"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

 *17/07/24 बुधवारचा परीपाठ*

◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤

*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*

*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*


 *Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*


*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*


 *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*

 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ 


 *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*

 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ 


 *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*

*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*


 *💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*

*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*

       🔘 *"माझी शाळा"* 🔘

   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*

    🔗🔗👇👇🔗🔗


https://urlzs.com/dmQmp

▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄

*0१ ]    ❂ आजचे पंचाग ❂*

  ━═●🇲◆🇸◆🇵●═━

🍥 *17. जुलै:: बुधवार* 🍥

 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━

आषाढ शु.११, पक्ष :शुक्ल पक्ष,

तिथि ~एकादशी, नक्षत्र ~अनुराधा, 

योग ~शुभ, करण ~वणिज, 

सूर्योदय-06:10, सूर्यास्त-19:19,

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0२ ]   ❂ सुविचार ❂* 

━┅═▣◆★✪★◆▣═┅━


17. *आयुष्यातला खरा आंनद भावनेच्या ओलाव्यात असतो.*

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*

━━●🇲=◆🇸◆=🇵●═━


17. *आंधळा दळतो ,कुत्रं पीठ खातो*

                *★अर्थ ::~* 

   एकाने काम करावे आणि दुसऱ्याने त्याचा फायदा घ्यावा.

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*

━┅━▣◆★✧★◆▣═┅━


17. *विद्यारत्नं महद्धनम् ।"*

            ⭐अर्थ ::~

 विद्यारूपी रत्न हे एक मोठे धन आहे.

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*

━━●🇲=◆🇸◆=🇵●━━


         🛡 *17. जुलै* 🛡

🔻===●●●★●●●===🔻

★हा या वर्षातील १९८ वा (लीप वर्षातील १९९ वा) दिवस आहे.


     ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~

🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹

●२००० : अभिनेत्री व नृत्यांगना वैजयंतीमाला बाली यांना’भरतनाट्य शिखरमणी’ पुरस्कार जाहीर

●१९९४ : विश्वकप फूटबॉलच्या अंतिम सामन्यात ब्राझिलने इटालीला पेनल्टी शूटआऊटमधे हरवले.

●१९९३ : तेलगू भाषेतील प्रतिष्ठेचा मानला जाणारा 'तेलगू थल्ली' हा सर्वोच्‍च पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांना प्रदान

●१९५५ : वॉल्ट डिस्‍ने यांनी अ‍ॅनाहेम, कॅलिफोर्निया येथे ’डिस्‍नेलँड’ सुरू केले.

●१८०२ : मोडी लिपीतून पहिल्यांदाच मुद्रण करण्यात आले.


    ~*★जन्मदिवस / जयंती★*~

 🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸

◆१९५४ : अँजेला मेर्केल – जर्मनीच्या चॅन्सेलर

◆१९३० : बाबुराव बागूल – दलित साहित्यिक 

◆१९१९ : स्‍नेहल भाटकर – संगीतकार 

◆१८८९ : अर्ल स्टॅनले गार्डनर – अमेरिकन लेखक आणि वकील 


      ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~

🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹

●२०१२ : मृणाल गोरे – समाजवादी नेत्या आणि ६ व्या लोकसभेच्या सदस्य 

●१९९२ : शांता हुबळीकर – प्रभातच्या ’माणूस’ चित्रपटामुळे गाजलेल्या अभिनेत्री, पुणे महापालिकेतर्फे ’बालगंधर्व पुरस्कार’

●१९९२ : काननदेवी – बंगाली व हिंदी चित्रपटातील अभिनेत्री व गायिका 

●१७९० : *अ‍ॅडॅम स्मिथ – स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ आणि तत्त्ववेत्ता*

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*🚦सतिष बोरखडे दारव्हा*

   💥📱7875840444💥

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..


     https://goo.gl/8D33ox

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

✪✪✫✪✪✫★✫✪✪✫✪✪

*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂* 

 ━┅━▣◆★✧★◆▣━┅━


17. *✸ भारत अमुचा देश ✸*

   ●●●●००००००●●●●

भारत अमुचा देश, भारत अमुचा देव

'भारत अमुचा सत्यधर्म' हा मंत्र जपू हा एक

भारतीय मी आहे आधी, आपण सारे एक


आम्ही मराठी, आम्ही गुर्जर, मद्रासी, आम्ही हिंदी

प्रांत आमुचा भाषा आमुची श्रेष्ठचि सर्वांमधी

दुराभिमाना देऊ असल्या पूर्ण छेदती रेघ


धर्म-जातिच्या, जुन्या मनूच्या, जुन्या कल्पना सोडू

उच्चनीचता गाडुन टाकू जाचक रुढिंना तोडू

विशाल भारत स्वप्‍नी त्याचा साकारू आलेख


प्रांत, देश, या पुढेहि जाऊ, पुजु या मानवतेला

मित्र जगाचे सार्‍या होऊ, मित्र करू या त्याला

सत्य, अहिंसा, शांती यांचा संगम साधु सुरेख

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0७ ]      ❂ प्रार्थना ❂*

━┅━▣◆★✧★◆▣═┅━


17. *❂ शारदे हवे तुझे वरदान ❂*

   ━━●✶★●★✹✶●━━

*शारदे हवे तुझे वरदान ll धृ ll*  

मानवतेची गावी गाणी,

अशी आम्हा दे जिवंत वाणी l

अन्यायाचे दर्शन होता,उसळो त्वेष उधान ll१ll

*शारदे हवे*.......


स्वतंत्र भारतभूचे वैभव ,सामर्थ्याने नटलेले नव,

उच्छवासाचा प्रबंध व्हावा, गाता भारत गान ll२ll

*शारदे हवे*.......


मराठीयेची नगरी आम्ही शिल्पकार की रचनाप्रेमी 

जीवन मंदीर उभवू सुंदर हा अमुचा

अभिमान ll३ll

*शारदे*..........


उकलायाला जीवनशास्त्रे,पहावया नव विक्रमक्षेत्रे

दिव्यदृष्टी दे करावयाला उन्नत जीवन मान ll४ll

*शारदे हवे*........


दिवंगतांच्या अतृप्त आशा,पूर्ण कराया अशी मनीषा,

भीष्मकामना निववाया दे,अर्जुन शर संधान ll५ll

*शारदे हवे*.......


नव्या युगाची नवीन सृष्टी नव्या मानवा दे नव दृष्टी

हवा शारदे नवा वीरंची नवचातुर्य निधानll६ll

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0८ ]    ❂ बोधकथा ❂*

━━●🇲=◆🇸◆=🇵●━━


17.  *❃❝ श्रमाचे महत्त्व ❞❃*

  ━•●◆●★◆★●◆●•━

      "धनासेठचा मुलगा  खूपच आळशी होता. घरात गडगंज संपत्ती व एकुलता एक लाडाचा त्यामुळे काम कधी करावंच लागलं नाही. तो आता २१ वर्षाचा झाला होता. शेठजींना काळजी पडली. याचे असे दे हरी पलंगावरी किती दिवस चालणार कसे होणार साठलेला पैसा किती दिवस पुरेल. 


     दुसऱ्या दिवशी, त्यांनी मुलाला बोलावले व म्हणाले, 'हे बघ राम आज तू सकाळीच बाहेर जा. काहींतरी काम करून पैसे मिळवुन आण तरच तुला जेवायला मिळेल.' 


       मुलाला काहीच कळेना. तो बहिणीकडे गेला तिने त्याला एक रूपया दिला. त्याने तो शेठजींचा हातावर ठेवला तर शेठजींनी तो विहीरीत फेकून दिला. 


       दुसर्‍या दिवशी, आईकडून त्याला एक रूपया मिळाला. त्याने तो शेठजींचा हातावर ठेवला तर शेठजींनी पुन्हा तो विहीरीत फेकून दिला. 


      तिसर्‍या दिवशी, मात्र कोणीही पैसे द्यायचे नाहीत हे उमजल्यावर स्वारी घराबाहेर काम शोधायला पडली. पण काय काम करणार? बारा वाजेपर्यंत हिंडला. काम मिळेना. पोटात कावळे कोकलायला लागले. 


       स्टेशनवरून एक जड बॅग घेऊन येणारा प्रवासी माणूस  दिसला, त्याला हमाल हवा होता. हा धावत पुढे गेला. 'साहेब, इकडे आणा'. 


       ती बॅग त्याने डोक्यावर उचलली. घामाघूम झाला. साहेबांनी आठ आणे हातावर ठेवले. घरी आला. शेठजींच्या हातावर आठ आणे ठेवले. दोन दिवसाप्रमाणेच शेठजींनी ते विहीरीत फेकले हा चवताळून उठला. 'बाबा अहो तेवढे आठ आणे मिळवायला मला किती वणवण करावी लागली आणि तुम्ही ते फेकून दिलेत ?' 


      शेठजींनी त्याला जवळ घेतले. पाठीवरून हात फिरवला, 'बाळा आता मला काही काळजी नाही कारण खर्‍या कष्टाची किंमत तुला आज कळली आहे. 


     दोन दिवस ह्याच्या दुप्पट रक्कम मी फेकली पण तुला राग आला नव्हता, कारण त्या मागे तुझे कष्ट नव्हते.' 


         *🌀❝ तात्पर्य ❞ ::~* 

      "स्वकष्टाची कमाई तीच खरी कमाई. श्रमाचे महत्त्व तेव्हाच कळते जेव्हा आपण स्वतः कमवतो. "

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*

━┅━▣◆★✧★◆▣═┅━


 17.  सर हा शब्द पाश्चात्य देशात वरिष्ठांना किंवा मालक या अर्थाने वापरला जातो. पण *ज्ञान देणारा या अर्थाने मात्र teacher, tutor असे शब्दप्रयोग केले जातात.*


     *शिक्षक ज्ञान देण्याचे महान कार्य करत असल्याने , त्यांच्यासाठी​ "गुरू" हेच संबोधन योग्य आहे.*

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*

━┅━▣◆★✧★◆▣━┅━


17. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*

   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑


 ✪  भारताची प्रथम महिला प्रधानमंत्री कोण ?

  ➜ इंदिरा गांधी.


 ✪  तिरूपती बालाजी हे ठिकाण देशातील कोणत्या राज्यात आहे ?

  ➜ आंध्रप्रदेश.


 ✪  हेलिकॉप्टरचा शोध कोणी लावला ?

  ➜ इगोर सिकोसकी.


  ✪ महाराष्ट्रातील लेण्यांचा जिल्हा कोणता ?

  ➜ औरंगाबाद.


 ✪  राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या अध्यक्ष कोण ?

  ➜ जयंती पटनायक

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*

━━●🇲=◆🇸◆=🇵●━━


17.   *❒ ♦ॲडम स्मिथ ♦ ❒*  

 ━━•●◆●★★●◆●•━━

●जन्म - १६ जून १७२३, 

*●मृत्यू - १७ जुलै १७९०*


      हे स्कॉटलंडचे एक तत्त्वज्ञ होते. राजकीय अर्थशास्त्राचा पाया त्यांनी रचल्याचे मानले जाते. त्यांचा जन्म स्कॉटलंडमधील कर्ककाल्डी या गावी झाला. त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ ग्लासगो मध्ये सामाजिक तत्त्वज्ञान विषयाचा अभ्यास केला. त्यांचे "अ‍ॅन एन्क्वायरी इंटू द नेचर अ‍ॅन्ड कॉजेस ऑफ द वेल्थ ऑफ नेशन्स" हे पुस्तक अर्थशास्त्राच्या इतिहासातील महत्वाचा टप्पा मानले जाते. तसेच त्याच्या व्याखेवरील टीका सुद्धा आहे.


      अर्थशास्त्र एक सामाजिक शास्त्र असून ते 'सेवा व उत्पादनांच्या' निर्मिती, वितरण आणि वापर या विषयाची माहिती देते. इंग्रजीत अर्थशास्त्राला एकॉनॉमिक्स (Economics) म्हणतात. अर्थशास्त्राच्या विद्वान अभ्यासकांना अर्थशास्त्रज्ञ किंवा अर्थतज्ज्ञ असे म्हणतात. *अर्वाचीन अर्थशास्त्राची सुरुवात ॲडम स्मिथ यांच्या इ.स. १७७६ मधील वेल्थ ऑफ नेशन्स पासून झाली.* अर्थशास्त्राचे अनेक विभाग/प्रकार विविध निकषानुसार पाडले गेले आहेत. समग्रलक्षी अर्थशास्त्र मोठ्या आर्थिक प्रश्न, देश-राज्य इत्यादी मोठ्या संस्थांचे आर्थिक व्यवहार प्रश्न इत्यादींबाबत चर्चा करते तर अल्पलक्षी अर्थशास्त्र एखादा माणुस, कुटुंब किंवा एखादी आर्थिक संस्था इत्यादींचे व्यवहार प्रश्नांबाबत माहिती देते.

▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄

••◎◑★✹🔅✹★◑◎••

        *✍ संकलन ✍*

*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*

♦📱7875840444♦

*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*

█║▌║█❃❂❃█║▌█


*❁बुधवार ~17/07/2024❁*

*⋐⋑⛯⋐⋑MSP⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment