"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

 *14/07/24 रविवारचा परीपाठ*

◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤

*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*

*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*


 *Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*


*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*


 *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*

 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ 


 *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*

 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ 


 *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*

*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*


 *💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*

*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*

       🔘 *"माझी शाळा"* 🔘

   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*

    🔗🔗👇👇🔗🔗


https://urlzs.com/dmQmp

▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄

*0१ ]    ❂ आजचे पंचाग ❂*

  ━═●🇲◆🇸◆🇵●═━

🍥 *14. जुलै:: रविवार* 🍥

 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━

आषाढ शु.८, पक्ष :शुक्ल पक्ष,

तिथि ~अष्टमी, नक्षत्र ~चित्रा, 

योग ~शिव, करण ~बव, 

सूर्योदय-06:08, सूर्यास्त-19:19,

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0२ ]   ❂ सुविचार ❂* 

━┅═▣◆★✪★◆▣═┅━


14. *नेहमी तत्पर रहा; बेसावध आयुष्य जगू नका.*

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*

━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━


14. *शिंक्याचे तुटले बोक्याचे पिकले*

      ★ अर्थ ::~ कोण्या माणसाची वस्तु\जिन्नस त्याला भोगायला न मिळता अकल्पितपणे काही श्रम न करता दुसऱ्याला भोगायला मिळणे.

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*

━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━


14. *यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता: ।*   ⭐अर्थ ::~

      जेथे स्त्रियांना पूज्य मानले जाते तेथे देवता रममाण होतात.

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*

━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━


     *🛡 ★ 14. जुलै ★ 🛡*

🔻====●●●★●●●====🔻

★हा या वर्षातील १९५ वा (लीप वर्षातील १९६ वा) दिवस आहे.


        ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~

 🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹

●२०१३ : डाक व तार विभागाची १६० वर्षांपासुन सुरू असलेली तार (Telegram) सेवा बंद झाली.

●१८६७ : आल्फ्रेड नोबेल यांनी ’डायनामाईट’ या स्फोटकाचे यशस्वी परीक्षण केले.


    ~*★जन्मदिवस / जयंती★*~

  🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸

◆१९२० : शंकरराव चव्हाण – केंद्रीय अर्थमंत्री, गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री (मृत्यू: २६ फेब्रुवारी २००४)

◆१८८४ : यशवंत खुशाल देशपांडे – महानुभाव वाङमयाचे नामवंत संशोधक, १९३९ मधे झुरिच येथे झालेल्या जागतिक इतिहास परिषदेतील भारताचे प्रतिनिधी

◆१८५६ : *गोपाळ गणेश आगरकर* –  ’केसरी’चे पहिले संपादक, डेक्‍कन एज्युकेशन सोसायटीचे एक संस्थापक  समाजसुधारक,विचारवंत वशिक्षणतज्ञ, 


      ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~

 🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹

●२००८ : यशवंत विष्णू चंद्रचूड – सर्वोच्‍च न्यायालयाचे १६ वे सरन्यायाधीश 

●२००३ : प्रो. राजेंद्र सिंग ऊर्फ ’रज्जू भैय्या’ – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ४ थे सरसंघचालक 

●१९९३ : श्रीमंत विजयमाला राणीसाहेब – करवीर संस्थानच्या महाराणी, खासदार 

●१९६३ : स्वामी शिवानंद सरस्वती – योगी व आध्यात्मिक गुरू

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*🚦सतिष बोरखडे दारव्हा*

   💥📱7875840444💥

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..


     https://goo.gl/8D33ox

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪

*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂* 

 ━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━


14. *✸ उठा राष्ट्रवीर हो ✸*

     ●●●●●००००००●●●●●

सुसज्ज व्हा उठा चला, सशस्‍त्र व्हा उठा चला, उठा राष्ट्रवीर हो


युद्ध आज पेटले, जवान चालले पुढे

मिळुन सर्व शत्रूला क्षणात चारुया खडे

एकसंघ होऊनी लढू चला, लढू चला

उठा उठा, चला चला


वायुपुत्र होऊनी धरू मुठीत भास्करा

होऊनी अगस्तीही पिऊन टाकू सागरा

रामकृष्ण होऊ या, समर्थ होऊ या चला

उठा उठा, चला चला


चंद्रगुप्‍त वीर तो फिरुन आज आठवू

शूरता शिवाजीची नसानसांत साठवू

दिव्य ही परंपरा अखंड चालवू चला

उठा उठा, चला चला


यज्ञकुंड पेटले प्रचंड हे सभोवती

दुष्ट शत्रू मारुनी तयात देऊ आहुती

देवभूमी ही अजिंक्य दाखवू जगा चला

उठा उठा, चला चला

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0७ ]      ❂ प्रार्थना ❂*

━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━


14. *❂ गणपति स्तोत्र ❂*

   ━━═●✶✹★✹✶●═━━

गणपति: विघ्नराजो लम्बतुन्ड़ो गजानन:।

द्वै मातुरश्च हेरम्ब एकदंतो गणाधिप:॥

विनायक: चारूकर्ण: पशुपालो भवात्मज:।

द्वादश एतानि नामानि प्रात: उत्थाय य: पठेत्॥

विश्वम तस्य भवेद् वश्यम् न च विघ्नम् भवेत् क्वचित्।


विघ्नेश्वराय वरदाय शुभप्रियाय।

लम्बोदराय विकटाय गजाननाय॥

नागाननाय श्रुतियज्ञविभूषिताय।

गौरीसुताय गणनाथ नमो नमस्ते॥


शुक्लाम्बरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं।

प्रसन्नवदनं ध्यायेतसर्वविघ्नोपशान्तये॥

 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0८ ]    ❂ बोधकथा ❂*

━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━


14. *❝ व्‍यवहारज्ञानाचे धडे ❞*

     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━

        एका शहरात दररोज संध्‍याकाळी एक महात्‍मा प्रवचन देत असे. त्‍यांची ख्‍याती एका धान्‍याच्‍या व्‍यापा यानेही ऐकली होती. तो आपल्‍या मुलासोबत प्रवचन ऐकण्‍यास आला. प्रवचन सुरु झाल्‍यानंतर दोघेही लक्षपूर्वक ऐकत होते. काही ज्ञानाच्‍या गोष्‍टी सां‍गत असताना ते म्‍हणाले,’’या जगात जितके प्राणी आहेत. त्‍या सर्वांमध्‍ये आत्‍मा वावरत असतो.’’ ही गोष्‍ट व्‍यापा याच्‍या मुलाला हृदयस्‍पर्शी वाटली. त्‍याने मनोमन हा विचार आचरणात आणण्‍याचा संकल्‍प केला. दुस या दिवशी तो एका दुकानावर गेला तेव्‍हा त्‍याच्‍या वडिलांनी त्‍याला काही वेळ दुकान सांभाळण्‍यास सांगितले. ते स्‍वत दुस या कामासाठी बाहेर निघून गेले. त्‍यानंतर काही वेळाने तेथे एक गाय आली. दुकानासमोर ठेवलेले धान्‍य खाऊ लागली. मुलाने त्‍या गायीला हाकलण्‍यासाठी लाकूड उचलले पण त्‍याच्‍या मनात विचार आला. गाय आणि माणूस दोघांनाही जीव आहे.मग भेदभाव का मानायचा? ती धान्‍य खात असेल तर खाऊ दे. तेवढयात व्‍यापारी तेथे आले त्‍याने गायीला धान्‍य खाताना पाहून मुलाला म्‍हणाले,’’ अरे तुझ्यासमोर ती गाय धान्‍य खाते आहे? आणि तू आंधळा झाल्‍यासारखा गप्‍प बसून का आहेस? आपले किती नुकसान होते आहे याची काही कल्‍पना आहे की नाही? तिला हाकलून का दिले नाहीस?’’ मुलगा म्‍हणाला,’’ बाबा, काल तर महाराज म्‍हणाले की, सगळे जीव एकसारखे आहेत, मी गायीमध्‍ये पण एक जीव पाहिला’’ तेव्‍हा व्‍यापारी म्‍हणाले,’’मूर्खा, अध्‍यात्‍म आणि व्‍यापार यात गल्‍लत एकसारखे करायची नसते.’’


