"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

 *31/07/24 बुधवारचा परीपाठ*

◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤

*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*

*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*


 *Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*


*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*


 *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*

 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ 


 *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*

 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ 


 *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*

*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*


 *💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*

*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*

       🔘 *"माझी शाळा"* 🔘

   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*

    🔗🔗👇👇🔗🔗


https://urlzs.com/dmQmp

▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄

*0१ ]    ❂ आजचे पंचाग ❂*

  ━═●🇲◆🇸◆🇵●═━

🍥 *31. जुलै:: बुधवार* 🍥

 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━

आषाढ कृ.११,पक्ष :कृष्ण पक्ष, 

तिथि ~एकादशी, नक्षत्र ~रोहिणी, 

योग ~ध्रुव, करण~बालव, 

सूर्योदय-06:15, सूर्यास्त-19:14,

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0२ ]   ❂ सुविचार ❂* 

━┅▣◆★✪★◆▣┅━

31. *परिस्थितिला शरण न जाता परिस्थितीवर मात करा.*

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*

━━●🇲=◆🇸◆=🇵●━━


31.  *नाव मोठे लक्षण खोटे –*

      *★ अर्थ ::~* 

 कीर्ती मोठी पण कृती छोटी

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*

━┅═▣◆★✧★◆▣═┅━


31.  *गुरुशुश्रूषया विद्या ।*

         ⭐अर्थ ::~

 विद्या ही गुरूंच्या सेवेने प्राप्त होते.

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*

━━●🇲=◆🇸◆=🇵●━━


        🛡 *31. जुलै* 🛡

🔻===●●●★●●●===🔻

★हा या वर्षातील २१२ वा (लीप वर्षातील २१३ वा) दिवस आहे.


     ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~

 🔹••°°~°°°•••◆•••°°°~°°••🔹

●२००१ : समाजात मूलभूत स्वरुपाची क्रांतिकारक जडणघडण करण्यासाठी झटणार्‍या व्यक्तींना देण्यात येणारा ’राजर्षी शाहूमहाराज समता पुरस्कार’ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांना जाहीर

●१९९२ : सतारवादक पं. रविशंकर यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर


    ~*★जन्मदिवस / जयंती★*~

 🔸•••°°~°°••◆••°°~°°••🔸

◆१९४७ : मुमताज – अभिनेत्री

◆१९४१ : अमरसिंग चौधरी – गुजरातचे मुख्यमंत्री 

◆१९०७ : दामोदर धर्मानंद कोसंबी – प्राच्यविद्या पंडित, गणितज्ञ, विचारवंत व इतिहासकार 

◆१९०२ : केशवा तथा के. शंकर पिल्ले – व्यंगचित्रकार व लेखक, भारतातील राजकीय व्यंगचित्रांचे जनक, पद्मविभूषण (१९७६), 

◆१८८० : धनपतराय श्रीवास्तव ऊर्फ ‘मुन्शी प्रेमचंद‘ – हिन्दी साहित्यिक. त्यांनी १५ कादंबर्‍या व ३०० कथा लिहील्या. 

◆१८७२ : लक्ष्मण रामचंद्र पांगारकर – संतसाहित्याचे अभ्यासक, चरित्रकार व गाथा संपादक 


    ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~

 🔹•••°°~°°••◆••°°~°°••🔹

●१९८० : मोहम्मद रफी – पार्श्वगायक, पद्मश्री 

●१९६८ : शतायुषी पंडित श्रीपाद दामोदर सातवळेकर – चित्रकार, संस्कृतपंडित, वेदांचे अभ्यासक-संशोधक विद्वान व लेखक. चारही वेदांच्या शुद्ध संहिता, महाभारत, सार्थ अथर्ववेद इ. ग्रंथ त्यांनी लिहिले.

●१८६५ : *जगन्नाथ ऊर्फ ’नाना’ शंकरशेठ* – दानशूर व शिक्षणतज्ञ 

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*🚦सतिष बोरखडे दारव्हा*

   💥📱7875840444💥

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..


     https://goo.gl/8D33ox

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

✪✪✫✪✫✪✫✪✫✪✫✪✪

*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂* 

 ━┅━▣◆★✧★◆▣═┅━


31. *✸ उंच उंच गगनात तिरंगा*

    ●●●●००००००●●●●

उंच उंच गगनात तिरंगा डौलाने फडकतो

हृदयातून जयहिंद,हृदयातून जयहिंद

भारतीय सूर एक नांदतो ||धृ||

  उंच उंच गगनात तिरंगाssss


भारत माता जन्मदायिनी अमृत पुत्रांची

राष्ट्रपुरुष घडविता भूमिका तुझी जिजाईची

तुझ्या कीर्तीचा अवनीवरती सुगंध दरवळतो ||१||

     उंच उंच गगनात तिरंगाssss


नंदनवन तू रम्य मनोहर समग्र विश्वाचे

वसुंधरा तू मुळात सुंदर प्रतिक ऐक्याचे

आम्रतरु जणू वात्सल्याची नित्य सावली देतो||२||

     उंच उंच गगनात तिरंगाssss


मनमंदिरी स्थान आईला,नित्य आम्ही दिधले

उत्थानासाव भारतभूच्या जीवन वेचू आपले

तिची कस्तुरी गंधित माती ,भाळावर लावतो ||३||

     उंच उंच गगनात तिरंगाssss


उंच उंच गगनात तिरंगा डौलाने फडकतो

हृदयातून जयहिंद,हृदयातून जयहिंद 

भारतीय सूर एक नांदतो

      उंच उंच गगनात तिरंगाssss 

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0७ ]      ❂ प्रार्थना ❂*

━┅━▣◆★✧★◆▣━┅━


31. *❂ देवा चांगली बुध्दी दे ❂*

  ━═●✶✹★●★✹✶●━━

*देवा, देवा चांगली बुध्दी दे*

*सर्वांशी प्रेमाने गोड बोलू दे..||धृ||*


*देवा, देवा चांगली बुद्धी दे*

मनातील कटुता दूर होवू दे

एकमेकांशी एकोप्याने राहू दे

मुखात सर्वांच्या गोडवा राहू दे..||१||


*देवा, देवा चांगली बुध्दी दे*

कोणालाही आळशी नको बनू दे

नवचैतन्य रक्तात उसळू दे

चांगले विचार मनात येवू दे

संघर्षाला तोंड देण्याची हिंमत दे..||२||


*देवा, देवा चांगली बुध्दी दे*

सर्वांना समान शिक्षण मिळू दे

शिक्षणातील भेदभाव दूर होवू दे

शिक्षणातील प्रगती होवू दे

आनंदाने शिक्षण सर्वांना घेवू दे..||३||


*देवा, देवा चांगली बुध्दी दे*

वेळेवर पाऊस येवू दे

शेतकऱ्यांची प्रगती होवू दे

सकस अन्न सर्वांना मिळू दे

आरोग्य सर्वांचे चांगले राहू दे...||४||


*देवा, देवा चांगली बुध्दी दे*

सुरक्षा जवानांची काळजी घे

देशावर हल्ले नको होवू दे......

देशाला सुरक्षित राहू दे

भारत देशाचे नाव उंचावू दे...||५||


*देवा, देवा चांगली बुध्दी दे*

गावात शांतता राहू दे

गावातील भेदभाव नष्ट होवू दे

जिव्हाळ्याचे संबंध राहू दे

गावात एकोपा राहू दे... ||६||


*देवा, देवा चांगली बुध्दी दे*

सर्वांना सुखात राहू दे

दु:ख वाट्याला नको येवू दे

आनंदाचे वातावरण राहू दे

सर्वांचेच कल्याण होवू दे...||७||

*देवा,देवा चांगली बुध्दी दे*

          *गीतरचना ✍🏻शांतीसुत*

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0८ ]    ❂ बोधकथा ❂*

━━●🇲=◆🇸◆=🇵●━━


31.   *❝ सूर्य आणि वायु ❞*

   ━━•●◆●★●◆●•═━

       *सूर्य आणि वारा यांच्यात आपापल्या पराक्रमाबद्दल एकदा पैज लागली.*


       जवळच्याच एका वाटसरूच्या अंगावरची घोंगडी त्याला काढून ठेवण्यास जो भाग पाडेल तो पराक्रमी समजावा असे ठरले.


       प्रथम वार्‍याने जोराने वाहून ती घोंगडी उडवण्याचा प्रयत्‍न केला. परंतु वार्‍यामुळे थंडी वाजून तो वाटसरू ती घोंगडी आणखीनच ओढून धरू लागला.


      शेवटी वारा दमला, नंतर सूर्याने आपली प्रखर किरणे वाटसरुच्या अंगावर सोडली. उन्हाने त्या माणसाला खूप उकडू लागले. घामाच्या धारा वाहू लागल्या तेव्हा त्याने ती घोंगडी काढून ठेवली व तो सावलीत जाऊन बसला.


      *🌀❝ तात्पर्य ❞ ::~* 

  *नुसत्या शक्तीचा उपयोग नाही.*

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*

━┅━▣◆★✧★◆▣━┅━


31. *"कोणत्याही क्षेत्रात नेत्रुत्व करणे म्हणजे हुकुमत गाजवने नसून, जबाबदारी स्वीकारून लोकांना, योग्य दिशा दाखवून, सोबत घेवुन प्रगती करणे होय..."* 

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*

━┅━▣◆★✧★◆▣━┅━


31. *✿ भौगोलिक माहिती प्रश्न ✿*

  ◑◑◑◆◑●★●◑◆◑◑◑

■ काॅफीचे मूळ स्थान कोणते ?

➜ सौदी अरेबिया


■ जगात बाॅक्साइटचे साठे सर्वांधिक कोणत्या देशात आहे ?

➜ गिनी


■ जगातील सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय महामार्ग कोणता ?

 ➜ पॅन अमेरिकन हायवे


■ जगातील सर्वात पहिली रेल्वे कोणत्या देशात सुरू झाली?

➜ इंग्लंड


■ जगात बाॅक्साइट उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक लागतो ?

➜ चौथा

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*

━━●🇲=◆🇸◆=🇵●━━


31. *❒ जगन्नाथ शंकरशेठ ❒*  

  ━═•●◆●★★●◆●•━━

    हे मराठी शिक्षणतज्ज्ञ, उद्योगपती होते. मुंबई शहराच्या घडणीत त्यांचा मोठा वाटा मानला जातो.

_*♦यांची आज पुण्यतिथी♦*_

         _त्यानिमित्त त्यांना_

      _*विनम्र अभिवादन..!!*_

   🙏🐾🌷🌹🌷🐾🙏

●जन्म :~ १० फेब्रुवारी १८०३*

*●मृत्यू :~ ३१ जुलै १८६५*


     🔷ठाणे जिल्ह्यातील मुरबाड हे त्यांचे मूळ गाव. त्यांना सार्वजनिक कार्याची आवड होती, त्यानुसार त्यांनी सार्वजनिक जीवनाच्या प्रमुख क्षेत्रांत सक्रिय सहभाग घेतला. मुंबई शहरातील अनेक सामाजिक व राजकीय संस्थांच्या उभारणीस त्यांनी हातभार लावला ज्यामध्ये “बॉम्बे असोसिएशन”,“बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी”,“एल्‌फिन्स्टन कॉलेज”,“ग्रेट मेडिकल कॉलेज”,“स्टुडंट्‌स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी” या सामाजिक व शैक्षणिक संस्थांचा समावेश होता. विशेष म्हणजे मुंबई विद्यापीठ आकाराला येण्यामागे नाना शंकरशेठ यांची दुरदृष्टी होती.नानांनी मुंबई विद्यापीठातर्फे १८६६ सालापासून जगन्नाथ शंकरशेठ संस्कृत शिष्यवृत्ती ही अत्यंत मानाची समजली जाणारी शिष्यवृत्ती सुरू केली ती आजतागायत सुरू आहे.


    🔶नाना शंकरशेठ काऊंसिलमध्ये असतानाच १८६४ साली मुंबई शहरातील जनतेला पायाभूत सुविधांबरोबर आरोग्य-सुखसोयी मिळवण्यासाठी मुंबईसाठी स्वतंत्र म्युनिसपल आयोग नेमला. त्याचे पुढे मुंबई म्युनिसिपल कॉपरेरेशनमध्ये रूपांतर केले गेले. आज मुंबई महानगरपालिकेचा जो भव्य-दिव्य वटवृक्षाचा डोलारा वाढला ते रोपटे नानांनी लावले होते. नानांनी इंग्रजांच्या व राजा राममोहन रॉय यांच्या साहाय्याने बालविवाह, सती या रुढी समाजाला किती घातक आहेत, हे ठिकठिकाणी व्याख्याने देऊन पटवून देण्याचे काम केले. अंधश्रद्धा आणि ताठर धार्मिक चालीरितींवर त्यांनी कठोर शब्दात टीका केली. या चालीरितींमुळे समाजाचे होत असलेले नुकसान त्यांनी समाजाच्या निदर्शनाला आणून दिले. याची दखल इंग्रजी राजवटीने घेऊन १८३०मध्ये इंग्रजांनी अंधश्रद्धेबरोबर जुन्या रुढींना आळा घालण्यासाठी सतीची चाल, बालविवाह या चाली कायद्याने बंद केल्या. तसेच विधवांना पुनर्विवाह करण्यासाठी कायद्याने संरक्षण दिले. अशा तर्‍हेने बालविवाह, सतीची चाल या हिंदू धर्मातील अरिष्ठ रुढींवर बंदी आणण्यात नानांचा मोलाचा वाटा होता.


   ♦ एकशेसाठ वर्षापूर्वी सामान्य माणसाला लांब पल्ल्याचा प्रवासासाठी आणि सामानाच्या वाहतुकीसाठी बैलगाडय़ातून प्रवास करावा लागत असे; ही;खडतर बाब ओळखून नानांनी स्वत: १८४३ साली आगगाडीची कल्पना प्रगतीपथावर नेणार्‍या ध्यासापायी ग्रेट ईस्टर्न कंपनीची स्थापना केली. या कंपनीचे कार्यालय गिरगावातील नानांच्या वाडय़ात होते. शेवटी नानांच्या दहा वर्षाच्या अथक प्रयत्नांमुळेच १६ एप्रिल १८५३ दिवशी बोरीबंदर ते ठाणे या लोहमार्गावरून केवळ भारतातलीच नव्हे, तर आशिया खंडातील पहिली रेल्वेगाडी धावली. या उद्घघाटन सोहळय़ाला प्रमुख पाहुण्यांचा व त्यामधुन प्रवास करण्याचा मान हा इंग्रजांनी नानांना दिलाच, पण त्याशिवाय प्रथम वर्गाचा सोन्याचा पास देऊन त्यांचा सन्मान देखील केला. तेव्हापासूनच नाना शंकरशेठ यांना “भारतीय रेल्वेचे जनक” म्हणून ओळखले जाऊ लागले. मध्य रेल्वेच्या मुख्य कार्यालयाच्या (सीएसटी) प्रवेशद्वाराच्या भिंतीवरील नानां शंकरशेठांचा पुतळा त्यांची साक्ष देतो.


     🔷पूर्वजांप्रमाणे भटभिक्षुकी न करता नानांनी व्यापार केला व अतिशय विश्वासू आणि प्रामाणिक व्यापारी असल्याची ख्याती मिळविली. त्यामुळे अनेक अरब, अफगाण तसेच इतर परदेशी व्यापारी आपली भारतातील मालमत्ता बँकांकडे न देता शंकरशेठ यांच्याकडे सोपवत. मुंबई शहराच्या विकासाचा पाया रचणार्‍या त्याचबरोबर मुंबई शहराच्या शैक्षणिक, सामाजिक व राजकीय व्यवस्थापनाची संकल्पना प्रत्यक्षात उतरवणार्‍या   

    *जगन्नाथ नाना शंकरशेठ यांना आधुनिक मुंबईचा शिल्पकार मानण्यात आले आहे.* 

▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄

••◎◑★✹🔅✹★◑◎••

        *✍ संकलन ✍*

*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*

♦📱7875840444♦

*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*

█║▌║█❃❂❃█║▌█


*❁बुधवार ~31/07/2024❁*

*⋐⋑⛯⋐⋑MSP⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment