❂••⊰❉⊱•⊰❉⊱•⊰❉⊱••❂
*महाराष्ट्र शिक्षक परिवार*
*❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀*
 *💲शालेय परिपाठ💲*
❉⌘❉⌘✽⌘✪⌘✽⌘❉⌘❉
    🇮🇳 *राष्ट्रगीत*  🇮🇳
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ 
    ♦ *प्रतिज्ञा* ♦
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ 
    🇮🇳 *संविधान* 🇮🇳
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ 
   🌀 *महाराष्ट्र गीत* 🌀
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
💎 *सर्वप्रकारची शैक्षणिक माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी...*
 🔘 *"माझी शाळा" ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
  🔗🔗👇👇🔗🔗
https://goo.gl/eDeLY7
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
 ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *15. सप्टेंबर:: सोमवार* 🍥
 ⫹⫺⫹⫺⫹⫺⫹⫺⫹⫺⫹⫺⫹⫺⫹⫺⫹⫺
 भाद्रपद कृ.९, पक्ष :कृष्ण पक्ष, 
   तिथि ~नवमी, नक्षत्र ~मृगशीर्ष, 
योग ~व्यतीपात, करण ~तैतिल, 
सूर्योदय-06:25, सूर्यास्त-18:41,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]      ❂ सुविचार ❂* 
  ━┅━═▣◆★✪★◆▣═━┅━
15. *आयुष्यात पैसा हवा पण पैशात आयुष्य नको.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
15. *कुंपणानेच शेत खाणे –*
          *★अर्थ ::~*
 रक्षणकर्त्यानेच नुकसान करणे
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
15. *अतिपरिचयात् अवज्ञा ।*
              ⭐अर्थ ::~
 अतिपरिचयाने अनादर होतो. (होऊ शकतो.)
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
 🛡 *★ 15. सप्टेंबर ★* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★ जागतिक लोकशाही दिन
★ हा या वर्षातील २५८ वा (लीप वर्षातील २५९ वा) दिवस आहे.
★ *विश्वकर्मा दिवस*
★ *भारतीय अभियंता दिन*
        ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
 🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●१९५९	:	प्रायोगिक तत्त्वावर दिल्ली दूरदर्शनचे प्रसारण सुरू झाले. ही भारतातील पहिली दूरदर्शन सेवा होती.
●१९५३	:	श्रीमती विजयालक्ष्मी पंडितयांची संयुक्त राष्ट्रसंघाच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून निवड
●१९४८	:	भारतीय सैन्याने निजामाच्या वर्चस्वातून औरंगाबाद शहर मुक्त केले. नागरिकांकडून भारतीय सैन्याचे उत्साहात स्वागत
     ~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
 🔸•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔸
◆१९३९	:	सुब्रम्हण्यम स्वामी – जनता पक्षाचे अध्यक्ष, अर्थतज्ञ, शिक्षणतज्ञ, योजना आयोगाचे सदस्य, केन्द्रीय मंत्री
◆१९३५	:	दगडू मारुती तथा ’दया’ पवार – ’बलुतं’कार दलित लेखक 
◆१९०९	:	रत्नाप्पा कुंभार – स्वातंत्र्यसैनिक, सहकारी चळवळीतील अग्रणी नेते, भारतीय राज्यघटना समितीचे सदस्य 
◆१८७६	:	शरदचंद्र चट्टोपाध्याय – बंगाली साहित्यिक, 
◆१८६०	:	 *भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या* – अभियंते, विद्वान,  त्यांचा जन्मदिन हा *अभियंता दिन* म्हणून पाळण्यात येतो. 
       ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
 🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००८	:	गंगाधर गाडगीळ – साहित्यिक, समीक्षक व अर्थतज्ञ, ५६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष 
●२०१२	:	के. एस. सुदर्शन – प्रखर राष्ट्रवादी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ५ वे सरसंघचालक
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..
     https://goo.gl/ghuC48
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂* 
  ━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
15.  *✹ने परत मातृभूमीला✹*
        ●●●●●००००००●●●●●
ने मजसी ने परत मातृभूमीला
सागरा, प्राण तळमळला ॥घृ॥
भूमातेच्या चरणतला तुज धूतां ।
मी नित्य पाहिला होता ॥
मज वदलासी अन्य देशिं चल जाऊं ।
सृष्टिची विविधता पाहूं ॥
तैं जननींहृद विरहशंकितहि झाले ।
परि तुवां वचन तिज दिधलें ॥
मार्गज्ञ स्वयें मीच पृष्ठिं वाहीन ।
त्वरित या परत आणीन ॥
विश्वसलों या तव वचनीं । मी
जगदनुभवयोगें बनुनी । मी
तव अधिक शक्त उद्धरणी । मी
येईन त्वएं, कथुनि सोडिले तिजला
सागरा, प्राण तळमळला ॥१॥
शुक पंजरि या हरिण शिरावा पाशीं ।
ही फसगत झाली तैशी
भूविरह कसा सतत साहुं यापुढती ।
दशदिशा तमोमय होती ॥
गुणसुमनें मी वेचियलीं या भावें ।
की तिनें सुगंधा घ्यावे ॥
जरि उद्धरणी, व्यय न तिच्या हो साचा 
हा व्यर्थ भार विद्येचा ॥
ती आम्रवृक्षवत्सलता । रे
नवकुसुमयुता त्या सुलता । रे
तो बाल गुलाबहि आतां । रे
फुलबाग मला, हाय पारखा झाला ।
सागरा, प्राण तळमळला ॥२॥
नभिं नक्षत्रें बहुत एक परि प्यारा ।
मज भरतभूमिचा तारा ॥
प्रासाद इथें भव्य परी मज भारी ॥
आईची झोपडी प्यारी ॥
तिजवीण नको राज्य, मज प्रिय साचा
वनवास तिचाजरि वनिचा
भुलविणें व्यर्थ हे आतां । रे
बहु जिवलग गमतें चित्ता । रे
तुज सरित्पतीईए, जी सरिता । रे
तद्विरहाची शपथ घालितो तुजला ।
सागरा, प्राण तळमळला ॥३॥
या फेनमिषें हंससि निर्दया कैसा ।
कां वचन भंगिसी ऐसा ? ॥
त्वत्स्वामित्या सांप्रत जी मिरवीते ॥
भिउनि कां आंग्लभूमीतें ॥
मम मातेला अबल म्हणुनि फसवीसी
मज विवासनातें देशी ॥
तरि आंग्लभूमि भयभीता ॥रे
अबला न माझि ही माता । रे
कथिल हें अगस्तिस आतां । रे
जो आचमनीं एक क्षणी तुज प्याला ।
सागरा प्राण तळमळला ॥४॥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      ❂ प्रार्थना ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
15. *❂ ⚜ऐ मालिक तेरे बंदे⚜ ❂*
         ✶✶✹✹★●★✹✹✶✶
ऐ मालिक तेरे बंदे , ऐसे हो हमारे करम
नेकी पर चले और बधी से टले 
ताकी हँसते हुए निकले दम ll धृ ll 
ये अँधेरा घना छा रहा , तेरा इंसान घबरा रहा हैं 
हो रहा बेखबर कुछ न आता नजर 
सुख का सुरज छिपा जा रहा 
हैं तेरी रोशनी मैं वो दम 
जो अमावस को कर दे पूनम ll १ ll 
जब जुल्मों का हो सामना , तब तू ही हमें थामना 
वो बुराई करे , हम भलाई करे
नही बदलेकी हो कामना 
बढ़ उठे प्यार का हर कदम 
और मिटे गैर का ये भरम ll २ ll 
बड़ा कमजोर हैं आदमी , अभी लाखों हैं इसमें कमी 
पर तू जो खड़ा हैं दयालु बड़ा 
तेरी कृपा से धरती थमी 
दिया तूने हमें जब जनम 
तू ही झेले हमारे ये गम ll ३ ll 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    ❂ बोधकथा ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
15.  *❃ जातीवंत इंजिनियर..!! ❃*
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
    खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. भारतावर इंग्रजांचे राज्य होते. माणसांनी खच्चून भरलेली एक रेल्वे प्रवास करत होती. प्रवाशांमध्ये जास्तीत जास्त भरणा हा इंग्रजांचाच होता. एका डब्यात एक भारतीय गंभीर चेहरा करून बसलेला होता. सावळ्या रंगाचा, मध्यम उंचीचा हा मनुष्य साधारणप्रतीचे कपडे घालून प्रवास करत होता. त्याच्या रंगाकडे आणि एकूणच अवताराकडे बघून डब्यातील बहुतांश इंग्रज त्याची चेष्टामस्करी करत होते. त्याला खेडूत, अडाणी समजून त्याच्या अवताराची ते टिंगल करत होते. पण त्यांच्या त्या चेष्टामस्करीकडे, टिंगल करण्याकडे त्या भारतीयाचे लक्ष नव्हते. तो त्याच्या नादात मग्न होता. अचानक तो भारतीय उठला आणि त्याने रेल्वेची साखळी ओढली. वेगात धावणारी ती आगगाडी तात्काळ थांबली. गाडीतले प्रवासी त्याला काहीबाही बोलू लागले. थोड्याच वेळात गार्डही तेथे आला व त्याने विचारले, "कोणी साखळी ओढून ही रेल्वे थांबविली"?  त्या सावऴया रंगाच्या व्यक्तिने उत्तर दिले, *"मी ओढली साखळी, मी थांबवली रेल्वे"* गार्डने या कृतीचे कारण विचारले असता ती व्यक्ति उत्तरली, *"माझ्या अंदाजानुसार इथून काही अंतरावर रेल्वे पट्ट्या खराब झाल्या आहेत."*
गार्डने विचारले, *"हे तुला कसे कळले"*  ती व्यक्ति म्हणाली, 
*"माझ्या अनुभवानुसार रेल्वेच्या गतीमध्ये काहीसा फरक पडला आहे आणि त्यामुळे रेल्वेचा जो विशिष्ट आवाज येतो तसा न येता तो वेगळा आवाज येऊ लागला आहे. असा आवाज फक्त रेल्वे पट्ट्या खराब असतानाच येतो हे माझे गणित आहे. आपण याची खात्री करून बघू शकता."*  
    गार्डने याची खातरजमा करून बघण्यासाठी त्या व्यक्तिला बरोबर घेतले व पुढे जाऊन पाहतात तो काय, एके ठिकाणी खरोखरीच रूळाच्या पट्ट्या निसटून रूळ सटकले होते. तेथील नटबोल्टही तेथूनच बाहेर पडलेले दिसून येत होते. हे सर्व होत असतानाच रेल्वेत त्या माणसाची टिंगल करणारे प्रवासीही तेथे येऊन पोहोचले व हे सर्व पाहून ते आश्चर्यचकित झाले. केवळ त्या माणसाच्या ज्ञानामुळे आज त्यांचे प्राण वाचले होते हे जाणवून ते सर्व आता त्या माणसाची प्रशंसा व स्तुती करू लागले. गार्डने त्यांचे आभार मानले व विचारले, *"सर, मी तुमचे नाव व हुद्दा जाणू शकतो काय"* त्या माणसाने शांतपणे उत्तर दिले, *"माझे नाव डॉ. एम. विश्र्वेश्वरैय्या असून मी व्यवसायाने इंजिनियर आहे."* त्यांचे नाव ऐकताच सगळेचजण स्तब्ध झाले. कारण त्याकाळात विश्र्वेश्वरैय्या यांना संपूर्ण देश एक हुशार इंजिनिअर म्हणून ओळखत होता. 
    सहाजीकच टिंगल करणा-या लोकांनी त्यांची क्षमा मागितली.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
15. सुख हे फुलपाखरा सारखे असते, पाठलाग केला तर उडुन जात, बळजबरी केली तर मरून जात, निरपक्ष:पणे काम करत राहील तर, अलगत येउन मनगटा वर येउन बसते.
           तसेच..
     नेहमी स्वार्थी हेतू न ठेवता निस्वार्थी भावनेने सतत काम करत रहा. लोक आपोआप जवळ येतील.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
15. *✿सामान्य ज्ञान प्रश्नावली✿*
   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑
✪  भारताच्या विमान वाहतुकीचे नाव काय आहे ?
-➜  इंडियन एअरलाइन्स.
✪  भारतात चारमिनार कोठे आहे ?
- ➜ हैद्राबाद.
✪  गुजरात या राज्याची राजधानी कोणती आहे ?
- ➜ गांधीनगर. 
✪  इंडिया गेट कोठे आहे ?
- ➜ दिल्ली. 
✪  एका बिंदूतून किती रेषा काढता येतात ?
➜ अनंत.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
15.  *❒ मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या ❒*  
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
   अभियंते, विद्वान, मुत्सद्दी आणि मैसूर संस्थानचे दिवाण, त्यांच्या सन्मानार्थ त्यांचा जन्मदिन हा भारतीय *अभियंता दिन* म्हणून पाळण्यात येतो. *_यांचा आज जन्म दिवस_*
           _त्यानिमित्त त्यांना_
      *_विनम्र अभिवादन..!!_* 
   🙏🐾🌷🌹🌹🌷🐾🙏
●जन्म	 :~ १५ सप्टेंबर १८६०
मुद्देनहळ्ळी, चिकबळ्ळापूर तालुका व जिल्हा, म्हैसूर राज्य (सध्या कर्नाटक)
●मृत्यू	 :~ १४ एप्रील १९६२, बंगलोर
●कार्यक्षेत्र	:~ अभियांत्रिकी
कार्यसंस्था	अभियंता, म्हैसूर चे दिवाण
●पुरस्कार :~ 	भारतरत्न ,'नाईट कमांडर ऑफ दि ऑर्डर ऑफ दि इंडियन एंपायर'
*सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया*
डॉ. विश्वेश्वरय्या १८८१ साली बी.ए. उच्च श्रेणीत उत्तीर्ण झाले. पुण्याच्या सायन्स कॉलेजमधून १८८३ मध्ये ते इंजिनिअरिंगच्या पदवी परीक्षा प्रथम श्रेणीने उत्तीर्ण झाले. त्यानंतर ते मुंबईच्या सार्वजनिक बांधकाम विभागात सहायक अभियंता या पदावर रुजू झाले. १८८३ साली सिंध प्रांतातील सक्कर या शहराला सिंधू नदीपासून पाणी पुरवण्यासाठी त्यांनी प्रसिद्ध 'सक्कर' बंधाऱ्याची योजना केली. १८९९ मध्ये शेतकऱ्यांसाठी ब्लॉक सिस्टिम शोधून काढली तसेच धरणातील वाया जाणारे पाणी थांबवण्यासाठी स्वयंचलित स्लुईस दरवाजाची रचना केली. हैद्राबाद येथील 'मुसा' आणि 'ईसा' या नद्यांवर धरण बांधले. तसेच नदीच्या काठावर बाग बनवून पुरापासून शहराचे संरक्षण केले. म्हैसूरच्या राजांनी त्यांना संस्थानाचे मुख्य अभियंता आणि नंतर दिवाण म्हणून नेमले होते. १८९२ साली डॉ. विश्वेश्वरय्या यांनी कावेरी नदीवर कृष्णराजसागर धरणाची योजना आखली.
डॉ. विश्वेश्वरय्या यांनी लोकांचे अज्ञान व दारिद्र्य नष्ट ह्वावे यासाठी लढा उभारला आणि यातूनच म्हैसूर विद्यापीठाची निर्मिती झाली. म्हैसूरमधील सारे उद्योग त्यांच्या मेहनतीचे फलित आहेत. त्यांच्या या कार्याने प्रेरित होऊनच टाटांनी त्यांची टाटा इस्पातच्या सल्लागारपदी नेमणूक केली होती. या पदावर त्यांनी १९२७ ते १९५५ पर्यंत काम केले. बंगलोरमधील दि हिंदुस्तान एअरक्राफ्ट फॅक्टरी आणि मुंबईची प्रीमियर कंपनी हे त्यांच्या कामाचे मूर्त स्वरूप आहे. देशात अर्थव्यवस्था नियोजन असावे, यावर काम करणारे डॉ. विश्वेश्वरय्या पहिलेच अभियंता होते. त्यांनी या विषयावर 'प्लॅन्ड इकोनॉमी फॉर इंडिया' हे पुस्तक लिहिले आहे. व्यापार आणि उद्योगधंदे यांच्या वाढीसाठी त्यांनी 'बँक ऑफ म्हैसूर' ची स्थापना केली.
      डॉ. विश्वेश्वरय्या यांना अनेक विद्यापीठांच्या डी. लिट उपाध्या मिळाल्या होत्या. ब्रिटिश सरकारने त्यांना 'सर' या उपाधीने गौरिवले, तर देशाचे प्रथम राष्ट्रपती डॉ. राजेन्द्रप्रसाद यांनी १९५५ साली 'भारतरत्न' या उपाधीने सन्मानित केले. त्यांच्या सन्मानार्थ एका टपाल तिकिटाचे प्रकाशनही करण्यात आले आहे. त्यांनी देशात इंजिनिअरिंगच्या तंत्रज्ञानाचा पाया घातल्यामुळेच त्यांचा १५ सप्टेंबर हा जन्मदिन, *'अभियंता दिन'* म्हणून साजरा केला जातो.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
         *✍ संकलन ✍* 
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
 *✧❂ महाराष्ट्र शिक्षण मित्र❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌
*❁सोमवार~15/09/2025❁* 
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
No comments:
Post a Comment