          *🌀❝ तात्पर्य ❞ ::~* 

    सारासार बुद्धीचा वापर करून जीवन जगल्‍यास जीवन सुखदायी होते.

 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*

━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━


14. आनंदापेक्षाही मोठा असा

   *एक आनंद आहे,*

तो त्यालाच मिळतो; 

     जो स्वत:ला विसरून 

  इतरांना आनंदित करतो...!! ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*

━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━


14. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*

   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑

✪  क्षेञफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वांत लहान जिल्हा कोणता ?

  ➜ मुंबई शहर.


 ✪  महाराष्ट्रात कोणत्या विभागात सर्वांधिक पाऊस पडतो ?

  ➜ कोकण विभाग.


 ✪  जालना जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिंल्ह्यातून करण्यात आली ?

  ➜औरंगाबाद.


 ✪  मेळघाट अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे ?

  ➜वाघ.


  ✪ नवेगाव बांध राष्ट्रीय अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?

  ➜गोंदिया

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*

━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━


14. *❒ गोपाळ गणेश आगरकर ❒*  

     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━

     *समाजसुधारक, विचारवंत व शिक्षणतज्ञ, ’सुधारक’ या वृत्तपत्राचे संस्थापक व संपादक यांची आज जयंती त्यानिमित्त त्यांना...*

       *विनम्र अभिवादन..!!* 

   🌺🥀🌸🙏🙏🌺🥀🌸

      *दिव्यत्वाची जेथ प्रचीती*

      *तेथे कर माझे जुळती ..!!*

    🙏🥀💐🌹🥀💐🙏


*●जन्म :~ १४ जुलै १८५६*

टेंभू, सातारा जिल्हा, महाराष्ट्र

●मृत्यू :~ १७ जून १८९५

पुणे, महाराष्ट्र

●चळवळ :~ समाजसुधारणा

●पत्रकारिता :~ केसरी, सुधारक


   ◆ गोपाळ गणेश आगरकर ◆


          आगरकरांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला. घरच्या गरिबीमुळे शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी त्यांना अनेक कामे करून त्यांनी आपले मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. पुढील शिक्षणासाठी ते कर्‍हाड, अकोला, रत्नागिरी येथे गेले. १८७५ साली ते मॅट्रिक झाले व महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी पुण्याला आले. पुण्यात त्यांनी डेक्कन कॉलेजला प्रवेश घेतला. वर्तमानपत्रात लिखाण करणे, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा यांत भाग घेऊन बक्षिसे जिंकणे, शिष्यवृत्ती मिळवणे अशा प्रकारे त्यांची गुजराण चालत असे.


              ◆ कारकीर्द

   आगरकर हे, बाळ गंगाधर टिळकांनी सुरू केलेल्या केसरी वृत्तपत्राचे पहिले संपादक  होते.


      पुण्यात महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना ते व लोकमान्य टिळक एकत्र आले. तोपर्यंत स्वदेशसेवेची प्रेरणा दोघांच्याही मनात जागी झाली होती. दिनांक १ जानेवारी, १८८० रोजी विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी ‘न्यू इंग्लिश स्कूल’ची स्थापना केली. आगरकर १८८१ मध्ये एम. ए. झाल्यावर चिपळूणकरांना जाऊन मिळाले. आगरकर व टिळक यांनी १८८१ मध्ये इंग्रजीतून ‘मराठा’, तर मराठीतून ‘केसरी’ अशी दोन वृत्तपत्रे चालू केली. केसरीचे संपादकत्व आगरकरांनी स्वीकारले.


     पुढे लोकमान्य टिळक व आगरकर यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली व त्या अंतर्गत १८८५ साली फर्ग्युसन कॉलेजची स्थापना झाली. आगरकर याच कॉलेजात शिकवू लागले, पुढे ते फर्ग्युसनचे प्राचार्यही झाले. १८८८ साली त्यांनी 'सुधारक' हे वृत्तपत्र सुरू केले.

        

     गोपाळ गणेश आगरकर हे, भौतिकता - ऐहिकता, बुद्धिप्रामाण्य, व्यक्तिस्वातंत्र्य या आधुनिक तत्त्वांना प्रमाण मानून जिवाच्या कराराने समाज सुधारणांचा पाठपुरावा करणारे समाजप्रबोधक होते. महाराष्ट्रातील समाज परिवर्तनाच्या प्रक्रियेला विवेकाचे, बुद्धिप्रामाण्याचे व व्यक्तिस्वातंत्र्याचे अधिष्ठान देऊन,परिवर्तनाचे विज्ञाननिष्ठ तत्त्वज्ञान निर्माण करण्याचे श्रेय गोपाळ आगरकरांकडे जाते.


    राजकीय स्वातंत्र्याआधी समाज सुधारणा महत्त्वाची आहे. बालविवाह, अस्पृश्यता यांसारख्या समाजातील अनिष्ट रूढी आधी नष्ट केल्या पाहिजेत अशा विचारांचे ते होते. समाजसुधारणा विरुद्ध राजकीय स्वातंत्र्य याच वादातून १८८७ च्या ऑक्टोबरमध्ये त्यांनी केसरीचे संपादकत्व सोडले. १८८८ साली त्यांनी ‘सुधारक (वृत्तपत्र)’ हे वृत्तपत्र सुरू केले. व्यक्तिस्वातंत्र्य, बुद्धिवाद, भौतिकता या मूल्यांचा प्रचार त्यांनी सुधारकमधून केला, तसेच जातिव्यवस्था, चातुर्वर्ण्य, बालविवाह, ग्रंथप्रामाण्य- धर्मप्रामाण्य, केशवपन इत्यादी अन्यायकारक परंपरांना त्यांनी विरोध केला. अंधश्रद्धा, पाखंडीपणा यांच्यावर प्रहार केले. सुधारक हे इंग्रजी व मराठी या दोन्ही भाषांतून प्रकाशित केले जात होते. इंग्रजी सुधारकची जबाबदारी काही काळ नामदार गोखले यांनी सांभाळली होती.


आगरकर व्यक्तिवादाचे पुरस्कर्ते होते. बुद्धीला जी गोष्ट पटेल ती बोलणे व शक्य तितकी आचरणात आणणे, मग त्याला इतरत्र पूज्य ग्रंथात वा लोकरूढीत आधार असो वा नसो, हे आगरकरांचे महत्त्वाचे तत्त्व होते. 

‘विचारकलह हा समाजस्वास्थ्याला आवश्यक आहे,’ असे त्यांचे मत होते. त्यांच्या या विचारसरणीमुळे त्यांना टोकाचा विरोध झाला. सनातनी लोकांनी त्यांच्या जिवंतपणीच त्यांची प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढली होती. पण तरीही निग्रहाने आणि निश्चयाने त्यांनी आपल्या विचारांचा पाठपुरावा केला.


    वयाच्या अवघ्या एकोणचाळीसाव्या वर्षी त्यांचे निधन झाले. 

        

   आगरकरांच्या लेखन कौशल्या संदर्भात टिळक म्हणतात, "देशी वर्तमानपत्रास हल्ली जर काही महत्त्व आले असले तर ते बऱ्याच अंशी आगरकर यांच्या विद्वत्तेचे व मार्मिकतेचे फल होय यात शंका नाही."


      गोपाळ गणेश आगरकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आचार्य अत्रे यांनी पुण्यात इ.स. १९३४ साली आगरकर हायस्कूल ही मुलींची शाळा स्थापन केली.


            ◆ पुरस्कार

     महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे ’सुधारक’कार गोपाळ गणेश आगरकर या नावाचा पुरस्कार दिला जातो.


    महाराष्ट्र संपादक परिषद ही संस्था, आदर्श पत्रकारितेसाठी गो.ग. आगरकर पुरस्कार देते.

▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄

••◎◑★✹🔅✹★◑◎••

        *✍ संकलन ✍*

*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*

♦📱7875840444♦

*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*

█║▌║█❃❂❃█║▌█


*❁रविवार~14/07/2024❁*

*⋐⋑⛯⋐⋑MSP⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment