"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

*07/11/18 बुधवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*🌅 _महाराष्ट् शिक्षक पॅनल_* 🌅
 ━━═•●◆●★❂★●◆●•═━━
*Ⓜ💲🅿 _परीपाठ_ Ⓜ💲🅿*
====●●●★♦★●●●====

*❂ दिनांक:~ 07/11/2018 ❂*
       *🔘 वार ~ बुधवार 🔘*
*⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘*

  *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

    *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

  *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*

  *💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
       🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

https://satishborkhade.blogspot.in/?m=1
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]   ❂ आजचे पंचाग ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

🍥 *07. नोव्हेंबर:: बुधवार* 🍥
 ━━═•●◆❃★❂★❃◆●•═━━
             आश्विन अमावस्या
      लक्ष्मीपूजन,  नक्षत्र : स्वाति,
योग : आयुष्यमान, करण : चतुष्पाद,
सूर्योदय : 06:41, सूर्यास्त : 18:03,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]    ❂ सुविचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

07. *सत्तेपूढे शहाणपण चालत नाही.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

07. *कामापुरता मामा –*
  ★ अर्थ ::~ काम साधण्यापुरते गोड बोलणे
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

07. *विद्याधनं सर्वधनप्रधानम् ।*
             ⭐अर्थ ::~
 विद्याधन हे सर्व धनांमध्ये श्रेष्ठ होय
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

   🛡 ★ 07. नोव्हेंबर ★ 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★हा या वर्षातील ३११ वा (लीप वर्षातील ३१२ वा) दिवस आहे.

        ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
 🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●२००१ : बेल्जियमची राष्ट्रीय विमान वाहतुक कंपनी ’सबीना’ (SABENA) दिवाळखोरीत गेली.
●१९९० : मेरी रॉबिन्सन या आयर्लंडच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष बनल्या.
●१९५१ : एम. पातंजली शास्त्री यांनी भारताचे २ रे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

    ~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९५४ : कमल हासन – अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक, पटकथालेखक
◆१९१५ : गोवर्धन धनराज पारिख – महाराष्ट्रातील विचारवंत व शिक्षणतज्ञ
◆१८८८ : *सर चंद्रशेखर वेंकट रमण* – नोबेल पारितोषिक विजेते भारतीय भौतिकशास्त्रज्ञ
◆१८८४ : डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे – क्रांतिकारक, विद्वान, कृषीतज्ञ, इतिहासकार आणि ’गदर पार्टी’ चे शिल्पकार
◆१८६७ : मेरी क्यूरी – नोबेल पारितोषिक विजेत्या पोलिश-फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ
◆१८५८ : बिपिन चंद्र पाल – ’लाल-बाल-पाल’ या त्रयीतील स्वातंत्र्यसेनानी

      ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
 🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००९ : सुनीता देशपांडे – लेखिका व स्वातंत्र्यसैनिक
●२००० : सी. सुब्रम्हण्यम – गांधीवादी नेते, केन्द्रीय मंत्री व महाराष्ट्राचे राज्यपाल
●१९९८ : पं. जितेंद्र अभिषेकी – शास्त्रीय गायक, संगीतकार व शास्त्रीय संगीताचे अभ्यासक
●१९०५ : कृष्णाजी केशव दामले तथा ’केशवसुत’ – मराठी काव्याचे प्रवर्तक.
●१८६२ : बहादूरशहा जफर – दिल्लीचा शेवटचा बादशहा
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
ొొొొొొొొొొొొొొొొొొొొొొొొొొ
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
 वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
  ━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

07.    *★ भारत देश महान ★*
        ●●●●●००००००●●●●●
भारत देश महान अमुचा भारत देश महान
स्फूर्ती देतिल हेच आमुचे राम कॄष्ण हनुमान॥धृ॥

व्यासादिक मुनिवरे गाइला
संत महंते पावन केला
प्रताप शिवबाने गाजविला
सुखसमृध्दिनिधान॥१॥

चिंतनि इतिहासाच्या दिसती
असंख्य नरवीरांच्या ज्योती
गाता स्वतंत्रतेची किर्ती
घडवू नव संतान॥२॥

धर्मासाठी जीवन जगणे
समष्टिमध्ये विलीन होणे
सीमोल्लंघन दुसरे कसले
यासाठी बलिदान॥३॥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      ❂ प्रार्थणा ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

07. *❂अजाण आम्ही तुझी लेकरे❂*
     ━━═●✶✹★●★✹✶●═━━
अजाण आम्ही तुझी लेकरे तू सर्वांचा पिता
नेमाने तुज नमितो, गातो तुझ्या गुणांच्या कथा

सूर्यचंद्र हे तुझेच देवा, तुझी गुरेंवासरें
तुझीच शेते, सागर, डोंगर, फुले, फळे, पाखरे

अनेक नावे तुला तुझे रे दाही दिशांना घर
करिशी देवा सारखीच तू माया सगळ्यांवर

खूप शिकावे, काम करावे, प्रेम धरावे मनी
हौस एवढी पुरवी देवा हीच एक मागणी
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    ❂ बोधकथा ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

07.  *❃❝ संस्काराचे बीजे ❞❃*
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
    एका छोट्या गावची गोष्ट आहे. त्या गावातील एका शाळेमधील छोट्या मुलाची गोष्ट आहे. एकदा एका मुलाने वर्गातील मुलाचे पुस्तक चोरले. घरी येउन त्याने ते पुस्तक आईला दाखविले. त्याच्या आईने त्याला ओरडण्याऐवजी त्याला ते पुस्तक स्वत :कडेच ठेवायला सांगितले. त्या मुलाला वाटले की, चोरी करण्यात काहीच चूक नाही. कारण त्याच्या आईनेच त्याला प्रोत्साहन देत होती. थोड्याच दिवसात त्याने कपडे चोरले. ते त्याने आईला दाखवले. आईने त्याला रागवायचं सोडून त्याचे पुन्हा खूप कौतुक केले. काही वर्षांनी मुलगा मोठा झाला.पण त्याची चोरी करण्याची सवय गेली नाही. पुढे तो मोठ-मोठ्या वस्तू चोरायला लागला. तो मोठा चोर बनला. पण एक दिवस तो एका चोरीमध्ये त्याला पोलिसाने पकडला गेला. पोलीस जेव्हा त्याला जेलमध्ये घेऊन जात असताना तेव्हा त्याची आई रडायला लागली. आईला रडताना पाहून तो मुलगा पोलिसांना म्हणाला, मला माझ्या आईला काहीतरी सांगायचे आहे. तो आईच्या कानाजवळ गेला आणि कानाला कचकन चावला. त्याचे असे वागणे पाहून त्याच्या आईला खूप आश्चर्य वाटले आणि रागही आला. आईने त्याला एक थोबाडीत मारली. मुलगा त्याच्या आईला म्हणाला,हीच थोबाडीत जर तू मला पहिल्यांदा पुस्तक चोरलं होतं तेव्हा मारली असतीस तर आज ही वेळ आली नसती. मुलाने बरोबर म्हटले होते. आईनेच त्याला चोर बनवले होते.

      *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
संस्काराचे बीजे लहानपाणीच पेरले जातात.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

07. *माणूस इतर गोष्टीत कितीही कच्चा असला तरी चालेल, पण तो माणुसकी मध्ये पक्का असला पाहिजे...!!*

   *पद महत्त्वाचे नसते,आपल्या विचारांची गुणवत्ता महत्वाची असते..*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

07. *✿ चालू घडामोडी 2017 ✿*
       ◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑
1) राज्याचे मुख्य सचिव =
    ➜ स्वाधीन क्षेत्रिय

2) राज्याचे लोकायुक्त =
    ➜ मदनलाल टहलियानी

3) उपलोकायुक्त =
    ➜ जॉनी जोसेफ

4) पोलीस महासंचालक =
    ➜ सतीश माथुर (40 वे )

5) मुंबई पोलीस आयुक्त =
    ➜ दत्तात्रय पडसलगीकर
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

07 . *❒ चंद्रशेखर वेंकट रामन ❒* 
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
*डॉ. सी. व्ही. रमण यांना मानाचा मुजरा..!! भारत व्हावा विज्ञाननिष्ठ!*
●जन्म :~ ७ नोव्हेंबर १८८८
       तिरुचिरापल्ली, तामिळनाडू
●मृत्यू :~ २१ नोव्हेंबर १९७०
       बंगळूर, कर्नाटक, भारत
🔸कार्यक्षेत्र :~ भौतिकशास्त्र
🔹ख्याती :~ रामन् परिणाम

            ★पुरस्कार :~ ★
   🔺भौतिकशास्त्राचे  नोबेल,
               🔺भारतरत्न,
    🔺लेनिन शांतता पारितोषिक

      ◆ चंद्रशेखर वेंकट रामन् ◆
    हे प्रसिद्ध भारतीय भौतिकशास्त्रज्ञ होते. रामन् यांचा जन्म तिरुचिरापल्ली आणि शिक्षण चेन्नई येथे झाले. त्यांनी कोलकाता विद्यापीठात १९१७-१९३३ भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केले. रामन्‌ हे काही काळ बंगलोरातही होते, १९४७ साली ते रामन संशोधन संस्थेचे संचालक झाले.

              ◆ संशोधन ◆
     🔶त्यांच्या रामन परिणाम (प्रकाशाचे मॉलिक्युलर स्कॅटरिंग) याशोधासाठी ते ओळखले जातात. १९३० चे भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक रामन् यांना मिळाले होते.

    ◆काय आहे हा रामन परिणाम?◆
    प्रकाश किरणांमध्ये वातावरणातील विविध कणांमुळे किंवा मूलद्रव्यामुळे प्रकाशाच्या तरंगलांबीमध्ये बदल होतो. जेव्हा प्रकाशाचे किरण कणरहित पारदर्शक रासायनिक मूलद्रव्यामधून प्रवास करतो, त्या वेळी प्रकाशाच्या किरणांच्या दिशांमध्ये बदल होतो. त्यातील अधिक प्रमाणातील प्रकाशाची तरंगलांबी बदलत नाही. त्यातील काही किरणांची तरंगलांबी मूळ प्रकाश किरणापेक्षा वेगळी असते. याला "रामन परिणाम" या नावाने ओळखले जाते.

              ◆ सन्मान ◆
   🔷चंद्रशेखर वेंकट रामन यांच्या सन्मानार्थ भारतात दरवर्षी २८ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो. याच तारखेला रामन यांनी त्यांचा शोधनिबंध नेचर या मासिकात प्रसिद्धीसाठी पाठवला होता.

    🔶सर सी. व्ही रामन यांच्या नावाने रँचो (रिसर्चर्स ॲन्ड नॅचरली क्लेव्हर ह्युमन ऑर्गनायझेशन) नावाची पुण्याची संस्था इ.स. २०११ सालापासून दरवर्षी डिसेंबरमध्ये ’सर सी.व्ही. रामन पुरस्कार’ देत असते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
            *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
 *✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌

*◆ बुधवार ~ 07/11/2018 ◆*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment