"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

*22/08/25 शुक्रवारचा परिपाठ*

❂••⊰❉⊱•⊰❉⊱•⊰❉⊱••❂

*महाराष्ट्र शिक्षक परिवार*

*❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀*


 *💲शालेय परिपाठ💲*

❉⌘❉⌘✽⌘✪⌘✽⌘❉⌘❉

    🇮🇳 *राष्ट्रगीत*  🇮🇳

❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ 

    ♦ *प्रतिज्ञा* ♦

❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ 

    🇮🇳 *संविधान* 🇮🇳

❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ 

   🌀 *महाराष्ट्र गीत* 🌀

*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*


💎 *सर्वप्रकारची शैक्षणिक माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी...*

 🔘 *"माझी शाळा" ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*

  🔗🔗👇👇🔗🔗


https://sutrasanchaln.blogspot.com/p/blog-page_901.html

▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄

*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*

 ━═●🇲◆🇸◆🇵●═━

🍥 *22. ऑगस्ट:: शुक्रवार* 🍥

 ⫹⫺⫹⫺⫹⫺⫹⫺⫹⫺⫹⫺⫹⫺⫹⫺⫹⫺

श्रावण कृ.१४, पक्ष :कृष्ण पक्ष, 

तिथि ~चतुर्दशी, नक्षत्र ~अश्लेशा, 

योग ~वरीयान्, करण ~शकुनि, 

सूर्योदय-06:21, सूर्यास्त-19:01,

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0२ ]      ❂ सुविचार ❂* 

  ━┅━▣◆★✪★◆▣═┅━


22. *आपल्यामुळे दुसऱ्याला दु:ख होईल असे कधीही वागू नका.*

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*

━━●🇲=◆🇸◆=🇵●═━


22. *डोंगर पोखरून उंदीर कढणे* 

              *★ अर्थ ::~* 

जास्त श्रम करून कमी फायदा होणे.

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*

━┅━▣◆★✧★◆▣═┅━


22. *परोपकाराय सतां विभूतय: ।*

       ⭐अर्थ ::~ सज्जनांचे ऐश्वर्य परोपकारासाठी असते.

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*

━━●🇲=◆🇸◆=🇵●═━


     🛡 ★ 22. ऑगस्ट ★ 🛡

🔻===●●●★●●●===🔻

★ हा या वर्षातील २३४ वा (लीप वर्षातील २३५ वा) दिवस आहे.

       

   ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~

 🔹•••°°~°°•••◆•••°°~°°•••🔹

●१९६२ : फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष चार्ल्स द गॉल यांची हत्या करण्याचा कट फसला.

●१९४४ : दुसरे महायुद्ध – सोविएत युनियनने रोमानिया जिंकले.

●१९४२ : दुसरे महायुद्ध – ब्राझिलने जर्मनी व इटालीविरुद्ध युद्ध पुकारले.

●१९०२ : कॅडिलॅक मोटर कंपनीची स्थापना


   ~*★जन्मदिवस / जयंती★*~

  🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸

◆१९५५ : चिरंजीवी – अभिनेते व केंद्रीय मंत्री

◆१९३५ : पंडित गोपीकृष्ण – कथ्थक नृत्यशैलीचे बनारस घराण्याचे नर्तक, नृत्यदिग्दर्शक व अभिनेते. 

◆१९२० : डॉ. डेंटन कूली – ह्रुदयरोपण शस्त्रक्रियेचा पाया घालणारे अमेरिकन शल्यविशारद

◆१९१८ : डॉ. बानू कोयाजी – कुटुंबनियोजनाच्या क्षेत्रात सलग साठ वर्षे कार्य 

◆१९१५ : शंभू मित्रा – बंगाली रंगभूमीवरील अभिनेते, दिग्दर्शक व नाटककार 


    ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~

  ◆•••°°~°°••◆••°°~°°•••◆

●१९९५ : पंडित रामप्रसाद शर्मा – संगीतकार, ट्रम्पेट व व्हायोलिनवादक. ‘लक्ष्मीकांत-प्यारेलाल‘ या जोडीतील प्यारेलाल यांचे ते वडील होत. 

●१९८९ : पं. कृष्णराव शंकर पंडित – ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक. राष्ट्रपती डॉ. राजेन्द्रप्रसाद यांनी त्यांचा ’राष्ट्रीय गायक’ म्हणून गौरव केला होता.

●१९८२ : एकनाथजी रामकृष्ण रानडे – क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक व कन्याकुमारी येथील विवेकानंद शिला स्मारकाचे शिल्पकार. 

●१८१८ : वॉरन हेस्टिंग्ज – भारताचा पहिला गव्हर्नर जनरल

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*🚦सतिष बोरखडे दारव्हा*

   💥📱7875840444💥

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..


     https://goo.gl/8D33ox

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

✪✪✫✪✫✪✫✫✪✫✪✫✪✪

*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂* 

  ━┅━▣◆★✧★◆▣═┅━


22.  *✹ आज़ादी का गीत ✹*

   ●●●●●०००००●●●●

हम ऐसे आज़ाद हमारा झंडा है बादल।

चाँदी सोने हीरे मोती से सजती गुड़ियाँ।

इनसे आतंकित करने की बीत गई घड़ियाँ

इनसे सज धज बैठा करते जो हैं कठपुतले

हमने तोड़ अभी फेंकी हैं बेड़ी हथकड़ियाँ


परंपरा गत पुरखों की हमने जाग्रत की फिर से

उठा शीश पर रक्खा हमने हिम किरीट उज्जवल

हम ऐसे आज़ाद हमारा झंडा है बादल।


चाँदी सोने हीरे मोती से सजवा छाते

जो अपने सिर धरवाते थे वे अब शरमाते

फूलकली बरसाने वाली टूट गई दुनिया

वज्रों के वाहन अंबर में निर्भय घहराते


इंद्रायुध भी एक बार जो हिम्मत से ओटे 

छत्र हमारा निर्मित करते साठ कोटि करतल

हम ऐसे आज़ाद हमारा झंडा है बादल।

               ~हरिवंश राय बच्चन

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0७ ]      ❂ प्रार्थना ❂*

━┅━▣◆★✧★◆▣━┅━


22. *❂ तू बुद्धि दे तू प्रकाश ❂*

    ✶✶✹✹★●★✹✹✶✶

तू बुद्धि दे, तू प्रकाश दे, नवचेतना विश्वास दे

जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे


सापडे ना वाट ज्यांना हो तयांचा सारथी

हरवले आभाळ ज्यांचे हो तयांचा सोबती

करिती तुझी जे साधना त्यांना तुझा सहवास दे


सन्मार्ग आणि सन्मती लाभो सदा सत्संगती

नीती ना ही भ्रष्ट हो जरी संकटे आली किती

पंखात ह्या बळ दे नवे झेपावण्या आकाश दे

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0८ ]    ❂ बोधकथा ❂*

━━●🇲=◆🇸◆=🇵●━━


22. *❃ माणुसकी जपा..!! ❃*

    ••◆•◆•◆★◆•◆•◆••

      हिंदुजा हॉस्पिटलमधुन एका डॉक्टरला ऑपरेशन साठी कॉल आला... खुप घाई करून तो डॉक्टर हॉस्पिटल मध्ये पोहोचला... त्याने पटकन सगळ्या नर्सला ऑपरेशनची तयारी करण्यास सांगितले, स्वतःचे कपडे बदलले, आणि पटकन ऑपरेशन थिएटर जवळ आला...


    तिथे त्याने पाहिले की एका मुलाचे वडिल ,जे कि वडिलोपार्जित गर्भश्रीमंत होते. ते हॉल बाहेर रागात

चकरा मारताय आणि डॉक्टर ची वाट

पाहताय... डॉक्टरांना पाहताच त्या मुलाच्या वडिलाचा पारा चढला व ते रागातच डॉक्टर ला म्हणाले

"तुम्ही इथे यायला इतका वेळ का घेतला? तुम्हाला कळत नाही का माझ्या मुलाचे प्राण धोक्यात आहे ते? तुम्हाला काही जबाबदारी ची जाणिव

आहे ; की नाही?" यावर डॉक्टर स्मितहास्य देत म्हणाला 

"मला माफ करा, मी हॉस्पीटल मध्ये नव्हतो, मी फोन आल्यानंतर जितक्या लवकर येता आले तितक्या लवकर आलो, आणि आता मी प्रार्थना करतो की तुम्ही शांत व्हा..!!

मला माझ काम करू द्या" "शांत व्हा?? 

वडील म्हणाले ,जर तुमचा मुलगा आता ऑपरेशन थिएटर मध्ये

असता तर?? जर तुमचा स्वतःचा मुलगा आता मृत्यु च्या जबड्यात असता तर तुम्ही काय केलअसतं??"

 वडील रागात म्हणाले...

डॉक्टर पुन्हा एकदा स्मितहास्य देत

म्हणाले "कोणत्याही प्रकारचे पापकर्म न करणे व सर्व प्रकारचे कुशलकर्म करणे अशी शिकवण देणाऱ्या तथागताचा मी उपासक आहे...

       आता तुम्ही शांत व्हा व समस्त प्राणिमात्राविषयी मैत्रिभावना करा...

मी माझे पुर्ण प्रयत्न करतो..."

आणि असे म्हणत डॉक्टर ऑपरेशन थिएटर मध्ये गेला तसे वडिल त्या डॉक्टरकडे रागातच पहात राहिले आणि काही तासांनंतर डॉक्टर आनंदात बाहेर आले आणि त्या मुलाच्या वडिलांना म्हणाले...


   "अभिनंदन ऑपरेशन यशस्वी झालं...  तुमच्या पुण्यकर्मचे फळ व आमचे प्रयत्नानी मुलाचे प्राण वाचले"

त्यावर मुलाच्या वडिलांचा आनंद

गगनात मावेनासा झाला...

त्यांनी डॉक्टर ना धन्यवाद दिले..

डॉक्टरांनी त्याना काहीही प्रतिक्रिया दिली नाही आणी ते तसेच तिथुन ताडकन निघुन गेले...


    यावर मग श्रीमन्तीचा पडदा पडलेल्या वडिलांना आश्चर्य झाला आणि ते शेजारी उभ्या असलेल्या नर्स ला रागात म्हणाले...

"किती गर्विष्ठ आणि माजोरा आहे

हा डॉक्टर"

        त्यावर ती नर्स रडत म्हणाली 

 "त्या डॉक्टरांचा मुलगा काल

अपघातात वारला... आज ते

त्याचा अंतिम संस्कार करत होते. जेव्हा आम्ही त्यांना तुमच्या मुलाच्या ऑपरेशन साठी फोन केला... आणि ते स्वतःच्या मुलाचा अंतिम संस्कार अर्धवट सोडुन घाईने तुमच्या मुलाच्या ऑपरेशन साठी आले आणि आता अंतिम संस्कार पुर्ण करण्यासाठि पटकन गेले...


     अहो ज्यांचा स्वतःचा एकुलता एक

मुलगा मेला तो काय गर्व आणि माज करणार" हे ऐकुन त्याच्ये वडिल सुन्न झाले.. आणि त्यांना खुप

पश्चाताप झाला...


       *🌀❝ तात्पर्य ❞ ::~* 

    कधीच कुणाबद्दल काहीही बोलुन मोकळे होऊ नये कारण तुम्हाला नसतं माहित त्याने काय भोगलय...

 पैसा सर्वच नसतो, माणुसकी जपा..!!

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*

━┅━▣◆★✧★◆▣═┅━


22. *आयुष्य आरश्या सारखे आहे..*

              *हे तेव्हाच हसणार*

      *जेव्हा तुम्ही हसणार...!!*

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*

━┅━▣◆★✧★◆▣═┅━


22. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*

   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑


 ✪  शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?

  ➜ पुणे.


 ✪  मानवाच्या प्रत्येक डोळ्यात किती स्नायू असतात ?

  ➜ ६ स्नायू.


 ✪  गेटवे आॅफ इंडिया कोणत्या शहरात आहे ?

  ➜ मुंबई.


 ✪  जगातील क्षेत्रफळाने मोठा असलेला देश कोणता ?

  ➜ रशिया.


✪  राष्ट्रीय आयुर्वेद संस्था कोठे आहे ?

  ➜ जयपूर 

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*

━━●🇲=◆🇸◆=🇵●═━


22. *❒♦डॉ. बानू कोयाजी❒*  

   ━━•●◆★★◆●•═━

*●जन्म :~ २२ आँगष्ट १९१८*

●मृत्यू :~ १५ जुलै २००४


      कुटुंबनियोजनाच्या क्षेत्रात सलग साठ वर्षे कार्य करणार्‍या सामाजिक कार्यकर्त्या. त्यांना पद्मभूषण, रॅमन मॅगसेसे पुरस्कार, रामेश्वरदास बिर्ला राष्ट्रीय पुरस्कार, पुण्यभूषण पुरस्कार, पुणे विद्यापीठातर्फे डॉक्टर ऑफ लेटर्स (१९५५) इ. पुरस्कारांनी गौरविण्यात आले. 


डॉ. बानू कोयाजी या भारतातील एक प्रख्यात वैद्यकीय तज्ञ व समाजसेविका होत्या.  त्या प्रामुख्याने पुण्यातील किंग एडवर्ड मेमोरियल (KEM) हॉस्पिटल, पुणे येथे कार्यरत होत्या.


*डॉ. बानू कोयाजी स्त्रीरोगतज्ज्ञ (Gynecologist & Obstetrician) म्हणून कार्यरत होत्या.

* स्त्रियांना व बालकांना उत्तम आरोग्यसेवा मिळावी यासाठी त्यांनी आयुष्यभर काम केले.

* त्या फॅमिली प्लॅनिंग, मातृ-शिशू आरोग्य या विषयांवर कार्यरत होत्या.

* पुण्यातील गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी KEM हॉस्पिटल एक मोठा आधार ठरले, यात त्यांचा मोठा वाटा आहे.

* त्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव मिळाला.

* त्यांना पद्मभूषण पुरस्कार (1989) प्रदान करण्यात आला.


डॉ. बानू कोयाजी या केवळ वैद्यकीय क्षेत्रातच नव्हे तर सामाजिक चळवळींमध्ये सुद्धा सक्रिय होत्या. महिलांच्या आरोग्याबरोबरच त्यांनी स्त्रीशिक्षण व महिला सक्षमीकरण यासाठीही कार्य केले. पुण्यातील के. इ. एम. रुग्णालय, जहांगीर नर्सिंग होम, दैनिक सकाळ, इंडिया फांउंडेशन इ. संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. 

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

••●◎◑✹★✹✹★✹◑◎●••

            *✍ संकलन ✍* 

*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*

   ♦📱 7875840444 ♦

 *❂ महाराष्ट्र शिक्षण मित्र ❂*

█║▌║▌║█❂█║▌║█║▌


 *❁शुक्रवार~22/08/2025❁*

*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment