*07/10/24 सोमवारचा परिपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*
*Ⓜ💲🅿 परिपाठ Ⓜ💲🅿*
*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*
*💥🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀
*💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀
*💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
🔘 *"माझी शाळा"* 🔘
*ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
🔗🔗👇👇🔗🔗
https://goo.gl/RpQbsw
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *07.ऑक्टोबर:: सोमवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
आश्विन शु.४, पक्ष :शुक्ल पक्ष,
तिथि ~चतुर्थी, नक्षत्र ~अनुराधा,
योग ~प्रीति, करण ~विष्टि,
सूर्योदय-06:30, सूर्यास्त-18:21
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ] ❂ सुविचार ❂*
━┅═▣◆★✪★◆▣═┅━
07. *समाधानी राहण्यातच आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख आहे.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ] ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
07. *भरंवशाच्या म्हशीला टोणगा –*
★ अर्थ ::~ पूर्ण निराशा करणे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ] ❂ सुभाषीत ❂*
━┅═▣◆★✧★◆▣━┅━
07. *गुणै: गौरवमायाति ।*
⭐अर्थ ::~
गुणांनी (मनुष्याला) गौरव प्राप्त होतो.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ] ❂ दिनविशेष ❂*
━═●🇲=◆🇸◆=🇵●═━
🛡 ★ 07. ऑक्टोबर ★ 🛡
🔻===●●●★●●●===🔻
★ वन्य पशू दिन
★ हा या वर्षातील २८० वा (लीप वर्षातील २८१ वा) दिवस आहे.
~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००१ : सप्टेंबर ११ च्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने अफगाणिस्तानवर हल्ला चढवला.
●१९१९ : महात्मा गांधींनी ’नवजीवन’ हे वृत्तपत्र सुरू केले.
●१९०५ : पुण्यात विलायती कपड्यांची होळी करण्यात आली. परदेशी मालावर बहिष्कार घालण्यासाठी केलेला अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयत्न होता.
~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९६० : आश्विनी भिडे-देशपांडे – शास्त्रीय गायिका
◆१९५२ : व्लादिमीर पुतिन - रशियाचे ४ थे राष्ट्राध्यक्ष
◆१९१७ : विनायक महादेव तथा ’वि. म.’ कुलकर्णी – कवी आणि बालकुमार-साहित्यिक
◆१८८५ : नील्स बोहर – अणूचे अंतरंग स्पष्ट करणार्या शोधासाठी नोबेल पारितोषिक मिळवणारे डॅनिश पदार्थवैज्ञानिक
◆१८६६ : कृष्णाजी केशव दामले तथा ’केशवसुत’ – मराठी काव्याचे प्रवर्तक. त्यांच्या सुमारे १३५ कविता आज उपलब्ध आहेत.
~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९९ : उमाकांत निमराज ठोमरे – साहित्यिक, अनेकांना लिहिते करणारे, वाचकप्रिय ‘वीणा‘ या दर्जेदार मासिकाचे संपादक, बालसाहित्यकार
●१९९८ : भाऊसाहेब वर्तक – महाराष्ट्राचे महसूलमंत्री, पद्मश्री
●१९७५ : देवनहळ्ळी वेंकटरामनय्या गुंडप्पा तथा डी. व्ही. जी. – कन्नड कवी व विचारवंत
●१७०८ : गुरू गोविंद सिंग – शिखांचे १० वे गुरू
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..
https://goo.gl/GP1pTx
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫✫✪✫✪✫✪✪
*0६ ] ❂ देशभक्ती गीत ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━
07. *✸ जय भारता जय भारता✸*
●●●●००००००●●●●
जय भारता, जय भारता, जय भारती जनदेवता
जय लोकनायक थोर ते, जय क्रांतिकारक वीर ते
जय भक्त ते, रणधीर ते, जय आमुची स्वाधीनता
तेजोनिधी हे भास्करा, प्रिय पर्वता, प्रिय सागरा
तरूवृंद हो, हे अंबरा, परते पहा परतंत्रता
बलिदान जे रणि जाहले, यज्ञात जे धन अर्पिले
शतकात जे हृदयी फुले उदयाचली हो सांगता
ध्वज नीलमंडल हो उभा, गतकाल हा वितरी प्रभा
भवितव्य हे उजळी नभा, दलितांस हा नित् तारता
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ] ❂ प्रार्थना ❂*
━┅━▣◆★✧★◆▣━┅━
07. *❂ शुभंकरोति म्हणा ❂*
✶✶✹✹★●★✹✹✶✶
दिवा पाहुनी लक्ष्मी येते करू तिची प्रार्थना
शुभंकरोति म्हणा, मुलांनो, शुभंकरोति म्हणा
शुभंकरोति कल्याणम्, शुभंकरोति कल्याणम्
जेथे ज्योती तेथे लक्ष्मी
उभी जगाच्या सेवाधर्मी
दिशादिशांतुन या लक्ष्मीच्या दिसती पाउलखुणा
या ज्योतीने सरे आपदा
आरोग्यासह मिळे संपदा
शत्रुबुद्धिचा विनाश होता सौख्य मिळे जीवना
दिव्या दिव्या रे दीपत्कार
कानी कुंडल मोतिहार
दिव्यास पाहून नमस्कार हा रिवाज आहे जुना
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ] ❂ बोधकथा ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●━━
07. *❃❝ आरसा ❞❃*
━━•●◆●★●◆●•━━
एक गुरूंच्या घरी एक शिष्य मनोभावे गुरुंची सेवा करून शिक्षण घेत होता. त्याच्या या सेवेमुळे गुरु त्याच्यावर प्रसन्न होते. शिक्षण् पूर्ण झाल्यावर विद्यार्थी घरी जाण्यासाठी निघाला तेव्हा गुरुंकडे त्याने जाण्याची आज्ञा मागितली तेव्हा गुरुंनी त्याला आशीर्वाद म्हणून एक आरसा भेट दिला व सांगितले की, हा दिव्य आरसा दर्पण असून यात मानवी मनात चालणारे विचार प्रगट होऊन दिसतात. विद्यार्थी मोठा आनंदीत झाला. हा आरसा खरेच कार्य करतो की नाही याची शहानिशा करण्यासाठी त्याने लगेच आपल्या गुरुंसमोर हा आरसा धरला व गुरुंच्या मनात कोणते भाव आहेत, दुर्गुण आहेत हे पाहू लागला आणि गुरुंच्या समोर आरसा धरताच त्याच्या चेह यावरचा रंग पार उडाला कारण तो आरसा गुरुंच्या अंतकरणात मोह, अहंकार, क्रोध आदि विकार दाखवित होता. त्याला याचे फारच दुख झाले की आपण ज्या गुरुची मनोभावे पूजा केली, ज्यांना पूर्ण ईश्र्वराचा दर्जा दिला त्यांच्या मनातही विकार आहेत, ते सुद्धा मानवी विकारापासून अजून सुटलेले नाहीत याचे त्याला वैषम्य वाटले. तो गुरुंना काहीच न बोलता तो आरसा घेवून गुरुकुलातून निघाला, रस्त्यात भेटणा या प्रत्येकाच्या मनातील भाव पाहणे हे त्याचे कामच झाले होते. गावी परत जाताच त्याने आपल्या प्रत्येक परिचिताबरोबर हा प्रयोग करून पाहिला. त्याला प्रत्येकाच्या हृदयात कोणता ना कोणता दुर्गुण दिसून आला. शेवट त्याने आपल्या जन्मदात्या आई वडीलांच्या समोरही हा आरसा ठेवला. ते दोघेही पण त्यातून सुटले नाहीत. त्यांच्या हृदयात पण त्याला काही ना काही दुर्गुण दिसले. शेवटी या गोष्टीचा त्याला मनोमन राग आला व तो गुरुकुलातील गुरुंकडे धावला. गुरुंपाशी जाऊन मोठ्या विनम्रपणे तो म्हणाला,’’ गुरुदेव, मी आपण दिलेल्या या आरशातून प्रत्येकाच्या मनात, हृदयात, अंतकरणात डोकावून पाहिले आणि मला असे जाणवले की प्रत्येकाच्याच मनात काही ना काही विकार आहेच, काही ना काही दोष आहे. एखाद्याच्या मनात कमी तर कुणाच्या मनात जास्त असे विकार, दोष भरून राहिले आहेत. हे पाहून मी फार दुखी झालो आहे, कृपया मला मार्गदर्शन करा.’’ गुरुंनी काहीच न बोलता तो आरसा फक्त त्याच्याकडे केला आणि काय आश्र्चर्य त्याला त्याच्या मनाच्या प्रत्येक कोप यात राग, द्वेष, अहंकार, क्रोध, माया आदि दुर्गुण भरून राहिलेले दिसले. गुरुजी म्हणाले,’’ वत्सा, हा आरसा मी तुला तुझे दुर्गुण पाहून ते कमी करण्यासाठी दिला होता पण तू दुस यांचे दुर्गुण पाहत बसलास आणि नको तितका वेळ खर्च केलास, अरे याच कालात जर तू जर स्वतचे अवलोकन केले असते तर तुला तुझ्यातील दुर्गुण सुधारता आले असते. याच काळात तु एक असामान्य व्यक्ती झाला असता. मानवाची ही कमतरता आहे, कमजोरी आहे की तो दुस यातील दुर्गुण पाहत बसतो आणि स्वतला सुधारण्याचा प्रयत्नही करत नाही. हेच या आरशातून मला तुला शिकवायचे होते. जे तुला शिकता आले नाही.’’
*🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
आपण नेहमीच दुस या व्यक्तीचे दुर्गुण बघतो, त्यावर टीका करतो पण आपल्यातील दुर्गुणांवर आपले कधीच लक्ष जात नाही. कधीतरी जर आपण आत्मनिरीक्षण केले तर आपल्यालाही आपले दुर्गुण सापडतीलच.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━
07. आयुष्यात प्रत्येक व्यक्तिला किंमत द्या...!!
कारण या जगात उद्या काय होईल ते कोणालाच माहित नसते...!!
एकत्र येणे ही सुरवात, एकामेकांसोबत राहणे ही प्रगति...!!
आणि, *एकामेकांसोबत काम करणे म्हणजे यश....!!*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ] ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━▣◆★✧★◆▣━┅━
07. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*
◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑
✪ स्वातंत्र्यपूर्व काळात प्रतिसरकारची स्थापना कोणी केली ?
➜ क्रांतिसिंह नाना पाटील.
✪ इंग्लंडमध्ये इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली ?
➜ श्यामजी कृष्ण वर्मा.
✪ सतीची चाल बंद करणारा भारतातील ब्रिटिश गव्हर्नर कोण ?
➜ लाॅर्ड विल्यम बेंटींक.
✪ भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली ?
➜ गोपाळ कृष्ण गोखले.
✪ पंचशील तत्वाचे जनक म्हणून कोण ओळखले जातात ?
➜ पंडित जवाहरलाल नेहरू.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━═●🇲=◆🇸◆=🇵●═━
07. *❒ ♦नील्स बोर♦ ❒*
━━•●◆●★★●◆●•═━
●जन्म :~ ७ ऑक्टोबर १८८५
●मृत्यु :~ १८ नोव्हेंबर १९६२,
भौतिकशास्त्रज्ञ होते. आण्वीय संरचना आणि पुंजभौतिकी सिद्धान्त
★ नील हेनरिक डेव्हिड बोर ★
हे एक डॅनिश भौतिकशास्त्रज्ञ होते. आण्वीय संरचना आणि पुंजभौतिकी सिद्धान्त या विषयांत त्यांनी मूलभूत योगदान दिले. त्याबद्दल १९२२ मध्ये त्यांना भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले. बोर हे एक तत्त्वज्ञानी आणि वैज्ञानिक संशोधनाचे प्रवर्तक देखील होते.
बोरने कोपनहेगन विद्यापीठात इंस्टिट्यूट ऑफ थिअरेटिकल फिजिक्सची (आता तिला नील्स बोर इंस्टिट्यूट म्हटले जाते) स्थापना केली. तिथे हान्स क्रेमर्स, ऑस्कर क्लाइन, जॉर्ज द हेवेसी , वर्नर हायझेनबर्ग असे विद्यार्थी घडवले, आणि त्यांच्याबरोबर काम केले. झिर्कोनियम सारखे गुणधर्म असलेल्या नव्या मूलद्रव्याचे त्यांनी भाकीत केले. ते सिद्ध झाल्यावर त्याचे नाव कोपेनहेगनच्या लॅटिन नावावर आधारले असे हाफ्मियम ठेवले गेले. या मूलद्रव्याचा शोध कोपनहेगन येथे झाला म्हणून हे नाव. खुद्द बोरच्या नावावर बोरियम या मूलद्रव्याची नोंद आहे.
१९३० च्या दशकात बोर नाझीवादाने पिडलेल्या शरणार्थींना मदत करत असत. नाझींनी डेन्मार्क व्यापल्यानंतर बोरची जर्मन अणुबाँब प्रकल्पाच्या प्रमुखपदी असलेल्या वर्नर हायझेनबर्गबरोबर भेट झाली होती. सप्टेंबर १९४३ मधे त्यांच्या कानी आले की जर्मन्स त्यांना अटक करण्याच्या विचारात आहेत, तेव्हा ते स्वीडनला पळून गेले. तेथून त्यांची रवानगी ब्रिटनला करण्यात आली. त्यांनी ब्रिटिश ट्यूब अँलॉइज न्युक्लिअर प्रोजेक्टमधे भाग घेतला, आणि पुढे त्यांचा समावेश मॅनहटन प्रोजेक्टला जाणार्या ब्रिटिश चमूत झाला.
युद्ध संपल्यावर बोरने आण्विक ऊर्जेसंदर्भात आंतरराष्ट्रीय सहयोग व्हावा म्हणून प्रयत्न केले. CERN च्या आणि RisՓ डॅनिश अटॉमिक एनर्जी कमिशनच्या संशोधन संस्थेच्या स्थापनेमधे त्यांचा सहभाग होता. ‘नॉर्डिक इंस्टिट्यूट ऑफ थिअरिटिकल फिजिक्स’ या संस्थेचे ते १९५७ साली पहिले चेअरमन बनले.
नील बोरनी अणूच्या रचनेवर सिद्धान्त मांडला. त्यानी अर्नेस्ट रुदरफोर्ड यांच्या अणूच्या प्रतिकृतीमध्ये अामूलाग्र सुधारणा सुचवल्या व बोअरची अणूची प्रतिकृती जगासमोर ठेवली. पुंजयामिकीमधील कोपेनहेगन विवेचनची पायाभरणी करण्यात त्यांचा मोठा सहभाग होता.
अणुभोवती इलेक्ट्रॉन कण काही विशिष्ट कक्षांमधेच कोणतेही प्रकाशकिरण उत्सर्जित न करता फिरू शकतात, मात्र एका कक्षेमधून दुसर्या कक्षेत त्यांनी उडी घेतली तर प्रकाशकिरणांचे उत्सर्जन होते हे बोर यांच्या आण्वीय संरचना सिद्धांताचे मूलभूत तत्त्व आहे. या सिद्धांताचे संपूर्ण स्पष्टीकरण पुढे श्रॉडिंजर-हायझेनबर्ग-डिरॅक-पाउली वगैरे बोरच्या शिष्यांनी विकसित केलेल्या पुंजयामिकीने दिले. हे शोधून काढण्यासाठी बोरने ‘बोर्स क्लाऊड चेंबर’ नावाचे उपकरण वापरले.
बोरचे पुंजयामिकीला योगदान म्हणजे त्यांनी मांडलेले परस्परपूरकतेचे तत्त्व. एकाद्या पादार्थिक अवस्थेचे वर्णन वरकरणी परस्परविरोधी भासणार्या कणकल्पना आणि तरंगकल्पना अशा संकल्पनांच्या मदतीने करता येते, तेव्हा या कल्पना परस्परविरोधी नसून परस्परपूरक असतात असे मानणे आवश्यक आहे. बोरच्या विज्ञान आणि तत्त्वविचारात परस्परपूरकता वारंवार डोकावते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★★✹◑◎●••
*✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❂█║▌║█║▌
*❁सोमवार ~07/10/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
No comments:
Post a Comment