"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

 

*01/07/24 सोमवार चा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

*Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*

*⌘⌘⌘✽⌘⌘✪⌘⌘✽⌘⌘⌘*

 *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

 *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

 *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
       🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

https://urlzs.com/dmQmp
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]    ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *01. जुलै:: सोमवार* 🍥
━═•●◆❃★❂★❃◆●•═━
ज्येष्ठ कृ.10, पक्ष :कृष्ण पक्ष,
तिथि ~दशमी , नक्षत्र ~अश्विनी,
योग ~सुकर्मा, करण ~विष्टि,
सूर्योदय-06:04, सूर्यास्त-19:20,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]       ❂ सुविचार ❂*
  ━┅═▣◆★✪★◆▣═┅━

01. *सगळेच निर्णय मनाने घेऊ नका; काही निर्णय बुध्दीलाही घेऊ द्या.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●═━

01. घोडामैदानजवळ असणे –  
   ★ अर्थ ::~ परीक्षा लवकरच होणे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅━▣◆★✧★◆▣━┅━

01. *नास्ति ज्ञानात् परं सुखम् ।*
          ⭐अर्थ ::~
ज्ञानापेक्षा दुसरी कोणतीही गोष्ट अधिक आनंददायी नाही.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●━━

     *🛡 ★ 01. जुलै ★ 🛡*
🔻===●●●★●●●===🔻
★राष्ट्रीय डॉक्टर दिन
★हा या वर्षातील १८२ वा (लीप वर्षातील १८३ वा) दिवस आहे.
★महाराष्ट्र कृषी दिन

    ~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९७ : शतकातील सर्वोत्कृष्ट वेटलिफ्टर्सच्या यादीत भारताच्या कुंजरानी देवीचा समावेश करण्यात आला.
●१९५५ : ’स्टेट बँक ऑफ इंडिया अ‍ॅक्ट
●१९०९ : क्रांतिकारक मदनलाल धिंग्राने भारतमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक कर्नल विल्यम कर्झन वायली यांची  गोळ्या झाडून हत्या केली.
●१८८१ : कॅनडातुन अमेरिकेत जगातील पहिला आंतरराष्ट्रीय टेलिफोन कॉल करण्यात आला.

    ~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९६१ : कल्पना चावला – भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर
◆१९४९ : वेंकय्या नायडू – केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष
◆१९३८ : पंडित हरिप्रसाद चौरसिया – बासरीवादक, पद्मविभूषण
◆१९१३ : *वसंतराव नाईक – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, रोजगार हमी योजनेचे जनक*
◆१८८२ : डॉ. बिधनचंद्र रॉय – भारतरत्‍न (१९६१), आंतरराष्ट्रीय कीर्तीचे निष्णात डॉक्टर, आधुनिक बंगालचे शिल्पकार, पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री

      ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९४ : राजाभाऊ नातू – दिग्दर्शक, नेपथ्यकार, प्रकाशयोजक व नाट्य 
●१९८९ : प्राचार्य ग. ह. पाटील – कवी व शिक्षणतज्ञ
●१९६२ : डॉ. बिधनचंद्र रॉय – भारतरत्‍न (१९६१),  पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री ब्राम्हो समाजाचे सदस्य
●१९६२ : पुरुषोत्तम दास टंडन – स्वातंत्र्यसेनानी, भारतरत्‍न (१९६१),  अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
━┅═▣◆★✧★◆▣═┅━

01. *✸ ते अमर हुतात्मे झाले ✸*
       ●●●●००००००●●●●
*ते देशासाठी लढले*
*ते अमर हुतात्मे झाले ! Ilधृll*
सोडिले सर्व घरदार
त्यागीला सुखी संसार
ज्योतिसम जीवन जगले
ते देशासाठी लढले ! ||१||
जे देशासाठी••••••

तो तुरुंग तो उपवास
सोसला किती वनवास
कुणी फासावरती चढले
ते देशासाठी लढले ! ||२||
जे देशासाठी लढले••••••

झगडली,झुंजली जनता
मग स्वतंत्र झाली 'माता'
हिमशिखरी ध्वज फडफडले
ते देशासाठी लढले ! ||३||
जे देशासाठी लढले••••••

🇮🇳हा राष्ट्रध्वज साक्षीला
करू आपण वंदन याला🙏
जयगीत गाउया अपुले
ते देशासाठी लढले ! ||४||
जे देशासाठी लढले••••
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      ❂ प्रार्थना ❂*
━┅═▣◆★✧★◆▣━┅━

01. *❂ तुम्ही माता-पिता हो ❂*
   ━═●✶✹★●★✹✶●═━
तुम्ही हो बंधू , सखा तुम्ही हो|
तुम्ही हो माता, पिता तुम्ही हो।

तुम्ही हो बंधू , सखा तुम्ही हो
तुम्ही हो साथी तुम्ही सहारे,
कोई ना अपने सिवा तुम्हारे।
तुम्ही हो साथी तुम्ही सहारे,
कोई ना अपने सिवा तुम्हारे।
तुम्ही हो नईया, तुम्ही खिवईया,
तुम्ही हो बंधू, सखा तुम्ही हो
तुम्ही हो माता, पिता तुम्ही हो।
तुम्ही हो बंधू , सखा तुम्ही हो

जो खिल सके ना वो फूल हम हैं,
तुम्हारे चरणों की धूल हम हैं।
जो खिल सके ना वो फूल हम हैं,
तुम्हारे चरणों की धूल हम हैं
दया की दृष्टि सदा ही रखना,
तुम्ही हो बंधू सखा तुम्ही हो|
तुम्ही हो माता, पिता तुम्ही हो।
तुम्ही हो बंधू , सखा तुम्ही हो
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    ❂ बोधकथा ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●═━

01. *❝ संकटसमयीचे धैर्य ❞*
     ━━•●◆●★◆★●◆●•━━
      अरब देशात पूर्वी एक बादशहा होऊन गेला. तो अत्‍यंत थाटात राहायचा. एकदा शेजारच्‍या देशाने त्‍याला युद्धाचे आव्‍हान दिले. बादशहा आपले सैन्‍य घेऊन सीमेवर निघाला. दुर्दैवाने त्‍याला शत्रूकडून हार पत्‍करावी लागली. त्‍याला बंदी बनवून आणण्‍यात आले. त्‍याला त्‍या जेलमध्‍ये ठेवण्‍यात आले होते. तेथे स्‍वयंपाक्‍यांनाही ठेवण्‍यात आले होते. त्‍याने आपल्‍या स्‍वयंपाक्‍यास जेवण बनवण्‍यास सांगितले. तेव्‍हा त्‍यांच्‍याकडे एकच मांसाचा तुकडा उरला होता. त्‍यांनी तोच तुकडा उकळण्‍यासाठी ठेवला. तेवढयात एक कुत्रा ते‍थे आला. मांसाच्‍या तुकड्याचा वास आल्‍याने त्‍याने भांड्यात तोंड घातले. पण त्‍याचे तोंड त्‍या भांडयात अडकले. आपले तोंड भांड्यातून सोडवू न शकलेले ते कुत्रे पळून गेले. ते पाहून बादशहाला हसू आवरले नाही व तो हसू लागला. बादशहा हसतो आहे हे पाहून पहा यावरील सैनिकाने त्‍याला विचारले, तुम्‍ही इतक्‍या अडचणीत असूनसुद्धा हसता कसे? दुसरा कोणी असता तर शरमेने मान खाली घालून बसला असता. तेव्‍हा बादशहा म्‍हणाला,’’ तोंड लपवून कोणती समस्‍या सुटते काय? वेळ फिरली की काय काय करावे लागते हे आता कुत्र्यापासून पहायला मिळाले याचे मला हसू आले आणि शिकायलाही. खरा माणूस दुखही हसून पचवतो. संकटसमयी आशावादी राहून संकटाशी मुकाबला करणारे धैर्यशील म्‍हणवले जातात.’’

       *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
   संकटाशी सामना करणे हेच पुरुषार्थाचे लक्षण आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

01.  असे *हास्य* तयार करा की
  हृदयाला  त्रास होणार नाही ,

      असा *स्पर्श* करा की,
त्याने जखम होणार नाही ,

      अशी *मैत्री* करा की ,
त्याचा शेवट कधी होणार नाही..!
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅═▣◆★✧★◆▣═┅━

01. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*
   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑

✪  माझे सत्याचे प्रयोग हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
➜महात्मा गांधी.

✪  चैत्यभूमी महाराष्ट्रातील कोणत्या शहरात आहे ?
➜मुंबई.

✪ खालसा या पंथाची स्थापना कोणी केली ?
➜गुरू गोविंदसिंग.

✪ हाॅकी जादूगर कोणाला म्हणतात ?
➜मेजर ध्यानचंद.

✪  लीप वर्षत एकूण किती दिवस असतात ?
➜३६६ दिवस.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

01. *❒♦वसंतराव नाईक♦❒* 
  ━═•●◆●★◆★●◆●•═━
★महाराष्ट्र राज्याचे तिसरे मुख्यमंत्री★
              व एक कृषितज्ञ,
     *रोजगार हमी योजनेचे जनक*
_यांची आज जयंती त्यानिमित्त त्यांना_
        *विनम्र अभिवादन..!!*
   🙏🐾🌷🌹🌹🌷🐾🙏

●जन्म :~ १ जुलै १९१३
गहुली ता.पुसद जिल्हा यवतमाळ
●मृत्यू :~ १८ ऑगस्ट १९७९

       ◆वसंतराव फुलसिंग नाईक◆
    वसंतरावांचे प्राथमिक शिक्षण विविध खेड्यांत झाले. नंतर एल्एल्.बी ही पदवीही मिळविली (१९४०). विद्यार्थिदशेत त्यांच्यावर महात्मा जोतिबा फुले व डेल कार्नेगी या दोहोंच्या विचारांची छाप पडली.

      वसंतरावांनी कायद्याची पदवी घेऊन पुसद येथे वकिलीस सुरुवात केली. हळूहळू त्यांचा वकिलीत जम बसू लागला व आर्थिक स्थितीही सुधारली तसेच प्रतिष्ठाही वाढली.
१९४६ मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मध्य प्रदेश राज्याच्या मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी त्यांची नियुक्ती झाली (१९५१–५२). ते पुसदच्या नगरपालिकेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले (१९४६–५२).

      पहिल्या निवडणुकीत ते मध्य प्रदेश राज्यात महसूल खात्याचे उपमंत्री झाले (१९५२–५६). १९५६ मध्ये राज्यपुनर्रचनेनंतर विदर्भ व मराठवाडा हे प्रदेश मुंबई द्विभाषिक राज्यात समाविष्ट झाल्यानंतर वसंतराव यशवंतरावांच्या मंत्रिमंडळात कृषिमंत्री झाले (१९५७). पुढे १९६० मध्ये स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर ते प्रथम महसूल मंत्री होते. १९६२ च्या निवडणुकीनंतरही कन्नमवारांच्या मंत्रिमंडळात ते महसूल मंत्री होते; पण कन्नमवारांच्या मृत्यूनंतर ते बहुमताने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले (१९६३). या पदावर त्यांनी सु. १२ वर्षे काम केले. या काळात त्यांनी महाराष्ट्रात अनेक सुधारणा केल्या.

      प्रथमतः त्यांनी कृषिविषयक समस्या हाताळून महाराष्ट्र धान्याच्या बाबतीत कसा स्वयंपूर्ण होईल याकडे लक्ष दिले. ‘दोन वर्षात महाराष्ट्र धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला नाही, तर मी स्वतः फाशी जाईन’ असे त्यांनी १९६५ मध्ये निक्षून सांगितले; त्यांचा प्रशासकीय दृष्टिकोन व्यावहारिक असे. काँग्रेसचे दारूबंदी हे धोरण असतानासुद्धा त्यांनी महाराष्ट्रात दारूबंदी शिथिल करून लोकांना चांगली दारू उपलब्ध केली व हातभट्ट्यांना आळा घालण्याचा प्रयत्न केला. कोणतीही समस्या ते विचारविनिमय करून तडजोडीच्या धोरणाने सोडवीत. त्यांनी शिक्षण, शेती वगैरे बाबतींत लक्ष घालून अनेक सुधारणा केल्या. विशेषतः पाझर तलाव व वसंत बंधारा यांच्या निर्मितीचे श्रेय त्यांच्याकडे जाते. २० फेब्रुवारी १९७५ रोजी शंकरराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर वसंतरावांनी आपल्या जिल्ह्यातच सामाजिक कार्य केले. १९७७ मार्चमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत ते लोकसभेवर निवडून आले.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹✹★✹◑◎●••
            *✍संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
║▌║▌║█❃❂❃█║▌║║▌

*❁ सोमवार~01/07/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment