"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

 *20/07/24 शनिवारचा परीपाठ*

◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤

*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*

*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*


 *Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*


*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*


 *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*

 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ 


 *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*

 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ 


 *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*

*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*


 *💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*

*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*

       🔘 *"माझी शाळा"* 🔘

   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*

    🔗🔗👇👇🔗🔗


https://urlzs.com/dmQmp

▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄

*0१ ]    ❂ आजचे पंचाग ❂*

  ━═●🇲◆🇸◆🇵●═━

🍥 *20. जुलै:: शनिवार* 🍥

 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━

आषाढ शु. १४, पक्ष :शुक्ल पक्ष,

तिथि ~चतुर्दशी, नक्षत्र ~पूर्वाषाढा, 

योग ~वैधृति, करण ~गर, 

सूर्योदय-06:11, सूर्यास्त-19:18,

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0२ ]   ❂ सुविचार ❂* 

━┅═▣◆★✪★◆▣═┅━


20. *शिक्षण हे साधन आहे; साध्य नव्हे.*

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*

━━●🇲◆🇸◆🇵●━━


20.  *दृष्टी आड सृ्ष्टि*

     *★अर्थ ::~*  जे प्रत्यक्षात नाही त्याविषयी उदासीन होणे 

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*

━┅▣◆★✧★◆▣┅━


20. *गुणाः पूजास्थानं गुणिषु न च लिंगं न च वयः ।*

   ⭐अर्थ ::~ गुणांची जाण असलेल्यांना गुण हेच पूजास्थानी असतात. ते व्यक्तीचे वय अथवा ती स्त्री कि पुरुष ते पहात नाहीत.

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*

━━●🇲=◆🇸◆=🇵●━━


         🛡 *20. जुलै* 🛡

🔻===●●●★●●●===🔻

★आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ दिन

★हा या वर्षातील २०१ वा (लीप वर्षातील २०२ वा) दिवस आहे.


   ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~

 🔹•••°°°°°•••◆•••°°°°°•••🔹

●२००० : अभिनेते दिलीपकुमार यांना ’राजीव गांधी राष्ट्रीय सद्‌भावना पुरस्कार’ जाहीर

●१९६९ : अपोलो-११ या अंतराळयानातुन गेलेला नील आर्मस्ट्राँग हा चंद्रावर पाऊल ठेवलेला पहिला मानव ठरला. त्यानंतर लगेच एडविन ऑल्ड्रिन चंद्रावर उतरला.

●१९०८ : बडोद्याचे महाराज सर सयाजीराव गायकवाड (तिसरे) यांच्या पुढाकाराने ’बँक ऑफ बडोदा’ ची स्थापना झाली.


 ~*★जन्मदिवस / जयंती★*~

 🔸•••°°°°••◆••°°°°•••🔸

◆१९५० : नसिरुद्दिन शाह – चित्रपट अभिनेता आणि दिग्दर्शक

◆१९२९ : राजेंद्रकुमार – हिन्दी चित्रपट अभिनेता

◆१९१९ : सर एडमंड हिलरी – माउंट एव्हरेस्टवर सर्वप्रथम चढाई करणारे न्यूझीलंडचे गिर्यारोहक 

◆१८३६ : सर थॉमस क्लिफोर्ड ऑलबट – ज्वरमापीचा शोध लावणारे इंग्लिश डॉक्टर 

◆१८२२ : ग्रेगोर मेंडेल – जनुकांची  संकल्पना मांडणारा जर्मन जीवशास्त्रज्ञ 


  ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~

 🔹•••°°°°°•••◆•••°°°°°•••🔹

◆२०१९ :शीला दीक्षित – ३ वेळ दिल्लीच्या मुख्यमंत्री व काँग्रेसच्या नेत्या

●१९९५ : शंकर काशिनाथ बोडस – पंडित विष्णू दिगंबर पलुसकर यांच्या परंपरेतील गायक 

●१९७३ : ब्रूस ली – अमेरिकन अभिनेता आणि मार्शल आर्ट तज्ञ 

*●१९६५ : बटुकेश्वर दत्त-क्रांतिकारक* 

१९४३ : वामन मल्हार जोशी – कादंबरीकार, साहित्य समीक्षक आणि तत्त्वचिंतक 

●१९३७ : गुग्लिएल्मो मार्कोनी – रेडिओचे संशोधक 

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*🚦सतिष बोरखडे दारव्हा*

   💥📱7875840444💥

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..


     https://goo.gl/8D33ox

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

✪✪✫✪✫✪✫✪✫✪✫✪✪

*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂* 

 ━┅═▣◆★✧★◆▣═┅━


20. *आला किनारा आला किनारा*

   ●●●●००००००●●●●

आला किनारा, आला किनारा

निनादें नभीं नाविकांनो इशारा


उद्दाम दर्यामधे वादळी

जहाजे शिडावून ही घातली

जुमानीत ना पामरांचा हकारा


प्रकाशें दिव्यांची पहा माळ ती

शलाका निळ्या-लाल हिंदोळती

तमाला जणु अग्‍नीचा ये फुलोरा


जयांनी दलें येथ हाकारली

क्षणासाठी या जीवनें जाळली

सुखेनैव स्वीकारुनी शूल-कारा


तयांच्या स्मृती गौरवे वंदुनी

उभे अंतीच्या संगरा राहुनी

किनार्‍यास झेंडे जयाचे उभारा

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0७ ]      ❂ प्रार्थना ❂*

━┅━▣◆★✧★◆▣═┅━


20. *❂ नमने वाहुनि स्तवने ❂*

     ✶✶✹✹★●★✹✹✶✶

नमने वाहुनि स्तवने उधळा, जयजयकार करा

बंधुहो, जयजयकार करा

सकल मनांचा विकास येतो आज आपुल्या घरा.


विमलहास्यसुमवृष्टीमध्ये असो तुझे स्वागत

निरंतर असो तुझे स्वागत

परमात्म्याच्या चित्सौंदर्या, येई बा हासत.


आत्मवेलिच्या स्फूर्तिफुलांवर वसंत जे विकसती

बुद्धिचे वसंत जे विकसती

त्याच वसंता त्वदीय विकासा, सरस्वती बोलती.


विश्वकाव्य वाचीत बैसली चित्तमयूरावरी

दीप्‍ती जी चित्तमयूरावरी

त्या दीप्‍तीला, त्या ज्ञप्‍तीला, वदती वागीश्वरी.

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0८ ]    ❂ बोधकथा ❂*

━━●🇲=◆🇸◆=🇵●━━


20.  *❃❝ लक्ष्मीचा निवास ❞❃*

 ━━•●◆●★★●◆●•═━

     एकदा एका व्यक्तीवर लक्ष्मी रुसली आणि जाता जाता त्याला म्हणाली आता माझ्या जागी तुझ्याघरात दारिद्र्य येणार अाहे. परंतू मी तुला एक वरदान मागण्याची संधी देत अाहे. तुझी इच्छा असेल ते माग.


     माणूस खूप समजूतदार होता, तो म्हणाला जर दारिद्र्य येनारचं असेल तर त्याला कोणी थांबवू शकत नाही, बस्स फक्त त्याला म्हणावं माझ्या परिवारात एकमेकांत प्रेम आणि जिव्हाळा राहू दे.


लक्ष्मी तथास्तु म्हणाली आणि निघून गेली.


    काही दिवसानंतर _ धाकटीसून स्वयंपाक बनवत होती, 

तिनं भाजीला मिठमसाला टाकला आणि दूसरं काम करायला निघून गेली.

    त्यानंतर मोठी सून आली न चाखताचं मिठ टाकलं आणि कामाला निघून गेली.

     त्याचप्रमाणे आणखी दोन सुनांनी न चाखताच भाजीत मिठ टाकून निघून गेल्या .


     जेव्हा माणूस आला आणि जेवायला बसला . तर भाजी इतकी खारट लागल्या नंतर तो समजुन गेला कि दारिद्र्य आलेलं आहे .त्यानं काही न बोलता जेवण केलं आणी निघून गेला.


     त्या नंतर मोठा मुलगा जेवायला बसला , तेव्हा खारट लागल्या नंतर विचारलं ? पप्पांनी जेवन केलं का ? तेव्हा बायकोनं हो म्हणाल्या नंतर त्यान विचार की जेव्हा वडील काही बोलले नाही तर मि कशाला बोलू.

त्याचप्रमाने परिवारातल्या सगळ्या लोकांनी एकमेकांविषयी विचारलं आणी न काही बोलता सर्वांनी जेवण केलं.


     संध्याकाळी दारिद्र्य त्या माणसा समोर आलं आणि म्हणालं मि निघून चाललो आहे. माणूस म्हणाला का? दारिद्रय म्हणालं, तुम्ही लोकांनी अर्धा किलो मीठं खाल्लं तरीपण भांडण केलं नाही. ज्या घरात माझ्याइतक्या खारटपणा नंतर ही तुमची गोडी कमी झाली नाही, त्या घरात मी राहू शकत नाही.


          *🌀❝ तात्पर्य ❞ ::~* 

     भांडण आणि  इर्षा यामूळं दरिद्री आणि आपलं नुकसानचं होतं.

ज्या घरात प्रेम शांती आणि आपूलकी असते तिथं लक्ष्मी राहत असते...!!

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*

━┅━▣◆★✧★◆▣━┅━


20.   *"‬कष्ट करा पोटभर मिळेल"*

       *"विश्वास करा प्रेम मिळेल"*

*"सेवा करा सुख मिळेल"*

       *"मदत करा फळ मिळेल"*

*"कल्पना करा मार्ग मळेल"*

       *"भक्ती कराआशिर्वाद मिळेल"*

*"दोस्ती करा साथ मिळेल"*

       *"दान करा धन मिळेल"*

*"आदर करा सन्मान मिळेल"*

     *"सत्कार करा संस्कार मिळेल"*

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*

━┅━▣◆★✧★◆▣━┅━


20. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*

   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑


 ✪  महाराष्ट्रातील सर्वांत लांब नदी कोणती ?

  ➜गोदावरी.


 ✪  भारतातील पहिले संपूर्ण साक्षर राज्य कोणते ?

  ➜ केरळ.


 ✪  रमाबाई रानडे यांनी स्थापन केलेल्या संस्थेचे नाव काय ?

  ➜ सेवासदन. ( पुणे )


 ✪  आस्ट्रेलिया खंडाचा शोध कोणी लावला ?

  ➜ जेम्स कुक.


 ✪  महाराष्ट्रातील आद्यशिक्षिका कोण आहेत ?

  ➜ सावित्रीमाई फुले

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂* 

━━●🇲=◆🇸◆=🇵●━━


20. *❒ ♦बटुकेश्वर दत्त ♦ ❒*  

 ━━•●◆●★◆★●◆●•━━

       एक भारतीय क्रातिकारी

 _*🌷यांचा आज स्मृतिदीन🌷*_

         _त्यानिमित्त त्यांना_

      _*विनम्र अभिवादन..!!*_

  🌺🌸🥀💎🥀💎🌸🌺

      *दिव्यत्वाची जेथ प्रचीती*

      *तेथे कर माझे जुळती ..!!*

 🌼🌸🥀💐🥀💐🌸🌼


●जन्म :~ १८ नोव्हेंबर १९१०

*●मृत्यू :~ २० जुलै १९६५*


           *◆ बटुकेश्वर दत्त ◆*

    एक भारतीय क्रातिकारी होते. बटुकेश्वर दत्त यांचा बंगाल मधील ओरी गावात झाला होता. यांचे वडील गोष्ठ बिहारी हे कानपूर मध्ये नौकरी करत असल्याने ते कानपूर मध्ये राहत असत. नंतर कानपूर च्या पी.पी.एन. महाविद्यालयात शिकत असताना त्यांची ओळख भगतसिंहांशी झाली व त्यांच्या विचारांनी प्रभावित होऊन ते ‘हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन‘ या क्रांतिकारी संघटनेत कार्य करू लागले.याच दरम्यान त्यांनी बॉम्ब बनवण्याचे तंत्र शिकून घेतले व त्यांच्या पुढाकाराने आग्रा येथे एक गुप्त बॉम्ब बनवण्याचा कारखाना चालू केला होता.


      बटुकेश्वर दत्त यांना मुख्यत्वे ओळखलं जातं ते म्हणजे ब्रिटीशांच्या केंद्रीय विधानसभेत (आजच्या संसदेत) त्यांनी भगतसिंहांना सोबत करत केलेल्या बॉम्बस्फोटा मुळे.तत्कालीन ब्रिटीश सरकारने ‘पब्लिक सेफ्टी बिल और ट्रेड डिस्प्यूट बिल‘ नावाने दोन बिलं संसदेत मंडळी होती ज्यामुळे मजुरांच्या उपोषण करण्यावर सरकार निर्बंध घालून आणि क्रांतिकारकांच्या विरुद्ध पोलिसांना अनावश्यक अधिकार मिळवून द्यायचा प्रयत्न सरकार करत होतं. याचा निषेध म्हणून भगतसिंह आणि बटुकेश्वर दत्त यांनी ८ एप्रिल १९२९ रोजी कुणालाही हानी होणार नाही अशा पद्धतीने संसदेच्या प्रेक्षक दिर्घेतून बॉम्ब फेकून गोंधळ उडवला. 


      या सर्व घटनेत दोषी म्हणून भगतसिंह व बटुकेश्वर दत्त या दोघांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. परंतु त्याच वेळी लाला लजपतराय यांच्या मृत्युचा बदला म्हणून केलेल्या सॉंडर्स हत्येच्या लाहोर कटात सहभागी असल्याचा ठपका ठेऊन भगतसिंह यांना फाशीची शिक्षा झाली तर बटुकेश्वर दत्त यांना अंदमानात काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली.


     पुढे अंदमान च्या कारागृहात १९३३ व १९३७ साली उपोषण करून त्यांनी इंग्रज सरकार विरुद्ध आवाज उठावाला,परंतु १९३८ साली महात्मा गांधींच्या हस्तक्षेपामुळे त्यांना कारागृहातून मुक्त करण्यात आले. अंदमानच्या कारागृहात क्षयरोगाने जर्जर झालेले असताना देखील बाहेर येताच त्यांनी आपले क्रांतिकार्य पुनःश्च सुरु केले अन १९४२ साली त्यांनी असहकार्य चळवळीत त्यांनी उडी घेताच त्यांना ४ वर्षांकरिता पुन्हा कारागृहात डांबले गेले. नंतर स्वातंत्र्याच्या अगदी थोडे आधी १९४५ साली त्यांची मुक्तता करण्यात आली.


     त्यांना कर्करोग झाल्याचे निदान केले गेले, म्हणून दिल्लीच्या सफदरजंग इस्पितळात हलवण्यात आले, याही क्षणी “ज्या दिल्लीत मी बॉम्बस्फोट करून आवाज उठावाला त्या दिल्लीत पुन्हा स्ट्रेचर वरून असे आणले जावे” हि खंत त्यांनी बोलून दाखवली. पण सरते शेवटी मृत्यूपश्चात आपले अंतिम संस्कार हे भगतसिंह, सुखदेव, राजगुरू या आपल्या मित्रांच्या शेजारी हुसैनीवाला येथेच करावेत हि इच्छा व्यक्त केली अन २० जुलै १९६५ साली आपले प्राण त्यागले.

    *पंजाबात  हुसैनीवाला या ठिकाणी  भगतसिंह,राजगुरू अन सुखदेव बटुकेश्वर दत्त‘ यांची स्मृतीस्थाने आहेत.*

▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄

••◎◑★✹🔅✹★◑◎••

        *✍ संकलन ✍*

*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*

♦📱7875840444♦

*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*

█║▌║█❃❂❃█║▌█


*❁शनिवार~20/07/2024❁*

*⋐⋑⛯⋐⋑MSP⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment