Ⓜ💲🅿 परिपाठ Ⓜ💲🅿
*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*
*💥🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀
*💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀
*💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
🔘 *"माझी शाळा"* 🔘
*ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
🔗🔗👇👇🔗🔗
https://goo.gl/RpQbsw
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *03. डिसेंबर:: मंगळवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
मार्गशीर्ष शू.२, पक्ष :शुक्ल पक्ष,
तिथि ~द्वितीया, नक्षत्र ~मूळ,
योग ~शूल, करण ~कौलव,
सूर्योदय-06:57, सूर्यास्त-17:59,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ] ❂ सुविचार ❂*
━┅═▣◆★✪★◆▣═┅━
03. *शञूची व रोगाची उपेक्षा करु नये.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ] ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●═━
03. आडात नाही तर पोहऱ्यात
कोठून येणार ?
★ अर्थ ::~ जर स्वत:जवळ एखादी वस्तू नसेल तर ती वस्तू दुसऱ्यास कशी देणार ?
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ] ❂ सुभाषीत ❂*
━┅═▣◆★✧★◆▣═┅━
03. *जयतु जयतु भारती ।*
⭐अर्थ ::~
भारतमातेचा विजय असो.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ] ❂ दिनविशेष ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●═━
🛡 ★ 03. डिसेंबर ★ 🛡
🔻===●●●★●●●===🔻
★ जागतिक विकलांग दिन
★ हा या वर्षातील ३३७ वा (लीप वर्षातील ३३८ वा) दिवस आहे.
~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●१९८४ : भोपाळ वायू दुर्घटना – भोपाळमधील ’युनियन कार्बाईड’ या कारखान्यातून मेथिल आयसोसायनेट या विषारी वायूची गळती होऊन सुमारे चौदाशे लोक लगेच मृत्युमुखी पडले तर नंतरच्या काही वर्षांत मृतांची एकूण संख्या सुमारे २०,००० इतकी झाली.
●१९७१ : पाकिस्तानने भारतावर हल्ला केला.
●१९६७ : डॉ. क्रिस्टियन बर्नार्ड यांनी दक्षिण अफ्रिकेतील केपटाऊन येथे जगातील पहिली मानवी हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी केली.
●१८२९ : लॉर्ड विल्यम बेंटिंग यांनी सतीच्या प्रथेवर बंदी घातली.
~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१८९२ : माधव केशव काटदरे – निसर्गकवी
◆१८८९ : खुदिराम बोस – क्रांतिकारक
◆१८८४ : डॉ. राजेन्द्र प्रसाद – भारताचे पहिले राष्ट्रपती
◆१८८२ : जगविख्यात चित्रकार नंदलाल बोस – श्री. बोस यांनी शांतिनिकेतनमधे सुमारे ३० वर्षाहून अधिक काळ अध्यापन करून अनेक चित्रकार तयार केले.
~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०११ : देव आनंद – चित्रपट अभिनेता व निर्माता
●१९७९ : मेजर ध्यानचंद – भारतीय हॉकीपटू
●१९५१ : बहिणाबाई चौधरी – कवयित्री. त्या निरक्षर होत्या. तथापि त्यांच्यापाशी जिवंत काव्यरचनेची प्रतिभा होती.
●१५५२ : सेंट फ्रान्सिस झेविअर – ख्रिस्ती धर्मप्रसारक. यांनी भारत व जपानमधे हजारो लोकांना ख्रिस्ती धर्माची दीक्षा दिली. गोव्यातील ’ओल्ड चर्च’मधे यांचेच शव अजून जपून ठेवण्यात आले आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..
https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ] ❂ देशभक्ती गीत ❂*
━┅═▣◆★✧★◆▣═┅━
03. *✸ एक सुराने गाऊ ✸*
●●●●००००००●●●●
हिंदू , मुस्लिम , बौद्ध , ख्रिस्तीअन , सीख आपण भाऊ
या देशाचे भविष्य घडवू , एक जुटीने राहू ll धृ ll
काश्मीर ठेवे भाल उंच ते नंदनवन ही साजे
जलधि मधे चरण टाकुनी , कन्याकुमारी विराजे
हिमालयाची ढाल घेवूनी , फडकत ठेवे बाहु ll १ ll
या देशाचे .....
लाल , बाळ अन् पालही लढले , लढली राणी झाशी
लढले गांधी भगतसिंगही , हासत गेले फाशी
जालियनवाला बाग घातली , रक्तामधे न्हावू ll २ ll
या देशाचे .....
कलाम अब्दुल , मनमोहनजी सकलां येथे संथी
महाराष्ट्राच्या प्रतिभा पाटील , गुजराथ मधले मोदी
मंदिर मस्जिद गुरुद्वारा अन् बौद्ध विहारी जावू ll ३ ll
या देशाचे .....
ऑगस्ट पंधरा घेवून येई , स्वातंत्र्याचा उत्सव
जानेवारीची सव्वीस करते , गणराज्याचा महोत्सव
सर्व धर्म समभाव जागवू ,
एक सुराने गावू ll ४ ll
या देशाचे ...
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ] ❂ प्रार्थना ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━
03. *❂ हे करुणाकरा ईश्वरा ❂*
━═●✶✹★✹✶●═━
हे करुणाकरा, ईश्वरा । कृपादान मज देई
तुजविण कोण निवारी संकट । दृढता ही तव पायी ॥
तूही आदि तू अनंत । तूही दु:स्तर भवनिधि तारक
तानसेन प्रभु तुम्ही उद्धरा ॥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ] ❂ बोधकथा ❂*
━═●🇲=◆🇸◆=🇵●═━
03. *❃❝ एकीचे बळ सर्वश्रेष्ठ ❞❃*
━━•●◆●★●◆●•═━
एका जातक कथेतील वर्णनानुसार वाराणसीलगत एका गावातील एक सुतार रोज जंगलात जात असे. एकदा त्याने खड्ड्यात पडलेल्या जंगली कुत्र्याच्या पिलाचा जीव वाचवला तेव्हापासून त्याला त्या पिलाचा लळा लागला. ते पिलू त्याला तेथे भेटत होते. ते पाहून इतरही जंगली कुत्रे त्याच्याजवळ येत असत. परंतु त्यांना सर्वांना एका वाघाने फार त्रस्त करून सोडले होते. तो रोज त्यांच्यावर हल्ले करत होता. सुताराने एक योजना बनविली. नेहमीप्रमाणे वाघ डोंगराच्या माथ्यावर आला. सर्व कुत्री वेगवेगळ्या ठिकाणी थांबून त्याच्यावर भुंकु लागली. वाघाने चवताळून एका कुत्र्यावर झेप घेतली तसा तो कुत्रा खाली बसला. वाघाची उडी थेट त्या कुत्र्याच्या मागे असणा या एका मोठ्या खड्ड्यात पडली. सगळ्या कुत्र्यांनी त्याच्यावर धाव घेतली व त्याच्यावर हल्ला करून त्याला ठार केले.
*🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
एकीचे बळ मोठे असते..
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━
03. *काही माणसे "श्रीमंतीला" सलाम करतात.. काही माणसे "गरिबीला" गुलाम करतात.. माञ... जी माणसं "माणुसकीला" प्रणाम करतात.. तीच माणसं खऱ्या "जीवनाचा" सन्मान करतात...*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ] ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━▣◆★✧★◆▣━┅━
03. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*
◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑
✪ धुळे जिल्ह्याचे विभाजन होऊन कोणता जिल्हा तयार झाला आहे ?
➜ नंदुरबार.
✪ गंधक या खनिजाचे उत्पादक राज्य कोणते ?
➜ हरियाणा.
✪ अहिल्याबाई होळकर यांचे जन्मस्थळ कोणते ?
➜ चौंडी.( अहमदनगर )
✪ इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या शहरात आहे ?
➜ दिल्ली.
✪ शिखांचा पवित्र आद्यग्रंथ कोणता ?
➜ गुरूग्रंथ साहेब.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●═━
03. *❒ खुदीराम बोस ❒*
━━═•●◆●★●◆●•═━━
●जन्म :~ ३ डिसेंबर १८८९ बहुवेनी, जिल्हा मेदिनीपूर, बंगाल
●मृत्यू :~ ११ ऑगस्ट १९०५
खुदीराम बोस भारतातील सर्वात तरुण वयाचा क्रांतिकारक म्हणून ओळखला जाणारा हा वीर वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी शहीद झाला. त्याचा जन्म बंगाल मधल्या मेदिनीपूर जिल्ह्यातल्या बहुवेनी या गावात दि. ३ डिसेंबर १८८९ ला झाला. त्याच्या लहानपणीच आई (लक्ष्मीप्रियादेवी) आणि वडील (त्रैलोक्यनाथ) यांचा मृत्यु झाल्याने त्याची मोठी बहीण अनुरूपादेवी आणि तिचे पती अमृतलाल यांनी त्याचे पालनपोषण केले.
बंगाल प्रांताचे विभाजन करण्याचे ब्रिटिश सरकारने १९०३ साली निश्चित केले. सर्वसामान्य लोकांमध्ये नाराजीची तीव्र लाट पसरली. खुदीरामलाही बंगालच्या फाळणीचा निर्णय अन्यायकारक वाटला, देशासाठी काहीतरी करावे असे सारखे वाटू लागल्याने त्याने सशस्त्र क्रांतीचा मार्ग पत्करला. सरकारच्या विरूद्ध आंदोलने करणार्यांना पकडून कठोर शिक्षा देण्यात येऊ लागल्या. यात प्रमुख असणार्या न्यायाधीश किंग्ज फोर्ड ला मारूनच सरकारचा विरोध करण्याचे पक्के करण्यात आले. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या आनंदमठ या कादंबरीतील वंदे मातरम या गीताने लोकांमध्ये नव संजीवनी पसरविली.
यातच खुदीरामने किंग्ज फोर्ड ला मारण्याची जबाबदारी स्वीकारली.
दि. ३० एप्रील १९०५ या दिवशी खुदीरामचा सहकारी प्रफुल्ल चक्रवर्ती याने किंग्ज फोर्ड याच्या गाडीवर एक बाँब फेकला, परंतु तो चुकून दुसर्याच एका गाडीवर पडला. त्या गाडीतील दोन महिला ठार झाल्या, किंग्ज फोर्ड मात्र बचावला. घटनेच्या दुसर्या दिवशी खुदीराम पकडला गेला तर प्रफुल्लने अटकेपूर्वीच आत्महत्या केली. खुदीरामवर खटला भरण्यात आला. त्याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा शाबीत झाल्याने त्याला दि. ११-०८-१९०५ या दिवशी फासावर जावे लागले. सशस्त्र क्रांतीत बाँबचा उपयोग करणारा खुदीराम पहिला क्रांतिकारक ठरला.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹✹★✹◑◎●••
*✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❂█║▌║█║▌
*❁मंगळवार~03/12/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
No comments:
Post a Comment