"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

July 07, 2025

गुरु पौर्णिमा सूत्रसंचालन

 

नमस्कार, 🙏
सर्वप्रथम आपल्या सर्वांचे या पवित्र गुरु पौर्णिमेच्या दिवशी मी .... मन:पूर्वक स्वागत करतो..!

"|| ॐ गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः ||
गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ||

    गुरु म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश. गुरु ईश्वराचे दुसरे रूप असतात. आषाढ शुद्ध पौर्णिमेला "गुरुपौर्णिमा" असे म्हटले जाते.
   आजचा दिवस आपल्या गुरूंसाठी कृतज्ञता व्यक्त करण्याचा, त्यांच्या ऋणाची आठवण करून देणारा आहे."
❀ पाहूणे स्थानापन्न करणे -           "हिऱ्याशिवाय कुंदणाला शोभा नाही... गोडीशिवाय ऊसाला शोभा नाही...!!  
सुगधांशिवाय फुलाला शोभा नाही... तसेच अध्यक्षांशिवाय कार्यक्रमालाही शोभा नाही...!!  
   म्हणून आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान माननीय.... यांनी स्विकारावे अशी मी त्यांना विनंती करतो.
   यानंतर प्रमुख पाहुण्यांना सन्मानपूर्वक मंचावर निमंत्रित करावे.

❀🪔 दीपप्रज्वलन आणि सरस्वती वंदना -

"आता कार्यक्रमाची सुरुवात आपण दीपप्रज्वलन करून करणार आहोत. ज्योती म्हणजे ज्ञान, आणि अज्ञानरूपी अंध:कार दूर करण्याचं प्रतीक.
माझं विनम्र आग्रह आहे की आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व पाहुणे यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात करावी.   
    त्यानंतर आपण सरस्वती वंदना ऐकू."

❀ प्रमुख अतिथींचे स्वागत -     अतिथिंच्या आगमनाने... 
हर्षित झाला सारा मेळा...!!  
धन्य धन्य होऊनी करितो... 
हा स्वागताचा सोहळा... 
हा स्वागताचा सोहळा...!!
✪कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांचे स्वागत घ्यावे.

❀ प्रास्ताविक भाषण :~
   "आता या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी आमंत्रित करतो/करते  श्री/सौ. ______ यांना."

❀ गुरूंचा सत्कार -
गुरु विना कोण दाखवील वाट..!
जीवनपथ हा... अवघड डोंगर घाट...!!
"गुरु म्हणजे फक्त पुस्तक शिकवणारे शिक्षक नव्हे, तर जीवन घडवणारे शिल्पकार असतात.
   त्यांचं योगदान अमूल्य आहे. आज त्यांच्या चरणी आपलं मनःपूर्वक आभार व्यक्त करायचे आहे.
    "गुरु म्हणजे केवळ शाळेतील शिक्षक नव्हेत, तर आपल्याला जीवनाची दिशा देणारे, मार्गदर्शक, प्रेरणादाते. आज अशा सर्व गुरूंचा सन्मान करण्याचा दिवस आहे.
आपल्या आदरणीय गुरूंचा सत्कार करण्यासाठी मी विनंती करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी माननीय..... गुरुवर्य यांचा सत्कार करावा..

❉ गुरुंचे मार्गदर्शनपर भाषण-

"आता आपण ऐकणार आहोत आपल्या गुरूंचं मौल्यवान मार्गदर्शन. जीवनाच्या वाटचालीसाठी त्यांचं अनुभवसिद्ध ज्ञान आपल्या सर्वांसाठी अमूल्य आहे.
    मी विनंती करतो आदरणीय ...... [गुरुजींचं नाव] यांना की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं."
✪यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी यांचे मनोगत घ्यावे...

सांस्कृतिक कार्यक्रम / कविता / भाषण / नृत्य-

"आता या कार्यक्रमात थोडं रंगतदार आणि भावनिक वातावरण निर्माण करणार आहोत एका छोट्या कवितेमधून / भाषणामधून / नृत्यप्रस्तावनेतून."
(कार्यक्रमानुसार नोंद घ्या आणि सुत्रसंचालनानुसार नावे घ्या.)
❀ अध्यक्ष भाषण :~
प्रभावशाली नेतृत्व, आभाळाएवढं कर्तृत्व, अशे कर्त्यवदक्ष.. कार्य कुशल आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय...... यांनी आपले विचार प्रकट करावे.

 आभार प्रदर्शन -
"कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अनेकांनी मेहनत घेतली. मी उपस्थित सर्वांच्या वतीने सर्व गुरुजनांचे, उपस्थित पालकांचे, विद्यार्थ्यांचे आणि कार्यक्रम संयोजकांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो...!!
    "प्रत्येक सुंदर गोष्टीचा शेवट होतोच, पण आठवणी मात्र कायम राहतात.
   आभार प्रदर्शन व्यक्त करण्यासाठी आदरणीय.... यांना निमंत्रित करतो
  आजच्या गुरु पौर्णिमा कार्यक्रमाचं समारोप करताना मी.... आमच्या शालेय परिवाराच्या वतीने सर्व मान्यवरांचे, आमचे गुरु, उपस्थित विद्यार्थी, आणि आयोजन करणाऱ्या सर्व सदस्यांचे मन:पूर्वक आभार मानतो. आपण अशाचप्रकारे एकत्र येऊन गुरुशिष्य परंपरेला उजाळा देत राहू."

🙏❀ समारोप ❀ 🙏
   अध्यक्षांच्या परवानगीने आजचा सुंदर कार्यक्रम आपण येथेच थांबवत आहोत...
  "गुरु पौर्णिमेच्या या पवित्र दिवशी, आपण सर्वांनी आपल्या गुरूंच्या चरणी नतमस्तक होऊन जीवनात योग्य मार्गक्रमण करण्याचं संकल्प घेऊ या.
धन्यवाद! || जय गुरुदेव ||

July 05, 2025

आषाढी एकादशी.. जय...हरी..विठ्ठल 🚩

 

रुप पाहतां लोचनीं । सुख जालें वो साजणी ॥
तो हा विठ्ठल बरवा । तो हा माधव बरवा ॥
बहुता सकृतांची जोडी । म्हणुनि विठ्ठलीं आवडी ॥
सर्व सुखाचें आगरु । बापरखुमादेविवरु ॥🚩

  देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा...!!


जन्म झाला वारकरी वाट समजली खरी, देह देवाची पंढरी विठू मनाच्या गाभारी..!!

जय...हरी..विठ्ठल 🚩
   चराचरातील कना कना मध्ये अगाध लीला तुझी पाहतो दिव्य तुझ्या त्या दृश्य रुपाला वारकरी असे नाव लावतो.

   आषाढी एकादशीच्या शुभदिनानिमित्त सर्व वारकरी बांधवांना आणि श्री विठ्ठल भक्तांना मनःपूर्वक शुभेच्छा..!
"माऊली माऊली’ च्या गजरात तुमचं जीवन आनंद, समाधान आणि भक्तिभावाने भरून जावो!
"विठ्ठल नामाचा गजर सदैव तुमच्या ओठांवर असो!” 🌼🌸🙏

सोहळा जमला आषाढी वारीचा सण आला पंढरीचा,मेळा जमला भक्तगणांचा, ध्यास विठुमाऊलीच्या दर्शनाचा 
आषाढी एकादशीच्या आपणास  मन:पुर्वक शुभेच्छा..!
जय राम कृष्ण हरी माऊली♥️🙌

भक्तीच्या वाटेवर  गांव तुझे लागले...
आशीर्वाद घेण्यास मन माझे थांबले...
तुझ्या भक्तिचा झरा असाच वाहू दे...
पांडुरंगा आम्हां सर्वांवर तुझी कृपा राहू दे...!!
👣||विठू माउली||👣 
    आषाढी एकादशी 
निमित्त हार्दिक शुभेच्छा..!! 🙏
जय राम कृष्ण हरी माऊली...!!

*भाळी तो चंदनाचा टिळा
*माळा रे तुळशीच्या गळा
*अंगी शोभे साजेसा शृंगार
*विठु भक्तांना लावी लळा...
           
     🙏🏻 राम कृष्ण हरी 🙏🏻
            

June 28, 2025

PARIPATH JULY 2025

    

"सप्तरंगी शालेय परिपाठ" 
परिपाठातील सर्व मुद्द्यांचा समावेश असलेला परिपाठ..

   ज्या तारखेचा परिपाठ पाहिजे असेल त्या तारखेला क्लिक करा....    

     JULY 2025     
 Mon  Tue  Wed  Thu  Fri  Sat  Sun 

12345










 मागील महिन्याचा परिपाठ  साठी CLICK करा..
 ~~●~~~~~~~~●~~

June 17, 2025

शैक्षणिक नववर्षाच्या विद्यार्थी, पालक व शिक्षकांना हार्दिक शुभेच्छा...

  

शैक्षणिक वर्ष 2025-2026 च्या   मनःपूर्वक शुभेच्छा!

🔴🔵

  नवीन शैक्षणिक सत्रासाठी माझ्या सर्व बाळगोपाळांच्या राज्यासह सर्वच क्षेत्राच्या संस्कारदूत, ज्ञानोपासक गुरुजन बंधु-भगिनींना सुहास्यवदनाने सुहृदयपूर्वक ज्ञानदान क्षेत्रातील यशदायी, सुदीर्घ यशवंत प्रवासास मनस्वी शुभचिंतन, शुभेच्छा...!

    आज शाळेचा पहिला दिवस — नव्या सुरुवातीचा, नव्या उमेदिचा..!


   आजचा दिवस प्रत्येक शिक्षक, मुख्याध्यापक आणि विद्यार्थ्यांसाठी विशेष आहे. ही फक्त शाळा सुरू होण्याची तारीख नाही, तर नव्या स्वप्नांची, नव्या संकल्पांची आणि नव्या प्रवासाची सुरुवात आहे.


   समाजातील बहुजनांचे शिक्षण अबाधित राहावे, यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील आहोत. अनेक आव्हानांवर मात करत, शिक्षणाच्या क्षेत्रात गुणवत्ता आणि दर्जा वाढवण्यासाठी शासनाच्या नवनवीन योजना व उपक्रम राबवले जात आहेत.

    या वाटचालीत शारीरिक, मानसिक आणि सामाजिक संतुलन राखून आपण सर्वजण परिश्रम करत आहोत. आपल्या अथक मेहनतीमुळेच ज्ञानाचा दीप सतत प्रज्वलित राहतो.

🔴🔵

    या नवीन वर्षात सर्व शिक्षक, मुख्याध्यापक आणि शिक्षण क्षेत्राशी जोडलेल्या प्रत्येक व्यक्तीला मनःपूर्वक शुभेच्छा...!!

 2025-26 च्या शैक्षणिक नवपर्वाच्या हार्दिक शुभेच्छा...!!

  शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभासोबतच तुमचं प्रत्येक पाऊल यशाच्या दिशेने जाऊदेत! मेहनत, समर्पण आणि एकाग्रतेने तुमच्या ध्येयांची साधना करा...

  शिक्षण हे तुमचं सामर्थ्य आहे आणि ते तुम्हाला आयुष्यातील सर्वोत्तम संधी देईल.

"कठीण समयामुळेच महानता साधता येते" हे लक्षात ठेवा, आणि प्रत्येक अडचणीवर मात करण्यासाठी पुढे चला...!! 

 तुम्ही शक्य ते सर्व काही साधू शकता!

नवीन ज्ञानाच्या वाटेवर तुम्ही यशस्वी व्हाल अशी आशा आहे...!!

    उन्नती आणि उत्कर्षाचा विचार एकदा मनात आला की ध्येयाची बांधणी होते. ध्येयाला सातत्यपूर्ण कल्पक परिश्रमाची जोड मिळाली की, जीवनात भव्य यशाचा दिव्य सूर्योदय होतो. 

June 15, 2025

PARIPATH JUN 2025

    

"सप्तरंगी शालेय परिपाठ" परिपाठातील सर्व मुद्द्यांचा समावेश असलेला परिपाठ..

   ज्या तारखेचा परिपाठ पाहिजे असेल त्या तारखेला क्लिक करा....   

     JUN 2025    
 Mon  Tue  Wed  Thu  Fri  Sat  Sun 
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13

 मागील महिन्याचा परिपाठ  साठी CLICK करा..

 ~~●~~~~~~~~●~~

June 07, 2025

मोबाईल वरून बदली फॉर्म कसा भरावा

 ऑनलाइन बदली पोर्टलवर विशेष संवर्ग भाग 1 व भाग 2 शिक्षकांनी मोबाईल वरून फॉर्म कसा भरावा.


दि. 7 जून 2025 चे संपुर्ण बदली प्रक्रियेसंबधी काही शंका किंवा अडचणी बाबत संपूर्ण माहिती

➡️अद्याप संवर्ग एक व संवर्ग दोन ला होकार किंवा नकार देण्याची सुविधा पोर्टलवर उपलब्ध झालेली नाही लवकरच ही सुविधा पोर्टलवर उपलब्ध होईल.

➡️ जिल्हानिहाय रिक्त पदे पोर्टलवरअपलोड करण्याचे काम पूर्ण झालेली असून पोर्टलवर रिक्त पदांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात येतील.


➡️ रिक्त पदांच्या याद्या पोर्टलवर प्रसिद्ध झाल्या बरोबर लवकरच संवर्ग 1 ला होकार व नकार देण्याची संधी प्राप्त होईल व सोबतच संवर्ग 2 ला होकार देण्याची संधी सुद्धा देण्यात येईल.

➡️ संवर्ग एक व संवर्ग दोन ला फॉर्म भरण्याच्या सुविधेबाबत पोर्टलवर अद्याप वेळापत्रक प्रकाशित झालेलं नाही ते सुद्धा लवकर प्रकाशित होईल.

➡️त्याकरिता संवर्ग एक व संवर्ग दोन मधून लाभ घेणाऱ्या शिक्षकांनी प्रक्रियेबद्दल अद्यावत राहावं.


✳️संवर्ग एक व संवर्ग दोन चे सर्वसामान्य मुद्दे..


➡️ संवर्ग एक च्या ज्या शिक्षकांना होकार द्यायचा आहे त्यांना फक्त जिल्ह्यातील बदली पात्र शिक्षकांच्या जागा पोर्टलवर दाखवल्या जातील.

➡️ पती-पत्नी एकत्रिकरणा अंतर्गत लाभ घेणाऱ्या शिक्षकांना पोर्टलवर रिक्त जागा व बदलीपात्र शिक्षकांच्या जागा दाखवल्या जातील.


➡️ विशेष संवर्ग भाग एक व विशेष संवर्ग भाग दोन च्या याद्या जाहीर करण्याकरिता व यादीवरील आक्षेप प्रक्रिया पूर्ण करण्याकरिता अर्ज भरून घेतल्या जात आहेत.

➡️ या ठिकाणी फक्त संवर्ग एक व संवर्ग दोन चे अर्ज भरून घेतल्या जात आहेत या ठिकाणी पसंती क्रम देण्याची सुविधा नाही.


➡️ संवर्ग एक च्या शिक्षकांना होकार किंवा नकाराची सुविधा मिळेल व संवर्ग दोनच्या शिक्षकांना फक्त होकार देता येईल.


➡️ज्या शिक्षकांना बदली प्रक्रियेमध्ये बदली घ्यायची नाही त्यांनी अर्ज करताना नकार नोंदवावा जेणेकरून आपली बदली पुढील कोणत्याही टप्प्यावर होणार नाही.

➡️ज्या संवर्ग एक च्या शिक्षकांची नावे बदली पात्र ,बदली अधिकार प्राप्त व अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरणे टप्पा क्रमांक सात या तीनही यादीमध्ये नसतील व त्यांना बदली घ्यायची नसेल तर त्यांना फॉर्म भरण्याची गरज नाही.


➡️ परंतु ज्या शिक्षकांना संवर्ग एक किंवा संवर्ग दोन मधून बदली करायची असेल त्यांनी होकार पोर्टलवर नोंदवावा.


✳️मोबाईल वरून ऑनलाइन बदली पोर्टलवर विशेष संवर्ग भाग 1 व संवर्ग भाग 2 चे शिक्षक खालील प्रमाणे फार्म भरू शकता.


➡️ यापूर्वी आपण आपले प्रोफाइल पोर्टलवर अपडेट केलेले आहे आता संवर्ग भाग 1 आणि संवर्ग भाग 2 च्या शिक्षकांनी फॉर्म भरण्याकरिता खालील लिंक ला क्लिक करा...

🔻🔻

https://ott.mahardd.com/



🔺👆🔺👆🔺

➡️ Open होणाऱ्या पेजवर आपला मोबाईल नंबर टाईप करा व Send OTP ऑप्शन वर क्लिक करा.