ज्यांनी लिहिली आझादीची गाथा,
त्यांच्या चरणी ठेविते माथा...!!
"भारत-भू"ला पारतंत्र्याच्या मगरमिठीतून मुक्त करणाऱ्या सर्व "देशभक्तांना" मानाचा मुजरा....!!
१५ ऑगस्ट: स्वातंत्र्य दिन हा प्रत्येक भारतीयासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी देशाला ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळालं आणि भारत एक सार्वभौम राष्ट्र म्हणून उदयास आले.
★ऐतिहासिक महत्त्व-
१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला सुमारे २०० वर्षांच्या ब्रिटिश राजवटीतून मुक्ती मिळाली. या स्वातंत्र्यासाठी अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी आपलं जीवन समर्पित केलं होतं. महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखालील अहिंसक चळवळी, तसेच भगतसिंग, सुभाषचंद्र बोस यांच्यासारख्या क्रांतीकारकांच्या योगदानाला या दिवशी उजाळा मिळतो. भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळी, भारताची फाळणी होऊन पाकिस्तानची निर्मिती झाली, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात हिंसाचार आणि विस्थापन झाले. तरीही, या दिवसाने भारताच्या इतिहासात एका नव्या पर्वाची सुरुवात केली.
★स्वातंत्र्य दिनाची पार्श्वभूमी-
१९३० पासून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने २६ जानेवारी हा दिवस 'पूर्ण स्वराज दिन' म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली होती, पण प्रत्यक्ष स्वातंत्र्य मिळाल्यावर १५ ऑगस्ट हा दिवस निश्चित करण्यात आला. लॉर्ड माउंटबॅटन यांनी १५ ऑगस्ट ही तारीख निवडली, कारण याच दिवशी दुसऱ्या महायुद्धात जपानने मित्र राष्ट्रांसमोर शरणागती पत्करली होती.
★स्वातंत्र्य दिन साजरा करण्याची पद्धत-
स्वातंत्र्य दिनाचा मुख्य सोहळा दिल्लीतील लाल किल्ल्यावर होतो. भारताचे पंतप्रधान लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकवतात आणि देशाला संबोधित करतात. या सोहळ्याला 'एकवीस तोफांची सलामी' दिली जाते. देशभरात शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालये आणि इतर सार्वजनिक ठिकाणी ध्वजारोहण कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम आणि देशभक्तीपर गाण्यांचे आयोजन केले जाते. या दिवशी लोकांना मिठाई वाटली जाते. भारतीय नागरिक आपल्या घरांवर, गाड्यांवर राष्ट्रध्वज फडकवून आपला राष्ट्रभक्तीचा गौरव व्यक्त करतात.
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Independence Day!
आज 15 ऑगस्ट, भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त, वंदे मातरम आणि भारत माता की जय म्हणत आपल्या देशाच्या स्वातंत्र्य सैनिकांना आदराने वंदन करूया. या दिवशी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्यांनी आपले प्राण अर्पण केले, त्या सर्व वीरांना आणि वीरांगनांना सलाम.
आपल्या तिरंगा ध्वजाचा मान राखूया आणि जय हिंद म्हणून आपल्या देशाच्या विकासासाठी आणि प्रगतीसाठी योगदान देण्याचा संकल्प करूया.
तुमच्या सर्व स्वप्नांना आणि आकांक्षांना यश मिळो! Independence Day 2025 च्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना खूप खूप शुभेच्छा..!
स्वातंत्र्यदिनाच्या प्रेमपूर्वक शुभेच्छा....🌹💐जय हिंद..।।
आचंद्र सूर्य नांदो, स्वातंत्र्य भारताचे...।।
१५ ऑगस्ट २०२५ भारतात सगळीकडे ७९ वा स्वातंत्र्यदिन साजरा केला होतोय . भारताला स्वातंत्र्य मिळ्वुन देणार्या सर्व हुतात्म्यांना कोटी कोटी प्रणाम....
बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो !!
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा जय हिंद...!!
माझ्या सर्व भारतीय बांधवांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा... जय हिंद,जय भारत...
भारत माता कि जय... वंदे मातरम्...!!
! जय हिंद ! वंदे मातरम !
नतमस्तक मी त्या सर्वांसाठी
ज्यांनी भारत देश घडवीला...!!
सीमेवर प्राणपणाने देशाची राखण करून देशवासीयांना सुखासमाधानाने जगू देणाऱ्या आमच्या जांबाज सैनिकांना मानाचा मुजरा ! जय हिंद ! वंदे मातरम !नतमस्तक मी त्या सर्वांसाठीज्यांनी भारत देश घडवीला...!!
🔘🔘🔘🔻🔘🔘🔘


No comments:
Post a Comment