"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

 *28/07/24 रविवारचा परीपाठ*

◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤

*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*

*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*


 *Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*


*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*


 *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*

 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ 


 *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*

 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ 


 *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*

*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*


 *💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*

*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*

       🔘 *"माझी शाळा"* 🔘

   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*

    🔗🔗👇👇🔗🔗


https://urlzs.com/dmQmp

▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄

*0१ ]    ❂ आजचे पंचाग ❂*

  ━═●🇲◆🇸◆🇵●═━

🍥 *28. जुलै:: रविवार* 🍥

 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━

आषाढ कृ. ८, पक्ष :कृष्ण पक्ष, 

तिथि ~अष्टमी, नक्षत्र ~अश्विनी, 

योग ~शूल, करण ~बालव, 

सूर्योदय-06:14, सूर्यास्त-19:16,

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0२ ]   ❂ सुविचार ❂* 

━┅▣◆★✪★◆▣┅━


28. *व्यायामामुळे बुध्दी आणि मन दोहोंचे सामर्थ्य प्रभावी होते.*

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*

━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━


28. *नाव मोठे लक्षण खोटे –* 

            *★अर्थ ::~*

   कीर्ती मोठी पण कृती छोटी

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*

━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━


28.    *दुर्जनः परिहर्तव्यः*

     *विद्ययाऽलंकृतोऽपि सन् ।*

★अर्थ :~ दुर्जन हा विद्यायुक्त असला तरी त्याला दूर ठेवले पाहिजे.

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*

━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━


        🛡 *28. जुलै* 🛡

🔻====●●●★●●●====🔻

★आंतरराष्ट्रीय काविळ दिन

★ हा या वर्षातील २०९ वा (लीप वर्षातील २१० वा) दिवस आहे.


        ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~

 🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹

●२००१ : प्रसिद्ध आसामी लेखिका इंदिरा गोस्वामी यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर

●१९९८ : सर्वोच्‍च आणि उच्‍च न्यायालयातील न्यायमूर्तींच्या नियुक्त्या आणि बदल्यांबाबत नऊ न्यायमुर्तींचा समावेश असलेले स्वतंत्र घटनापीठ स्थापन

●१९८४ : अमेरिकेतील लॉसएंजल्स येथे २३ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.

●१९७९ : भारताचे ५ वे पंतप्रधान म्हणून चौधरी चरणसिंग यांनी सूत्रे हाती घेतली.

●१९३४ : पं. मदनमोहन मालवीय आणि बापूजी अणे यांनी काँग्रेस राष्ट्रीय पक्षाची स्थापना केली.


    ~*★जन्मदिवस / जयंती★*~

     🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸

◆१९५४ : ह्युगो चावेझ – व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष 

◆१९३६ : सर गारफिल्ड तथा ’गॅरी’ सोबर्स – वेस्ट इंडिजचे क्रिकेट कर्णधार, फलंदाज, डावखुरे लेगब्रेक गोलंदाज व उत्कृष्ट क्षेत्ररक्षक

◆१९०७ : अर्ल टपर – ’टपरवेअर’चा संशोधक 


      ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~

     🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹

●१९८८ : राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत सलग आठ वेळा विजेतेपद मिळवणारे सैद मोदी यांची लखनौ येथील के. डी. सिंगबाबू स्टेडियम जवळ हत्या 

●१९८१ : बाबूराव गोखले – नाटककार व भावगीतकार

●१९७७ : गोविंद परशुराम तथा ’पंडितराव’ नगरकर – गायक व अभिनेते, ’अमर भूपाळी’ चित्रपटातील होनाजी बाळा यांची ’घनश्याम सुंदरा’ ही भूपाळी गाऊन अजरामर झालेले गायक 

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*🚦सतिष बोरखडे दारव्हा*

   💥📱7875840444💥

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..


     https://goo.gl/8D33ox

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪

*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂* 

 ━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━


28. *✸ जहाँ डाल डाल पर.. ✸*

     ●●●●●००००००●●●●●

जहाँ डाल डाल पर सोने की चिड़ियाँ करती है बसेरा

वो भारत देश है मेरा।


जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग-पग लगता डेरा

वो भारत देश है मेरा।


ये धरती वो जहाँ ॠषि मुनि जपते प्रभु नाम की माला

जहाँ हर बालक एक मोहन है और राधा हर एक बाला

जहाँ सूरज सबसे पहले आ कर डाले अपना फेरा

वो भारत देश है मेरा।


अलबेलों की इस धरती के त्योहार भी हैं अलबेले

कहीं दीवाली की जगमग है कहीं हैं होली के मेले

जहाँ राग रंग और हँसी खुशी का चारों ओर है घेरा

वो भारत देश है मेरा।


जहाँ आसमान से बातें करते मंदिर और शिवाले

जहाँ किसी नगर में किसी द्वार पर कोई न ताला डाले

प्रेम की बंसी जहाँ बजाता है ये शाम सवेरा

वो भारत देश है मेरा।

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0७ ]      ❂ प्रार्थना ❂*

━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━


28. *❂इतनी शक्ति हमें देना दाता❂*

     ━━═●✶✹★●★✹✶●═━━

इतनी शक्ति हमें देना दाता

मन का विश्वास कमजोर हो ना 

हम चले नेक रस्ते पे हमसे

भूलकर भी कोई भूल हो ना 


दूर अज्ञान के हो अंधेरे

तू हमें ज्ञान की रोशनी दे 

हर बुराई से बचते रहें हम

जितनी भी दे भली ज़िन्दगी दे

बैर हो ना किसी का किसी से

भावना मन में बदले की हो ना


हम ना सोचें हमें क्या मिला है

हम ये सोचे किया क्या है अर्पण

फूल खुशियों के बाँटे सभी को

सब का जीवन ही बन जाए मधुबन

अपनी करुणा का जल तू बहा के

कर दे पावन हर एक मन का कोना

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0८ ]    ❂ बोधकथा ❂*

━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━


28.     *❃ दैव आणि कर्म ❃*

     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━

      आमच्या गल्लीत एक पानवाला आहे. त्याच्याकडे पाहिले कि असे वाटते कि तो आपलीच वाट पहतो. त्याच्याकडे जो पण ग्राहक गेला कि तो त्याच्याशी गप्पा गोष्टी व चर्चा करत असतो. त्यात त्याला फार आनंद व समाधान वाटत असते. पान बनवतांना त्याचा बरा वेळ जायचा. मी फार वैतागायचो.

       एक दिवस मी ठरवले याला फार चर्चा करायची हौस आहे का? आज त्याला असा प्रश्न विचारतो कि त्याने परत चर्चा बंद केली पाहीजे.

        मी त्याच्या दुकानावर गेलो व त्याला विचारले कि बाबा रे! मला एक प्रश्न विचारायचा त्याचे उत्तर देवू शकतो का? तो म्हणाला तुम्ही खुशाल विचारा मी नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करीन.

         मी विचारले कि माणुुस मेहनत करतो मग त्याला यश मिळाले कि तो म्हणतो हे देवाने यश पदरात टाकले. मला सांग दैव श्रेष्ठ कि मेहनत?

         मला वाटले कि याची पुरती बोलती बंद होणार, पण त्याने जे उत्तर दिले ते एकुन मी अवाक झालो. बोलती बंद त्याची नाही तर माझीच बोलती बंद झाली.

           त्याने उत्तर दिले, तो म्हणाला मला सांगा तुमचे बँकेत सेफ डिपॉजीट चे लॉकर आहे? त्या लॉकरला दोन चाव्या असतात एक तुमच्याकडे आणि एक बँक मँनेजर कडे. लॉकर उघडतानां त्या दोन्ही चाव्या लॉकर ला लावाव्या लागतात तरच तो लॉकर उघडते अन्यथा नाही.बरोबर ना? मी म्हणालो बरोबर, पण याचा मी विचारलेल्या प्रश्नाचा काम संबंध?

            तो म्हणाला जसे बँक लॉकरला दोन चाव्या असतात तश्याच आपल्या मानवास नियतीने दोन चाव्या दिल्या. एक मेहनत चावी ती आपल्या पाशी असते तर दुसरी नशीब (दैव) चावी ही त्या परमेश्वरा पाशी असते. 

          आपण आपली चावी यशाच्या लॉकरला लावून द्यायची, जेव्हा परमेश्वर त्याकडची चावी यशाच्या लॉकरला लावेल तेव्हाच आपले यशाचे लॉकर उघडेल अन्यथा नाही.

          यशा साठी मेहनत व नशीब या दोन्ही चाव्या आवश्यक आहे त्या शिवाय यशाचे द्वार उघडणार नाही.

मानवाने मेहनत करता करता त्या परमेश्वराचे सतत नामस्मरण करत राहावे. तरच त्याला यश मिळेल, अन्यथा नाही. नुसती मेहनत करूनही उपयोग व नुसती भक्ती करुन उपयोग नाही.


          *🌀❝ तात्पर्य ❞ ::~* 

     *यश मिळवण्यासाठी मेहनत व भक्ति दोन्ही आवश्यक आहे.*

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*

━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━


28. "जन्म एका टिंबासारखा असतो.. आयुष्य एका ओळीसारखं असतं...

प्रेम एका त्रिकोनाप्रमाणे असतं...


  *पण मैत्री असते ती वर्तुळासारखी*

        *कि ज्याला शेवट नसतो..!!*

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*

━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━


28. *✿सामान्य ज्ञान प्रश्नावली✿*

   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑


✪  भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे ?

➜ वड.


 ✪  विजेच्या दिव्याचा शोध कोणी लावला ?

➜ थाॅमस अल्वा एडिसन.


 ✪  कोणती आंतरराष्ट्रीय टेनिस खेळ स्पर्धा हिरव्या गवताच्या मैदानात खेळली जाते ?

➜ विंबलडन.


 ✪ भारतीय संविधानाचा सरनामा कोणी तयार केला ?

➜ जवाहरलाल नेहरू.


 ✪  डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रथम महाड चवदार तळ्याचा सत्याग्रह केव्हा केला ?

➜ २० मार्च १९२७.

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*

━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━


28. *❒♦ मा. लिला नायडू ♦❒* 

   ━━═•●◆●★◆★●◆●•═━━

  मिस इंडिया', आरस्पानी सौंदर्य लाभलेल्या नायिका ●स्मृतिदिन:~ २८ जुलै २००९


     भारतीय पिता आणि आयरिश मातेपोटी जन्मलेल्या लिला नायडू यांनी १९५४ साली 'मिस इंडिया' हा बहुमान पटकावला होता. 'व्होग' नियतकालिकानेही जगातील पाच सौंदर्यवताइपैकी एक असा त्यांचा उल्लेख केला होता. त्यांचे पिता, डॉ. रामैय्या नायडू एक ख्यातनाम अणु संशोधक होते तर आई स्विस मुळाची भारतीय संस्कृतीची (Indology)अभ्यासिका होती – त्यांच्या कडूनच लीला नायडू यांना भारतीय आणि युरोपियन मिश्रित सौंदर्याचा वारसा मिळाला होता! त्यामुळेच त्यांच्या सौंदर्यातील वेगळेपणा हा त्या काळच्या हिरोइन्स (नर्गिस, मीना कुमारी इ.) मध्ये उठून दिसायचा. बलराज साहनी यांच्या 'अनुराधा' चित्रपटापासून नायडू यांनी १९६० मध्ये चित्रपटातील कारकिर्दीस प्रारंभ केला होता. बॉलीवूड मध्ये लीला नायडू सारखे आरस्पानी सौंदर्य लाभलेल्या नायिका फारच कमी पहावयास मिळतील. "वोग" (Vogue ) सारख्या आंतरराष्ट्रीय आणि ख्यातनाम मासिकाने १९५०-६० च्या दशकात या आकर्षक आणि डौलदार व्यक्तिमत्वाच्या धनी असलेल्या अभिनेत्रीचा समावेश "जगातील १० अति सुंदर" महिलांमध्ये उगाचच केला नव्हता! हृषीकेश मुखर्जी यांनी डायरेक्ट केलेला "अनुराधा" हा लीला नायडू यांचा बॉलीवूड मधील पहिला चित्रपट! या चित्रपटात त्यांनी अशा एकाकी पडलेल्या पत्नीची भूमिका अतिशय उठावदार पणे केली कि जी आपले सारे गानविश्वातील करिअर आपल्या डॉक्टर पतीकरता (बलराज सहानी) करिता सोडून देते. या चित्रपटाची गणना एका महान बॉलीवूड चित्रपटांमध्ये होते. पंडित रविशंकर यांनी दिलेले अतिश्रवणीय संगीत (जाने कैसे सपनोमे, कैसे दिन बीते इ. गाणी) आणि बलराज सहानी यांचा दमदार अभिनय ह्या "अनुराधा" या चित्रपटाच्या इतर जमेच्या बाजू! या चित्रपटाला १९६१ चा भारत सरकारचा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार आणि बर्लिन आंतराराष्ट्रीय फिल्मोत्सव पुरस्कार मिळाला!


    "येह रास्ते हैं प्यारके" हा त्यांचा अजून एक गाजलेला चित्रपट (१९६३)! ह्या चित्रपटाची कथा त्या वेळच्या गाजलेल्या "नानावटी प्रेमप्रकरण" यावर आधारित होती. ह्या चित्रपटात सुनील दत्त, रेहमान आणि लीला नायडू यांनी हा प्रेमाचा त्रिकोण अतिशय समर्थपणे साकारला आहे. खरे तर, ही अपारंपारिक भूमिका स्वीकारावयास त्या वेळच्या कोणत्याही प्रसिद्ध नायिका तयार नव्हत्या. पण लीला नायडू यांचा दाखविलेला धीटपणा त्यांच्या चांगलाच उपयोगी पडला आणि हा चित्रपट हिट ठरला!


     जेम्स आईव्हरी यांचा "The householder" (१९६३) आणि श्याम बेनेगल यांचा "त्रिकाल" (१९८५) हे लीला नायडू यांचे इतर गाजलेले चित्रपट! श्याम बेनेगल तर लीला नायडू यांच्या अभिनया बद्दल म्हणतात "It was a sheer haunting experience to work with Leela Naidu, who breethed innocence and serenity in her performance!”

परंतु, इतक्या प्रतिभाशाली अभिनेत्रीला केवळ बोटावर मोजण्या इतकेच चित्रपट मिळाले - कदाचित त्यांचे स्वतंत्र व्यक्तिमत्व आणि तेजस्वी प्रतिभा त्यांच्या प्रगतीआड आली असावी! 

▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄

••◎◑★✹🔅✹★◑◎••

        *✍ संकलन ✍*

*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*

♦📱7875840444♦

*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*

█║▌║█❃❂❃█║▌█


*❁रविवार ~28/07/2024❁*

*⋐⋑⛯⋐⋑MSP⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment