"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

 *19/07/24 शुक्रवारचा परीपाठ*

◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤

*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*

*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*


 *Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*


*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*


 *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*

 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ 


 *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*

 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ 


 *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*

*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*


 *💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*

*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*

       🔘 *"माझी शाळा"* 🔘

   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*

    🔗🔗👇👇🔗🔗


https://urlzs.com/dmQmp

▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄

*0१ ]    ❂ आजचे पंचाग ❂*

  ━═●🇲◆🇸◆🇵●═━

🍥 *19. जुलै:: शुक्रवार* 🍥

 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━        

आषाढ शु. १३, पक्ष :शुक्ल पक्ष,

तिथि ~त्रयोदशी, नक्षत्र ~मूळ, 

योग ~इन्द्र, करण ~कौलव, 

सूर्योदय-06:10, सूर्यास्त-19:19,

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0२ ]   ❂ सुविचार ❂* 

━┅═▣◆★✪★◆▣═┅━

19. *तन्मयता नसेल तर; विद्वत्ता व्यर्थ आहे

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*

━━●🇲=◆🇸◆=🇵●═━


19.  साखरेचे खाणार त्याला 

               देव देणार--

   ★ अर्थ ::~ भाग्यवान माणसाला दैवाची साथ मिळते 

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*

━┅━▣◆★✧★◆▣═┅━


19. *ज्ञानं महेश्वरादिच्छेत् ।*

            ⭐अर्थ ::~

 शंकराकडून ज्ञान प्राप्त करण्याची इच्छा करावी. (कारण तो सर्वज्ञ आहे.)

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*

━━●🇲=◆🇸◆=🇵●═━


          🛡 *19. जुलै* 🛡

🔻===●●●★●●●===🔻

★हा या वर्षातील १९९ वा (लीप वर्षातील २०० वा) दिवस आहे.


      ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~

 🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹

●१९९३ : ग्रामीण भागातील महिलांचे जीवनमान सुधारण्यासाठी केलेल्या कार्याबद्दल डॉ. बानू कोयाजी यांना समाजसेवेसाठीचा ’रॅमन मॅगसेसे पुरस्कार’ जाहीर

●१९७६ : नेपाळमधे सागरमाथा राष्ट्रीय उद्यानाची रचना करण्यात आली.

●१९६९ : भारतातील १४ मोठ्या बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.

●१९६९ : नील आर्मस्ट्राँग, एडवीन ऑल्ड्रिन व मायकेल कॉलिन्स या अंतराळवीरांसह अपोलो ११ हे अंतराळयान चंद्राच्या कक्षेत पोहोचले.


    ~*★जन्मदिवस / जयंती★*~

 🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸

◆१९३८ : डॉ. जयंत विष्णू नारळीकर – खगोलशास्त्रज्ञ, १९६४ मधे केम्ब्रिज विद्यापीठात डॉ. फ्रेड हॉईल यांच्याबरोबर संशोधन करुन गुरुत्वाकर्षणासंदर्भातील एक नवा सिद्धांत मांडला.

◆१९०२ : यशवंत नरसिंह केळकर – कवी, कोशकार, इतिहास संशोधक, इतिहास लेखक, शाहिरी वाङ्मयाचे संग्राहक, संपादक व प्रकाशक 

◆१८९६ : ए. जे. क्रोनिन – स्कॉटिश लेखक 

*◆१८२७ : मंगल पांडे – क्रांतिकारक* 


      ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~

 🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹

●१९६८ : प्रतापसिंग गायकवाड – बडोद्याचे महाराज 

●१९६५ : सिंगमन र्‍ही – दक्षिण कोरियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष 

●१८८२ : फ्रान्सिस बाल्फोर – प्राण्यांच्या वर्गीकरणाविषयी मूलभूत संशोधन करणारे ब्रिटीश निसर्ग शास्त्रज्ञ 

●१३०९ : संत विसोबा खेचर (संत नामदेव यांचे गुरू) समाधिस्थ झाले 

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*🚦सतिष बोरखडे दारव्हा*

   💥📱7875840444

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..


     https://goo.gl/8D33ox

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

✪✪✫✪✫✪✫✫✪✫✪✫✪✪

*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂* 

 ━┅━▣◆★✧★◆▣═┅━


19.  *✸ गाउ त्यांना आरती ✸*

   ●●●●००००००●●●●

संगरी वीराग्रणी जे धैर्यमेरू संकटी, जन्मले या भारती

राष्ट्रचक्रोद्धारणी कर्णापरी ज्यांना मृती, गाउ त्यांना आरती


कोंदला अंधार मार्गी खाचखड्डे मातले, तस्करांनी वेढिले

संभ्रमी त्या जाहले कृष्णापरी जे सारथी, गाउ त्यांना आरती


स्वार्थहेतूला दिला संक्षेप ज्यांनी जीविती, तो परार्थी पाहती

आप्‍तविस्तारांत ज्यांच्या देशही सामावती, गाउ त्यांना आरती


देश ज्यांचा देव, त्याचे दास्य ज्यांचा धर्म हो दास्यमुक्ति ध्येय हो

आणि मार्कंडेयसे जे जिंकिती काळाप्रती, गाउ त्यांना आरती


देह जावो, देह राहो, नाहि ज्यांना तत्क्षिती, लोकसेवा दे रती

आणि सौभद्रापरी देतात जे आत्माहुती, गाउ त्यांना आरती


जाहल्या दिंमूढ लोकां अर्पिती जे लोचने, क्षाळुनी त्यांची मने

कोटिदीपज्योतिशा ज्यांच्या कृती ज्यांच्या स्मृती, गाउ त्यांना आरती


नेटके काही घडेना, काय हेतु जीवना, या विचारी मन्मना

बोधितो की "एवढी होवो तरी रे सत्कृति, गा तयांची आरती."

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0७ ]      ❂ प्रार्थना ❂*

━┅═▣◆★✧★◆▣═┅━


19. *❂ देशकार्यि विरमु दे ❂*

      ==••◆◆●★●◆◆••==

अमूर्त मूर्त मूर्तिमंत तुजसमान होऊ दे

येत शरण तव पदांसि देशकार्यि विरमु दे॥


उमलतिल ह्या कळया हळूहळूंचि पाकळ्या

तत् सुगंध तुजसमान सर्वदूर पसरु दे॥१॥


पुष्पफले नको आम्हासि अर्पु दे तुझ्या पदांसि

स्वार्थाचे होमहवन तुजपुढेचि होउ दे॥२॥


आम्हासि तूच ध्येय देव सेवु धरुनि भक्तिभाव

पूजने तुझ्या आम्हास देवरुप होउ दे॥३॥


अससि भव्यदिव्य दीप तेज तुझे असे अमूप

ज्योत तीच आमुच्याही ह्रदयांतरि उजळु दे॥४॥


करुनिया तुझ्यासमान होउ देच वर्धमान

देश धर्म संस्कृतिचे संरक्षणचि होउ दे॥५॥

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0८ ]    ❂ बोधकथा ❂*

━━●🇲=◆🇸◆=🇵●═━


19.       *❃ खटला ❃*

   ━═•●◆●★★●◆●•═━

     *दोघां भावात जमिनीवरून तंटा निर्माण झाला*. मामला कोर्टात पोहोचला. त्‍यात एक भाऊ लखपती होता तर दुसरा गरीब होता. त्‍या दोघांना प्रत्‍येकी दहा लाख रूपये वाटणीमध्‍ये आले होते. न्‍यायाधिशांनी एका भावाला विचारले तुझ्या भावाने सात वर्षात दहा लाख रूपये कसे काय खर्च केले. श्रीमंत भाऊ म्‍हणाला, माझा भाऊ प्रत्‍येक काम नोकराकडून करवून घेत असे. कोणतेही काम त्‍याने केले नाही. नोकरही मनमानी करू लागले. एक रूपया खर्च येत असेल तर शंभर रूपये आल्‍याचे दाखवत असत. तो अन्नाला महाग झाला. न्यायाधीशांनी विचारले, तुझी श्रीमंती कशी काय टिकून राहिली. तो म्‍हणाला, माझ्या वाडवडिलांची देणगी दिली म्‍हणजे मी परिश्रम करूच नये की काय, संपत्ती मिळाल्‍यावरही मी परिश्रम करण्‍याचे सोडले नाही. मी नोकरांवर कधीच अवलंबून राहिलो नाही. प्रत्‍येक कामात माझा सहभाग असल्‍याने नोकरांची बोलण्‍याची हिंमत होत नव्‍हती. आता जेव्‍हा याच्‍याकडे फुटकी कवडीही उरली नाही म्‍हणून याने माझ्यावर दावा ठोकला आहे. याला परिश्रम करायला नको आहेत याने स्‍वत:ची संपत्ती तर आळसाने घालविली आता माझ्या संपत्तीवर याचा डोळा आहे.’’ यावर न्‍यायाधीश महोदयांनी इतर साक्षीपुरावे तपासले व *श्रीमंत भाऊच खरे असल्‍याचा निर्वाळा दिला*.


      *🌀❝ तात्पर्य ❞ ::~* 

    मिळालेले धन हे टिकवून ठेवणे अवघड आहे.

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*

━┅━▣◆★✧★◆▣═┅━


19.    *क्षणाला क्षण अन दिवसाला दिवस जोडत*

       *आयुष्य पुढे सरकत असते*

           *कधी तरी, कुठे तरी*

      *केव्हातरी असा क्षण येतो*

*जो अख्खं आयुष्यच बदलुन टाकतो*

*फक्त तो क्षण ओळखता आला पाहिजे.   

.......यालाच*

    *"आयुष्याचा टर्निंग पाँईंट " म्हणतात.....!!*

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*

━┅━▣◆★✧★◆▣━┅━


19. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*

   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑


✪  महाराष्ट्र राज्याची पूर्व - पश्चिम लांबी किती आहे ?

  ➜ ८०० किमी.


 ✪  चिल्का हे खारया पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यात आहे ?

  ➜ओरिसा.


 ✪  चित्रनगरी हे मराठी चित्रपट निर्मितीचे केंद्र कोठे आहे ?

  ➜ कोल्हापूर.


 ✪  ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे ?

  ➜ बीड.


 ✪  चंदनाचे सर्वांधिक उत्पादन कोठे होते ?

➜ कर्नाटक.

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*

━━●🇲=◆🇸◆=🇵●═━


19. *❒🔻  मंगल पांडे  🔻❒*  

 ◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤

   भारताच्या १८५७ च्या स्वातंत्र्य

   युद्धातील आद्य क्रांतिकारक

_यांच्या जयंती त्यानिमित्त त्यांना_ 

        *विनम्र अभिवादन..!!* 


      *दिव्यत्वाची जेथ प्रचीती*

      *तेथे कर माझे जुळती ..!!*

     🙏🐾🌷🌹🌹🌷🐾🙏


*●जन्म :~ १९ जुलै १८२७*

●मृत्यू :~ ८ एप्रिल  १८५७


    मंगल पांडे यांचा जन्म उत्तर प्रदेशातील बालिया जिल्ह्यातील नगवा या झाला. त्यांना लहानपणापासूनच धाडसी कृत्यांची आवड होती. नेमबाजी, तलवारयुध्द इत्यादी कलांमध्ये ते पारंगत होते. मंगल पांडे त्याचबरोबर आपल्या हिंदू धर्माबद्दल अत्यंत संवेदनशील आणि अभिमानी होते.

      ज्या वेळी १८४९ साली, त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यात नोकरीस सुरुवात केली, त्यावेळी ते २२ वर्षाचे होते. पांडे हे बराकपूर सैन्यदलामधील बंगालच्या ३४व्या बी. एन. आय तुकडीच्या ५व्या कंपनीत काम करत होते. कोलकात्याजवळील बराकपूर येथील १९ व्या पलटणीला दिलेली काडतुसे गाय वा डुक्कर यांची चरबी लावलेली आहेत असा समज सैन्यात पसरला होता. ही काडतुसे बंदुकीत भरण्यापूर्वी त्यांना लावलेले आवरण दातांनी तोडावे लागे. अशा वेळी या आवरणाला लावलेली गाईची वा डुकराची चरबी तोंडात जाऊ शकेल या भीतीने या पलटणीतील शिपायांनी ती काडतुसे स्वीकारण्याचे नाकारले. इतकेच नव्हे, तर प्रतिकारार्थ त्यांनी शस्त्र उपसले. त्या दिवशी ब्रिटिश अधिकाऱ्यांची संख्या कमी असल्याने ब्रिटिशांनी तो अपमान मुकाट्याने गिळला. त्यांनी ब्रह्मदेश (म्यानमार)हून गोर्‍या सैनिकांची कुमक मागवून या पलटणीला निःशस्त्र करून अपमानित अवस्थेत हाकलून द्यायचे ठरवले. याची अंमलबजावणी बराकपूरला करण्याचे ठरले. या अपमानास्पद कारवाईमुळे मंगल पांडेने आपल्या सहकाऱ्यांना ब्रिटिशांविरुद्ध उठाव करण्याचे आवाहन केले. त्याला पकडण्यासाठी आज्ञा सोडणाऱ्या सार्जंट मेजर ह्यू सनवर त्याने गोळया झाडल्या आणि बॉ नावाच्या अधिकाऱ्यावर तलवारीने वार केला.


        ३१ मे रोजी एकदम सर्वत्र क्रांतियुद्धाला प्रारंभ करण्याची श्रीमंत नानासाहेब पेशवे आदींची योजना होती. मात्र १९ व्या पलटणीतील स्वदेशबंधूंचा आपल्यादेखत अपमान व्हावा, ही गोष्ट मंगल पांडे यांना आवडली नाही. मार्च २९, १८५७ रोजी कवायतीच्या मैदानावर मंगल पांडे बराकपूर छावणीत ब्रिटिश करत असलेल्या अन्यायाविरुद्ध देशी सैनिकांना उत्तेजित करू लागले. `मर्दहो, उठा !’ अशी गर्जना करून ते सैनिकांना म्हणाले, “आता माघार घेऊ नका. बंधूंनो, चला तुटून पडा ! तुम्हाला तुमच्या धर्माची शपथ आहे !! चला, आपल्या स्वातंत्र्यासाठी शत्रूचा निःपात करा !!! हे पहाताच सार्जंट मेजर ह्यूसन याने त्यांना पकडण्याची आज्ञा केली; पण एकही सैनिक जागचा हालला नाही. उलट मंगल पांडे यांची गोळी लागून ह्यूसन जखमी झाला. हे पहाताच लेफ्टनंट बॉ घोडा नाचवत मंगलवर चाल करून आला. एवढ्यात मंगलच्या बंदुकीतून सुटलेली गोळी घोड्याच्या पोटात शिरली. घोडा लेफ्टनंटसह भूमीवर आडवा झाला. मंगल पांडे यांना पुन्हा बंदुकीत गोळया भरायचा अवसर मिळण्याआधीच लेफ्टनंट बॉ आपले पिस्तुल काढून उभा राहिला. मंगल पांडे यांनी तिळमात्रही न डगमगता आपली तलवार उपसली. बॉने पिस्तुल झाडले; पण मंगल पांडे यांनी त्याचा नेम चुकवला. आपल्या तलवारीने मंगल पांडे यांनी त्यालाही लोळवले. ह्यूसन व बॉ आपल्या निवासस्थानांकडे पळून गेले.


     एवढ्यात शेख पालटू नावाचा शिपाई मंगलच्या दिशेने जाऊ लागला. तो आपल्या पलटणीतील असल्यामुळे आपल्याला मदत करायला येत असावा, असे मंगल पांडे यांना वाटले; पण तसे घडले नाही. शेख पालटूने मंगल पांडे यांना पाठीमागून विळखा घातला. पांडे यांनी त्याचा विळखा सोडवला. देशी शिपाईही शेखच्या रोखाने दगड व जोडे फेकू लागले. जिवाच्या भीतीने शेख पालटू पळून गेला. थोड्याच वेळात कर्नल व्हीलर त्या स्थानी आला. त्याने सैनिकांना मंगल पांडे यांना पकडण्याची आज्ञा केली. कर्नल व्हीलरला सैनिकांनी निक्षून सांगितले, “आम्ही या पवित्र शुरवीराच्या केसालासुद्धा हात लावणार नाही. हिंदुस्थानच्या भूमीवरून वाहाणारे गोर्‍या अधिकाऱ्यांचे रक्‍त आणि समोरचे धर्माभिमानी शिपाई पाहून कर्नल व्हीलर त्याच्या बंगल्याकडे पळून गेला. नंतर जनरल हिअर्स पुष्कळसे युरोपियन शिपाई घेऊन मंगल पांडे यांच्यावर चालून गेला. तोपर्यंत दुपार झाली होती. मंगल पांडे थकले होते. आपण फिरंग्यांच्या हातात सापडणार, हे पहाताच त्यांनी बंदूक आपल्या छातीकडे रोखली व स्वत:वर गोळी झाडून घेतली. मंगल पांडे धरणीवर कोसळले. त्यांची शुद्ध हरपली. नंतरच ब्रिटिश त्यांना पकडू शकले.  जखमी झालेल्या मंगल पांडे यांना सैनिकी रुग्णालयात नेण्यात आले. आठवडाभरातच त्यांच्यावर सैनिकी न्यायालयात अभियोग चालवण्यात आला. स्वधर्मावर प्राणापलीकडे निष्ठा ठेवणार्‍या या तरण्याबांड क्षात्रवीराला न्यायालयाने इतर कटवाल्यांची नावे विचारली; परंतु मंगल पांडे यांच्या मुखातून कोणाचेही नाव बाहेर पडले नाही. पांडे यांना सैनिक न्यायालयात फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. आपल्या देशबांधवांच्या अपमानासाठी स्वतःचे प्राण देणार्‍या या क्रांतीच्या अग्रदूताविषयी लोकांत इतकी विलक्षण श्रद्धा निर्माण झाली होती की, सार्‍या बराकपूरमध्ये त्यांना फाशी देण्यास एकही मानुस मिळेना. शेवटी या घाणेरड्या कामासाठी कोलकात्याहून चार माणसे मागवण्यात आली. मंगल पांडे ज्या तुकडीचे सैनिक होते, तिच्या सुभेदाराला इंग्रजांनी ठार मारले. १९ आणि ३४ या दोन्ही पलटणी त्यांनी निःशस्त्र करून खालसा केल्या. याचा परिणाम उलटाच झाला. शिपायांना धाक वाटण्याऐवजी शेकडो शिपायांनी आपणहून गुलामीचे चिन्ह असलेले त्यांचे सैनिकी गणवेश फाडून टाकले.

हा १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धाचा प्रारंभ मानला जातो. त्यांच्या नावाचा प्रभाव एवढा विलक्षण होता की, या क्रांतियुद्धातील सर्व सैनिकांना इंग्रज 'पांडे’ याच नावाने संबोधू लागले.

यांची जयंती त्यानिमित्त विनम्र अभिवादन व कोटी कोटी प्रणाम.

        *विनम्र अभिवादन..!!*

▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄

••◎◑★✹🔅✹★◑◎••

        *✍ संकलन ✍*

*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*

♦📱7875840444♦

*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*

█║▌║█❃❂❃█║▌█


*❁शुक्रवार ~19/07/2024❁*

*⋐⋑⛯⋐⋑MSP⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment