"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

 *23/07/24 मंगळवारचा परीपाठ*

◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤

*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*

*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*


 *Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*


*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*


 *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*

 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ 


 *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*

 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ 


 *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*

*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*


 *💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*

*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*

       🔘 *"माझी शाळा"* 🔘

   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*

    🔗🔗👇👇🔗🔗


https://urlzs.com/dmQmp

▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄

*0१ ]    ❂ आजचे पंचाग ❂*

  ━═●🇲◆🇸◆🇵●═━

🍥 *23. जुलै:: मंगळवार* 🍥

 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━            

आषाढ कृ. २, पक्ष :कृष्ण पक्ष, 

तिथि ~द्वितीया, नक्षत्र ~धनिष्ठा, 

योग ~आयुष्मान्, करण ~गर, 

सूर्योदय-06:11, सूर्यास्त-19:17,

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0२ ]       ❂ सुविचार ❂*

 ┅━▣◆★✪★◆▣━┅


23. *या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे.*

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*

━━●🇲=◆🇸◆=🇵●═━


23.   टाकीचे घाव सोसल्याशिवाय

    देवपण येत नही –

             ★ अर्थ ::~ 

   कष्टाशिवाय यश मिळत नाही

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*

━┅━▣◆★✧★◆▣━┅━


23. *ऐक्यं बलं समाजस्य तदभावे स दुर्बलः ।*  

      ⭐अर्थ ::~ एकी (संघटितपणा) हे समाजाचे बळ असून ऐक्याच्या अभावी समाज दुर्बळ ठरतो.

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*

━━●🇲=◆🇸◆=🇵●━━


     🛡 *★23. जुलै★* 🛡

🔻===●●●★●●●===🔻

★वनसंवर्धन दिन

★हा या वर्षातील २०४ वा (लीप वर्षातील २०५ वा) दिवस आहे.


        ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~

 🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹

●१९८६ : ’हेपेटायटिस-बी’ या रोगावरील लशीच्या वापरास अमेरिकेत परवानगी मिळाली.

●१९८३ : एल.टी.टी.ई. ने श्रीलंकेच्या १३ सैनिकांची हत्या केली. याचा वचपा म्हणून श्रीलंकेच्या सरकारने तमिळवंशीय नागरिकांवर हल्ला केला. जुलै महिन्यात १,००० नागरिक ठार. 

●१९२७ : मुंबईत ’रेडिओ क्लब’ ने पहिले रेडिओ प्रसारण सुरू केले. यात इंग्रजी भाषेतुन बातम्या देण्यात आल्या. याचेच पुढे आकाशवाणी’ (All India Radio) मधे रुपांतर झाले.


    ~*★जन्मदिवस / जयंती★*~

 🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸

◆१९४७ : डॉ. मोहन आगाशे – अभिनेते व मानसोपचारतज्ञ

◆१९२७ : धोंडुताई कुलकर्णी – जयपूर-अत्रौली घराण्याच्या गायिका

◆१९१७ : लक्ष्मीबाई यशवंत तथा ’ माई’ भिडे – नाट्य-चित्रपट अभिनेत्री 

◆१९०६ : चंद्रशेखर आझाद – स्वातंत्र्यलढ्यातील आघाडीचे क्रांतिकारक 

◆१८५६ : *लोकमान्य बाळ (केशव) गंगाधर टिळक* – समाजसुधारक आणि प्रखर राष्ट्रवादी, भगव्‌दगीतेचे भाष्यकार


   ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~

 🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹

●२०१२ : लक्ष्मी सहगल – आझाद हिंद सेनेतील झाशी राणी रेजिमेंटच्या कॅप्टन 

●२००४ : महमूद – विनोदी अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता

●१९९९ : दामोदर तात्याबा तथा दादासाहेब रुपवते – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी आणि आंबेडकरी चळवळीचे नेते

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*🚦सतिष बोरखडे दारव्हा*

   💥📱7875840444💥

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या

 वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..


     https://goo.gl/8D33ox

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

✪✪✫✪✫✪★✪✫✪✫✪✪

*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*

   ━┅━▣◆★✧★◆▣━┅━


23. *✸ स्मृती तुझीच जागु दे ✸*

    ●●●●००००००●●●●

चरण चालू दे सदा ध्येयमंदिराकडे

अंतरात आमुच्या स्मृती तुझीच जागु दे॥धृ॥


गती मती द्युती तुझी आमुच्यात येउ दे

सुखात आणि संकटी तुझा मनास ध्यास दे

गतीस खंड त्या नको अम्ही असू सदा खडे॥१॥


पाहुनी सभोवती दुःख दैन्य आपदा

जाणुनी स्वयेच तू त्यागिलीस संपदा

दंभ मोह् लाजले पाहता तुझ्याकडे॥२॥


चरण धुंद चालु दे वेग त्यास येउ दे

ध्येयमंदिरावरी दृष्टि अढळ राहु दे

कवच घालुनी स्मृती सिध्द संगरा खडे॥३॥


धूलिच्या कणांतुनी घोष हा उठे महा

स्पर्श होउनी तुझा देह धन्य हो अहा

वाट पाहता युगे अशी विभूति सापडे॥४॥

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0७ ]      ❂ प्रार्थना ❂* 

━┅━▣◆★✧★◆▣━┅━


23. *❂इतनी शक्ति हमें देना दाता*

  ━━●✶✹★●★✹✶●═━

इतनी शक्ति हमें देना दाता

मन का विश्वास कमजोर हो ना 

हम चले नेक रस्ते पे हमसे

भूलकर भी कोई भूल हो ना 


दूर अज्ञान के हो अंधेरे

तू हमें ज्ञान की रोशनी दे 

हर बुराई से बचते रहें हम

जितनी भी दे भली ज़िन्दगी दे

बैर हो ना किसी का किसी से

भावना मन में बदले की हो ना


हम ना सोचें हमें क्या मिला है

हम ये सोचे किया क्या है अर्पण

फूल खुशियों के बाँटे सभी को

सब का जीवन ही बन जाए मधुबन

अपनी करुणा का जल तू बहा के

कर दे पावन हर एक मन का कोना

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0८ ]    ❂ बोधकथा ❂*

━━●🇲=◆🇸◆=🇵●━━


23.  *❃❝ कर्तव्यनिष्ठा ❞❃*

━━•●◆●★◆★●◆●•━━

     फ्रान्स मधील ही गोष्ट. पॅरिस शहरात मोठी दंगल झाली.मॅथ्यू हेन्जलर नावाचा पत्रकार प्रत्यक्ष दंगलीच्या ठिकाणी जाऊन आपल्या वर्तमानपत्रासाठी बातमी तयार करीत होता.

      दंगल आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांना शेवटी गोळीबार करावा लागला. चुकून पत्रकाराला एक गोळी लागली. तो जखमी झाला.

  डॉक्टरांना बोलावण्यात आले. घायाळ झालेला तो पत्रकार डॉक्टरांना म्हणाला,"मी लिहू शकत नाही. भयंकर वेदना होत आहे."

   डॉक्टर त्याला  धीर देत म्हणाले, "  "अरे लिहायचे काय घेऊन बसलास? आता तुला विश्रांतीची प्रथम गरज आहे."त्यावर पत्रकार म्हणाला, "*प्रथम मला माझे कर्तव्य बजावले पाहिजे. प्रत्येकाचे काम ठरलेले असते.  माझे काम बातमी लिहिणे आहे कृपया हा माझा कागद घ्या व त्याच्याखाली लिहा. सांयकाळी ४ वाजून वीस मिनिटांनी पोलिसांनी गोळीबार केला. त्यात तीन माणसे जखमी झाली व एक मरण पावला. डॉक्टरांनी विचारले, "मेला कोण?"  उत्तर मिळाले 'मी' आणि हे सांगता सांगताच त्या पत्रकाराने प्राण सोडला. 


      *🌀❝ तात्पर्य ❞ ::~* 

   प्राणाची पर्वा न करता कर्तव्याची पूर्ती करणारे असे लोक हीच खरी राष्ट्राची संपत्ती होय.

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*

━┅━▣◆★✧★◆▣━┅━


23.  *जेव्हा काही माणसांना तुमच्यातलं चांगलं सहन होत नाही.*

*तेंव्हा ते इतरांना तुमच्यातलं वाईट सांगायला सुरुवात करतात.*

   

*प्रत्येक वेळेस तुम्हाला लोकांची साथ मिळेलच असे नाही,*

*कधीकधी एकटे पण लढावे लागते,*

*पण असे लढा कि साथ न देणारे पण हात जोडून प्रणाम करतील...!!*

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*

━┅━▣◆★✧★◆▣━┅━


23.  *✿ देश व टोपननावे  ✿*

    ◑◑◑◆◑●★●◑◆◑◑◑

■  अज्ञात खंड.   ➜  आफ्रिका 


■  गोऱ्या माणसाची दफन भूमी.

    ➜  गिनीचा किनारा 

  

■  भूमध्य समुद्राची किल्ली.

    ➜  जिब्राल्टर 

  

■  भारताचा मसाला मळा.

    ➜  केरळ 

  

■  अमर शहर.   ➜  रोम 

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*

━━●🇲=◆🇸◆=🇵●═━


23.  *❒ लोकमान्य टिळक  ❒*  

 ━━•●◆●★◆★●◆●•━━

*समाजसुधारक आणि प्रखर राष्ट्रवादी, भगव्‌दगीतेचे भाष्यकार..*

   *_"यांच्या जयंती निमित्त"_*

         *_विनम्र अभिवादन"_*

   🌹🌷🌺🏵🌺🌷🌹

      *दिव्यत्वाची जेथ प्रचीती*

      *तेथे कर माझे जुळती ..!!*

  🙏🌲🙏🌹🙏🌲🙏

●टोपणनाव :~ लोकमान्य टिळक

*●जन्म :~ २३ जुलै १८५६*

रत्‍नागिरी (टिळक आळी), महाराष्ट्र, 

●मृत्यू :~ १ ऑगस्ट १९२०

पुणे, महाराष्ट्र, भारत

●चळवळ :~ भारतीय स्वातंत्र्यलढा

●पत्रकारिता/ लेखन :~ केसरी, मराठा

●तळटिपा :~ "स्वराज्य हा माझा जन्म सिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच "


◆लोकमान्य बाळ गंगाधर टिळक◆


       हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील अग्रगण्य राजकीय पुढारी, भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचे आद्य प्रवर्तक, भारतीय असंतोषाचे जनक, गणितज्ञ, खगोलतज्ज्ञ, राजकीय तत्त्वज्ञ, पत्रकार, संपादक, लेखक, वक्ते आणि स्वातंत्र्यसेनानी होते. लोकमान्य या उपाधीने त्यांचा उल्लेख केला जातो.


          टिळकांचे खरे नाव केशव आहे. परंतु त्यांना ‘बाळ’ या टोपण नावानेच सगळे ओळखत. टिळक अतिशय कुशाग्र बुध्दिमत्तेचे होते. त्यांचे गुरु त्यांना ‘सुर्याचे पिल्लू’ म्हणायचे.

लोकमान्य टिळक यांचे संपूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक. त्यांचे मूळ नाव केशव असे होते. पण, ‘बाळ’ हे टोपण नावच कायम राहिले. त्यांचे वडील गंगाधर पंत हे सुरूवातीला प्राथमिक शिक्षक होते. पुढे ते शिक्षण-निरीक्षक बनले. टिळक १० वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांची पुणे येथे बदली झाली. त्यामुळे टिळकांचे शिक्षण पुणे येथे झाले.


       सन १८७२ मध्ये टिळक मॅट्रीकची परिक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्यांनी पुण्याच्या डेक्कन कॉलेजात प्रवेश घेतला. याच कॉलेजातून ते १८७७ मध्ये बी.ए. ची परिक्षा उत्तीर्ण झाले. पुढे सन १८७९ मध्ये ते एल.एल.बी. च्या वर्गात असतानाच त्यांचा आगरकरांशी परिचय झाला. समान ध्येयाने प्रेरित झालेल्या या दोन तरुणांनी ब्रिटिशांच्या पारतंत्र्यातून आपल्या मातृभूमीची सुटका करण्यासाठी लोकजागृतीच्या आणि राष्ट्रोद्धाराच्या कार्यात स्वतःला वाहुन घेण्याचा निश्चय केला.


         साहित्य आणि संशोधन

  टिळक फक्त चांगले संपादकच नव्हते तर संस्कृत, गणित, खगोलशास्त्र यांच्यामधील मान्यताप्राप्त अभ्यासकपण होते. त्यांची दोन पुस्तके ’ओरायन’(Orion) आणि ’आर्क्टिक होम ऑफ वेदाज’ (Arctic home of vedas) त्यांच्या अत्यंत क्लिष्ट विषय अभिनव व नावीन्यपूर्ण प्रकारे हाताळण्याच्या क्षमतेची उत्तम उदाहरणे आहेत. आर्क्टिक हे आर्यांचे मूळ वसतीस्थान आहे असा निष्कर्ष यामध्ये त्यांनी मांडला आहे. त्यांचे तिसरे पुस्तक ’गीतारहस्य’ यात त्यांनी भगवद्‌गीतेतील कर्मयोगाची समीक्षा मांडली आहे. 

▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄

••◎◑★✹🔅✹★◑◎••

        *✍ संकलन ✍*

*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*

♦📱7875840444♦

*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*

█║▌║█❃❂❃█║▌█


*❁मंगळवार~23/07/2024❁*

*⋐⋑⛯⋐⋑MSP⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment