"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

 *25/07/24 गुरूवारचा परीपाठ*

◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤

*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*

*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*


 *Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*


*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*


 *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*

 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ 


 *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*

 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ 


 *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*

*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*


 *💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*

*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*

       🔘 *"माझी शाळा"* 🔘

   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*

    🔗🔗👇👇🔗🔗


https://urlzs.com/dmQmp

▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄

*0१ ]    ❂ आजचे पंचाग ❂*

  ━═●🇲◆🇸◆🇵●═━

🍥 *25. जुलै:: गुरूवार* 🍥

 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━

आषाढ कृ. ५, पक्ष :कृष्ण पक्ष, 

तिथि ~पञ्चमी, नक्षत्र ~पूर्वाभाद्रपदा, 

योग ~शोभन, करण ~कौलव, 

सूर्योदय-06:12, सूर्यास्त-19:16,

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0२ ]   ❂ सुविचार ❂* 

━┅▣◆★✪★◆▣┅━


25 *दुसऱ्यांच्या गुणाचं कौतुक करायलाही मन मोठं लागतं.*

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*

━━●🇲=◆🇸◆=🇵●━━


25. उंटावरून शेळ्या हाकणे –

         *★ अर्थ ::~* 

 आळस, हलगर्जीपणा करणे

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*

━┅━▣◆★✧★◆▣━┅━


25.    *सेवाधर्मः परमगहनो योगिनामप्यगम्यः ।*

⭐अर्थ ::~ दुसर्‍यांची सेवा करणे हे फार कठिण काम आहे. मोठमोठ्या योग्यांना देखिल हे दुःसाध्य आहे.

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*

━━●🇲=◆🇸◆=🇵●━━


        🛡 *25. जुलै* 🛡

🔻===●●●★●●●===🔻

★हा या वर्षातील २०६ वा (लीप वर्षातील २०७ वा) दिवस आहे.


        ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~

 🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹

●२०२२ :भारताच्या पंधराव्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू शपथ ग्रहण..

●२००७ : भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून श्रीमती प्रतिभा पाटील यांचा शपथविधी

●१९९९ : लान्स आर्मस्ट्राँगने आपली पहिली टूर डी फ्रान्स सायकल शर्यत जिंकली.

●१९९७ : के. आर. नारायणन भारताचे १० वे, पहिले दलित आणि पहिले मल्याळी राष्ट्रपती बनले.

●१९९७ : इजिप्तचे अध्यक्ष मोहम्मद होस्‍नी मुबारक यांची १९९५ च्या आंतरराष्ट्रीय सामंजस्यासाठी दिल्या जाणार्‍या जवाहरलाल नेहरू पुरस्कारासाठी निवड

●१९९२ : स्पेनमधील बार्सिलोना येथे २५ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.


    ~*★जन्मदिवस / जयंती★*~

    🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸

◆१९२९ : सोमनाथ चटर्जी – लोकसभेचे सभापती आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते

◆१९२२ : विश्वनाथ वामन तथा वसंत बापट – कवी व संगीतकार 

◆१९१९ : सुधीर फडके ऊर्फ ’बाबूजी’ –गायक व  संगीतकार 

◆१८७५ : जिम कॉर्बेट – ब्रिटिश -भारतीय वन्यजीवतज्ञ, शिकारी व लेखक 


      ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~

   🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹

●२०१२ : बी. आर. इशारा – चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथालेखक 

●१९७७ : कॅप्टन शिवरामपंत दामले – पुण्यातील महाराष्ट्रीय मंडळाचे संस्थापक, लष्करी शिक्षणाचे प्रसारक 

●१८८० : गणेश वासुदेव जोशी उर्फ ’सार्वजनिक काका’ – 

(जन्म: ९ एप्रिल १८२८)

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*🚦सतिष बोरखडे दारव्हा*

   💥📱7875840444💥

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..


     https://goo.gl/8D33ox

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

✪✪✫✪✫✪✫✫✪✫✪✫✪✪

*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂* 

 ━┅━▣◆★✧★◆▣═┅━


25. *✸आला किनारा आला किनारा*

     ●●●●००००००●●●●

आला किनारा, आला किनारा

निनादें नभीं नाविकांनो इशारा


उद्दाम दर्यामधे वादळी

जहाजे शिडावून ही घातली

जुमानीत ना पामरांचा हकारा


प्रकाशें दिव्यांची पहा माळ ती

शलाका निळ्या-लाल हिंदोळती

तमाला जणु अग्‍नीचा ये फुलोरा


जयांनी दलें येथ हाकारली

क्षणासाठी या जीवनें जाळली

सुखेनैव स्वीकारुनी शूल-कारा


तयांच्या स्मृती गौरवे वंदुनी

उभे अंतीच्या संगरा राहुनी

किनार्‍यास झेंडे जयाचे उभारा

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0७ ]      ❂ प्रार्थना ❂*

━┅━▣◆★✧★◆▣━┅━


25. *❂ मुखी तुझे नाम राहो ❂*

  ━━●✶✹★●★✹✶●━━

तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम

देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम


देहधारी जो-जो त्यासी विहित नित्यकर्म

सदाचार नीतिहुनी आगळा ना धर्म

तुला आठवावे, गावे, हाच एक नेम


तुझे नाम पांडुरंगा सर्व ताप नाशी

वाट प्रवासासी देती स्वये पाप राशी

दिसो लागली तू डोळा अरूपी अनाम


तुझ्या पदी वाहिला मी देहभाव सारा

उडे अंतराळी आत्मा सोडुनि पसारा

नाम तुझे घेतो गोरा म्हणूनी आठयाम

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0८ ]    ❂ बोधकथा ❂*

━━●🇲=◆🇸◆=🇵●━━


25. *❝उंदीर,कोंबडा आणि मांजर❞*

   ━━•●◆●★◆★●◆●•━

     एका उंदिराचे पिटुकले पहिल्यांदाच आपल्या बिळातून बाहेर पडले होते. ते इकडे तिकडे फिरून पुन्हा बिळात गेल्यावर आपल्या आईस म्हणते, "आई, ज्या या लहानशा जागेत लहानाचे मोठे केले, ती जागा सोडून आज मी अंमल बाहेर जाऊन आलो. तेथे मी जी फौज पाहिली, ती काही विलक्षणच. रस्त्याच्या बाजूने फिरत असता, मी दोन प्राणी पाहिले, त्यापैकी एक प्राणी फार गडबड्या स्वरुपाचा असून त्याच्या डोक्यावर तांबड्या रंगाचा तुरा आहे. तो प्राणी जेव्हा जेव्हा आपली मान हालवी, तेव्हा तेव्हा तो तुराही हालत असे. मी त्याची ही मौज पहात आहे, इतक्यात त्याने आपले दोन्ही हातही हालविले आणि असा काही कर्कश्श शब्द केला, की त्याने माझ्या कानठळ्याच बसून गेल्या आणि दुसऱ्या प्राण्याची गोष्ट ऐक. तो प्राणी फार सभ्य आणि शांत असून, त्याच्या अंगावर रेशमासारखी मऊ लोकर होती. तो चांगला देखणा असून त्याचे एकंदर वर्तन असे होते, की मला त्याच्याशी आपली मैत्री व्हावी असे वाटल्याशिवाय राहिले नाही.' हे भाषण ऐकून उंदरी त्यास म्हणाली, "वेड्या पोरा! तुला काडीचीही अक्कल नाही. नुसत्या दिखाऊपणावर जाशील तर फसशील, हे लक्षात ठेव. तू जो प्राणी पाहिला आहे तो लबाड व क्रूर मांजर आहे. उंदराच्या मांसाशिवाय दुसरा कोणताही पदार्थ त्याला फारसा आवडत नाही, हे लक्षात ठेव.


      *🌀❝ तात्पर्य ❞ ::~* 

    बाह्य देखावा आणि सौंदर्य यावरुन मानसाच्या अंतरंगाची परिक्षा होणे शक्य नाही. 

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*

━┅━▣◆★✧★◆▣═┅━


25.    *चुकीच्या निर्णयामुळे अनुभव वाढतो.. आणि योग्य निर्णयामुळे आत्मविश्वास...*

   *म्हणून निर्णय चुक कि बरोबर विचार करायचा नाही..निर्णय घ्यायचा अनं पुढे जायचं...*


   *"जीवनात एक क्षण रडवून जाईल तर दुसरा क्षण हसवून जाईल"...*


    *या जीवनरूपी प्रवासात येणारा प्रत्येक क्षण जीवन जगण्याची कला शिकवून जाईल...!!*

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*

━┅━▣◆★✧★◆▣━┅━


25. *✿ वैज्ञानिक माहिती प्रश्न ✿*

    ◑◑◑◆◑●★●◑◆◑◑◑

■ अल्कोहोलचा गोठणबिंदू किती असतो ?

 ➜ 117 अंश C


■ रबराच्या अंगी कोणता गुणधर्म असतो ?

 ➜ प्रत्यास्थता


■ वातावरणातील दाब मोजण्याचे साधन कोणते ?

➜ बॅरोमिटर


■ रसायन शास्त्राचा जनक कोणास म्हणतात ?

➜ राॅबर्ट बाॅईल


■ पेशी- हे नाव प्रथम कोणत्या शास्त्रज्ञाने वापरले ?

➜ राॅबर्ट हूक

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*

━━●🇲=◆🇸◆=🇵●━━


25.  *❒ गणेश वासुदेव जोशी ❒*     ━━•●◆●★◆★●◆●•━

       हे मराठी समाजसुधारक, 

      सामाजिक कार्यकर्ते होते.

      ◆यांची आज पुण्यतिथी◆

            त्यानिमित्त त्यांना 

        *विनम्र अभिवादन..!!* 

 🙏🐾🌷🌹🌹🌷🐾🙏

●जन्म :~ २० जुलै  १८२८ 

*●मृत्यू :~ २५ जुलै  १८८०*


    *गणेश वासुदेव जोशी ऊर्फ*

         *सार्वजनिक काका*

     समाजसुधारक, राष्ट्रवादी विचारसरणीचे व स्वदेशी चळवळीचे प्रणेते आणि पुणे सार्वजनिक सभेचे संस्थापक आहेत.

     यांचा जन्म सातारा येथे वडिलोपार्जित घरात  झाला. सर्व भावंडात ते धाकटे होते. त्यांचे बालपण सातारा या शहरी गेले. प्राथमिक शिक्षण, मुंज, लग्न हेही सातारी येथेच झाले. वयाच्या विसाव्या वर्षापर्यंत ते सातारा येथे होते. इ.स. १८४८ साली ते पुण्यास आले आणि त्यांनी नाझर कोर्टात नोकरी धरली. यानंतर आयुष्यभर पुणे हेच त्यांच्या वास्तव्याचे क्षेत्र होते. त्यांना एकूण ५२ वर्षांचे आयुष्य लाभले. इ.स. १८४८ ते इ.स. १८६९ हा सुमारे बावीस वर्षांच्या काळात त्यांनी नोकरी, ती सोडल्यावर वकिली आणि सार्वजनिक कार्यातील उमेदवारी केली. यानंतरची १० वर्षं त्यांच्या आयुष्यात महत्त्वाची ठरली.

    शेतकी व आरोग्य हे त्यांचे आवडते विषय होते. शास्त्रीय ज्ञानाची जोड देऊन शेतीत नवे प्रयोग करावेत व संशोधन करावे असे त्यांना वाटत असे.

   'पुणे सार्वजनिक सभे'च्या स्थापनेत पुढाकार घेऊन या संस्थेतर्फे गणपतरावांनी जी विधायक व समाजोपयोगी कामे केली, त्यामुळे त्यांना 'सार्वजनिक काका' ही बिरुदावली लाभली. राजकारणाचे आद्यपीठ किंवा कांग्रेसची जननी म्हणता येईल अशी 'सार्वजनिक सभा' ही जनतेची गार्‍हाणी सरकारदरबारी आणि वेशीवर टांगणारी क्रियाशील संस्था होती. इ.स. १८७० ते इ.स. १९२० या पन्नास वर्षांच्या काळात, विशेषतः इ.स. १८९६ - ९७ पर्यंत सार्वजनिक सभेचा राजकीय क्षेत्रावर चांगला प्रभाव होता. या संस्थेचे पालनपोषण पहिली दहा बर्ष मुख्यतः सार्वजनिक काकांनी केले. तिच्यामार्फत विविध उपक्रम करून त्यांनी लोकजागृती केली. सभेचे कार्य घटनानियमांनुसार जरी चालू होते तरी तिच्या सर्व कार्यामागे काकांची प्रेरक शक्ती होती.

   वासुदेव बळवंत फडक्यांच्या खटल्यांचे वकीलपत्र घेणारे गणेश वासुदेव उर्फ सार्वजनिक काका जोशी हे न्या. रानडे यांचे चांगले स्नेही होते..

▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄

••◎◑★✹🔅✹★◑◎••

        *✍ संकलन ✍*

*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*

♦📱7875840444♦

*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*

█║▌║█❃❂❃█║▌█


*❁गुरूवार~25/07/2024❁*

*⋐⋑⛯⋐⋑MSP⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment