"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

7/12/24 शनिवारचा परिपाठ

Ⓜ💲🅿 परिपाठ Ⓜ💲🅿

*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*

 *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

 *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

 *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
       🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

https://goo.gl/RpQbsw
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]    ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *07. डिसेंबर:: शनिवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
मार्गशीर्ष शू.६, पक्ष :शुक्ल पक्ष,
तिथि ~षष्ठी, नक्षत्र ~धनिष्ठा,
योग ~व्याघात, करण ~तैतिल,
सूर्योदय-06:58, सूर्यास्त-18:00,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]   ❂ सुविचार ❂*
  ━┅═▣◆★✪★◆▣═┅━

07. *माणुसकीची वाढ म्हणजे सुधारणा.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*
━═●🇲=◆🇸◆=🇵●═━

07. *मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही*
  ★ अर्थ ::~ प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय कळत नाही
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━

07. *सहसा विदधीत न क्रियाम् अविवेकः परमापदां पदम्*
           ⭐अर्थ ::~
    कोणतीही गोष्ट सारासार विचार न करता एकाएकी करू नये. अविवेक हा मोठ्या संकटांना कारणीभूत होतो.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

    🛡 ★ 07. डिसेंबर ★ 🛡
🔻===●●●★●●●===🔻
★ भारतीय सेना ध्वज दिन
★ हा या वर्षातील ३४१ वा (लीप वर्षातील ३४२ वा) दिवस आहे.
★ International Civil Aviation Day

   ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°•••◆•••°°~°°•••🔹
●१९९८ : ७२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कवी वसंत बापट यांची निवड
●१९९५ : फ्रेन्च गयानातील कोऊरू प्रक्षेपण केन्द्रावरुन ’इन्सॅट-२सी’ या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण
●१९९४ : कन्‍नड साहित्यिक यू. आर. अनंतमूर्ती यांना ज्ञानपीठ पारितोषिक जाहीर
●१९४१ : दुसरे महायुद्ध – जपानने पर्ल हार्बरवर तुफानी हल्ला केला.

    ~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९५७ : जिऑफ लॉसन – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू
◆१९२१ : प्रमुख स्वामी महाराज – स्वामीनारायण पंथातील अध्यात्मिक गुरू
◆१९०२ : जनार्दन ग्यानोबा तथा ‘जे. जी.‘ नवले – भारतीय कसोटी क्रिकेट संघाचे पहिले यष्टिरक्षक

      ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९७ : ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी शांतानंद सरस्वती यांचे अलाहाबाद येथील अलोपी आश्रमात निधन
●१९८२ : बाबूराव विजापुरे – संगीतशिक्षक
●१९७६ : डॉ. गोवर्धनदास पारिख – विचारवंत आणि शिक्षणतज्ञ
●१९४१ : भास्कर रामचंद्र तथा भा. रा. तांबे – कवी
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
  ━┅━▣◆★✧★◆▣═┅━

07. *✸ उठा राष्ट्रवीर हो ✸*
     ●●●●००००००●●●●
सुसज्ज व्हा उठा चला, सशस्‍त्र व्हा उठा चला, उठा राष्ट्रवीर हो

युद्ध आज पेटले, जवान चालले पुढे
मिळुन सर्व शत्रूला क्षणात चारुया खडे
एकसंघ होऊनी लढू चला, लढू चला
उठा उठा, चला चला

वायुपुत्र होऊनी धरू मुठीत भास्करा
होऊनी अगस्तीही पिऊन टाकू सागरा
रामकृष्ण होऊ या, समर्थ होऊ या चला
उठा उठा, चला चला

चंद्रगुप्‍त वीर तो फिरुन आज आठवू
शूरता शिवाजीची नसानसांत साठवू
दिव्य ही परंपरा अखंड चालवू चला
उठा उठा, चला चला

यज्ञकुंड पेटले प्रचंड हे सभोवती
दुष्ट शत्रू मारुनी तयात देऊ आहुती
देवभूमी ही अजिंक्य दाखवू जगा चला
उठा उठा, चला चला
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      ❂ प्रार्थना ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━

07.  *❂ तुम्ही हो माता ❂*
       ✶✶✹✹★●★✹✹✶✶
तुम्ही हो माता, पिता तुम्ही हो, तुम्ही हो बंधु, सखा तुम्ही हो...
तुम्ही हो माता, पिता तुम्ही हो, तुम्ही हो बंधु, सखा तुम्ही हो...

तुम्ही हो साथी, तुम्ही सहारे, कोई न अपना, सिवा तुम्हारे...
तुम्ही हो साथी, तुम्ही सहारे, कोई न अपना, सिवा तुम्हारे...
तुम्ही हो नैया, तुम्ही खिवैया, तुम्ही हो बंधु, सखा तुम्ही हो...
तुम्ही हो माता, पिता तुम्ही हो, तुम्ही हो बंधु, सखा तुम्ही हो...

जो खिल सके न, वो फूल हम हैं, तुम्हारे चरणों की, धूल हम हैं...
जो खिल सके न, वो फूल हम हैं, तुम्हारे चरणों की, धूल हम हैं...
दया की दृष्टि सदा ही रखना, तुम्ही हो बंधु, सखा तुम्ही हो...
तुम्ही हो माता, पिता तुम्ही हो, तुम्ही हो बंधु, सखा तुम्ही हो...
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    ❂ बोधकथा ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●═━

07.  *❃❝ "मी"चा त्याग ❞❃*
     ━━═•●◆●★●◆●•═━━
     एका विख्‍यात संताला भेटण्‍यासाठी एक राजा आला आणि म्‍हणाला,’’ तुम्‍ही मला त्‍या स्थितीमध्‍ये घेऊन जा, ज्‍या स्थितीमध्‍ये तुम्‍ही आहात.’’ संताने म्‍हटले,’’ महाराज मी तुम्‍हाला त्‍या अवस्‍थेत निश्र्चित घेऊन जाईन, पण माझी एक अट आहे. उद्या पहाटे चार वाजता तुम्‍ही एकटे माझ्या कुटीवर या.’’ राजा म्‍हणाला,’’ ठीक आहे.’’ दुस-या दिवशी पहाटे राजा कुटीवर आला, राजाने कुटीच्‍या दारापाशी येताच संताच्‍या नावाने हाक मारली. त्‍याबरोबर आत जागे असणा-या संतांनी विचारले की कोण आले आहे, राजाने सांगितले,’’ मी राजा आलो आहे’’ संतांनी सांगितले की उद्या या. राजाला विचित्र वाटले पण तो तेथून निघून गेला. दुस-या दिवशी पहाटे चार वाजता राजा एकटा पुन्‍हा कुटीपाशी गेला, त्‍याने हाक मारली, संतांनी तोच प्रश्र्न विचारला, राजाने यावेळी उत्तरात सुधारणा केली कारण मी राजा आलो आहे हे वाक्य संतांना आवडले नसेल म्‍हणून राजाने सांगितले,’’ मी आलो आहे’’ संतांनी सांगितले, उद्या या. तिसरे दिवशी राजा पुन्‍हा गेला, दोन दिवसांप्रमाणेच घडले यावेळी राजाने उत्तर दिले, ‘’मी आहे’’ संतानी पुन्‍हा उद्या या असे सुनावले. राजा चौथ्‍या दिवशी मात्र विचारात पडला आता जावे की नको कारण संत काहीही उत्तर दिले हाकलून देतात, त्‍यापेक्षा न जाणेच बरे या विचारात होता. मात्र आता तीन दिवस हाकलून दिले आहे, आता चौथ्‍या दिवशी जाऊन बघु. चौथ्‍या दिवशी पण राजा गेला, त्‍याने संतांच्‍या नावाने हाक मारली, संतांनी आतूनच विचारले, कोण आहे, मात्र यावेळी राजाला काय उत्तर द्यावे हे सुचले नाही. तो गप्प राहिला. मग काही क्षणातच आतून संत बाहेर आले, त्‍यांनी राजाला जवळ घेतले, घट्ट मिठी मारली आणि म्‍हणाले, ‘’राजन तुम्‍ही परीक्षेत उत्तीर्ण झालात, पहिले तीन दिवसात तुमच्‍या उत्तरात तुम्‍ही ‘मी’ आलो असे उदगार काढले पण मी तर तुम्‍हाला एकट्यानेच बोलावले होते.तूम्ही तुमच्या "मी"पणाला बरोबर घेऊन आलात.मानवी जीवनात या "मी"पणाला काहिही स्थान नाही."मी" पणा सोडला की खूप काही शिकावयास मिळते.

         *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
   मानवाने "मी"पणा सोडल्यास खूप काही प्राप्त होते."मी"पणाचा मृत्यू ज्या दिवशी मानवातून होतो,तो त्या दिवशी संतत्वाकडे वाटचाल करु लागतो.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━

07. *प्रगती करत असताना अंगी,मेहनत आणि धाडस असायला हवं. त्यासाठी वेगळा काही करण्याची गरज नाही. बेधडक आणि प्रामाणिक पणे मेहनत केली की प्रगती नक्कीच होते...!*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━

07. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*
   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑
✪ अंधार कोठडीची घटना कोठे घडली होती ?
  ➜ कलकत्ता.

✪ 'पंचशील' करार कोणत्या दोन देशांत घडून आला ?
  ➜ चीन - भारत.

✪  'सायमन कमिशन' भारतात कधी आले होते ?
➜ १९२८.

✪ 'गोवा' हे राज्य स्वतंत्र होण्यापूर्वी कोणाच्या अधिपत्याखाली होते ?
  ➜ पोर्तुगीज.

✪ ' चिपको' आंदोलन कशासाठी आहे ?
  ➜ वृक्ष आणि वन संरक्षण.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━═●🇲=◆🇸◆=🇵●═━

07. *❒ ♦ भा. रा. तांबे♦ ❒* 
     ━═•●◆●★●◆●•═━
●जन्म :~ २७ ऑक्टोबर १८७३
*●मृत्यू :~ ७ डिसेंबर १९४१*

★भास्कर रामचंद्र तथा भा. रा. तांबे★

    अर्वाचीन मराठी कवींमधील एक मान्यताप्राप्त कवी. ते ग्वाल्हेर संस्थानाचे ’राजकवी’ होते. ’तांबे यांची समग्र कविता’ या ग्रंथात त्यांची कविता प्रकाशित झाली आहे. त्यांना आधुनिक मराठीतील गीतकाव्याचे प्रवर्तक मानण्यात येते.

■त्यांच्या काही प्रसिध्द कविता■
जन पळभर म्हणतिल हाय हाय!
नववधू प्रिया मी बावरते
कळा ज्या लागल्या जीवा
मावळत्या दिनकरा
तिन्ही सांजा सखे मिळाल्या
भा. रा. तांबे हे मराठी काव्य सृष्टीमध्ये फुललेले, व रसिकतेला आपल्या हजारो नवकल्पनांच्या पाकळ्यांनी भुरळ पाडणारे विलोभनीय व सप्तरंगी कमळ होते. मृत्यूसारख्या धीरगंभीर व अथांग अशा खोल विषयाला कल्पक शब्दरचनांच्या शृंखलांमध्ये बांधण्याचा प्रयत्न त्यांच्या कवितांनी केला. मृत्यू या शब्दाबद्दल पहिल्यापासून, त्यांना कसले तरी सुप्त आकर्षण होते. मृत्यूविषयी आतुरता,  असाहाय्यता, निराशा, वात्सल्य, भय, निराशा, साशंकता, अनामिक खिन्नता अशा विविध भावनांची चित्रे शब्दकुंचल्याने रंगवित, तांबे मृत्यूच्या स्वागतासाठी स्वतःला तयार करत गेलेले दिसतात. मृत्यूविषयीच्या त्यांच्या कविता इतक्या करूणसुंदर आहेत, की प्रत्यक्ष मृत्यूलाही पाझर फुटावा! म्रूत्यू म्हणजे परमेश्वरभेटीचे एक माध्यम असल्याचे त्यांनी मानले. आजचा दिवस हा आपल्या आयुष्यातला शेवटचा दिवस आहे असे समजून स्वतःचा आणि इतरांचा प्रवास सुखकर कसा होईल ह्यासाठी प्रयत्न करावा असे त्यांनी नेहमी सुचविले
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹✹★✹◑◎●••
           *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❂█║▌║█║▌

*❁शनिवार ~ 07/12/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment