"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

*04/08/24 रविवार परीपाठ*

◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤

*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*

*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*


 *Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*


*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*


 *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*

 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ 


 *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*

 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ 


 *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*

*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*


 *💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*

*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*

       🔘 *"माझी शाळा"* 🔘

   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*

    🔗🔗👇👇🔗🔗


https://goo.gl/RpQbsw

▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄

*0१ ]    ❂ आजचे पंचाग ❂*

  ━═●🇲◆🇸◆🇵●═━

🍥 *04. ऑगस्ट:: रविवार* 🍥

 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━

आषाढ अमावास्या, नक्षत्र ~पुष्य, 

योग ~सिद्धि, करण ~नाग, 

सूर्योदय-06:05, सूर्यास्त-19:20,

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0२ ]       ❂ सुविचार ❂*

  ━┅━═▣◆★✪★◆▣═━┅━


04. *छंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात.*

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*

━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━


04. *पळसला पाने तीनच*

      *★ अर्थ ::~* 

सगळीकडे सारखी परिस्थिती असणे 

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*

━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━


04. *संघे शक्तिः कलौ युगे ।*

               ⭐अर्थ ::~

 कलियुगामध्ये एकजुटीत शक्ती आहे.

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*

━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━


    🛡 ★ 04. ऑगस्ट ★ 🛡

🔻====●●●★●●●====🔻

★हा या वर्षातील २१६ वा (लीप वर्षातील २१७ वा) दिवस आहे.


         ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~

 🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹

●२००१ : मरणोत्तर त्वचादान करुन दुसर्‍यांना जीवनदान देणारी, भारतातील पहिली स्किन बँक मुंबई येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात स्थापन झाली.

●१९९८ : फिलिपाइन्सच्या माजी अध्यक्षा कोरेझॉन अ‍ॅक्‍विनो यांना आंतरराष्ट्रीय सामंजस्यासाठीचा ’रॅमन मॅगसेसे पुरस्कार’ जाहीर

●१९५६ : भाभा अणुशक्ती केंद्र तुर्भे येथे ’अप्सरा’ ही भारताची सहावी अणुभट्टी कार्यान्वित झाली.

●१९४७ : जपानच्या सर्वोच्‍च न्यायालयाची स्थापना झाली.


    ~*★जन्मदिवस / जयंती★*~

     🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸

◆१९६१ : बराक ओबामा – अमेरिकेचे ४४ वे आणि पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष, नोबेल पारितोषिक विजेते 

◆१८९४ : नारायण सीताराम तथा ना. सी. फडके – साहित्यिक व वक्ते 

◆१८६३ : महामहोपाध्याय वासुदेवशास्त्री अभ्यंकर – पातंजलीच्या संकृत महाभाष्याचा मराठीत अनुवाद करणारे विद्वान 

◆१८४५ : सर फिरोजशहा मेहता – कायदेपंडित, समाजसुधारक व राजकीय नेते, उत्तम प्रशासक 

१७३० : सदाशिवराव भाऊ – पानिपतच्या तिसर्‍या युद्धातील सरसेनापती.


      ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~

     🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹

●१९९७ : जीन काल्मेंट – १२२ वर्षे आणि १६४ दिवस जगलेली फ्रेन्च महिला 

●१९३७ : डॉ. काशीप्रसाद जायस्वाल – प्राच्यविद्या पंडित व कायदेतज्ञ 

●१०६० : हेन्‍री (पहिला) – फ्रान्सचा राजा

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*🚦सतिष बोरखडे दारव्हा*

   💥📱7875840444💥

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..


     https://goo.gl/8D33ox

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪

*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂* 

  ━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━


04. *✸ स्वातंत्र्य प्राण  ✸*

       ●●●●●००००००●●●●●

भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी

सैनिक हो तुमच्यासाठी


वावरतो फिरतो आम्ही नित्यकर्म अवघे करतो

राबतो आपुल्या क्षेत्री चिमण्यांची पोटे भरतो

परि आठव येता तुमचा आतडे तुटतसे पोटी


आराम विसरलो आम्ही आळसा मुळी ना थारा

उत्तरेकडुनि या इकडे वार्तांसह येतो वारा

ऐकताच का अश्रुंची डोळ्यांत होतसे दाटी


उगवला दिवस मावळतो अंधार दाटतो रात्री

माउली नीज फिरवीते कर अपुले थकल्या गात्री

स्वप्‍नात येउनी चिंता काळजा दुखविते देठी


रक्षिता तुम्ही स्वातंत्र्या प्राणांस घेउनी हाती

तुमच्यास्तव आमुची लक्ष्मी तुमच्यास्तव शेतीभाती

एकट्या शिपायासाठी झुरतात अंतरे कोटी

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0७ ]      ❂ प्रार्थना ❂*

━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━


04.  *❂ तेजोमय नादब्रह्म हे ❂*

       ✶✶✹✹★●★✹✹✶✶

तेजोमय नादब्रह्म हे

रुणझुणले काळजात, लखलखले लोचनांत

अंबरात, अंतरात, एकरूप हे


सृष्टीचा देव्हारा, दरवळला गाभारा

सर्व दिशा कांचनमय, पवन मंद मंगलमय

आरतीत तेजाच्या विश्व दंग हे


कुसुमांच्या हृदयातून स्‍नेहमयी अमृतघन

चोहिकडे करूणा तव, बरसून ये स्वरलाघव

परमेशा साद घालि तुझे रूप हे

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0८ ]    ❂ बोधकथा ❂*

━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━


04. *❝ मुंगी आणि झाडाचे पान ❞*

     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━

       एक धनाढ्य, श्रीमंत व्यापारी होता. त्याचा भला मोठा बंगला होता. त्याच्या बंगल्याला एक सुरेख टेरेस होता. त्या टेरेसवर एक झोपाळा होता, बरीच फुलझाडे लावलेली होती. विश्रांती घेण्याची ही जागा त्याची अत्यंत आवडती जागा होती.


        एके दिवशी तो व्यापारी झोपाळ्यावर विश्रांती घेण्यासाठी पहुडला होता. तेव्हा त्याचे लक्ष एका मुंगीकडे गेले. ती मुंगी झाडाचे एक वाळलेले पान घेऊन तुरु तुरु चालली होती. त्या पानाचा आकार मुंगीच्या शरीराच्या आकाराच्या मानाने बराच मोठा होता. तरी सुद्धा मुंगी ते पान घेऊन तुरु तुरु चालली होती. त्या व्यापार्या ला मजा वाटली व त्याने त्या मुंगीचे निरिक्षण करायला सुरवात केली.


          ती मुंगी तिच्या कामामध्ये 'फुल्ली कॉन्सन्ट्रेडेड' होती. ती इकडे बघत नव्हती की तिकडे बघत नव्हती. तिला तिचा मार्ग अचुक ठाऊक होता. ती उगीचच इकडे तिकडे भरकटत नव्हती किंवा आपला मार्ग चुकत नव्हती. तिच्या मार्गात अनेक अडथळे येत होते. पण ते सर्व अडथळे पार करून ती मुंगी ते पान घेऊन चालली होती. हे बघून त्या व्यापा-याला त्या मुंगीचे कौतूक वाटू लागले होते पण तिच्या मार्गात एक भला थोरला अडथळा आलाच. ती मुंगी ज्या कॉन्क्रीटच्या स्लॅबवरून चालली होती त्या स्लॅबला मोठी क्रॅक गेली होती. या क्रॅकच्या दोन्ही टोकांमधील अंतर बरेच जास्त होते. मुंगीला पानासकट ते अंतर पार करणे अशक्य होते. फक्त एकटी मुंगीच काय ती जाऊ शकणार होती. आता मुंगी काय करते या विषयी त्या व्यापा-याच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती. त्या मुंगीने ते झाडाचे पान खाली ठेवले. थोडावेळ इकडे तिकडे भटकली. परिस्थितीचे निरिक्षण केले. मग ते पान एका टोकाकडून उचलले व त्या कॉक्रिटच्या फटीवर अशा रितीने टाकले की त्या पानाचा पुल तयार होईल. मग मुंगी त्या पानाच्या पुलावरून पलीकडे गेली आणि पलीकडच्या भागात पानाचे जे टोक आले होते त्याला धरून ते पान उचलून चालू लागली. मुंगीची ही कल्पकता बघून तो त्यापारी थक्क झाला. मुंगी ती केवढीशी तर तिचा मेंदू तर किती छोटा- बघायला मायक्रोस्कोपच हवा. पण मुंगीच्या या छोट्या मेंदुमध्ये सुद्धा परिस्थितीचे निरिक्षण करण्याची आकलन शक्ती तर होतीच पण आलेल्या अडथळ्यांवर मात करण्यासाठी लागणारी कल्पनाशक्ती पण होती.

          

     सर्व अडथळे पार करून ती मुंगी ते पान घेऊन तिच्या वारुळापाशी आली. तिला ते पान आता आत, वारूळात न्यायचे होते. पण वारूळाचे दार म्हणजे एक छोटे छिद्र होते. त्या छोट्या छिद्रातून ते झाडाचे पान काही केल्या आता जाईना. मुंगीने थोडावेळ प्रयत्न केला. पण नंतर तिने तो नाद सोडून तिला व ते पान तेथेच टाकून एकटीच आत निघून गेली. महत्प्रयासाने त्या मुंगीने आणलेले झाडाचे पान काही तिला वारुळात नेता आले नाही. तिची सर्व मेहेनत बेकार गेली याचे त्या व्यापार्या च्या लक्षात आले व याचे त्याला खूप वाईटपण वाटले.


    पण त्याच्या लक्षात आले की अरे माणसांचे पण असेच असते. माणसे आयुष्यभर निरनिराळी पाने गोळा करत असतात, काहीजण तर यासाठी आपले सर्वस्व पणाला लावत असतात. मग ही पाने विद्वत्तेची असोत, डिग्री-डिप्लोमा- सर्टिफिकेट सारख्या शैक्षणीक पात्रतेची असोत, धन-दौलत- श्रिमंतीची असोत, मान-सन्मान-प्रतिष्ठेची असोत, ऍवॉर्ड-बक्षीसे- मानाच्या पदव्यांची असोत नाहीतर अजुन कसलीतरी असोत. पण माणुस जेव्हा मृत्युच्या दारात पोचतो तेव्हा त्याला ही पाने मागेच ठेवावी लागतात, त्याला आपल्याबरोबर ही पाने काही नेता येत नाही. मग माणूस ढोर मेहेनत करून ही पाने का गोळा करत बसतो? आणि यातील किती पाने स्वतःसाठी व किती पाने इतरांसाठी दाखवण्यासाठी असतात?


     याचा अर्थ माणसाने पाने गोळा करू नयेत असा होत नाही. माणसाने पाने जरूर गोळा करावीत पण त्याचबरोबर जिवनाचा आनंद पण घ्यावा! ती मुंगी पान नेताना इकडे बघत नव्हती की तिकडे बघत नव्हती. तिच्या मार्गात अनेक सुंदर फुलांचे ताटवे येत होते पण त्याकडे तिचे लक्ष नव्हते. त्या फुलांचा सुगंध येत होता तो तीला जाणवत नव्हता. आजुबाजुला अनेक सुंदर दृष्ये होती पण ती तिला दिसत नव्हती. या सर्वांकडे दुर्लक्ष करून वारुळाच्या तोंडापर्यंत नेलेले पान काही तिला वारुळात नेता आले नाही.


      आपली अवस्था त्या मुंगीसारखी तर होणार नाही ना याची दक्षता प्रत्येकाने घ्यायला हवी नाही का ?


      *🌀❝ तात्पर्य ❞ ::~* 

    *माणसाने संग्रहाची पाने जरूर गोळा करावीत पण त्याचबरोबर जिवनाचा आनंद पण घ्यावा...!!*

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*

━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━


04. *गर्व करून कुठल्या नात्याला*

   तोडण्यापेक्षा माफी

        *मागून ती नाती जपा.*

कारण वेळ आल्यावर पैसा नाही तर,  

      *माणसंच साथ देतात...!!*

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*

━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━


04. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*

   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑

 ✪  गलगंड आजार कशाच्या कमतरतेमुळे होतो ?

➜ आयोडीन.


✪ नेताजी सुभाषचंद्र बोस विमानतळ कोठे आहे ?

➜ कोलकाता.


 ✪ रवींद्रनाथ टागोर यांचे टोपण नाव काय आहे ?

➜ गुरूदेव.


 ✪ संत नामदेव महाराज यांचा जन्म कोठे झाला ?

➜ नरसी. ( हिंगोली )


 ✪ प्रसिद्ध मिनाक्षी मंदिर कोठे आहे ?

➜ मदुराई. (,तामिळनाडू )

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*११ ] ❂व्यक्ती परिचय ❂*

━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━


04. *❒ किशोर कुमार गांगुली ❒*  

     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━

●जन्म :~ ४ ऑगस्ट  १९२९

           खांडवा, मध्य प्रदेश

●मृत्यू :~ १३ ऑक्टोबर १९८७

           मुंबई, महाराष्ट्र

🔸कार्यक्षेत्र :~ गायक, अभिनेता,

          दिग्दर्शक, संगीतकार

🔹कारकीर्द :~ १९४६ - १९८७


     *किशोर कुमार* यांचा जन्म मध्य प्रदेशातील खांडवा या गावी झाला. त्यांचे नाव आभास कुमार ठेवण्यात आले. त्यांचे वडील कुंजलाल गांगुली हे वकील होते.

     🔶अभिनेता म्हणून त्यांचा पहिला चित्रपट "शिकारी" (इ.स. १९४६) होता. या चित्रपटात अशोक कुमार यांची प्रमुख भूमिका होती. संगीतकार खेमचंद प्रकाश यांनी किशोर कुमार यांना "जिद्दी" (इ.स. १९४६) या चित्रपटासाठी गाण्याची संधी दिली. हे गाणे होते "मरने की दुआएँ क्यों मांगूँ". यानंतर किशोर कुमार यांना गाण्याच्या बर्‍याच संधी मिळाल्या.


   ♦किशोर कुमार संगीत शिकलेले नव्हते. सुरुवातीला ते के.एल्. सैगल यांची नक्कल करीत. सुप्रसिद्ध संगीतकार सचिन देव बर्मन यांना किशोर यांची गायकी खूप आवडे. त्यांच्या सल्ल्यानुसारच किशोर कुमार यांनी नक्कल करण्याचे सोडून आपली एक विशिष्ट शैली निर्माण केली.

    🔷अभिनेता म्हणून किशोर कुमार यांनी बर्‍याच नामांकित दिग्दर्शकां बरोबर काम केले आहे. बिमल रॉय बरोबर "नौकरी" आणि हृषीकेश मुख़र्जींबरोबर "मुसाफिर" सलिल चौधरी, "नौकरी"चे संगीतकार किशोर कुमार यांना त्यांचे संगीतात शिक्षण नाही म्हणून गाण्याची संधी देऊ इच्छीत नव्हते, पण किशोरचे गाणे ऐकून, त्यांनी हेमंत कुमारच्याऐवजी किशोर कुमार यांना "छोटा सा घर होगा" हे गाणे गावयास दिले.

     🔶प्रमुख चित्रपट चलतीका नाम गाडी, पडोसन, दिल्लीका ठग, नई दिल्ली, झुमरू, आशा, हाफ़ टिकट, श्रीमान फ़न्टूश. किशोर कुमार यांचा अभिनेता म्हणून शेवटचा चित्रपट "दूर वादियों में कहीँ" होता.

   🔷किशोर कुमार यांनी ८१ चित्रपटात काम केले आहे. त्यांनी जवळ जवळ ५७४ चित्रपटात गायले आहेत. 

    🔶किशोर कुमार यांनी १४ चित्रपटांची निर्मिती केली आणि काहींचे त्यांचे लेखन करून त्यात संगीत दिले. त्यापैकी ६ चित्रपट अपूर्ण राहिले. त्यांनी ५ चित्रपटांच्या पटकथा लिहिल्या असून त्यापैकी २ अपूर्ण राहिले. त्यानी १२ चित्रपटांचे दिग्दर्शन केले त्यापैकी ४ अपूर्ण राहिले.


◆आणीबाणी आणि किशोरकुमार◆

   ♦इंदिरा गांधींनी भारतावर लादलेल्या आणीबाणीचा किशोर कुमार यांनी जाहीरपणे धिक्कार केला. त्याचा सूड म्हणून इंदिरा गांधी यांनी किशोरकुमार यांच्या मिळकतीवर आयकर खात्याकडून छापे मारायला सुरुवात केली. त्यांची गाणी आकाशवाणीवर वाजवू नयेत असे आदेश दिले. किशोर कुमार तुरुंगात जाता जाता वाचले असले तरी ते कफल्लक झाले. यावर उपाय म्हणून ते देशात आणि परदेशांत स्टेज शोज करू लागले. त्यांत त्यांना अपरंपार यश, प्रसिद्धी आणि भरपूर पैसा मिळाला. किशोर कुमार यांचे सर्व स्टेज शोज हाऊसफुल होत. आणीबाणी संपली तरी किशोर कुमार स्टेजवर येतच राहिले.

   *१३ ऑक्टोबर १९८७ रोजी हृदयविकाराने त्यांचे निधन झाले. त्यांचा पार्थिव देह अंत्यविधीसाठी खांडव्याला नेण्यात आला.*


             ◆ पुरस्कार ◆

   🔷किशोर कुमार यांनी ८ वेळा फ़िल्मफेअर सर्वोतम पार्श्वगायकाचा मान मिळाला आहे. 

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••

            *✍ संकलन ✍*

*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*

   ♦📱 7875840444 ♦

 *✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*

█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌


 *❁रविवार~04/08/2024❁*

*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment