"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

 *10/07/23 सोमवारचा परीपाठ*

◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤

*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*

*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*


 *Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*


*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*


   *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*

 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ 


     *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*

 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ 


    *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*

*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*


 *💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*

*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*

  🔘 *"माझी शाळा"* 🔘

   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*

    🔗🔗👇👇🔗🔗


https://urlzs.com/dmQmp

▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄

*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*

  ━═●🇲◆🇸◆🇵●═━

🍥 *10. जुलै:: सोमवार* 🍥

 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━

आषाढ कृ.०८, पक्ष :कृष्ण पक्ष, 

तिथि ~अष्टमी, नक्षत्र ~रेवती, 

योग ~अतिगण्ड, करण ~बालव, 

सूर्योदय-06:07, सूर्यास्त-19:20,

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0२ ]   ❂ सुविचार ❂* 

━┅═▣◆★✪★◆▣═┅━


10. *चेहरा हा आपल्या व्यक्तीमत्त्वाचा आरसा असतो.*

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*

━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━


10.  *नळी फुंकली सोनारे, इकडुन तिकडे गेले वारे*

      ★ अर्थ ::~ सांगितलेल्या गोष्टी किंवा सुचना या कानाने ऐकुन त्या कानाने सोडून देणे. अशा लोकांना वारंवार सुचना करूनही त्याकडे दुर्लक्ष करून त्यांना हवं तेच करतात.

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*

━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━


10. *विद्याविहीनः पशुः ।*

   ⭐अर्थ ::~ विद्याविहीन मनुष्य हा मनुष्य नसून पशूच आहे.

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*

━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━


     *🛡 ★ 10. जुलै ★ 🛡*

🔻====●●●★●●●====🔻

★मातृसुरक्षा दिन

★हा या वर्षातील १९१ वा (लीप वर्षातील १९२ वा) दिवस आहे.

★बहामाचा स्वातंत्र्यदिन


        ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~

 🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹

●१९९२ : संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या 'इन्सॅट २ ए' या उपग्रहाचे फ्रेंच गयानातील कोउरू येथून प्रक्षेपण

●१९९२ : आर्वी येथील ’विक्रम इनसॅट भू-केंद्र’ राष्ट्राला अर्पण

●१९७८ : मुंबई येथे महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ स्थापन करण्यात आले.

●१९२५ : अवतार मेहेरबाबा यांनी आपल्या मौनव्रताची सुरूवात केली. हे व्रत त्यांनी सलग ४४ वर्षे त्यांच्या मृत्यूपर्यंत पाळले.


    ~*★जन्मदिवस / जयंती★*~

  🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸

◆१९५० : ’बेगम’ परवीन सुलताना – पतियाळा घराण्याच्या शास्त्रीय गायिका

◆१९४९ : *सुनील मनोहर तथा ’सनी’ गावसकर* – क्रिकेटपटू व समालोचक

◆१९४० : लॉर्ड मेघनाद देसाई – अर्थशास्त्रज्ञ आणि इंग्लंडच्या ’हाऊस ऑफ लॉर्डस’चे सभासद

◆१९१३ : पद्मा गोळे – कवयित्री 

◆१९०३ : रा. भि. जोशी – साहित्यिक 


      ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~

 🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹

●२००५ : जयवंत कुलकर्णी – पार्श्वगायक 

●१९९५ : डॉ. रामकृष्ण विष्णू तथा ’दादासाहेब’ केळकर – ’गरिबांचे डॉक्टर’ म्हणून प्रसिद्ध, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अभिनव भारत मंदिराचे अध्यक्ष 

●१९८९ : प्रभाकर ऊर्ध्वरेषे – साम्यवादी विचारवंत व साहित्यिक 

●१९७१ : भिखारी ठाकूर – भोजपुरी भाषेचे ’शेक्सपिअर’

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*🚦सतिष बोरखडे दारव्हा*

   💥📱7875840444💥

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..


     https://goo.gl/8D33ox

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪

*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂* 

 ━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━


10. *✸ मेरे देश की धरती.. ✸*

     ●●●●●००००००●●●●●

मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती 

मेरे देश की धरती 

बैलों के गले में जब घुँघरू जीवन का राग सुनाते हैं 

ग़म कोस दूर हो जाता है खुशियों के कंवल मुसकाते हैं 

सुन के रहट की आवाज़ें यों लगे कहीं शहनाई बजे 

आते ही मस्त बहारों के दुल्हन की तरह हर खेत सजे


मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती 

मेरे देश की धरती


जब चलते हैं इस धरती पे हल ममता अँगड़ाइयाँ लेती है 

क्यों ना पूजे इस माटी को जो जीवन का सुख देती है 

इस धरती पे जिसने जनम लिया उसने ही पाया प्यार तेरा

यहाँ अपना पराया कोई नही हैं सब पे माँ उपकार तेरा


मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती 

मेरे देश की धरती 

ये बाग़ हैं गौतम नानक का खिलते हैं अमन के फूल यहाँ 

गांधी, सुभाष, टैगोर, तिलक ऐसे हैं चमन के फूल यहाँ 

रंग हरा हरिसिंह नलवे से रंग लाल है लाल बहादुर से 

रंग बना बसंती भगतसिंह रंग अमन का वीर जवाहर से


मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती 

मेरे देश की धरती

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0७ ]      ❂ प्रार्थना ❂*

━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━


10. *❂ ज्यास देव सापडला ❂*

      ✶✶✹✹★●★✹✹✶✶

ज्यास देव सापडला माणसाच्या ठायी

त्यास मंदिराच्या भिंती दिशा सर्व दाही


करुणेची निरांजन आत सांडते प्रकाश

त्याचे तन-मन पूजा आणि गाभारा आकाश

धूप वसंताचा तेथे दरवळून येई


दु:ख पाहुनी दुसर्‍याचे ज्याचे भरतात डोळे

डोळ्यांतल्या त्या पाण्याला तीर्थ भेटायास आले

अशा माणसाचा स्पर्श, पांडुरंग होई


धर्म पावसाचा अंगी ज्यास नसे नाव

अंकुरते जेथे जेथे तेच त्याचे गाव

असे गाव ज्याचा कोठे नकाशाच नाही

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0८ ]    ❂ बोधकथा ❂*

━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━


10.     *❝ दैवी संपत्ती ❞*

     ━━═•●◆●★●◆●•═━━

     एक म्हातारं जोडप होतं.घराजवळच्या जागेत भाज्या लावाव्यात म्हणून तन-मन लावून झटत होते.एकदा खणता खणता त्या म्हाता-या माणसाच्या कुदळीला काही तरी लागलं.त्यानं खणून पाहिलं तर ती एक पेटी होती.उघडताच त्यातल्या सोन्याच्या मोहरा चमकू लागल्या.

ती म्हातारी स्री म्हणाली,चला,आपण आता श्रीमंत झालो.आपल्या संकटकाळी देवाने आपल्यासाठी मदत पाठवली आहे.


    हे बघ,उगीचचं लाळ घोटू नकोस.ही जागा आपल्या मालकीची नाही.तेव्हा कशावरून देवाने ही संपत्ती आपल्यासाठीच पाठवली अाहे,असे समजायचे ? 


     म्हातारा म्हणाला.आपण ही अशीच इथे ठेवू देऊया.जर समज, ही संपत्ती आपल्यासाठीच देवाने पाठवली असेल,तर ती पाठवण्याची व्यवस्थाही तोच करेल.


     पेटी होती त्याच जागी पुन्हा ठेवून ते दोघे तिथून निघून गेले.म्हातारीने ही गोष्ट सगळ्यांना सांगायला सुरुवात केली.पण कुणीही तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नव्हते.त्या सगळ्यांना वाटलं की,म्हातारी काहीतरी थापा मारतेय.त्या गावात एक व्यापारी राहत होता.त्याला संपत्तीची खूप हाव होती त्याचाही तिच्या बोलण्यावर विश्वास नव्हता.पण एकदा खात्री करून घ्यावी या उद्देशाने तो एका रात्री त्या ठिकाणी पोहोचला.त्याने आपल्याबरोबर आपल्या दोन मुलांनाही घेतले.त्या तिघांनी ती पेटी खणून वर काढली.पेटीचे झाकण उघडताच नागाचा फुत्कार त्यांना ऐकू आला.तशी त्यांनी पेटी घाईघाईने बंद केली.आता मात्र व्यापा-याची खात्री पटली की,म्हातारीने आपल्याला फसवण्यासाठीच हा डाव टाकला आहे.तेव्हा तिला चांगली अद्दल घडवावी या उद्देशाने त्या तिघांनी ती पेटी दोरखंडाने बांधून ओढत ओढत म्हातारीच्या घराबाहेर आणली व ते निघून गेले.


      सकाळी दरवाजा उघडताच ती पेटी दारात पाहून त्या दोघांनाही आनंद झाला.ती पेटी उघडताच पुन्हा त्या सोन्याच्या मोहरा चमकू लागल्या.त्या पेटीतून तो नाग केव्हाच पसार झाला होता.आता मात्र दोघांची खात्री पटली की,देवाने आपल्यासाठी पाठवलेली ही *दैवी संपत्तीच*  आहे.

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*

━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━


10.   *आज सकाळी धुक्याने*

   *एक छान गोष्ट शिकवली की*

*जीवनात रस्ता दिसत नसेल तर दूरचं पाहण्याचा प्रयत्न करणं व्यर्थ असतं*,

*एक एक पाऊल टाकत चला, रस्ता आपोआप मोकळा होत जाईल...!!*

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*

━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━


10. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*

   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑


 ✪ विमानाचा शोध कोणी लावला ?

 ➜राईट बंधू.


 ✪ गंगा नदीला बांग्लादेशात कोणत्या नावाने ओळखले जाते ?

 ➜ पद्मा.


 ✪ 'हाॅपमॅन कप' कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

 ➜टेनिस.


 ✪ शुद्ध सोने किती कॅरेटचे असते ?

 ➜२४ कॅरेट.


 ✪ जगातील सर्वांत प्रतिष्ठेचा पुरस्कार कोणता ?

 ➜ नोबेल पुरस्कार 

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*११ ] ❂ व्यक्ती परिचय ❂*

━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━


10. *❒ ♦सुनील गावसकर♦ ❒*  

     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━

   *_यांचा आज जन्म दिवस_*

        _त्यानिमित्त त्यांना_

   *_हार्दिक~हार्दिक शुभेच्छा..!!_*

   🙏🐾🌷🌹🌹🌷🐾🙏


●पूर्ण नाव :~ सुनील मनोहर गावसकर

●जन्म :~ १० जुलै, १९४९ 

    मुंबई,महाराष्ट्र,भारत

●विशेषता :~ फलंदाज


        ★आंतरराष्ट्रीय माहिती★

●क.सा. पदार्पण ~ ६ मार्च १९७१

विरुद्ध वेस्ट ईंडीझ

●शेवटचा क.सा. ~ १३ मार्च १९८७

विरुद्ध पाकिस्तान

●आं.ए.सा. पदार्पण~ १३ जुलै १९७४ विरुद्ध इंग्लंड


      ◆ सुनील मनोहर गावसकर ◆

   हे भारतीय पुरुष क्रिकेट संघाकडून आंतरराष्ट्रीय सामने खेळलेले फलंदाज आहे. कसोटी सामन्यांमध्ये भारतीय क्रिकेट संघाच्या इतिहासातील सर्वोत्तम आघाडीचा फलंदाज म्हणून त्यांना गणले जाते. विशेषता फलंदाजी पद्धत उजव्या हाताने करत असे. भारतीय संघातर्फे त्यांनी १२५ कसोटी सामने खेळून ५१.१२ धावांच्या सरासरीने एकूण १०,१२२ धावा काढल्या.


              ◆ पुरस्कार

     मुंबई क्रीडा पत्रकार संघटनेतर्फे क्रिकेटपटू सुनील गावसकर यांना ११ डिसॆंबर २०१६ रोजी "जीवनगौरव" पुरस्कार देण्यात आला आहॆ.

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••

            *✍संकलन ✍* 

*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*

   ♦📱 7875840444 ♦

 *✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*

█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌


 *❁ सोमवार ~ 10/07/2023❁*

*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment