"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

*21/08/24 बुधवार परीपाठ*

◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤

*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*

*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*


 *Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*


*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*


 *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*

 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ 


 *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*

 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ 


 *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*

*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*


 *💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*

*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*

       🔘 *"माझी शाळा"* 🔘

   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*

    🔗🔗👇👇🔗🔗


https://goo.gl/RpQbsw

▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄

*0१ ]    ❂ आजचे पंचाग ❂*

  ━═●🇲◆🇸◆🇵●═━

🍥 *21. ऑगस्ट:: बुधवार* 🍥

 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━

श्रावण कृ. २, पक्ष :कृष्ण पक्ष, 

       तिथि ~द्वितीया, 

     नक्षत्र ~पूर्वाभाद्रपदा, 

योग ~सुकर्मा, करण ~तैतिल,

सूर्योदय-06:20, सूर्यास्त-19:04,

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0२ ]      ❂ सुविचार ❂* 

  ━┅━▣◆★✪★◆▣═┅━


21. *निघून गेलेला क्षण कधीच परत आणता येत नाही.*

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*

━━●🇲=◆🇸◆=🇵●━━


21.  *दुष्काळात तेरावा महिना –*

 ★ अर्थ ::~ संकटात अधिक भर

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*

━┅═▣◆★✧★◆▣═┅━


21.  *दुर्जनः परिहर्तव्यः विद्ययाऽलंकृतोऽपि सन् ।*

   ⭐अर्थ ::~ दुर्जन हा विद्यायुक्त असला तरी त्याला दूर ठेवले पाहिजे.

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*

━━●🇲=◆🇸◆=🇵●═━


     🛡 ★ 21. ऑगस्ट ★ 🛡

🔻===●●●★●●●===🔻

★हा या वर्षातील २३३ वा (लीप वर्षातील २३४ वा) दिवस आहे.


    ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~

 🔹•••°°~°°•••◆•••°°~°°•••🔹

●१९९३ : मंगळाच्या शोधमोहिमेसाठी पाठवण्यात आलेल्या 'मार्स ऑब्झर्व्हर' या यानाचा पृथ्वीशी (NASA) संपर्क तुटला.

●१९११ : पॅरिसच्या लुव्र या संग्रहालयातुन लिओनार्डो-द-व्हिन्सी याचे ’मोनालिसा’ हे जगप्रसिद्ध चित्र चोरीला गेले.

●१८८८ : विल्यम बरोज याने बेरजा मारणार्‍या यंत्राचे पेटंट घेतले.


    ~*★जन्मदिवस / जयंती★*~

🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸

◆१९८६ : उसेन बोल्ट – जमैकाचा धावपटू

◆१९६१ : व्ही. बी. चन्द्रशेखर – भारताचा फिरकी गोलंदाज

◆१९२४ : श्रीपाद अच्युत दाभोळकर – ‘प्रयोग परिवार‘ या संकल्पनेचे प्रवर्तक, गणितज्ञ आणि जमनालाल बजाज पुरस्काराने गौरवण्यात आलेले कृषीशास्त्रज्ञ

◆१९३४ : सुधाकरराव नाईक – महाराष्ट्राचे १३ वे मुख्यमंत्री

◆१९१० : नारायण श्रीधर बेन्द्रे – आदिम कलेपासून चिनी चित्रकलेपर्यंत अनेक शैलीविशेष आत्मसात केलेले चित्रकार 


   ~*★ मृत्यू / पुण्यतिथी ★*~

🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹

●२००६ : बिस्मिला खाँ – शहनाई नवाझ  

●१९९५ : सुब्रमण्यन चंद्रशेखर – तार्‍यांचे आयुर्मान व त्यांचा शेवट यावरील संशोधनासाठी १९८३ मधे नोबेल पारितोषिक मिळालेले भारतीय- अमेरिकन खगोल वैज्ञानिक.  

●१९८१ : आचार्य दत्तात्रय बाळकृष्ण तथा ’काकासाहेब’ कालेलकर – गांधीवादी देशभक्त, शिक्षणतज्ञ, समाजसुधारक, इतिहासकार,  

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*🚦सतिष बोरखडे दारव्हा*

   💥📱7875840444💥

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..


     https://goo.gl/8D33ox

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

✪✪✫✪✫✪✫✫✪✫✪✫✪✪

*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂* 

  ━┅━▣◆★✧★◆▣━┅━


21.  *✹ देशभक्तों नमन ✹*

    ●●●●००००●●●●

जाँ पे खेला बचाया है तुमने वतन

ज़ुल्म सहते रहे गोली खाते रहे

बीच लाशों के तुम मुस्कुराते रहे

कतरे-कतरे से तुमने ये सींचा चमन

आज करता हूँ मैं देशभक्तों नमन

साँप बनकर जो आए थे डसने हमें

कुचला पैरों से तुमने मिटाया उन्हें

कर दिया पल में ही दुश्मनों का दमन

आज करता हूँ मैं देशभक्तों नमन


सर झुकाया नहीं सर कटाते रहे

देख बलिदान दुश्मन भी जाते रहे

माँ ने बाँधा था सर पे तुम्हारे कफ़न

आज करता हूँ मैं देशभक्तों नमन

                     ~ महेश मूलचंदानी

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0७ ]      ❂ प्रार्थना ❂*

━┅━▣◆★✧★◆▣═┅━


21. *❂ जय शारदे वागीश्वरी ❂*

     ✶✶✹✹★●★✹✹✶✶

जय शारदे वागीश्वरी

विधिकन्यके विद्याधरी


ज्योत्‍स्‍नेपरी कांती तुझी, मुख रम्य शारद चंद्रमा

उजळे तुझ्या हास्यांतुनी चारी युगांची पौर्णिमा

तुझिया कृपेचे चांदणे नित्‌ वर्षु दे अमुच्या शिरी


वीणेवरी फिरता तुझी चतुरा कलामय अंगुली

संगीत जन्मा ये नवे, जडता मतिची भंगली

उन्मेष कल्पतरूवरी बहरून आल्या मंजिरी

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0८ ]    ❂ बोधकथा ❂*

━═●🇲=◆🇸◆=🇵●═━


21.  *❃❝ आचार्य विनोबा भावे ❞❃*

 ━═•●◆●★★●◆●•━━

       भूदान चळवळीच्‍या काळातील ही गोष्‍ट आहे. या चळवळीचे प्रणेते आचार्य विनोबा भावे होते. त्‍यांची पदयात्रा सुरु होती. आपल्‍या काही शिष्‍यांसह विनोबाजी मीराजींच्‍या आश्रमात थांबले होते. अल्‍पशा विश्रांतीनंतर त्‍यांची पदयात्रा पुन्‍हा सुरु झाली. त्यावेळी ते हरिद्वारकडे चालले होते. विनोबाजींची प्रकृती थोडी ठीक नव्‍हती. त्‍यांची कंबर आणि पाय दुखत होते. त्‍यामुळे त्‍यांना खुर्चीत बसवून नेण्‍यात येत होते. मध्‍ये मध्‍ये खुर्चीतून उतरून पायी चालायचे. तेव्‍हा एक शिष्‍य त्‍यांच्‍याजवळ येऊन म्‍हणाला,'' बाबा, मला खूप राग येतो, मी काय करावे'' विनोबाजी म्‍हणाले,'' मी लहान असताना मलाही खूप राग यायचा, मग माझ्याजवळ मिश्री असायची ती मी तोंडात ठेवायचो, परंतु कधीकधी ती ही नसायची'' मग तुम्‍ही काय करत होता असे त्‍या व्‍यक्तीने विचारले. विनोबाजी म्‍हणाले,'' मी यावर खूप विचार केला, मग माझ्या मनात एक गोष्‍ट आली. जेव्‍हा आपल्‍या मनाविरूद्ध एखादी गोष्‍ट आली जेव्‍हा आपल्‍या मनाविरूद्ध गोष्‍ट घडली तर लगेच नाराज होतो जर तो क्षणच आपण टाळला तर रागावर विजय मिळवू शकतो. आनंद आणि नाराजी यावर आपण तेव्‍हाच प्रकट करतो तो पहिलाच क्षण आपल्‍यावर वरचढ ठरू पाहतो. तो क्षण टाळणे कठीण आहे. पण मनन करून तो टाळता येतो. मी यावर खूप मनन केले, यामुळेच जीवनात कितीही मोठी आपत्ती आली तरी मी संयम ढळू दिला नाही.''


         *🌀❝ तात्पर्य ❞ ::~* 

   *विचार पुर्वक उचललेले पाऊल आयुष्याला योग्य दिशा देते.*

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*

━┅━▣◆★✧★◆▣━┅━


21.     *राजकारण वेगळे,* 

 *मैत्री वेगळी, व्यवसाय वेगळा,* 

           *संबंध वेगळे* 

    हे प्रत्येकाने जपा कोणावाचुन कोणाचे काहीही बिघडत नाही.

    जे नशिबात आहे ते 

       प्रत्येकाला मिळणार...

 

*चांगले करायला जमले नाही तर वाइट करू नका* 

     *प्रत्येकाची वेळ येत असते फक्त कारण वेगळे असते.*

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*

━┅━▣◆★✧★◆▣═┅━


21. *✿सामान्य ज्ञान प्रश्नावली✿*

   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑


 ✪  भारतात सर्वांत मोठी गॅस दुर्घटना कोठे झाली होती ?

➜ भोपाळ.


 ✪  'हायकू' काव्यप्रकार मराठीत कोणी रूजवला ?

➜ शिरीष पै.


 ✪  २०१९ मधील फिफाचा सर्वश्रेष्ठ खेळाडू पुरस्कार कोणाला मिळाला ?

➜ मेसी लियोनल.


 ✪  देशातील युवा धोरण राबविणारे पहिले राज्य कोणते ?

➜ महाराष्ट्र.


  ✪ डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत भारत वृत्तपत्र केव्हा सुरू केले ?

➜ ३ एप्रिल १९२७

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*

━━●🇲=◆🇸◆=🇵●━━


21.  *❒ सुब्रह्मण्यन चंद्रशेखर ❒*  

   ━━•●◆●★★●◆●•═━

     *भौतिकशास्त्रातील नोबेल    पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ*

       

●पूर्ण नाव :~ सुब्रह्मण्यन चंद्रशेखर

●जन्म :~ १९ ऑक्टोबर १९१०

*●मृत्यू :~ २१ ऑगस्ट  १९९५*

●कार्यक्षेत्र :~ भौतिकशास्त्र


        ◆ सुब्रह्मण्यम् चन्द्रशेखर ◆

    हे एक भारतीय व अमेरिकन शास्त्रज्ञ होते. आधुनिक खगोलशास्त्रात त्यांचे काम मुलभूत आणि महत्त्वाचे मानले जाते. ताऱ्यांच्या उत्पत्ती कशी होते ते चंद्रशेखरांनी शोधून काढले. या कामासाठी त्यांना १९८३ चे नोबेल पारितोषिक मिळाले. शिवाय त्यांना पद्मविभूषण, ब्रूस पदक, व इतर अनेक पारितोषिके मिळाली.


            *◆ जीवन ◆*

    डॉ. चन्द्रशेखर यांचा जन्म १९ ऑक्टोबर  १९१० रोजी लाहोर येथे झाला. त्यांचे वडील सुब्रह्मण्यन् हे तेव्हा लाहोर येथे भारतीय रेल्वेच्या ऑडीट खात्यात होते. लाहोरला त्यांचा जन्म झाला त्याआधी काही महिने त्यांच्या आजोबांचे, रामनाथ चंद्रशेखरांचे निधन झाले होते. दाक्षिणात्य ब्राम्हण कुटुंबात आजोबांच्या मृत्युनंतर जन्माला आलेल्या अर्भकाला, तीच व्यक्ती जन्माला आली, असे समजून तिचे नाव दिले जाते. तसे चंद्रशेखरांना त्यांच्या आजोबांचे नाव ठेवण्यात आले.लाहोरच्या लॉरेन्स गार्डन या भागात होते. वडील सुब्रह्मण्यन् हे कर्नाटक संगीताचे उत्तम जाणकार आणि स्व‌तः वायोलीन वादकही होते आणि संगीतशास्त्र वरील काही पुस्तकांचे लेखनही त्यांनी केले तर चन्द्रशेखर यांच्या आई सीता बालकृष्णन याही अतिशय हुशार होत्या, त्यांनी इंग्रजीतील पुस्तकांचे तमिळ भाषेत अनुवाद केले. तर त्यांचे काका, विश्व प्रसिद्ध वैज्ञानिक सर सी. व्ही. रामन होते. अशा हुशार घराण्यातील असलेले डॉ. चन्द्रशेखर स्वतःही लहानपणापासून प्रतिभावान होते.

 

            ◆ संशोधन ◆

   डॉ. चन्द्रशेखर यांची खरी ओळख म्हणजे "चन्द्रशेखर मर्यादा". ११ जानेवारी १९३५ या दिवशी डॉ. चन्द्रशेखर यांनी एक सिद्धांत मांडला. पुंजवाद आणि सापेक्षतावाद यांची सांगड घालून चन्द्रशेखर यांनी श्वेत बटूंची कमाल वस्तुमानमर्यादा सूर्यापेक्षा ४४ टक्के इतकी असू शकते असे आपल्या सिद्धांताद्वारे मांडले. यात सूर्यापेक्षा लहान असलेले तारे म्हणजे बटू तारे यांचे अस्तीत्त्व कशामुळे टिकून आहे हे गणीताद्वारे डॉ. चन्द्रशेखर यांनी मांडले. या सिद्धांतासाठी डॉ. चन्द्रशेखर यांचा विरोध करणारे डॉ. आर्थर एडिंगटन हेही याच समस्येवर विचार करीत होते, पण त्यांना यावर उत्तर सापडले नाही. एडिंटन यांनी चन्द्रशेखर यांच्या सिद्धांताला विरोध केल्याने तो सिद्धांत मागे पडला.


     डॉ. चन्द्रशेखर यांनी १९३९ साली आपला सिद्धांत An Introduction to the Study of Stellar Structure नावाच्या पुस्तकात विस्तृत रुपात मांडला. १९५० च्या दशकात शास्त्रज्ञांना या सिद्धांतील मते पटू लागली. त्या दिशेने संशोधन सतत सुरूच होते. अखेर जगभरातील शास्त्रज्ञांना डॉ. चन्द्रशेखर यांचे म्हणणे पटले. १९८३ साली त्यांच्या संशोधनाची मान्यता म्हणून डॉ. चन्द्रशेखर यांना जगातील सर्वोच्च समजले जाणारे नोबेल पारितोषिक देण्यात आले.


     अखेरपर्यंत अमेरिकेतच स्थाईक राहणारे आणि संशोधन कार्यात कार्यरत राहणार्‍या डॉ. चन्द्रशेखर यांचा मृत्यु २१ ऑगस्ट १९९५ रोजी झाला.

            ◆ पुरस्कार ◆

 हेन्री नॉरिस रसेल व्याख्याता (इ.स. १९४९), ब्रुस पदक (इ.स. १९५२),

रॉयल ऍस्ट्रोनॉमिकल सोसायटीचे सुवर्णपदक (इ.स. १९५३), पद्मविभूषण (१९६८), भारत सरकार

हेन्री ड्रेपर पदक (इ.स. १९७१), 

नोबेल पारितोषिक भौतिकशास्त्र (इ.स. १९८३),  रॉयल सोसायटीचे कोप्ली पदक (इ.स. १९८४)

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

••●◎◑✹★✹✹★✹◑◎●••

           *✍ संकलन ✍*

*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*

   ♦📱 7875840444 ♦ 

 *✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*

█║▌║▌║█❂█║▌║█║▌


 *❁बुधवार~21/08/2024❁*

*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment