक्षत्र ~ज्येष्ठा, 

योग ~शुक्ल, करण ~गर, 

सूर्योदय-06:04, सूर्यास्त-19:20,

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0२ ]       ❂ सुविचार ❂* 

  ━┅━▣◆★✪★◆▣═┅━


02. *प्रायश्चित्तासारखी दूसरी शिक्षा नाही.*

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*

━━●🇲=◆🇸◆=🇵●━━


02.  *आपला तो बाब्या, दुसऱ्याचे ते कार्टे*

      *★ अर्थ ::~* 

  माणसाला आपल्या सर्व गोष्टी चांगल्या वाटतात , पण दुसऱ्याच्या गोष्टीत त्याला दोष दिसतात.

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*

━┅━▣◆★✧★◆▣━┅━


02. *सर्वं सत्ये प्रतिष्ठितम् ।*

   ⭐अर्थ ::~ सर्व सत्यावर

         आधारलेले आहे.

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*

━━●🇲=◆🇸◆=🇵●━━


     *🛡 ★ 02. जुलै ★ 🛡*

🔻===●●●★●●●===🔻

★हा या वर्षातील १८३ वा (लीप वर्षातील १८४ वा) दिवस आहे.


    ~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~

🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹

●२००१ : बिहारमधील चंपारण्य जिल्हयातील केसरिया गाव येथे १०४ फूट उंचीचा जगातील सर्वात मोठा बौध्द स्तूप सापडला.

●१९८३ : कल्पक्कम, तामिळनाडू येथील अणूऊर्जा केंद्र सुरू झाले.

●१९७२ : भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांनी सिमला करारावर स्वाक्षर्‍या केल्या.

●१९४० : सुभाषचंद्र बोस यांना कलकत्ता येथे स्थानबद्ध करण्यात आले.


    ~*★जन्मदिवस / जयंती★*~

 🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸

◆१९३० : कार्लोस मेनेम – अर्जेंटिनाचे ५० वे राष्ट्राध्यक्ष

◆१९२५ : पॅट्रिक लुमूंबा – काँगोचे पहिले पंतप्रधान 

◆१९२३ : जवाहरलाल अमोलकचंद दर्डा – स्वातंत्र्यसैनिक व राजकारणी 

◆१८८० : गणेश गोविंद तथा ’गणपतराव’ बोडस – नट व गायक, ’गंधर्व नाटक मंडळी’चे एक संस्थापक 


      ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~

🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹

●२०११ : चतुरानन मिश्रा – केंद्रीय कृषी मंत्री, कामगार नेते, कम्युनिस्ट पक्षाचे नेते 

●१९६१ : नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन लेखक अर्नेस्ट हेमिंग्वे यांनी आत्महत्या केली

●१९५० : युसूफ मेहेर अली – समाजवादी नेते, स्वातंत्र्यसैनिक व मुंबईचे महापौर 

●१८४३ : डॉ. सॅम्यूअल हानेमान – होमिओपाथी या वैद्यकीय उपचारपद्धतीचे जनक

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*🚦सतिष बोरखडे दारव्हा*

   💥📱7875840444💥

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या

 वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..


     https://goo.gl/8D33ox

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

✪✪✫✪✫✪★✪✫✪✫✪✪

*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*

   ━┅━▣◆★✧★◆▣═┅━


02 . *स्वर्गाहुनही प्रिय आम्हांला*

    ●●●●००००००●●●●

स्वर्गाहुनही प्रिय आम्हांला अमुचा सुंदर भारत देश

आम्ही सारे एक, जरीही नाना जाती, नाना वेष


या भूमीच्या आम्ही कन्या, कोमल भाव मनी

फूलकोवळ्या तरी प्रसंगी होऊ रणरागिणी

आवेशाने घुसू संगरी चढवुनिया रणवेष


श्रीरामाचे, शीकृष्णाचे अजून आहे स्मरण मनास

वीर शिवाजी, प्रताप, बाजी.. थोर आमुचा हा इतिहास

रक्तामधुनी वीज वाहते उरात भरतो नव आवेश


हिमायलापरि शीतल आम्ही, आग पेटती परि उरात

पाऊल परके पडता येथे बळ वज्राचे याच करांत

या देशाची गौरवगाथा हाच अम्हाला दे आदेश

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0७ ]      ❂ प्रार्थना ❂* 

━┅═▣◆★✧★◆▣═┅━


02. *❂ सत्यम्‌ शिवम्‌ सुंदरा ❂*

  ━━●✶✹★●★✹✶●═━

नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा

सत्यम्‌ शिवम्‌ सुंदरा


शब्दरूप शक्‍ती दे

भावरूप भक्‍ती दे

प्रगतीचे पंख दे चिमणपाखरा


विद्याधन दे अम्हांस

एक छंद, एक ध्यास

नाव नेई पैलतीरी दयासागरा


हो‍ऊ आम्ही नीतिमंत

कलागुणी बुद्धिमंत

कीर्तिचा कळस जाय उंच अंबरा

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0८ ]    ❂ बोधकथा ❂*

━━●🇲=◆🇸◆=🇵●━━


02.  *❃❝ अचुक निर्णय ❞❃*

 ━━•●◆●★◆★●◆●•═━

     एक साधा भोळा खेड्यातला उंदीर होता. त्याच्याकडे एक धष्टपुष्ट व गोजिरवाणा असा शहरातला उंदीर आला. खेड्यातल्या उंदराने आपल्या पाहुण्याचा चांगला आदरसत्कार केला. आपल्या घरातले काही पदार्थ, जवळच्या शेतातील कोवळी कणसे, वाटाण्याच्या शेंगा व भाकरीचे तुकडे त्याला दिले. 

       पण खेड्यातले हे अन्न त्या शहरातल्या उंदराला आवडले नाही. मग तो त्या खेड्यातल्या उंदराला म्हणाला, 'अरे, तुला जर राग येणार नसेल तर मी थोडं मनमोकळेपणाने बोलतो, अरे अशा ह्या कंटाळवाण्या जागेत तू राहतोस कसा? हे रान, आसपास गवत, झाडं, डोंगर नि पाण्याचे ओहळ याशिवाय दुसरं काही नाही. इथल्या पक्ष्यांच्या किलबिलाटा पेक्षा माणसाचा आवाज बरा नाही का ? या ओसाड रानापेक्षा राजधानी बरी म्हणायची. विचार कर आणि ही जागा सोडून माझ्याबरोबर शहरात चल, तिथे तुला बरंच सुख मिळेल.' 

       हे सगळे वर्णन ऐकून त्या खेड्यातल्या उंदराला मोह झाला व दोघे सकाळी खेड्यातून निघून रात्री शहरात पोहोचले. थोडे पुढे गेले तर तेथे त्यांना एक मोठा वाडा दिसला. आदल्या दिवशीच तेथे लग्नसमारंभ झाला होता. त्या वाड्याच्या आत जाऊन ते स्वैपाक घरात शिरले. तेथे नाना प्रकारचे पदार्थ होते. पण माणसे कोणी नव्हती. ते पाहून खेड्यातला उंदराला मोठा आनंद झाला. तेव्हा शहरातला उंदीर त्याला म्हणाला, 'तू खोलीच्या मध्यभागी बस. मी एक एक पदार्थ देईन, तो खाऊन पहा आणि त्याची चव कशी काय आहे ते मला सांग !' मग तो एकेक पदार्थ आपल्या पाहुण्याला देउ लागला व तो चाखून 'अहाहा ! काय चविष्ट पदार्थ आहे हा !' असे म्हणून तो खेड्यातला उंदीर त्याचे कौतुक करू लागला. 

      अशा प्रकारे एक तास मोठ्या आनंदात गेला. इतक्यात स्वैपाक घराचे दार उघडले गेले व ते पाहून दोघेही उंदीर एका कोनाड्यात जाऊन लपले. इतक्यात दोन मोठे बोके तेथे आले व त्यांनी मोठ्याने आवाज केला. तो ऐकून खेड्यातला उंदीर भीतीने घाबरला, त्याची छाती धडधडू लागली. मग तो हळूच शहरातल्या उंदराला म्हणाला, 'अरे, असंच जर तुझं शहरातलं सुख असेल तर ते तुझं तुलाच लखलाभ होवो. मला खेडंच बरं, तिथल्या रानातल्या शेंगा बर्‍या पण रात्रंदिवस जिवाला भिती असणारी ही इथली पक्वान्न मला नकोत.'


      *🌀❝ तात्पर्य ❞ ::~* 

   शहरात सुख फार पण त्याप्रमाणे दुःखेही फार. खेड्यात मजा कमी पण त्या मानाने दुःखे व संकटेही कमी असतात.

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*

━┅━▣◆★✧★◆▣━┅━


02. काहीही करा पण 

       गुणवत्तापूर्ण करा....

*ज्या क्षेत्रात तुम्ही जाल*

       *त्यात जिव ओता*

*त्यात सर्वोचस्थानी पोहोचा...!!*

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*

━┅═▣◆★✧★◆▣═क┅━


 02. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*

   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑


✪  विश्वनाथन आनंद हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

 ➜बुद्धीबळ.


✪  जगातील क्षेत्रफळाने दुस-या क्रमांकाचा देश कोणता ?

➜कॅनडा.


 ✪ आहाराचे मोजमाप कोणत्या एककात होते ?

 ➜कॅलरी.


✪  वि.वा.शिरवाडकर यांचे टोपणनाव काय आहे ?

 ➜कुसुमाग्रज.


✪  अंतर मोजण्याचे एकक कोणते ?

 ➜किलोमीटर.

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*

━━●🇲=◆🇸◆=🇵●━━


02.    *❒ बिधन चंद्र रॉय ❒*  

  ━━•●◆●★★●◆●•━━

●जन्म :~ १ जुलै १८८२ - 

●मृत्यू :~ १ जुलै १९६२

●व्यवसाय :~ वैद्यकीय चिकित्सक,

●स्वातंत्र्यसेनानी

●पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री


   *◆डॉ. बी.सी. रॉय म्हणून ओळखले जाणारे बिधन चंद्र रॉय◆*


      हे एक निष्णात डॉक्टर होते. ते भारताच्या पश्चिम बंगाल राज्याचे दुसरे मुख्यमंत्री होते. बी.सी. रॉय एक आघाडीचे स्वातंत्र्यसेनानी व महात्मा गांधींचे निकटवर्ती सहकारी होते.


     स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांनी गांधींच्या सांगण्यावरून राजकारणा मध्ये प्रवेश केला व १९४८ साली पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रि पदाची शपथ घेतली. ह्या पदावर ते पुढील १४ वर्षे होते.

      *१९६१ साली भारत सरकारने त्यांना भारतरत्‍न पुरस्कार देऊन गौरवले.* १ जुलै १९६२ रोजी त्यांच्याच जन्मदिवशी रॉय ह्यांचे निधन झाले.


    वैद्यकीय शास्त्रात केलेल्या नावीन्यपूर्ण संशोधनासाठी डॉ. बी.सी. रॊय यांच्या नावाचा एक पुरस्कार दरवर्षी दिला जातो. 

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

••●◎◑✹★✹✹★✹◑◎●••

            *✍संकलन ✍* 

*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*

   ♦📱 7875840444 ♦

 *✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*

║▌║▌║█❃❂❃█║▌║║▌


 *❁रविवार ~ 02/07/2023*

*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment