"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

 *13/07/24 शनिवार चा परीपाठ*

◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤

*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*

*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*


 *Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*


*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*


 *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*

 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ 


 *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*

 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ 


 *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*

*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*


 *💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*

*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*

       🔘 *"माझी शाळा"* 🔘

   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*

    🔗🔗👇👇🔗🔗


https://urlzs.com/dmQmp

▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄

*0१ ]    ❂ आजचे पंचाग ❂*

  ━═●🇲◆🇸◆🇵●═━

🍥 *13. जुलै:: शनिवार* 🍥

 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━

आषाढ शु.७, पक्ष :शुक्ल पक्ष,

तिथि ~सप्तमी, नक्षत्र ~हस्त, 

योग ~शिव, करण ~वणिज, 

सूर्योदय-06:08, सूर्यास्त-19:19,

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0२ ]   ❂ सुविचार ❂* 

━┅═▣◆★✪★◆▣═┅━


13. *तुलना करावी पण अवहेलना करू नये.*

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*

━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━


13. *कावीळ झालेल्याला सगळे जग पिवळे*

  ★ अर्थ ::~ पूर्वग्रहदूषित किंवा स्वत: वाईट प्रवृत्ती असलेल्या माणसांना सगळीकडे दोषच दिसत असतात.

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*

━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━


13.  *आरोग्यं धनसम्पदा ।*

         ⭐अर्थ ::~

 आरोग्य ही मोठी संपत्ती आहे.

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*

━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━


     *🛡 ★ 13. जुलै ★ 🛡*

🔻====●●●★●●●====🔻

★हा या वर्षातील १९४ वा (लीप वर्षातील १९५ वा) दिवस आहे.


        ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~

 🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹

●२०११ : मुंबई शहरात झालेल्या ३ बॉम्बस्फोटात २६ जण ठार तर १३० जण जखमी झाले.

●१९२९ : जतिंद्रनाथ दास यांनी लाहोर तुरुंगात आपले आमरण उपोषण सुरु केले. या उपोषणातच ६३ दिवसांनी (१३ सप्टेंबर १९२९) त्यांचा मृत्यू झाला.

●१९०८ : लोकमान्य टिळकांवर दुसर्‍या राजद्रोहाच्या खटल्याचे काम सुरु झाले.

●१६६० : पावनखिंड झुंजवणार्‍या वीर बाजीप्रभू देशपांडे यांनी शिवाजी महाराज विशाळगडावर पोहोचल्याच्या खुणेच्या तोफांचे आवाज ऐकल्यावर 'आता मी सुखाने मरतो' असे म्हणून प्राण सोडला.


    ~*★जन्मदिवस / जयंती★*~

🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸

◆१९४२ : हॅरिसन फोर्ड – अमेरिकन अभिनेता

◆१८९२ : केसरबाई केरकर – जयपूर-अत्रौली घराण्याच्या शास्त्रीय गायिका 


      ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~

 🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹

●२०१० : मनोहारी सिंग – पट्टीचे सॅक्सोफोन वादक 

●२००९ : निळू फुले – अभिनेते 

●२००० : *इंदिरा संत – साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या कवयित्री व लेखिका* 

●१९९४ : पं. कृष्णा गुंडोपंत तथा ’के. जी.’ गिंडे – शास्त्रीय (धृपद) गायक, संगीतकार व शिक्षक 

●१९९० : अर्देशिर फुर्दोरजी सोहराबजी ऊर्फ ’बॉबी’ तल्यारखान – क्रीडा समीक्षक व समालोचक 

●१९६९ : महर्षी न्यायरत्‍न धुंडिराजशास्त्री विनोद – तत्त्वज्ञ, विचारवंत, योगी, स्वातंत्र्य सैनिक आणि लेखक. 

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*🚦सतिष बोरखडे दारव्हा*

   💥📱7875840444💥

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..


     https://goo.gl/8D33ox

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪

*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂* 

 ━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━


13.  *✸ भारत देश महान ✸*

     ●●●●●००००००●●●●●

भारत देश महान अमुचा 

भारत देश महान 

स्फूर्ती देतील हेच आमुचे 

राम कृष्ण हनुमान ll धृ ll 


व्यासादिक मुनिवरे गाइला 

संत महंते पावन केला 

प्रताप शिवबाने गाजविला 

सुख समृद्धी निधान ll १ ll 


चिंतनि इतिहासाच्या दिसती 

असंख्य नरवीरांच्या ज्योती 

गाता स्वतंत्रतेची किर्ती 

घडवू नव संतान ll २ ll 


धर्मासाठी जीवन जगणे 

समष्टिमध्ये विलीन होणे 

सिमोल्लंघन दुसरे कसले 

यासाठी बलिदान ll ३ ll 

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0७ ]      ❂ प्रार्थना ❂*

━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━


13. *❂ सरस्वती वंदना ❂*

   ━━═●✶✹★★✹✶●═━━

या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता।

या वींणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपदमासना॥

या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता।

सा माम पातु सरस्वती भगवती 

निःशेषजाड्याऽपहा॥

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0८ ]    ❂ बोधकथा ❂*

━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━


13. *❝ कोकिळा,पोपट व घार ❞*

     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━

     *एका गरीब भोळ्या कोकीळाला* एका घारीचे मरणप्राय भय वाटले. कारण घार तिच्या डोक्यावर ओरडत व भक्ष्यासाठी घिरट्या घालत फिरत होती. 

       ते पाहून एक पोपट कोकीळाला म्हणाला की, 'इकडे ये, घाबरू नको, धीर धर. हा सर्व किलकिलाट व धडपड केवळ मूर्खपणाची आहे. शेवटी या आळशी घारीने एखादा गरीब बेडूक किंवा उंदीर पकडलेला तू पाहशील, अरे ससाणे हे खरे भयंकर पक्षी असून ते काही गडबड न करता मुकाट्याने प्राणी पकडून खातात.'


          *🌀❝ तात्पर्य ❞ ::~* 

   *बोलेल तो करेल काय ? गर्जेल तो पडेल काय ?*

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*

━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━


13. खूप खूप *ताकद* लागते

   आलेले *अपयश*  पचवायला...

 *डोळ्यात* आलेले *पाणी* पुसून

       *ओठांवर* हसू खेळवायला...

 काहीतरी *ध्येय* लागतं आपल्याला

           आयुष्यात जगायला...

 शेवटी *अपयशाचीच* गरज असते

      आयुष्यात *खंबीर* बनायला..!!

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*

━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━


13. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*

   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑

✪  एकलहरे विद्युत निर्मिती केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे ?

  ➜नाशिक.


✪  कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?

  ➜रायगड.


 ✪  चंद्रपूर जिल्ह्यात कोणते औष्णिक ऊर्जा केंद्र आहे ?

  ➜ दुर्गापूर.


 ✪  चादरीकरीता प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते ?

  ➜सोलापूर.


 ✪  हिमरू शालीकरीता प्रसिद्ध असलेले शहर कोणते ?

  ➜ औरंगाबाद 

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*

━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━


13.   *❒ ♦इंदिरा संत♦ ❒*  

     ━━═•●◆●★★●◆●•═━━

●जन्म नाव :~ इंदिरा नारायण संत

●जन्म :~ ४ जानेवारी १९१४, 

इंडी, कर्नाटक, भारत

*●मृत्यू :~ १३ जुलै २०००, पुणे*

●कार्यक्षेत्र :~ साहित्य, अध्यापन

●भाषा :~ मराठी

●साहित्य प्रकार :~ कविता


        *◆ इंदिरा नारायण संत ◆*

   या मराठी कवयित्री आणि कथालेखक होत्या. शिक्षकीपेशा स्वीकारलेल्या इंदिरा संतांनी लहान मुलांच्या कथा लिहून आपल्या लिखाणाला प्रारंभ केला. १९५०च्या दशकात त्यांनी स्त्रीवादी कविता लिहण्यावर आपले लक्ष केंद्रित केले. आई, पत्नी, मुलगी या नात्यांतून भारतीय स्त्रीचे दिसणारे खडतर जीवन त्यांनी आपल्या कवितांमधून हळुवारपणे मांडले आहे. इंदिरा संत आणि त्याचे पती ना.मा. संत या दोघांच्या कवितांचा एकत्रित असा संग्रह 'सहवास' या नावाने १९४० ला प्रसिद्ध झाला. 


     दुर्दैवाने ना.मा. संत यांचे १९४६ साली निधन झाले. वेळीच सावरून या घटनेचा इंदिरा संत यांनी आपल्या कवितेवर परिणाम होऊ दिला नाही. विशुद्ध रूपातील इंदिरा संत यांची कविता टीकाकार तसेच काव्यरसिकांनी उचलून धरली. इंदिरा संत यांची सुमारे पंचवीस पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. रमेश तेंडुलकर यांनी इंदिरा संत यांच्या निवडक कविता 'मृण्मयी' नावाने १९८२ साली संपादित करून प्रसिद्ध केल्या आहेत.


             ◆ पुरस्कार

•साहित्य अकादमी पुरस्कार गर्भरेशीम

•अनंत काणेकर पुरस्कार गर्भरेशीम

•साहित्य कला अकादमी पुरस्कार घुंघुरवाळा

•महाराष्ट्र शासन पुरस्कार शेला रंगबावरी मृगजळ

•कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••

            *✍संकलन ✍*

*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*

   ♦📱 7875840444 ♦

 *✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*

█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌


 *❁शनिवार~13/07/2024❁*

*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment