"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

*02/08/24 शुक्रवारचा परीपाठ*

◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤

*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*

*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*


 *Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*


*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*


 *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*

 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ 


 *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*

 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ 


 *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*

*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*


 *💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*

*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*

       🔘 *"माझी शाळा"* 🔘

   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*

    🔗🔗👇👇🔗🔗


http://satishborkhade.blogspot.com/p/1_29.html

▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄

*0१ ]    ❂ आजचे पंचाग ❂*

  ━═●🇲◆🇸◆🇵●═━

🍥 *02. ऑगस्ट:: शुक्रवार* 🍥

 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━

आषाढ कृ. १३, पक्ष :कृष्ण पक्ष, 

तिथि ~त्रयोदशी, नक्षत्र ~आर्द्रा, 

योग ~हर्षण, करण ~वणिज, 

सूर्योदय-06:04, सूर्यास्त-19:20

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0२ ]       ❂ सुविचार ❂* 

  ━┅━═▣◆★✪★◆▣═━┅━


02. *चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देवमाणूस !*

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*

━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━


02.     *बाप तसा बेटा ,*

        *कुंभार तसा लोटा*

           *★ अर्थ ::~*

आईवडिलांप्रमाणे मुलाची वागणूक

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*

━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━


02. *आचार्यदेवो भव ।*

 ⭐अर्थ ::~ आचार्यांमध्ये देव पहा.

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*

━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━


     🛡 ★ 02. ऑगस्ट ★ 🛡

🔻====●●●★●●●====🔻

★हा या वर्षातील २१४ वा (लीप वर्षातील २१५ वा) दिवस आहे.


         ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~

 🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹

●२००१ : ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेतील विजेता पुल्लेला गोपीचंद याची भारतीय क्रीडाक्षेत्रातील सर्वाधिक प्रतिष्ठेच्या राजीव गांधी खेल रत्‍न पुरस्कारासाठी निवड.

●१९७९ : नगर जिल्ह्यातील डॉ. रजनीकांत आरोळे व त्यांच्या पत्‍नीला मॅगसेसे पुरस्कार जाहीर

●१९५४ : दादरा व नगर हवेली हा प्रांत भारतीयांनी पोर्तुगीजांकडुन ताब्यात घेतला.

●१७९० : अमेरिकेत पहिली जनगणना सुरू झाली.

 

    ~*★जन्मदिवस / जयंती★*~

     🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸

◆१९४१ : ज्यूल्स हॉफमन – नोबेल पारितोषिक विजेते फ्रेन्च जीवशास्त्रज्ञ

◆१९१० : पुरुषोत्तम शिवराम रेगे – कादंबरीकार, नाटककार, कवी आणि समीक्षक 

◆१८७६ : पिंगाली वेंकय्या – भारतीय तिरंग्याचा रचनाकार 

◆१८६१ : *आचार्य प्रफुल्लचंद्र रे*– भारतीय रसायनशास्त्रज्ञ, देशातील वैज्ञानिक चळवळीचे प्रणेते,  

त्यांना ’मास्टर ऑफ नायट्रेटस’ म्हणत असत. (मृत्यू: १६ जून १९४४)


      ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~

     🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹

●१९३४ : पॉल फॉन हिन्डेनबर्ग – जर्मनीचे दुसरे राष्ट्राध्यक्ष 

●१९२२ : अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल – स्कॉटिश - अमेरिकन पदार्थ वैज्ञानिक, टेलिफोनचा संशोधक

●१७८१ : सखारामबापू बोकील – पेशवाईतील मुत्सद्दी, साडेनीन शहाण्यांपैकी एक पूर्ण शहाणे

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*🚦सतिष बोरखडे दारव्हा*

   💥📱7875840444💥

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..


     https://goo.gl/8D33ox

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪

*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂* 

  ━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━


02. *✸अमुचा भारत देश महान..!*

           ●●●●●००००००●●●●●

अमुचा भारत देश महान

परदास्याची तुटे शृंखला सरला अंध:कार

नभी तिरंगी निशाण चढले करुया जयजयकार


स्वतंत्र झाली भारतमाता आम्ही तिचे संतान

अमुचा भारत देश महान !


स्वराज्य येथे सुराज्य व्हावे

रामराज्य या भूवर यावे

त्रिखंडात या अखंड राहो अजिंक्य हिदुस्थान

       अमुचा भारत देश महान !


या देशाला शिकवून भक्ती

गांधिजींनी केली मुक्ती

राष्ट्रपित्याने दिले अम्हाला चिरंजीव वरदान

अमुचा भारत देश महान !


गरीब कोणी, अमीर कोणी

या मातीला समान दोन्ही

माणुसकीचे पाईक आम्ही, नाही थोर लहान

अमुचा भारत देश महान ! 

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0७ ]      ❂ प्रार्थना ❂*

━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━


02. *❂ मराठीची गौरव गाथा.. ❂*

        ✶✶✹✹★●★✹✹✶✶

कथा,कविता,सुंदर गाणी

ओवी,भारूड,अभंगवाणी

दासांसंगे श्लोक मनाचे

नित्य गाते मराठी वाणी


केशवसुतांचा शूर शिपाई

बालकवीची ती फुलराणी

तांबे,बोरकर,कांतांसवे

गाणी गाते बहिणाबाई


शूरांच्या त्या शौर्य गाथा

बिरबल सांगे चतूर कथा

रहस्य,विज्ञान,विनोद,अवकाश

मराठीचा भरला भाता


सोळा स्वरांची दुनिया सगळी

व्यंजन चौतीस सारी सजली

शब्दांपुढती विभक्ती प्रत्यय

मराठी भाषा ऐसी बनली

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0८ ]    ❂ बोधकथा ❂*

━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━


02.    *❝ बंध विश्वासाचे ❞*

     ━━═•●◆●★●◆●•═━━        

       एकदा एक छोटी मुलगी आणि तिचे वडील एक पूल पार करत असतात.

        मुलगी पडेल, याची वडिलांना थोडी भीती वाटते आणि ते तिला म्हणतात...


        'बाळा, माझा हात धर’.

 

      मुलगी पटकन म्हणते, “नको बाबा, तुम्हीच माझा हात धरा’


    वडील कौतुकाने विचारतात, 

  “अगं बाळा, काय फरक पडतो?’


      मुलगी म्हणते, “खूप फरक पडतो बाबा. मी तुमचा हात धरला आणि मला काही झाले, तर मी पटकन हात सोडून देईन.


      पण मला माहितीय, तुम्ही माझा हात धरला असताना काहीही झालं तरी तो सोडणार नाही.’      


         *🌀❝ तात्पर्य ❞ ::~* 

     कोणत्याही नात्यामधील विश्‍वास बंधनकारक नसतो, तर तो एक न तुटणारा बंध असतो.

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*

━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━


02. *समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे अधिक*

      *भयानक असतात म्हणुन*

*मनातल्या गोष्टी जवळच्या व्यक्तींना*

        *नक्की सांगा कारण*

   *त्याने मन हलके तर होईलच आणि लढण्याची ताकद पण येईल...!*

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*

━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━


02. *✿सामान्य ज्ञान प्रश्नावली✿*

   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑


✪  संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोठे आहे ?

➜ मुंबई.


 ✪  विमानाचा शोध कोणी लावला ?

➜ राईट बंधू.


 ✪  'बालकवी' या टोपण नावाने कोणाला ओळखले जाते ?

➜ त्र्यंबक बापूजी ठोंबरे.


 ✪  भारताचा सर्वोच्च खेळ पुरस्कार कोणता ?

➜ अर्जून पुरस्कार.


✪  डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना कोणत्या संस्थेने बाॅर - अँट - लाॅ ही पदवी बहाल केली ?

➜ ग्रेज इन.

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*

━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━


02. *❒ अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल ❒*  

     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━

●जन्म :~ ३ मार्च १८४७,*

          एडिनबरा, स्कॉटलंड

*●मृत्यू :~ २ ऑगस्ट १९२२*


      ♦अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल

 यांचे सगळ्यात महत्त्वाचे संशोधन म्हणजे दूरध्वनी. दूर अंतरावर असलेल्या आपल्या प्रिय व्यक्तीचा आवज काही सेकंदात आपल्यापर्यंत पोहोचविणारे यंत्र असावे असे वाटत असल्याने बेल यांनी दूरध्वनी यंत्राचा शोध लावला.


    🔶मूक-बधिरांसाठी शिक्षण सुलभ व्हावे, त्यांना इतरांचे बोलणे कळावे यासाठी अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल सतत प्रयत्नशील होते. त्यासाठी बोस्टन विद्यापीठात स्वरयंत्राचे कार्यशास्त्र शिकविण्यासाठी नेमण्यात आले. तेथेच बधिरांसाठी यंत्र तयार करण्याचे प्रयत्न बेल करीत होते. असे यंत्र बनविण्याच्या पयत्नात बेल असतांनाच ते मेबल ह्यूबर्ड नावाच्या कर्ण बधिर मुलीच्या प्रेमात पडले आणि तिच्याशी त्यांचा विवाह झाला. पत्नीला बेलच्या यंत्राविषयी कळल्यावर तिनेच ओठांची हालचाल वाचता येणे हाच बधिरांसाठी कसा सर्वोत्तम पर्याय आहे हे पटवून सांगितले. मग बेल यांनी तसे यंत्र बनविण्याचे प्रयत्न सुरू केले आणि त्यातच दूरध्वनी यंत्राचे कोडे उलगडले.


    🔷बेल यांनी माणसाच्या स्वरयंत्राचा आणि कानाचा अभ्यास करून पहिले दूरध्वनी यंत्र तयार केले. दि. २ जून १८७५ या दिवशी आपले सहकारी वॉटसन यांच्यासह काम करीत असतांना दुसऱ्या खोलीतील वॉटसन यांच्या हाताच्या धक्याने ट्रान्समीटर थरथरला, तो लहानसा आवाजही बेल यांना ऐकू आला. मग बेल यांनी आपल्या ट्रान्समीटरचा उपयोग करून सहकारी वॉटसन यांना आपल्या खोलीत येण्याविषयी सांगितले. बेल यांचा तो संदेश सहकारी वॉटसन यांनी ऐकून तसा प्रतिसाद दिल्यावर संदेशाची देवाणघेवाण झाल्याबद्दल दोघांची खात्रीच पटली. बेल आणि वॉटसन यांनी या यंत्रावर आणखी प्रयोग करून दि. १५-०२-१८७६ या दिवशी आपल्या यंत्राचे पेटंट घेण्यासाठी अर्ज दाखल केला. तेव्हा पेटंट कार्यालयातच बेल यांना समजले की अशाच प्रकारच्या प्रयोगासाठी आणखी चार अर्ज पेटंट कार्यालयात पडून होते. हे पेटंट युद्ध बराच काळ सुरू होते, शेवटी बेल यांना दूरध्वनी यंत्राचे पेटंट मिळाले.


    🔶बेल यांनी तयार केलेल्या आपल्या यंत्राचे प्रयोग अमेरिकेत आणि युरोपमध्ये केले. त्यानुसार नोव्हेंबर १८७७ साली बेल यांना बर्लीन शहरात दूरध्वनीचे जाळे पसरविले. १८८५ साली बेल यांनी द अमेरिकन टेलिफोन अँड टेलिग्राफ कंपनीची स्थापना केली. नंतर ही कंपनी बेल टेलिफोन कंपनी म्हणून ओळखली जावू लागली.


    🔷दि. २ ऑगस्ट १९२२ या दिवशी बेल यांचे निधन झाले. त्यांना श्रद्धांजली म्हणून समस्त अमेरिकेतील दूरध्वनी संच एक मिनीट बंद ठेवण्यात आले.


    🔶विज्ञान विषयक सर्व प्रकारची माहिती नियतकालिकारुपाने जगाच्या समोर यावी या हेतुने १८८२ साली बेल यांनी सायन्स नावाचे नियतकालिक सुरू करण्यात पुढाकार घेतला तसेच आपल्याजवळील पैसा लावून हे नियतकालिक आठ वर्षे सतत सुरू ठेवले. पुढे हे नियतकालिक अमेरिकन असोसिएशन फॉर द ऍडव्हान्समेंट ऑफ सायन्स या संस्थेचे अधिकृत नियतकालिक झाले.

१८९८ ते १९०४ या काळात बेल नॅशनल जिओग्राफिक सोसायटीचे अध्यक्ष होते. 

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••

          *✍ संकलन ✍*

*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*

   ♦📱 7875840444 ♦

 *✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*

█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌


 *❁शुक्रवार~ 02/08/2024❁*

*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment