"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

*05/08/24 सोमवार चा परीपाठ*

◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤

*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*

*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*


 *Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*


*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*


 *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*

 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ 


 *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*

 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ 


 *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*

*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*


 *💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*

*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*

       🔘 *"माझी शाळा"* 🔘

   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*

    🔗🔗👇👇🔗🔗


https://goo.gl/RpQbsw

▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄

*0१ ]    ❂ आजचे पंचाग ❂*

  ━═●🇲◆🇸◆🇵●═━

🍥 *05. ऑगस्ट:: सोमवार* 🍥

 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━

श्रावण शु१, पक्ष :शुक्ल पक्ष,

तिथि ~प्रतिपदा, नक्षत्र ~आश्लेषा, 

योग ~व्यतीपात, करण ~बव, 

सूर्योदय-06:05, सूर्यास्त-19:20,

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0२ ]       ❂ सुविचार ❂*

  ━┅━▣◆★✪★◆▣━┅━


05. *सहल म्हणजे माणसिक आनंदाची सामुहिक क्रिडा.*

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*

━━●🇲=◆🇸◆=🇵●━━


05. *असतील शिते तर जमतील भूते*

      *★ अर्थ ::~* 

   माणसाजवळ पैसा असेपर्यंतच लोक त्याच्या भोवती जमा होतात.   

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*

━┅═▣◆★✧★◆▣═┅━


05. *सर्वं सत्ये प्रतिष्ठितम् ।*

   ⭐अर्थ ::~ सर्व सत्यावर

         आधारलेले आहे.

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*

━━●🇲=◆🇸◆=🇵●━━


     🛡 ★ 05. ऑगस्ट ★ 🛡

🔻===●●●★●●●===🔻

★हा या वर्षातील २१७ वा (लीप वर्षातील २१८ वा) दिवस आहे.


   ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~

 🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹

●१९९७ : रशियाच्या दोन अंतराळवीरांना घेऊन ’सोयूझ-यू’ हे अंतराळयान ’मीर’ अंतराळ स्थानकाकडे रवाना

●१९९४ : इंडियन नॅशनल सायन्स अ‍ॅकेडमी (INSA) तर्फे दिला जाणारा ’होमी जहांगीर भाभा पुरस्कार’ राष्ट्रीय पदार्थविज्ञान प्रयोगशाळेले (NPL) संचालक प्रा. इरोड सुब्रमणियन राजगोपाल यांना प्रदान

●१९६५ : पाकिस्तानी सैन्याने साध्या वेषात घुसखोरी केल्यामुळे भारत पाकिस्तान युद्धाला सुरूवात झाली.


   ~*★जन्मदिवस / जयंती★*~

 🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸

◆१९७५ : काजोल – अभिनेत्री

◆१९६९ : वेंकटेश प्रसाद – जलदगती गोलंदाज

◆१९३० : *नील आर्मस्ट्राँग* – चंद्रावर पाऊल ठेवलेला पहिला मानव 

◆१८९० : *महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार* – इतिहासकार, लेखक, वक्ते आणि पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, 

◆१८५८ : वासुदेव वामन तथा ’वासुदेवशास्त्री’ खरे – इतिहासाचार्य, लेखक, नाटककार व कवी


   ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~

 🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹

●२००१ : ज्योत्स्‍ना भोळे – संगीत रंगभूमीला नवचैतन्य देणार्‍या गायिका आणि अभिनेत्री. संगीत नाटक अकादमी पुरस्कार, महाराष्ट्र विशेष गौरव पुरस्कार, 

●२००० : लाला अमरनाथ भारद्वाज – भारतीय क्रिकेटचे भीष्माचार्य, स्वतंत्र भारताच्या पहिल्या क्रिकेट संघाचे कर्णधार व स्वतंत्र भारताचे पहिले शतकवीर

●१९९७ : के. पी. आर. गोपालन – स्वातंत्र्यसैनिक, कम्युनिस्ट व नक्षलवादी नेते 

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*🚦सतिष बोरखडे दारव्हा*

   💥📱7875840444💥

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..


     https://goo.gl/8D33ox

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

✪✪✫✪✫✪✫✫✪✫✪✫✪✪

*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂* 

  ━┅━▣◆★✧★◆▣═┅━


05. *✸ या भारतात बंधुभाव.. ✸*

  ●●●●००००००●●●●

या भारतात बंधुभाव नित्य वसू दे, दे वरचि असा दे

हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे, मतभेद नसू दे


नांदोत सुखे गरीब-अमीर एक मतांनी

मग हिंदू असो ख्रिश्चन वा हो इस्लामी

स्वातंत्र्य-सुखा या सकलांमाजि वसू दे

दे वरचि असा दे


सकळांस कळो मानवता, राष्ट्रभावना

हो सर्व स्थळी मिळुनी समुदाय प्रार्थना

उद्योगी तरुण शीलवान येथ असू दे

दे वरचि असा दे 


जातिभाव विसरूनिया एक हो आम्ही

अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातुनी

खलनिंदका मनीही सत्य न्याय वसू दे

दे वरचि असा दे


सौंदर्य रमो घराघरात स्वर्गीयापरी

ही नष्ट हो‍उ दे विपत्ती भीती बावरी

तुकड्यास सदा या सेवेमाजी वसू दे

दे वरचि असा दे

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0७ ]      ❂ प्रार्थना ❂*

━┅━▣◆★✧★◆▣━┅━


05.  *❂ विठ्ठला, तू वेडा कुंभार ❂*

       ✶✶✹✹★●★✹✹✶✶

फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार

विठ्ठला, तू वेडा कुंभार !


माती, पाणी, उजेड, वारा

तूच मिसळसी सर्व पसारा

आभाळच मग ये आकारा

तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत, ना पार !


घटाघटांचे रूप आगळे

प्रत्येकाचे दैव वेगळे

तुझ्याविना ते कोणा नकळे

मुखी कुणाच्या पडते लोणी कुणा मुखी अंगार !


तूच घडविसी, तूच फोडिसी

कुरवाळिसि तू, तूच ताडिसी

न कळे यातुन काय जोडिसी ?

देसी डोळे, परि निर्मिसी तयांपुढे अंधार !

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0८ ]    ❂ बोधकथा ❂*

━━●🇲=◆🇸◆=🇵●━━


05.     *❃❝ खरा स्वर्ग ❞❃*

  ━━•●◆●★★●◆●•━━

     कोल्हापूर गावी रहात असलेल्या आपल्या आईला तिच्या वाढदिवसा निमित्त पोस्टाने फुले पाठविण्यासाठी मुंबईत राहणारे रंगराव फुले घेण्यास मंडई मध्ये गेले, तिथे गेल्यावर त्यांना एक छोटीशी मुलगी रडत असल्याचे दिसले, त्यावर त्यांनी विचारले,


रंगराव :- तू का रडत आहेस बाळ ?

मुलगी :- मला माझ्या आईसाठी फुल घ्यायचे आहे, फुल १० रुपयाला आहे पण माझ्याकडे ४ च रुपये आहेत ........

रंगराव :- एवढेचना चल मी तुला फुल घेऊन देतो......... ( फुल घेऊन दिल्यावर ) चल मी तुला घरी सोडतो.

मुलगी :- हो चालेल मला माझ्या आईजवळ नेऊन पोचवा (त्यावर ती गाडीत बसते ).

रंगराव :- कुठे सोडू तुला ?

मुलगी :- इथून सरळ गेल्यावर उजव्या हाथाला स्वर्ग आहे तिथे. 

रंगराव :- पण तिथे तर स्मशानभूमी आहे..!!

मुलगी :- काका, "जिथे आई तोच स्वर्ग".  ...... नव्हे का ?? 

रंगरावांच्या हृदयाला तिच्या शब्दांनी स्पर्श केला........... 

   पोस्टाने सातार्याला फुले पाठविण्याच्या ऐवजी रंगराव स्वताहा कोल्हापूरला आपल्या आईला भेटावयास गेले...!!


      *🌀❝ तात्पर्य ❞ ::~* 

 "हि गोष्ट वाचून तुमच्या हृदयाला जिने स्पर्श केला ती भावनाच तात्पर्य होय "

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*

━┅━▣◆★✧★◆▣━┅━


05. नारळाचे *मजबूत कवच     फोडल्याशिवाय* आतमधील 

अमृताचा *आस्वाद* घेऊ शकत नाही. 

त्याचप्रमाणे *प्रगतीच्या* वाटेत येणारी *संकटावर* मात केल्याशिवाय *यशस्वीतेचा* आस्वाद घेणे शक्य नाही. 


    *संकट* म्हणजे *अपयश* 

नव्हे तो *यशाचाच* एक भाग आहे..!!

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

 *१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*

━┅━▣◆★✧★◆▣═┅━


05. *✿सामान्य ज्ञान प्रश्नावली✿*

   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑


✪  भारतातील सर्वांत मोठी सार्वजनिक बॅंक कोणती ?

➜ स्टेट बॅंक ऑफ इंडिया.


 ✪  महात्मा गांधीनी भारतात सर्वप्रथम सत्याग्रह कोठे केला ?

➜ चंपारण्य.


✪  रिफामायसिन हे प्रतिजैविक कोणत्या रोगाविरूद्ध प्रभावी ठरते ?

➜ क्षयरोग.


 ✪  ग्लुकोजच्या एका रेणूमध्ये ऑक्सीजनचे किती अणू असतात ?

➜ सहा.


 ✪  क्ष - किरण चा शोध कोणी लावला ?

➜ राॅंटजेन 

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*

━━●🇲=◆🇸◆=🇵●═━


05. *❒ ♦नील आर्मस्ट्राँग♦ ❒*  

 ━━•●◆●★◆★●◆●•━━

       *चंद्रावर पाउल ठेवणारा*  

        *जगातील पहिला मानव*

_यांची आज जयंती त्यानिमित्त त्यांना_ 

        *विनम्र अभिवादन..!!* 

   🙏🐾🌷🌹🌹🌷🐾🙏

●जन्म :~ ५ ऑगस्ट, १९३०

●मृत्यू :~ २५ ऑगस्ट २०१२*


      *◆ नील आर्मस्ट्राँग ◆*

    हा एक अमेरिकन अंतराळयात्री, अंतरीक्ष अभियंता व लष्करी वैमानिक होता. आर्मस्ट्राँग हा चंद्रावर पाउल ठेवणारा जगातील पहिला मानव होता.

नासाचे अपोलो ११ हे अंतराळयान आर्मस्ट्राँगने २० जुलै, इ.स. १९६९ रोजी २०:१७:३९ यूटीसी ह्या वेळेला चंद्रावर उतरवले व त्यानंतर काही तासांत (२१ जुलै, १९६९, २:५६ यूटीसी) त्याने चंद्राच्या पृष्ठभागावर पहिले पाउल टाकले. आर्मस्ट्राँग हे दोन तास ३२ मिनिटे आणि आल्ड्रिन हे त्यांच्यापेक्षा १५ मिनिटे कमी काळ चंद्रावर होते. त्यांनी अमेरिकेचा ध्वज तिथे फडकावला. "ते मानवाचे एक छोटे पाऊल, सर्व मनुष्यजातीसाठी मोठी झेप आहे,' असे आर्मस्ट्राँग यांनी पृथ्वीवासीयांना रेडिओ संदेशाद्वारे सांगितले होते.


नील आर्मस्ट्राँग ...., चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मानव


   पण तुम्हा ठाऊक आहे , NASA च्या नियोजित कार्यक्रमात चंद्रावर पहिले पाऊल कोण ठेवणार होतं? अनेकांना हे ठाऊक नाही .... मला ही माहीत नव्हतं !!


   ती नियोजित व्यक्ति होती, एडविन सी अल्डारिन, अपोलो मिशन चा पायलट. तो अमेरिकन एअरफोर्स मध्ये कार्यरत होता, त्याला स्पेस वाॅकिंगचा अनुभव पण होता आणि म्हणुनच त्याची या मिशनचा पायलट म्हणुन निवड झालेली होती.


      नील आर्मस्ट्राँग हा अमेरिकन नेव्हीमध्ये कार्यरत होता. त्याची या मिशनचा को-पायलट म्हणुन निवड झालेली होती.


     जेव्हा अपोलो यान चंद्रावर उतरले, त्यांना नासाच्या बेस स्टेशन कंट्रोल मधुन आदेश मिळाला , 

         "Pilot First".

      पण एडविन थबकला,

"काय होईल पुढे ",

"मी उतरल्या बरोबर चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाने ओढला जाऊन चंद्रभूमीत गडप तर नाही ना होणार, किंवा बाहेर पडल्या बरोबर जळुन राख ही होऊ शकेल आपली वगैरे वगैरे..."

हा संशयाचा, अडखळण्याचा काळ काही तासांचा नव्हे तर काही क्षणांचा ...


     मधल्या काळात NASA ने पुढचा संदेश दिला, "Co-Pilot Next".

क्षणार्धात नील आर्मस्ट्राँग ने आपले पाऊल चान्द्रभूमीवर ठेवले ...!! आणि तो चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मानव झाला ...!!


 *मानवाच्या विकासाच्या इतिहासाच्या गौरवगाथेचा एक भाग झाला...!!*

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

••●◎◑✹★✹✹★✹◑◎●••N

            *✍ संकलन ✍*

*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*

   ♦📱 7875840444 ♦

 *✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*

█║▌║▌║█❂█║▌║█║▌


 *❁ सोमवार ~05/08/2024❁*

*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment