"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

 *30/07/24 मंगळवारचा परीपाठ*

◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤

*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*

*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*


 *Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*


*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*


 *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*

 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ 


 *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*

 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ 


 *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*

*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*


 *💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*

*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*

       🔘 *"माझी शाळा"* 🔘

   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*

    🔗🔗👇👇🔗🔗


https://urlzs.com/dmQmp

▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄

*0१ ]    ❂ आजचे पंचाग ❂*

  ━═●🇲◆🇸◆🇵●═━

🍥 *30. जुलै:: मंगळवार* 🍥

 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━

आषाढ कृ. १०, पक्ष :कृष्ण पक्ष, 

तिथि ~दशमी, नक्षत्र ~कृत्तिका, 

योग ~वृद्धि, करण ~विष्टि, 

सूर्योदय-06:14, सूर्यास्त-19:15,

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0२ ]   ❂ सुविचार ❂* 

━┅▣◆★✪★◆▣┅━


30. *जग हे कायद्याच्या भीतीने चालत नाही ते सद्विचाराने चालते.*

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*

━━●🇲=◆🇸◆=🇵●━━


30. *ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी*

       *★ अर्थ ::~* 

    उपकारकर्त्याच्या बाजूने बोलावे.

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*

━┅━▣◆★✧★◆▣═┅━


30.   *मातृदेवो भव ।*

⭐अर्थ ::~ मातेला देवाप्रमाणे पहा.

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*

━━●🇲=◆🇸◆=🇵●═━


     🛡 *★30. जुलै★* 🛡

🔻===●●●★●●●===🔻

★हा या वर्षातील २११ वा (लीप वर्षातील २१२ वा) दिवस आहे.       


    ~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~

🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹

●२०१९ : तीन तलाक ऐतिहासिक बिल पास राज्यसभेत 99 विरुद्ध 84 मंजूर

●२००१ : राजस्थानातील अलवर येथील राजेंद्रसिंह यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर. छोटे बंधारे बांधून पाणी साठवण्याबाबत त्यांनी लोकसहभागातून मोठे काम केले आहे.

●२००० : कोणत्याही प्रवासी वाहनातून एखादा प्रवासी अपघाताने खाली पडून त्याचा मृत्यू झाल्यास त्याबद्दल त्या वाहनचालकाला जबाबदार धरता येणार नाही, असा सर्वोच्‍च न्यायालयाचा निकाल

●१९९७ : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना ’राजीव गांधी राष्ट्रीय सद्‍भावना पुरस्कार’ जाहीर

●१९३० : पहिला फुटबॉल विश्वचषक उरुग्वेने जिंकला.


   ~*★जन्मदिवस / जयंती★*~

🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸

◆१९७३ : सोनू निगम – पार्श्वगायक

◆१९४७ : अर्नोल्ड श्वार्झनेगर – जन्माने ऑस्ट्रियन असलेले अमेरिकन शरीरसौष्ठवपटू, अभिनेते आणि कॅलिफोर्नियाचे ३८ वे राज्यपाल

◆१८६३ : हेन्‍री फोर्ड – फोर्ड मोटर कंपनीचे संस्थापक 


    ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~

 🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹

●२०११ : डॉ. अशोक रानडे – संगीत समीक्षक 

●१९९५ : डॉ. विनायक महादेव तथा ’वि. म.’ दांडेकर – अर्थतज्ञ, ’इंडियन स्कूल ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी’ या संस्थेची त्यांनी उभारणी केली. त्यांचे ’पॉव्हर्टी इन इंडिया’ हे पुस्तक गाजले 

●१९९४ : शंकर पाटील – साहित्यिक, चित्रपट कथालेखक, भारतीय चित्रपट महामंडळाचे संस्थापक सचिव आणि ’बालभारती’चे संपादक. 

●१९६० : ’कर्नाटकसिंह’ गंगाधर बाळकृष्ण देशपांडे – स्वातंत्र्यसैनिक 

●१८९८ : ऑटो फॉन बिस्मार्क – जर्मनीचा पहिला चॅन्सेलर

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*🚦सतिष बोरखडे दारव्हा*

   💥📱7875840444💥

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या

 वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..


     https://goo.gl/8D33ox

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

✪✪✫✪✫✪✫✪✫✪✫✪✪

*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*

━┅━▣◆★✧★◆▣═┅━


30. *✸ खरा तो एकची धर्म ✸*

   ●●●●००००००●●●●

खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे


जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पददलित

तया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे


जयांना ना कोणी जगती सदा ते अंतरी रडती

तया जाऊन सुखवावे, जगाला प्रेम अर्पावे


समस्तां धीर तो द्यावा, सुखाचा शब्द बोलावा

अनाथा साह्य ते द्यावे, जगाला प्रेम अर्पावे


सदा जे आर्त अतिविकल, जयांना गांजती सकल

तया जाऊन हसवावे, जगाला प्रेम अर्पावे


कुणा ना व्यर्थ शिणवावे, कुणा ना व्यर्थ हिणवावे

समस्तां बंधु मानावे, जगाला प्रेम अर्पावे


प्रभूची लेकरे सारी तयाला सर्वही प्यारी

कुणा ना तुच्छ लेखावे, जगाला प्रेम अर्पावे


असे जे आपणापाशी असे, जे वित्त वा विद्या

सदा ते देतची जावे, जगाला प्रेम अर्पावे


भरावा मोद विश्वात असावे सौख्य जगतात

सदा हे ध्येय पूजावे, जगाला प्रेम अर्पावे


असे हे सार धर्माचे असे हे सार सत्याचे

परार्थी प्राणही द्यावे, जगाला प्रेम अर्पावे


जयाला धर्म तो प्यारा, जयाला देव तो प्यारा

त्याने प्रेममय व्हावे, जगाला प्रेम अर्पावे

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0७ ]      ❂ प्रार्थना ❂* 

━┅━▣◆★✧★◆▣━┅━


30. *❂  तुझिया चिंतनात ❂*

 ━━●✶✹★●★✹✶●═━

त्या तुझिया चिंतनात मन माझे गुंतु दे

गीताच्या एकसरी भावफुले गुंफु दे


श्रवणी ये नाम जसे

मूर्ती पुढती विलसे

रूप मनी आठवुनी नित्य तुला पाहु दे


भाव एक नवनवा

गंध धुंद करि जिवा

जीवशीव संगतीत मन कलिका उमलूदे


छंद तुझा क्षणोक्षणी

बरवा मज दिनरजनी

गीत तुझे आळवूनी तुजसाठी गाउ दे

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0८ ]    ❂ बोधकथा ❂*

━━●🇲=◆🇸◆=🇵●═━


30.  *❃❝ मोठेपणा ❞❃*

  ━━•●◆●★★●◆●•━━

   एकदा एका गृहस्थाने आपल्या मित्रांना मेजवानीसाठी बोलाविले होते. सगळेजण दिवाणखान्यात एका मोठया मेणबत्तीच्या प्रकाशात जेवत होते, ते पाहून मेणबत्तीला स्वत:चा अभिमान वाटला, आपल्या प्रकाशाचा केवढा उपयोग आहे असे वाटून ती गर्वाने म्हणाली, "ज्या वेळी व ज्या ठिकाणी सूर्यचंद्राचा प्रकाश पोहोचू शकत नाही. त्या वेळी व त्या स्थळी माझा प्रकाश पडू शकतो, चंद्रसूर्यही माझ्यापुढेही क्षुद्र वाटतात.' तिचे हे गर्वाचे बोलणे ऐकून जेवणारी मंडळी हसली. त्यातला एक जण उठला. त्याने खिडकी उघडली. त्याबरोबर हवेची झुळूक आली व मेणबत्ती विझली. नंतर त्याने पुन्हा खिडकी बंद केली व मेणबत्ती पेटविली. मग तो गृहस्थ मेणबत्तीला म्हणाला, 'अगं वेडे आता तरी प्रकाश दे, एवढयाशा झुळकेने विझतेस, चंद्रसूर्याला क्षुद्र समजतेस त्यांच्यापेक्षा श़ेष्ठ असल्याची मिजास करतेस. चंद्रसूर्य कधी तुझ्यासारखे वाऱ्याच्या झुळकेने विझून गेले आहेत का?' 


      *🌀❝ तात्पर्य ❞ ::~* 

  आपल्यावर सोपवलेली कामगिरी व्यवस्थितपणे पार पाडण्यातच मोठेपण आहे.

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*

━┅━▣◆★✧★◆▣═┅━


30.  *गवत उगवण्यास एक पावसाची सर खुप होते पण वटवृक्ष उगवण्यासाठी खुप उशीर लागतो....*


  *गवत लवकर उगवते आणि लवकर सुकून जाते परंतु वड उशीरा उगवतो आणि हजारो वर्ष जगतो....*


   *तसेच चांगले विचार समजण्यासाठी खुप उशीर लागतो पण एकदा समजले की आयुष्यभर विसरत नाही......*

       *म्हणून जीवनात गवतासारख्या भेटणाऱ्या लोकांपेक्षा वटवृक्षासारख्या खंबीर असणाऱ्या लोकांच्या सानिध्यात राहावे...!!* 

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*

━┅━▣◆★✧★◆▣═┅━


30. *✿ भूगोल सामान्य माहिती *

   ◑◑◑◆◑●★●◑◆◑◑◑ 

■    *तार्यांचे फिरणे कोणत्या क्रियेमुळे जाणवते*?

     ➜ झिमन इफेक्ट


■ *सूर्याची उष्णता मोजण्याचे एकक कोणते* ?

   ➜अॅक्टेनाॅमिटर


 ■   *प्रत्येकी दोन रेखावृत्तातील अंतर जास्तीत जास्त किती असते* ?

    ➜111 किमी


■  *श्वेत खंड म्हणून कोणत्या खंडास म्हटले जाते*?

   ➜ अंटार्क्टीका खंड


■   *"मैर इंटरनम" हे जुने नाव असलेला सागर कोणता* ?

    ➜ भूमध्य सागर

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*

━━●🇲=◆🇸◆=🇵●━━


30. *❒ शिवशाहीर मा.बाबासाहेब पुरंदरे*  

  ━━•●◆●★★●◆●•═━

मराठी साहित्यिक, नाटककार, इतिहासकार आणि वक्ते आहेत. शिवशाहीर मा.बाबासाहेब पुरंदरे यांना पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आला.


       ★मा.बाबासाहेब पुरंदरे ★

   शिवचरित्र केवळ अभ्यासणारे नव्हे, तर ते जिव्हाळ्याने अनुभवणारे आणि जणू शिवकाळातच राहून शिवचरित्र अक्षरश: जगणारे शिवशाहीर ! म्हणजे बळवंत मोरेश्वर पुरंदरे उर्फ मा.बाबासाहेब पुरंदरे. 

’इतिहास माजघरापर्यंत गेला पाहिजे, पाळणाघरापर्यंत गेला पाहिजे, इतकंच नव्हे तर आमच्या बहिणी, भावजया आणि लेकीसुना गरोदर असतील, तर त्यांच्या गर्भापर्यंत गेला पाहिजे,’ असे म्हणणारे मा.बाबासाहेब हे एकमेवाद्वितीयच! त्यांचे मूळ गाव पुणे जिल्ह्यातील सासवड. पण तरुणपणापासूनच ते पुण्यातच स्थायिक झाले. पुढे भारत इतिहास संशोधन मंडळ या संस्थेत काम करू लागले. या ठिकाणीच इतिहाससंशोधक ग.ह. खरे हे बाबासाहेबांना गुरुस्थानी लाभले व इतिहास संशोधक म्हणून त्यांची वाटचाल सुरू झाली. सह्याद्रीचा एकेक कडा आणि एकेक शिखर हे ज्यांच्यासाठी चरित्रनायक आहेत. एकेक किल्ला हा ज्यांच्या महाकाव्याचा एक-एक अध्याय आहे, असे ज्येष्ठ इतिहासकार म्हणजे शिवशाहीर मा.बाबासाहेब पुरंदरे होत. त्यांच्या लेखनातून व व्याख्यानांतून शिवकाळ महाराष्ट्राच्या कानाकोपर्याकत पोहोचला आहे. पुरंदर्यां ची दौलत, पुरंदर्यांेची नौबत, गड-किल्ल्यांची ऐतिहासिक माहिती देणारे साहित्य (गडसंच), शेलारखिंड, व राजा शिवछत्रपती हे बाबासाहेबांचे आजवर प्रकाशित झालेले साहित्य होय. शिवचरित्र हे घरोघरी पोहोचावे हे ध्येय ठेवून बाबासाहेबांनीअथक संशोधनातून व परिश्रमांतून राजा शिवछत्रपती हा ग्रंथ साकार केला.  ‘राजा शिवछत्रपती’ या ग्रंथाच्या १८ आवृत्त्या प्रकाशित झाल्या असून, काही कादंबऱ्या तसेच किल्ल्यांचे वर्णन करणारी पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. मुजऱ्याचे मानकरी, पुरांदार्ची नोबत, पुरंदरचा सरकारवाडा, शनवारवाडय़ातील शमादान, दख्खनची दौलत ही त्यांची पुस्तके म्हणजे ऐतिहसिक कथासंग्रह.  फुलवंती व जाणता राजा ही नाटके त्यांनी लिहिली, दिग्दर्शित केली. जाणता राजा या महानाट्याचे गेल्या २७ वर्षांत १२५० हून अधिक प्रयोग झाले आहेत. पहिला प्रयोग १४ एप्रिल १९८४ रोजी झाला होता. या प्रयोगांच्या उत्पन्नातून बाबासाहेबांनी अनेक संस्थांना लाखो रुपयांची मदत केली आहे हे नाटक ५ अन्य भाषांत भाषांतरित केले गेले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावरील सर्वात मोठे असे महानाटय़ असून याशिवाय हत्ती, घोडे, उंट, बैलगाडय़ांचा या महानाटय़ात समावेश असतो.

जाणता राजा या महानाट्याचे अमेरिका, लंडनसह भारतात महाराष्ट्र, गुजरात, कनार्टक, मध्यप्रदेश, राजस्थान छत्तीसगढ, गोवा या राज्यांतील अनेक शहरात प्रयोग झाले आहेत. इतिहासाचा ध्यास घेतलेले मा.बाबासाहेब हे तरुणपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जवळून संपर्कात होते. त्या काळातच ते आचार्य अत्रे यांच्या वृत्तपत्रात लेखन करीत. शिवाय आपले मेहूणे श्री. ग. माजगावकर यांच्याबरोबर ते ‘माणूस’ मध्येही काम करत होते. ज्येष्ठ इतिहासकार व कादंबरीकार गो. नी. दांडेकरांशी पुढे त्यांची भेट झाली. मा.बाबासाहेब-गोनीदा ही जोडी म्हणजे शिवचरित्राचा वारसा आजच्या पिढीपर्यंत पोहोचवणारे दूतच झाले. ते नेहमी गडांवर एकत्र भटकंती करीत. महाराष्ट्रातील एकही असा किल्ला नाही, जिथे मा.बाबासाहेब पोहोचले नाहीत आणि एकही असे सरदार घराणे नाही, ज्यांच्याशी त्यांचा संपर्क झालेला नाही! शिवचरित्र अभ्यासणारे अनेक अभ्यासक असतात परंतु शिवचरित्र अनुभवणारे, अक्षरश: जगणारे मा.बाबासाहेब एकच! स्वातंत्र्यानंतर लढल्या गेलेल्या दादरा नगर हवेली मुक्ती संग्रामात मा.बाबासाहेबांनी सुधीर फडके यांच्याबरोबर हिरिरीने सहभागी होते. आचार्य अत्रे, गो. नी. दांडेकर, पु.ल. देशपांडे, अटलबिहारी वाजपेयी, मंगेशकर कुटुंबीय, ठाकरे कुटुंबीय यांसारख्या दिग्गजांचा सहवास त्यांना लाभला. या सर्वांच्या माध्यमातून,सहकार्यातून त्यांनी शिवचरित्रप्रसारासाठी अनेक उपक्रम चालवले.महाराष्ट्रात, भारतात आणि परदेशातही त्यांच्या व्याख्यानांतून, जाणता राजा या महानाट्यातून आजही शिवचरित्र जिवंत होते. ’शिवचरित्र हे व्यक्तिचारित्र्य निर्मितीचा अभ्यासक्रम आहे’ हे त्यांनी आपल्या व्याख्यानांमधून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातील अनेक पैलू उलगडून दाखवत पटवून दिले.

▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄

••◎◑★✹🔅✹★◑◎••

        *✍ संकलन ✍*

*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*

♦📱7875840444♦

*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*

█║▌║█❃❂❃█║▌█


*❁मंगळवार ~30/07/2024❁*

*⋐⋑⛯⋐⋑MSP⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment