"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

 *16/07/24 मंगळवारचा परीपाठ*

◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤

*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*

*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*


 *Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*


*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*


 *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*

 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ 


 *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*

 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ 


 *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*

*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*


 *💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*

*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*

       🔘 *"माझी शाळा"* 🔘

   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*

    🔗🔗👇👇🔗🔗


https://urlzs.com/dmQmp

▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄

*0१ ]    ❂ आजचे पंचाग ❂*

  ━═●🇲◆🇸◆🇵●═━

🍥 *16. जुलै:: मंगळवार* 🍥

 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━

आषाढ शु. १०, पक्ष :शुक्ल पक्ष,

तिथि ~दशमी, नक्षत्र ~विशाखा, 

योग ~साध्य, करण ~तैतिल, 

सूर्योदय-06:09, सूर्यास्त-19:19,

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0२ ]   ❂ सुविचार ❂* 

━┅═▣◆★✪★◆▣═┅━

16. *स्वातंत्र्य म्हणजे संयम; स्वैराचार नव्हे.*

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*

━━●🇲=◆🇸◆=🇵●═━


16. *कामपुरता मामा ताकापुरती मामी *     *★ अर्थ ::~* 

   - गरजेपुरता गोड बोलणारा 

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*

━┅━▣◆★✧★◆▣═┅━


16. *सहसा विदधीत न क्रियाम् अविवेकः परमापदां पदम्*

           ⭐अर्थ ::~

    कोणतीही गोष्ट सारासार विचार न करता एकाएकी करू नये. अविवेक हा मोठ्या संकटांना कारणीभूत होतो.

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*

━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━


    🛡 *★16. जुलै★* 🛡

🔻===●●●★●●●===🔻

*★ गुरुपौर्णिमा*

★हा या वर्षातील १९७ वा (लीप वर्षातील १९८ वा) दिवस आहे.


        ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~

 🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹

●१९९२ : भारताचे नववे राष्ट्रपती म्हणून डॉ. शंकरदयाळ शर्मा यांची निवड झाली. तत्पुर्वी ते उपराष्ट्रपती आणि महाराष्ट्राचे राज्यपाल होते.

●१९६९ : चंद्रावर पहिला मानव उतरवणार्‍या ’अपोलो-११’ अंतराळयानाचे फ्लोरिडा येथुन प्रक्षेपण

 ● ६२२ : इस्लामिक (हिजरी) कॅलेंडरची या दिवसापासुन सुरूवात झाली.


    ~*★जन्मदिवस / जयंती★*~

 🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸

◆१९८४ : कतरिना कैफ – चित्रपट कलाकार

◆१९६८ : धनराज पिल्ले – हॉकी पटू

◆१९२३ : के. व्ही. कृष्णराव – भूदल प्रमुख, जम्मू काश्मीर, नागालँड, मणिपूर व त्रिपूराचे राज्यपाल 

◆१९१४ : वामनराव कृष्णाजी तथा वा. कृ. चोरघडे – साहित्यिक (लघुकथा, लोककथा, बालवाड़्मय, चरित्र, अनुवाद), विचारवंत व स्वातंत्र्यसैनिक 

◆१९१३ : स्वामी शांतानंद सरस्वती – ज्योतिर्मठाचे शंकराचार्य 

◆१९०९ : अरुणा असफ अली – स्वातंत्र्यसेनानी. ९ ऑगस्ट १९४२ रोजी त्यांनी मुंबईतील गोवालिया टँक मैदानावर तिरंगा फडकवला होता, भारतरत्‍न (मरणोत्तर) पुरस्कारांने त्यांना गौरविण्यात आले. 


      ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~

 🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹

●१९९३ : उस्ताद निसार हुसेन खाँ – पद्मभूषण (१९७०), रामपूर साहसवान घराण्याचे तराणा व ख्यालगायक, 

●१९८६ : वासुदेव सीताराम तथा वा. सी. बेन्द्रे – इतिहासकार

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*🚦सतिष बोरखडे दारव्हा*

   💥📱7875840444💥

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या

 वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..


     https://goo.gl/8D33ox

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

✪✪✫✪✫✪★✪✫✪✫✪✪

*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*

   ━┅━▣◆★✧★◆▣━┅━


16. *❂ स्वातंत्र्याची घुमे तुतारी ❂*

      ✶✶✹✹★●★✹✹✶✶

स्वातंत्र्याची घुमे तुतारी दुमदुमली धरती

हे शिवशंकर मुक्ती दायिनी जय जय जनशक्ती


कणकणातून जागृत झाला मंत्र तुझा बलशाली

सळसळणार्‍या रक्तामधुनी फुलल्या लाख मशाली

दिशादिशातून तुझ्या यशाच्या लखलखती ज्योती


मुठी-मुठीतून तूच घडविली परक्रमाची गाथा

एकजुटीने भंगलास तू अन्यायाचा ताठा

मांडिलेस तू अपूर्व तांडव इथल्या जनतेसाठी


तव तेजाने उजळून उठली इतिहासाची पाने

कालचक्र हे अखंड गाईल तुझ्या किर्तीचे गाणे

पिढ्या-पिढ्यांना स्फूर्ती देईल धगधगती क्रांती

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0७ ]      ❂ प्रार्थना ❂* 

━┅━▣◆★✧★◆▣═┅━


16. *❂ सुंदर ते ध्यान ❂*

     ✶✶✹✹★●★✹✹✶✶

सुंदर ते ध्यान उभे विटेवरी

कर कटावरी ठेऊनिया


तुळसी हार गळा कांसे पितांबर

आवडे निरंतर तेची रूप


मकर कुंडले तळपती श्रवणी

कंठी कौस्तुभमणी विराजीत


तुका म्हणे माझे हेची सर्व सुख

पाहीन श्रीमुख आवडीने

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0८ ]    ❂ बोधकथा ❂*

━━●🇲=◆🇸◆=🇵●━━


16.  *❃❝ स्वप्न आणि सत्य ❞❃*

 ━═•●◆●★◆★●◆●•═━

      एकदा स्‍वप्‍न आणि सत्‍य यांचे जोरदार भांडण झाले. भांडणाचा विषय होता ’भविष्‍य घडविण्‍यात सर्वाधिक सहभाग कोणाचा असतो’ दोघेही खूप भांडले, भरपूर वाद घातला पण निर्णय काही होईना. शेवटी दोघेही आपल्‍या पित्‍ याकडे गेले. पित्‍याला वादाचा विषय सांगितला. पिता म्‍हणाला,’’ज्‍या कोणाचे हात आभाळाला टेकतील पण तरीही पाय जमिनीवर असतील त्‍याचा भविष्‍य घडविण्‍यात निर्णायक सहभाग असतो.’’ दोघेही परत आले. सर्वप्रथम स्‍वप्नाने एकाच उडीत त्‍याचे हात आभाळाला टेकले, मात्र पाय जमिनीपासून केव्‍हाच उचलले गेले होते. मग सत्‍याने प्रयत्‍न केला मात्र त्‍याचे पाय कायम जमिनीवर टेकलेले होते पण हात आभाळाला पोहोचू शकले नाहीत. दोघांनीही खूप प्रयत्‍न केले पण दोघेही अयशस्‍वी राहिले. शेवटी थकून ते पुन्‍हा एकदा पित्‍याकडे गेले तेव्‍हा पिता म्‍हणाला,’’ भविष्‍य घडविण्‍यात सत्‍य आणि स्‍वप्‍न या दोघांचाही समान सहभाग असतो.’’

 

     *🌀❝ तात्पर्य ❞ ::~* 

   खऱ्या अर्थाने भविष्य घडवायचे असेल तर स्वप्नाला सत्याच्या खाद्यावर उभे राहायला हवे*.

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*

  ━┅▣◆★✧★◆▣┅━


16. जीवनात एकदा ध्येय निर्धारित

केल्यानंतर पुन्हा मागे वळुन 

   पाहू नका, कारण...

पुन्हा पुन्हा मागे वळुन पाहणारे इतिहास घडवीत नसतात...!!

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*

━┅═▣◆★✧★◆▣━┅━


16. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*

   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑

 ✪  महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते ?

  ➜खोपोली.


 ✪  महाराष्ट्राला लागून किती राज्याच्या सीमा आहे ?

  ➜सहा.


 ✪  महाराष्ट्रात तांबे सर्वांत जास्त कोणत्या जिल्ह्यात सापडते ?

  ➜चंद्रपूर.


 ✪  भारतातील पहिला सहकारी साखर कारखाना कोठे आहे ?

  ➜प्रवरानगर.


 ✪  महाराष्ट्र राज्य खाण महामंडळाचे मुख्यालय कोठे आहे ?

  ➜ नागपूर

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*११ ] ❂ थोरव्यक्ती परिचय ❂*

━━●🇲=◆🇸◆=🇵●━━


   *❒ ♦धनराज पिल्ले♦ ❒*  

     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━

●जन्म :~ १६ जुलै, १९६८

    हे खडकी-पुणे येथे राहणारे एक हॉकी खेळाडू आहेत.


     धनराज पिल्ले यांचा जन्म सामान्य कुटुंबात झाला पण आपल्या जिद्दीच्या व कौशल्याच्या जोरावर ते भारतीय हॉकी संघाच्या कर्णधारपदापर्यंत पोचले.. आघाडीवर खेळणार्‍या धनराजने आतापर्यंत चारशेहून जास्त सामने खेळले असून दोनशेच्या आसपास गोल केले आहेत.


       भारताकडून सर्वांत जास्त गोल करणार तो खेळाडू आहे. चार ऑलिम्पिक, चार जागतिक हॉकी करंडक, चार चॅम्पियन्स चषक व चार आशियाई स्पर्धांत भाग घेतला आहे. २००२ मध्ये झालेल्या आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून देणार्‍या संघाचा तो कर्णधार होता. ते सध्या इंडियन एअरलाइनमध्ये सहाय्यक व्यवस्थापक आहेत.


       धनराज पिल्ले आतापर्यंत इंडियन जिमखाना, एफ सी लॉन, सिलंगूर (मलेशिया), अभाहानी (बांगला देश), स्टुटगार्ट किकर्स, बँक सिंपानाम नॅशनल (मलेशिया), आर्थर अँडरसन (कुआलालंपूर) अशा वेगवेगळ्या जागतिक हॉकी क्लबांकडून खेळला आहे.


         🏆  *पुरस्कार*🏆  

अर्जुन पुरस्कार (१९९५)के. के. बिर्ला पुरस्कार (१९९८-९९)राजीव गांधी खेलरत्‍न पुरस्कार (१९९९)पद्मश्री (२०००)क्रीडा महर्षी हरिभाऊ साने पुरस्कार...

▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄

••◎◑★✹🔅✹★◑◎••

        *✍ संकलन ✍*

*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*

♦📱7875840444♦

*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*

█║▌║█❃❂❃█║▌█


*❁मंगळवार ~16/07/2024❁*

*⋐⋑⛯⋐⋑MSP⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment