*01/10/24 मंगळवारचा परिपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*
*Ⓜ💲🅿 परिपाठ Ⓜ💲🅿*
*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*
*💥🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀
*💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀
*💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
🔘 *"माझी शाळा"* 🔘
*ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
🔗🔗👇👇🔗🔗
https://goo.gl/RpQbsw
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *01. ऑक्टोबर:: मंगळवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
भाद्रपद कृ.१४, पक्ष :कृष्ण पक्ष,
तिथि ~चतुर्दशी,
नक्षत्र ~पूर्वाफाल्गुनी,
योग ~शुक्ल, करण ~विष्टि,
सूर्योदय-06:29, सूर्यास्त-18:26
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ] ❂ सुविचार ❂*
━┅═▣◆★✪★◆▣═┅━
🔵🟢🔴
01. *संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं पण संकटाचा सामना करणं त्याच्या हातात असतं.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ] ▪ म्हणी व अर्थ* ▪
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••
01. *गाढवाला गुळाची चव काय –*
★ अर्थ ::~ अडाणी, मूर्ख माणसास गुणाचे कौतुक नसते
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ] ▫ सुभाषीत▫*
====••◆◆●★●◆◆◆••====
01. *ज्ञानस्याभरणं क्षमा ।*
⭐अर्थ :: ~
क्षमा हे ज्ञानाचे भूषण होय.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ] ♦दिनविशेष*♦
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••
🛡 *01. ऑक्टोबर * 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★ जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन
★ हा या वर्षातील २७४ वा (लीप वर्षातील २७५ वा) दिवस आहे.
★ १ आक्टोबर ते ७ आक्टोबर :
वन्य जीव सप्ताह
~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९५९ : भुवनेशप्रसाद सिन्हा यांनी भारताचे ६ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
●१९५८ : भारतात दशमान (मेट्रिक) पद्धत वापरण्यास सुरूवात झाली.
●१८८० : थॉमस एडिसनने विद्युतदिव्यांचा कारखाना सुरू केला.
●१८३७ : भारतातील पहिले टपाल कार्यालय सुरू झाले.
~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९२४ : जिमी कार्टर – अमेरिकेचे ३९ वे राष्ट्राध्यक्ष, नोबेल पारितोषिक विजेते
◆१९१९ : *ग. दि. माडगूळकर –* गीतकार, कवी, लेखक, पटकथाकार,
◆१९१९ : मजरुह सुलतानपुरी – दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते
◆१८९५ : लियाकत अली खान – पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान
◆१८४७ : अॅनी बेझंट – थिऑसॉफिस्ट, सामाजिक कार्यकर्त्या व भारतीय स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या, १९१६ मध्ये त्यांनी ’होमरुल लीग’ची स्थापना केली. (मृत्यू: २० सप्टेंबर १९३३)
~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९७ : गुल मोहम्मद – जगातील सर्वात बुटकी व्यक्ती (२२.१")
●१९३१ : शंकर काशिनाथ गर्गे तथा ’दिवाकर’ – नाट्यछटाकार
●१८६८ : मोंगकुट ऊर्फ राम (चौथा) – थायलंडचा राजा
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..
https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ] ❂ देशभक्ती गीत ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━
01. *खरा तो एकची धर्म*
🇮🇳🔺🇮🇳♦🇮🇳🔺🇮🇳
खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे
जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पददलित
तया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे
जयांना ना कोणी जगती सदा ते अंतरी रडती
तया जाऊन सुखवावे, जगाला प्रेम अर्पावे
समस्तां धीर तो द्यावा, सुखाचा शब्द बोलावा
अनाथा साह्य ते द्यावे, जगाला प्रेम अर्पावे
सदा जे आर्त अतिविकल, जयांना गांजती सकल
तया जाऊन हसवावे, जगाला प्रेम अर्पावे
कुणा ना व्यर्थ शिणवावे, कुणा ना व्यर्थ हिणवावे
समस्तां बंधु मानावे, जगाला प्रेम अर्पावे
प्रभूची लेकरे सारी तयाला सर्वही प्यारी
कुणा ना तुच्छ लेखावे, जगाला प्रेम अर्पावे
असे जे आपणापाशी असे, जे वित्त वा विद्या
सदा ते देतची जावे, जगाला प्रेम अर्पावे
भरावा मोद विश्वात असावे सौख्य जगतात
सदा हे ध्येय पूजावे, जगाला प्रेम अर्पावे
असे हे सार धर्माचे असे हे सार सत्याचे
परार्थी प्राणही द्यावे, जगाला प्रेम अर्पावे
जयाला धर्म तो प्यारा, जयाला देव तो प्यारा
त्याने प्रेममय व्हावे, जगाला प्रेम अर्पावे
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ] 💎 प्रार्थना 💎*
====••◆◆●★●◆◆◆••====
01. *शारदे हवे तुझे वरदान*
==••◆◆●★●◆◆••==
मानवतेची गावी गाणी,
अशी आम्हा दे जिवंत वाणी l
अन्यायाचे दर्शन होता,उसळो त्वेष उधान ll१ll
*शारदे हवे तुझे वरदान*
स्वतंत्र भारतभूचे वैभव ,सामर्थ्याने नटलेले नव,
उच्छवासाचा प्रबंध व्हावा, गाता भारत गान ll२ll
*शारदे हवे*.......
मराठीयेची नगरी आम्ही शिल्पकार की रचनाप्रेमी
जीवन मंदीर उभवू सुंदर हा अमुचा
अभिमान ll३ll
*शारदे*..........
उकलायाला जीवनशास्त्रे,पहावया नव विक्रमक्षेत्रे
दिव्यदृष्टी दे करावयाला उन्नत जीवन मान ll४ll
*शारदे हवे*........
दिवंगतांच्या अतृप्त आशा,पूर्ण कराया अशी मनीषा,
भीष्मकामना निववाया दे,अर्जुन शर संधान ll५ll
*शारदे हवे*.......
नव्या युगाची नवीन सृष्टी नव्या मानवा दे नव दृष्टी
हवा शारदे नवा वीरंची नवचातुर्य निधानll६ll
*शारदे*........
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ] 🔵 बोधकथा*🔵
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••
01. *💠ससाणा आणि कोकीळ💠*
••=✶✶=✹✹✹✹=✶✶=••➟
एक भुकेलेला ससाणा भक्ष्यासाठी फिरत असता त्याला एक कोकीळ सापडला. तो कोकीळ त्याला म्हणाला, 'भाऊ, मला सोड, मी इतका लहान आहे की मला खाल्ल्याने तुझं पोट नक्कीच भरणार नाही, मला सोडून देऊन माझे गाणे तासभर ऐकशील तर तुला आनंद होईल.' ससाणा म्हणाला, 'तू कितीही लहान असलास तरी माझ्यासारख्या भुकलेल्या प्राण्याला तुझ्या मासाचा बराच उपयोग होईल. शिवाय सापडलेला लहान पक्षी सोडून देऊन, मोठा पक्षी पकडण्याच्या नादी लागण्याइतका मी नक्कीच मूर्ख नाही.'
*_🌀तात्पर्य_ ::~*
*हातचे सोडून पळत्याच्या पाठीस लागणे हा मूर्खपणा होय.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] 🔷प्रेरणादायी विचार🔷*
====••◆◆●★●◆◆◆••====
01. ज्यांचा स्वाभिमान जिवंत आहे
तीच माणसे
*"संघर्षाची व्याख्या समजू शकतात.!*
ज्यांचा स्वाभिमान मेलेला आहे
ते आयुष्यभर इतरांचे
*"गुलाम"* बनुन जगतात..!
अशी *मेलेली* माणसे
कोणतेही मिशन चालवू शकत नाहीत..
तर *जिवंत* माणसे चालु मिशन
कधीही थांबु देत नाहीत..!"
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ] *🔴सामान्य ज्ञान🔴*
====••◆◆●★●◆◆◆••====
01. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*
◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑
✪ स्वतंत्र भारताचा पहिला व शेवटचा भारतीय गव्हर्नर जनरल कोण ?
➜ चक्रवर्ती राजगोपालचारी.
✪ सायमन कमिशन केव्हा नेमण्यात आले ?
➜ १९२७.
✪ आझाद हिंद सेनेची स्थापना कोठे करण्यात आली ?
➜ सिंगापूर.
✪ भारतामध्ये पाऊल ठेवणारा पहिला इंग्रज अधिकारी कोण ?
➜ थाॅमस स्टिव्हन्सन.
✪ रॅम्से मॅकडोनाॅल्ड यांनी जातीय निवाडा केव्हा जाहीर केला ?
➜ १९३२ मध्ये.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] 🔶थोरव्यक्ती परिचय🔶*
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••
01. *❒♦ग.दि. माडगूळकर❒*
━━•●◆●★★●◆●•═━
🔹जन्म नाव :~ गजानन दिगंबर
माडगूळकर
🔸टोपणनाव :~ गदिमा
*🔺जन्म :~ १ ऑक्टोबर १९१९*
शेटफळे, सांगली, महाराष्ट्र,
🔹मृत्यू :~ डिसेंबर १४, १९७७
पुणे, महाराष्ट्र, भारत
🔸कार्यक्षेत्र :~ साहित्य, चित्रपट
🔺साहित्य प्रकार :~ गीतरचना,
कथा, कादंबरी
🔹प्रसिद्ध साहित्यकृती :~
गीतरामायण
★ग. दि. माडगूळकर★
हे आधुनिक काळतील मराठी भाषेतील अग्रगण्य साहित्यिक होते. ग.दि. माडगूळकर हे गद्य व पद्य दोन्ही क्षेत्रात प्रसिद्ध आहेत. संत कवी नसले तरी त्यांचे गीत रामायण फार लोकप्रिय आहे. त्यांच्या गीत रामायणाने अखिल महाराष्ट्राला वेड लावले आहे. गदिमा भावकवीही आहेत. त्यांच्या काव्यावर संत काव्य आणि शाहिरी काव्य या दोन्हींचा प्रभाव जाणवतो. त्यांच्या लावण्या व चित्रपट गीतेही प्रसिद्ध आहेत.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★🔅★✹◑◎●••
*✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❂█║▌║█║▌
*❁मंगळवार~01/10/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
No comments:
Post a Comment